एडिटर्स चॉईस ⋆ MARATHI STOCK https://marathistock.com वित्तंबातमी, वित्तसाक्षरता ! Tue, 19 Nov 2024 14:53:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://marathistock.com/wp-content/uploads/2024/08/cropped-android-chrome-512x512-1-32x32.png एडिटर्स चॉईस ⋆ MARATHI STOCK https://marathistock.com 32 32 साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=elcid-investments-in-marathi https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html#respond Fri, 01 Nov 2024 18:38:56 +0000 https://marathistock.com/?p=2606 परवा 29 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग स्टॉक्स पाहत असताना एका स्टॉक्सने लक्ष वेधून घेतले, ऑल टाइम हाय गाठणाऱ्या स्टॉक्सच्या कॅटेगरीमध्ये दिसणाऱ्या या स्टॉक्सने त्या एकाच दिवशी तब्बल 69 हजार पट वाढ नोंदवली होती. थोडं चक्रावूनच गेलो, पण त्यानंतर थोडं शोध घेतल्यावर एकंदरीत प्रकरण लक्षात आलं. कारण एव्हाना बातम्या, अलर्टस येऊ लागली होती. ‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid […]

The post साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. appeared first on MARATHI STOCK.]]>
परवा 29 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग स्टॉक्स पाहत असताना एका स्टॉक्सने लक्ष वेधून घेतले, ऑल टाइम हाय गाठणाऱ्या स्टॉक्सच्या कॅटेगरीमध्ये दिसणाऱ्या या स्टॉक्सने त्या एकाच दिवशी तब्बल 69 हजार पट वाढ नोंदवली होती. थोडं चक्रावूनच गेलो, पण त्यानंतर थोडं शोध घेतल्यावर एकंदरीत प्रकरण लक्षात आलं. कारण एव्हाना बातम्या, अलर्टस येऊ लागली होती.

‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) हे त्या कंपनीचे नाव आहे. पण असं नक्की काय झालं होतं की जवळपास ₹3.59 किंमत नोंदला गेलेला या कंपनीचा शेअर अगदी काही क्षणांत कोणत्याही मर्यादेविना ₹2,36,250.00 पर्यंत गेला. ज्यामुळे त्याने भारतीय स्टॉक मार्केटमधील सर्वात महागडा शेअर बिरुद असलेल्या MRF लाही मागे टाकलंय. त्यानंतर काल हा शेअर आणखी वर जाऊन ₹2,48,062 वर पोहोचलाय. पण गंमतीचा भाग म्हणजे, आजही पुस्तकी मूल्यानुसार हा शेअर स्वस्तच आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही, ‘स्वस्त!’ या उच्चांकी उसळीमागील कारणही या शेअरच्या नियमापेक्षा जास्त ‘स्वस्त’ असण्यामध्येच दडलेलं आहे.

हे झालं एका विशेष लिलावाच्या आयोजनामुळे,

अनेकदा असं होतं की एखाद्या शेअरची किंमत त्याच्या मुलभूत निकषांवर पाहिल्यास वाजवी नसते, या शेअरबाबतही असंच होतं. आधी या शेअरची किंमत 3.59 रुपये होती, तर पुस्तक मूल्य मात्र प्रति शेअर 4 लाख रुपयांपेक्षा अधिक दिसत होतं. म्हणजे पुस्तकी मूल्यानुसार पाहायला गेलं तर शेअरची किंमत योग्य गुणोत्तरात नव्हती.

असं का ?

‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) ही बाजारात एक सूचीबद्ध कंपनी असली तरी ती एक होल्डिंग कंपनी म्हणून वर्गीकृत आहे, जिची कमाई प्रामुख्याने गुंतवणुकीवरील व्याज आणि लाभांशातून येते. होल्डिंग कंपन्यांचे शेअर्स बहुतेक वेळा सवलतीच्या (डिस्काउंट) दरात व्यवहार करतात आणि अल्साइडच्या बाबतीतही असेच होते. अशा शेअरबाबत असणारी बाजारातील अत्यंत कमी तरलता आणि 5% दैनंदिन किमतीची मर्यादा या शेअर्सच्या किमती कमी राहतात. म्हणजेच भोवतालच्या नियम आणि परिस्थितीवश योग्य ती किंमत प्राप्त न होत नाही.
हे लक्षात घेऊन अशा कंपन्यांना त्यांचे वाजवी मूल्य प्राप्त होण्यासाठी काही पाऊले उचलणे आवश्यक होते, ज्याचा विचार करून सेबीने या कंपन्यांना एक विशेष लीलावाद्वारे आपले वाजवी मूल्य प्राप्त करू घेण्याची संधी दिली. म्हणजेच या लिलावाद्वारे या कंपन्यांच्या खऱ्या किंमतीचा शोध घेतला जातो.

काय आहे हा विशेष लिलाव?

SEBI ने जून 2024 मध्ये एक परिपत्रक काढले आहे ज्या अंतर्गत गुंतवणूक (होल्डिंग) कंपन्यांसाठी वाजवी मूल्य निश्चित करण्याच्या मार्गात सुधारणा करण्यासाठी विशेष लिलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. SEBI ने निरीक्षण केले की अशा अनेक कंपन्या त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी व्यवहार करत आहेत, म्हणून त्यांच्यात गुंतवणुक वाढवण्यासाठी एका लिलावाची (ऑक्शन) योजना आणली. ज्यामध्ये शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणत्याही मर्यादेचा अडसर नसेल. यानुसारच 29 ऑक्टोबर रोजी हे लिलाव आयोजीत करण्यात आले होते, ज्यानुसार या शेअर्समध्ये उसळी दिसून आली. लक्षात घ्या ही अशा शेअर्ससाठी एकप्रकारे रिलिस्टिंग म्हणजे पुनर्सूचीबद्ध होण्याची प्रक्रिया असते.

पण विश्लेषकांच्या मते अल्साइडच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीनंतरही कंपनीचे शेअर्स अजूनही 0.38 च्या कमी प्राइस-टू-बुक रेशोवर व्यवहार करत आहेत. कारण कंपनीत प्रवर्तकांकडे 75% हिस्सा असून बाजारात अपेक्षित असणारे फ्री फ्लोट हिस्सेदारी कमी आहे, त्यामुळे योग्य मूल्यासाठी अधिक तरलता आवश्यक आहे. कारण तरलता नसल्याने अल्साइड इन्वेस्टमेंट च्या शेअर्समध्ये शेवटचे व्यवहार याआधी 21 जून 2024 रोजी झाले होते ज्यावेळी अवघे 500 शेअर्स मध्ये व्यवहार झाले होते.

फक्त एल्साइड इन्वेस्टमेंटसाठीच साठीच हा लिलाव आयोजित करण्यात आला होता का?

नाही, पिलानी इन्व्हेस्टमेंट्स, कल्याणी इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र स्कूटर्ससारख्या इतर होल्डिंग कंपन्यादेखील यात सहभागी झाल्या, परंतु त्यांच्या किमतींमध्ये फारसा बदल झाला नाही.

विशेष लिलाव कसे कार्य करते?

हा लिलाव वर्षातून एकदा होतो, ज्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस दिली जाते. लिलावात शेअरची योग्य ती किंमत यशस्वीरित्या शोधण्यासाठी किमान पाच भिन्न खरेदीदार आणि विक्रेते असणे आवश्यक असते. पहिल्या दिवशी किंमत निश्चित न झाल्यास, योग्य किंमत मिळेपर्यंत दुसऱ्या दिवशीही हा लिलाव सुरू राहतो.

असो, जाता-जाता आणखी एक महत्वाचं, एक गुंतवणूकदार कंपनी असल्याने या एल्साइड इन्वेस्टमेंटची ‘Asian Paints’ मध्ये 1.28% हिस्सेदारी आहे, ज्याचे मूल्य रु. 3,616 कोटी आहे, जे ‘Elcid’ च्या स्वतःच्या एकूण बाजार भांडवलाच्या 80% आहे.

The post साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html/feed 0
डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=how-to-make-money-with-digital-marketing https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html#respond Wed, 28 Jun 2023 14:50:58 +0000 https://marathistock.com/?p=2408 आज 28 जून 2023 रोजी आमच्या  @marathistock ट्विटर खात्यास पाच वर्षे पूर्ण झाली. पाच वर्षापूर्वी 28 जून 2018 मध्ये हे खाते सुरु केले तेव्हा जे काही थोडं फार कळत होतं ते होतं फक्त शेअरमार्केट. पण या पाच वर्षांत ब्लॉगिंग, मग वर्डप्रेस वेबसाईट, एमेझन एफीलीएट मार्केटिंग, ‘डील्स – ऑफर्स’ वेबसाईट, किन्डल ई-बुक, गमरोड इथपर्यंतचा प्रवास, आणि यादरम्यान […]

The post डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग appeared first on MARATHI STOCK.]]>

आज 28 जून 2023 रोजी आमच्या  @marathistock ट्विटर खात्यास पाच वर्षे पूर्ण झाली.

पाच वर्षापूर्वी 28 जून 2018 मध्ये हे खाते सुरु केले तेव्हा जे काही थोडं फार कळत होतं ते होतं फक्त शेअरमार्केट.

पण या पाच वर्षांत ब्लॉगिंग, मग वर्डप्रेस वेबसाईट, एमेझन एफीलीएट मार्केटिंग, ‘डील्स – ऑफर्स’ वेबसाईट, किन्डल ई-बुक, गमरोड इथपर्यंतचा प्रवास, आणि यादरम्यान थोडंफार डिजिटल मार्केटिंगसारख्या गोष्टी जाणून घेऊ शकलो. 

अर्थात आजही केवळ एकाच व्यक्तीकडून व्यवस्थापीत केल्या जाणाऱ्या या फाफट पसाऱ्याने पाच वर्षांचा हा पल्ला गाठणं शक्य झालं केवळ तुमच्या प्रतिसादामुळेच.

आज पाच वर्षानंतर सहजंच पाहिल्यावर लक्षात आलं कि व्यावसायिक लेखक वगैरे नसलो तरी नाही म्हणायला आपल्या नावावर स्वतःचे म्हणावेत असे जवळपास दोनशेहून अधिक लेख, तीन विविध विषयांना वाहिलेल्या वेबसाईट्स, आणि दोन पुस्तके (अर्थातच ई-बुक्स ) इतकी बौद्धिक वगैरे मालमत्ता जमा झाली आहे.कारण सगळ्याच गोष्टी पैशात तोलता येत नसल्या तरी काही मनाला समाधान नक्कीच देऊन जातात.

पण हे काय आणि कसं, हे आपल्यासारख्याच इतरांनाही समजावं आणि करू पाहता यावं, म्हणून यासंदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न. कारण यामध्ये कोणतीही तांत्रिक क्लिष्टता नाहीये तसेच फार खर्चिक वगैरे असंही काही नाही, म्हणजे हे अगदी कोणीही करू शकतो. हो अगदी बऱ्यापैकी स्मार्टफोन आणि कम्प्युटर हाताळू शकणारा कुणीही. 

म्हणजे कुठून सुरवात ?

असं कोणताही एक विषयाचा  कोपरा-कोनाडा (Niche ) निवडा ज्यामध्ये तुम्ही कौशल्ये बाळगता आणि ज्याबाबत तुम्ही बऱ्यापैकी व्यक्त होऊ शकता. 

आम्ही कसं केलं ?

वेबसाईट :

सर्वप्रथम ट्विटर, फेसबुक पेजने सुरुवात होऊद्या. जसं आम्ही मराठी स्टॉक साठी केलं. तर असंच तुमच्या स्वारस्य आणि कौशल्याचा विषय निवडल्यानंतर त्या विषयाला चिकटून राहा. विषयाबाबतची नाविन्यपूर्ण, सर्वोत्तम माहिती आपल्या अनुसारकांना देण्याचा प्रयत्न असुद्या. तदनंतर थोडाफार जम बसल्यानंतर वेबसाईट साठी प्रयत्न करू शकता. सुरुवात गुगलच्या Blogger ने होऊद्या. वेबसाईटसाठी एखादं नाव ठरवावं. सब-डोमेन ऐवजी स्वतःचं डोमेन असण्यास प्राधान्य द्या. Hiox  सारख्या  व्यासपीठावर किमान किंमतीत डोमेन मिळवू शकता. किंवा तुमच्या पसंतीचा इतर पर्याय सुद्धा निवडू शकता. यांनतर ब्लॉगरवरच वेबसाईट उभारू शकता. यासाठी युट्युब मदतीला आहेच.

चांगला जम बसल्यानंतर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेस कडे स्थलांतरित करू शकता यासाठीच्या होस्टिंगसाठी तुमच्या पसंतीचा किंवा होस्टींगर सारखा पर्याय निवडू शकता. जिथे एकल वेबसाईटसाठी वर्षाला अडीच हजाराच्या आसपास खर्च येतो. युट्युबच्या सहाय्याने तुमची ब्लॉगर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेसवर सहजरीत्या स्थलांतरित करू शकाल.

आता वेबसाईट बनवून जवळपास सहा महिने झाल्यानंतर तुम्ही ती गुगल एड सेन्ससाठी सबमिट करू शकता. लक्षात असुद्या “कंटेंट इज द किंग” म्हणजेच उत्तमोत्तम कंटेंट तुमच्या डिजिटल यशाची गुरुकिल्ली असते. गुगल एड सेन्ससाठी एप्लाय करताना तुमच्या वेबसाईटवर नियमित लेख येत असतील याची काळजी घ्या. विषयांची निवड तसेच लेखन करण्यासोबतच ‘सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन’ (SEO) समजून घ्यावे. आता एआयच्या (AI ) युगात हे सोप्पं आणि आव्हानात्मक असं दोन्ही भासू शकतं.

एफीलीएट असोसिएट:

हे सगळं करत असतानाच ‘एफीलीएट मार्केटिंग’ नावाचा प्रकार सुद्धा शिकून घ्यावा.याची सुरुवात एमेझन एफीलीएट असोसिएट पासून करता येईल.आपल्या सोशल मिडिया खात्यावरून ‘एफीलीएट मार्केटिंग’ करताना प्रॉडक्ट्स तुमच्या  कंटेंटशी संबंधित राहील याची काळजी घ्यावी. 

एफीलीएट मार्केटिंग करताना त्याच्याशी संबंधित वेबसाईट बनवता आली तर उत्तमच, जशी आमची स्वतःची द डील ( The Deal ) या नावाची वेबसाईट आहे. तुम्ही आमच्या या वेबसाईटला आणि तिच्याशी  संबंधितट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

किन्डल ई-बुक :

‘वाचनाने माणूस शहाणा होत असेल तर “लेखनाने ते शहाणपण तपासता येतं” असं आमचं मत आहे. लेखन बऱ्यापैकी जमू लागलेलं असेल तर आणि आपल्या आवडत्या क्षेत्रातील सांगण्यासारखे किंवा असलेलं थोडंफार ज्ञान वाटावसं वाटत असेल तर. ई-बुक हा उत्तम पर्याय आहे आणि इथेही एमेझन तुमच्या सोबत आहे. किन्डल डायरेक्ट पब्लिशिंग अर्थात KDP  च्या सहाय्याने तुम्ही तुमचं लिखाण ई-बुकमध्ये परावर्तीत करून एमेझनवर विक्री करिता ठेवू शकता. अर्थात इतेही पैसे कमावणे दुय्यम आणि लेखनाची आवड जोपासणे तसेच कौशल्ये, ध्यान इतरांमध्ये वाटण्यास प्राधान्य दिलं तर त्यातून मिळणारं समाधान मोठं असतं. आणि यातही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय टूल्स उपयुक्त ठरू शकतात. फक्त त्यांचा कल्पकतेने वापर करता आला पाहिजे.

याप्रकारे आम्ही आमची खाली दिलेली दोन ई-पुस्तके एमेझनवर उपलब्ध करून दिली आहेत.

1 ) Take it “Personally”


2 ) 
शेअर मार्केटची तयारी

बरं हे सगळं करत असताना आपण आपल्या मुख्य व्यवसायास अनुसरून काही प्रयत्न या डिजिटल माध्यमाद्वारे करू शकता. जसं आम्ही आमच्या नव्या https://legitance.in/ या प्रयत्नातून करीत आहोत. लेजीटान्सच्या माध्यमातून आम्ही लीगल, डिजिटल आणि फायनान्स ( विमा ) संबंधित सल्ला आणि सेवा पुरवीत आहोत. आपण आमच्या या वेबसाईटला आणि ट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

याव्यतिरिक्त मराठी माणसांकडून होत असणाऱ्या उद्यमशील प्रयत्नांना जास्तीत जास्त पोहोच मिळावी या हेतूने सुरु केलेलं मी उद्यमी हे ट्विटर खातेही आहेच. आपल्या माहितीतील कोणीही व्यक्ती जी स्वयंरोजगार उभारू पाहतेय तसेच आपल्या या प्रयत्नांतून इतरांसाठी रोजगार निर्माण करू पाहत असेल तर अशा व्यक्तींच्या उद्यमशील तेची माहिती आमच्या पर्यंत नक्की पोहोचावा आम्ही त्यांना आमच्या या खात्याद्वारे प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. 

डिजिटल मार्केटिंग :

तुमचं उत्पादन – सेवा थेट असो वा डिजिटल, डिजिटल मार्केटिंग हि फार महत्वाची बाब बनलीये. तुम्ही वर वाचलं असेल कि दिलेल्या सर्व प्रकारांत डिजिटल मार्केटिंगचा वापर आम्ही केलेला आहे. मग ते आमच्या समाज माध्यमी खात्यावरून केलेली ‘एफीलीएट मार्केटिंग’ असो किंवा मग वेबसाईटवरील लेखांद्वारे पुरवलेली शेअरमार्केट, आर्थिक संकल्पना विषयक माहिती असो किंवा मग  डीमॅट खाते उघडण्याबाबतचे मार्गदर्शन असो.आता चॅट जीपीटी सारख्या विविध एआय टूल्समुळे डिजिटल उत्पादनांचा वेग वाढणारच आहे. नुकतंच प्रकाशित झालेले आमचे नवीन ई-पुस्तक याचेच उदाहरण आहे. हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन (पर्सनल फायनान्स) संदर्भातील पुस्तक आम्ही एमेझन सोबतच गमरोड (Gumroad) या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे.

आमच्या ट्विटरवरील सुरवातीस पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिलेल्या या माहितीचा उद्देश आमचा इथपर्यंतचा प्रवास सांगणे नसून, समाज माध्यम आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करून काही नवं – वेगळं करू पाहणाऱ्या व्यक्तींना याद्वारे थोडक्यात मार्गदर्शन करण्याचा आहे. अर्थात हे प्रयत्न करतानाच आपला मूळ व्यवसाय – नोकरी यांना अंतर देण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा इथे नमूद करणे महत्वाचे वाटते,

धन्यवाद!

The post डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html/feed 0
‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=what-is-net-worth-in-marathi https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html#respond Mon, 19 Jun 2023 04:55:32 +0000 https://marathistock.com/?p=2382 मोरूला त्याचा मित्र बंड्या सांगत होता कि समोरच्या बिल्डींगमधला राजेश आता चांगला श्रीमंत झालाय. म्हणजे असं का वाटतं तुला ? मोरूचा मित्राला प्रश्न अरे, गेल्याच आठवड्यात उपनगरात एक फ्लॅट घेतला त्याने, चारचाकी गाडी या आधीच घेतली आहे, गावाला जमीन, शिवाय पाचेक तोळं सोनं सुद्धा करून ठेवलंय. बंड्याने एका दमात मोरूला सांगून टाकलं तसं नसतं रे […]

The post ‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
मोरूला त्याचा मित्र बंड्या सांगत होता कि समोरच्या बिल्डींगमधला राजेश आता चांगला श्रीमंत झालाय.

म्हणजे असं का वाटतं तुला ?

मोरूचा मित्राला प्रश्न

अरे, गेल्याच आठवड्यात उपनगरात एक फ्लॅट घेतला त्याने, चारचाकी गाडी या आधीच घेतली आहे, गावाला जमीन, शिवाय पाचेक तोळं सोनं सुद्धा करून ठेवलंय.

बंड्याने एका दमात मोरूला सांगून टाकलं

तसं नसतं रे भावा, समोर दिसतं त्यावरून परीक्षा करू नये, आजच्या क्रेडीट कार्ड, पे-लेटर आणि ईएमआयच्या जगात तर मुळीच असं करू नये. मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा तर तू श्रीमंत आहेस.

आता हे सांगताना मोरू गाडी विश्लेषणाच्या मार्गावर आणू लागला.

काय , मी त्याच्यापेक्षा श्रीमंत ? हे कसं काय ?

बंड्या आता ऐकायला उतावीळ झाला होता.

तुला त्या राजेशची नेटवर्थ किती हे सांगता येईल ?

मोरूने बंड्याला हसत-हसत विचारलं .

नेटवर्थ ? ते काय असतं ? आणि त्याचा या श्रीमंती-गरिबीशी काय संबंध.

गोंधळलेल्या बंड्याचा मोरूला प्रतिप्रश्न .

थोडा वेळ असेल तर मग लक्ष देऊन ऐक,

हातावरच्या स्मार्टवॉचमध्ये वेळ पाहत मोरू मित्राला म्हणाला

एखादी व्यक्ती श्रीमंत आहे कि गरीब हे आपण कसं ठरवतो ? आपण ढोबळमानाने त्याच्याकडील संपत्ती मोजतो. त्याचं घर , गाडी, सोनं आणि जमीन जुमला वगैरे. आणि त्यानुसार त्याची श्रीमंत किंवा गरीब यातील वर्गात रवानगी करून टाकतो.

‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? (what is net worth in marathi )

पण हे करताना आपण फक्त बेरीज करतो आणि वजाबाकी मात्र विसरतो. कारण एखाद्याकडील संपत्तीचे मोजमाप करताना त्याची मालमत्ता वजा त्याचे दायित्व ( अर्थात कर्ज आणि इतर आर्थिक देणी) हि साधी-सोपी पद्धत नेट वर्थ शोधताना वापरतात.

नेट वर्थ ही एक आर्थिक संज्ञा आहे जी एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची वास्तविक सांपत्तिक स्थिती दर्शवते म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालमत्ता (त्याच्या मालकीच्या गोष्टी) वजा त्यांच्या दायित्वांचे (त्यांच्यावर असलेले कर्ज) एकूण मूल्य दर्शवते.

ही संकल्पना आणखी स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी, आपण राजेशचेच उदाहरण घेऊ. राजेशचे राहते घर सामाईक कुटुंबाचे आहे त्यामुळे ते इतक्यात त्याच्या संपत्तीत धरता येणार नाही, पण त्याने उपनगरात घेतलेल्या नव्या फ्लॅटची आजची किंमत ₹90 लाख इतकी आहे. त्याच्याकडे ₹1 लाखांची बचत आहे आणि कार घेताना जरी तिची किंमत ₹10 लाख असली तरी आता दीड वर्षानंतर मात्र तिचे मूल्य ८.५ लाख इतके असेल. पाच तोळे सोने ज्याची किंमत अडीच लाखांपर्यंत. तसेच गावाकडील जमिनीची आताचे मूल्य 6 लाखांच्या आसपास आहे. तर ही आहे त्याची मालमत्ता.

दुसरीकडे, आता त्याचे दायित्व अर्थात कर्ज-जबाबदारी पाहूयात, फ्लॅट घेताना त्याने गृहकर्ज काढले होते. ज्यातील ₹70 लाखांचे गृहकर्ज त्याला फेडायचे आहे. या व्यतिरिक्त कार घेताना घेतलेल्या वाहन कर्जातील ₹5 लाखांचे कर्ज फेडणे बाकी आहे. गावाकडे जमीन आहे पण ती नुकतीच गहाण ठेवून ४ लाखाचे कर्ज त्याने घेतले आहे.

होय त्याने काही दागिने नक्की केले आहेत पण त्यामधील जवळपास ३ तोळे दागिने त्याने क्रेडीट कार्डवर खरेदी केले होते आणि त्या क्रेडीट कार्ड थकबाकीचे त्याने कर्जात रुपांतर करून ईएमआय सुरु केले आहेत. हि कर्ज रक्कम आजच्या घडीला दीड लाखांपर्यंत आहे. या व्यतिरिक्त . 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज त्याच्यावर आहे.

राजेशच्या निव्वळ संपत्तीचे (Net worth) मूल्य काढण्यासाठी आपण त्याच्या मालमत्तेमधून त्याच्या दायित्वे वजा करूया.

एकूण संपत्ती मूल्य ( Net Assets Value )

संपत्ती मूल्य
घर ₹90 लाख
बचत ₹1 लाख
गावाची जमीन₹6 लाख
सोने ₹2.5 लाख
गाडीचे आताचे मूल्य ₹8.5 लाख
एकूण संपत्ती1 कोटी आठ लाख

आता राजेशचे एकूण दायित्व पाहूया,

दायित्व (Net liabilities)

दायित्वमूल्य
गृहकर्ज ₹70 लाख
वाहन कर्ज ₹5 लाख
गहाणखत (कर्ज )₹4 लाख
क्रेडीट कार्ड कर्ज ₹1.5 लाख
वैयक्तिक कर्ज₹2 लाख
एकूण मालमत्ता82 लाख पन्नास हजार.

तर मग नेटवर्थ सूत्र, (Net worth formula )

नेटवर्थ = ‘एकूण मालमत्ता मूल्य’ उणे ‘एकूण दायित्व’

म्हणून 1,08,00,000 – 82,50,000 = 25,50,000

तर, राजेशच्या मालमत्तेचे निव्वळ मूल्य अर्थात नेटवर्थ आहे ₹25,50,000 (रुपये पंचवीस लाख पन्नास हजार)

हे सांगून झाल्यावर मोरू बंड्याला म्हणाला, “तुझं आपल्या इमारतीमधील घर स्वतःचं आहे, ज्याचं आताचं मूल्य 70 लाखांच्या आसपास आहे आणि त्यावर तू घेतलेले गृहकर्ज 40 लाखांच्या आसपास आहे.”

“म्हणजे इथे 70 लाख – 40 लाख = 30 लाखांची मालकी मूल्य तुझं आहे. याव्यतिरिक्त तुझं कोणतेही वेगळे कर्ज किंवा दायित्व नाहीये त्यामुळे तुझी दुचाकी, बचत खात्यात २५ हजारांची रक्कम, आणि दीड तोळ्याच्या आसपास असलेलं सोनं गृहीत धरून दीड लाखांच्या आसपास रक्कम तुझ्याकडे आहे.”

“आता हे सगळे विचारात घेता जवळपास 31 लाख पन्नास हजार तुझी नेट वर्थ आहे जी तुझ्यामते श्रीमंत वगैरे असणाऱ्या राजेशच्या साडे पंचवीस लाखांपेक्षा जास्तच आहे कि.”

आपण हे सांगितल्यानंतर बंड्याच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानाची नोंद घेत मोरू घराकडे निघाला.

अर्थात हे झालं बंड्या आणि राजेश बदल, तुम्हाला तुमची नेट वर्थ माहित आहे का ? नसेल माहित तर खालील ‘नेटवर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator) च्या सहाय्याने ती जाणून घेऊ शकता. यामध्ये मालमत्ता असो वा दायीत्वे, त्यांचे सध्याचे मूल्य प्रविष्ट करावे.

‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator)

Net Worth Calculator

श्रीमंती मूल्यमापनी गणक

संपत्ती (₹)

दायित्व (₹)

‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ ( What is HNI in marathi )

हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ अर्थात एचएनआय म्हणजे उत्तम सांपातिक स्थित असणाऱ्या अशा व्यक्ती ज्यांची निव्वळ मालमत्ता दहा लाख डॉलर्सपेक्षा ( भारतीय रुपयांत सध्या 8 कोटीहून अधिक) जास्त आहेत. आता गंमत अशी कि कर्जबाजारी, अयशस्वी उद्योगपती म्हणून अलीकडे ज्यांचा उल्लेख होतो त्या अनिल अंबानींची नेटवर्थ आजही 250 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच ‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ या वर्गात ते मोडतात.

मला आशा आहे की हे स्पष्टीकरण, तक्ता आणि ‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ च्या सहाय्याने तुम्हाला ‘नेट वर्थ’ हि संकल्पना समजली असेल.

The post ‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html/feed 0
मार्जिन कॉल म्हणजे काय ? https://marathistock.com/2023/03/margin-call-explained-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=margin-call-explained-in-marathi https://marathistock.com/2023/03/margin-call-explained-in-marathi.html#respond Mon, 06 Mar 2023 17:48:41 +0000 https://marathistock.com/?p=2142 काही दिवसांपूर्वी अदानी समूहाशी संबंधित असलेला हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांत एक बातमी आली. ती म्हणजे अदानी समूहाने आपलं 1.1 अब्ज डॉलर्सचे एक कर्ज एकरकमी फेडून टाकले. आपल्याकडील अनेक ‘बिझनेस’ वृत्त वाहिन्यांनी या बातमीला अभिमानाची किनार वगैरे जोडत हे वृत्त दाखवले. पण […]

The post मार्जिन कॉल म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
काही दिवसांपूर्वी अदानी समूहाशी संबंधित असलेला हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांत एक बातमी आली. ती म्हणजे अदानी समूहाने आपलं 1.1 अब्ज डॉलर्सचे एक कर्ज एकरकमी फेडून टाकले.

आपल्याकडील अनेक ‘बिझनेस’ वृत्त वाहिन्यांनी या बातमीला अभिमानाची किनार वगैरे जोडत हे वृत्त दाखवले. पण या कर्ज परतफेडी मागे असणारी मार्जीन कॉलची पार्श्वभूमी मात्र फारच कमीजणांनी लक्षात घेतली.यामागचे कारण म्हणजे ‘न्यूजमध्ये फक्त मनोरंजन शोधणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी मनोरंजनाच्या शोधात असलेल्या आपल्या प्रेक्षकांची ओळखलेली नाडी’. त्यामुळे सर्वसामान्यांना या “मार्जिन कॉल” नावाच्या प्रकरणाशी काही देणेघेणे असण्याची शक्यता तशी कमीच. (Margin call explained in marathi)

पण तरीही हा प्रकार नक्की काय हे आपल्या ‘वित्तंबातमी’ मध्ये रस असणाऱ्या आणि त्यामागील ‘वित्तव्यवहार’ जाणून घेऊ पाहणाऱ्या वाचकांना समजायला हवे म्हणून आज आम्ही याबद्दल सांगणार आहोत.(margin call meaning marathi)

‘मार्जिन कॉल’ हि सामान्यत: भांडवली बाजाराशी संबंधित हि संज्ञा आहे. जेव्हा एखादा खातेधारक आपल्याला ब्रोकर कडून मिळालेली पत म्हणजेच क्रेडीट वापरून आपल्याकडे असलेल्या रकमेपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्सची खरेदी करतो. पण कालांतराने जेव्हा त्या शेअर्सचे मूल्य कमी होते तेव्हा आधीचे मूल्य आणि आताचे मूल्य यामुळे निर्माण झालेला फरक भरून काढण्यासाठी ब्रोकरकडून खातेधारकाला साधला गेलेला संपर्क म्हणजेच ‘मार्जिन कॉल’.( Margin call in marathi)

आपण एका उदाहरणाने पाहूया.

एखादा गुंतवणूकदार मार्जिनवर ₹20,000 किमतीचे स्टॉक्सची खरेदी करतो, आणि समजा या खरेदीसाठी खातेधारकास ब्रोकरकडून ₹10,000 ची क्रेडीट (उधार) दिली जाते आणि ₹10,000 मात्र खातेधारक स्वतःचे ठेवतो. इथे ब्रोकरला किमान 30% मार्जिन राखणे आवश्यक आहे असे समजूया.

पण काही काळाने या स्टॉक्सचे मूल्य आजच्या ₹20,000 वरून घसरून ₹12,000 वर येते. आता तुम्ही ब्रोकरकडून ₹10,000 कर्जाऊ घेतले असल्यामुळे या आजच्या ₹12,000 मूल्याच्या स्टॉक्समध्येही ₹10,000 ब्रोकरचे समजले जातात.म्हणजे इथे खातेधारकाचे भांडवली मूल्य आहे ₹2000, जे स्टॉक्सच्या आजच्या मुल्यानुसार आवश्यक असलेल्या मार्जिन म्हणजे 30% पेक्षा कमी आहे.

अशावेळी ब्रोकरकडून खातेधारकास ‘मार्जिन कॉल’ जनरेट होतो. म्हणजे आता खातेधारकास यामध्ये भर घालून पुन्हा मार्जिन 30% राखावे लागेल. म्हणजेच वरील उदाहरणांत 30 % मार्जिन राखण्यासाठी,

₹2,000 / ₹12,000 X 100 = 16.6% (सध्यस्थिती) जे आवश्यक असलेल्या 30% कमी आहे.

₹12,000 / 100 X 30 = ₹3600 ( आवश्यक असलेले मार्जिन)

म्हणजेच,

₹3600 – ₹2000 = ₹1600 → ‘मार्जिन कॉल’ ज्यास खातेधारक समोर जाईल. म्हणजेच इथे ₹1600 ची अतिरिक्त भर आता खातेधारकास घालावी लागेल. अर्थात इथे काही स्टॉक्स विकण्याचा पर्यायही खातेधारकासमोर उपलब्ध असतो पण तो काहीसा नकारात्मक समजला जातो.

इथे आणखी एक पर्याय उपलब्ध असतो. तो कोणता यासाठी आपण पुन्हा अदानी प्रकरणाकडे येऊया.

वरील उदाहरणांत आपण ब्रोकर आणि खातेधारक यांचे उदाहरण घेऊन ‘मार्जिन कॉल’ संकल्पना समजून घेतली. पण गरजेचं नाही कि समोर ब्रोकरच असावा. अदानी प्रकरणांत अदानी समूहाकडून आपले शेअर्स गहाण ठेवून वित्तसंस्थांकडून कर्ज घेतलं गेलं होतं. यात वावगं काहीच नाही अनेक उद्योग समूह, व्यावसायिक असे करतात. पण अदानी समूहाकडून सदर कर्ज घेताना त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव हे अत्युच्च पातळीवर होते. अन् हि शेअर्सच्या किंमतीत झालेली हि वाढ अगदी अल्पावधीत झाली होती. अर्थात ‘ती कशी आणि का’ हा काही या लेखाचा विषय नाहीये.

तर या उच्च भावात असलेले शेअर्स तारण ठेवून हे कर्ज घेतले गेले असल्याने पुढील परीस्थित बिकट झाली. म्हणजे इथे पुढे आलं हिंडेनबर्ग प्रकरण. आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व अशी घसरण होऊ लागली, जी 50% च्या पलीकडे गेली. आणि अर्थातच याचा परिणाम समूहाच्या कर्जावर झाला नसता तरच नवल होतं. असं म्हणतात कि अदानी समूहाच्या गौतम अदानींना या 1.1 अब्ज डॉलर्सच्या या कर्जासंदर्भात 500 कोटी डॉलर्स मूल्याच्या ‘मार्जिन कॉलला’ सामोरे जावं लागलं.

त्यामुळे मग या समूहाचे गुंतवणूकदार तसेच भांडवली बाजारातील कामगिरीवर होऊ शकणारे परिणाम लक्षात घेऊन नेहमीचे पर्याय न आजमावता समूहाने त्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला. मार्जिन कॉल संदर्भात असलेला हाच तो आणखी एक पर्याय.

बरं समजा खातेधारकाने वरीलपैकी कोणताही पर्याय आजमावला नाही तर ?

तर मग ब्रोकर अथवा धनको मार्जिन फरकानुसार आपल्या अधिकारातील स्टॉक्सची विक्री करू शकतो. आणि हा पर्याय खातेधाराकासाठी ‘रोगापेक्षा उपाय भयंकर” असा सिद्ध होऊ शकतो. म्हणजे जेव्हा अशा मोठ्या प्रमाणात स्टॉक्सची विक्री होऊ लागते तेव्हा त्या स्टॉक्सची किंमत झपाट्याने घसरू लागते. आणि मग भीतीपोटी रिटेल गुंतवणूकदार सुद्धा आपल्याकडील समभाग विकी लागतो. समभागांच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे नव्याने निर्माण मार्जिन फरकापोटी ब्रोकर किंवा धनकोस वारंवार आपल्या स्टॉक्सची विक्री करावी लागते.

मित्रांनो, हि माहिती आवडली असेल तर ती तुमच्या पर्यंत मर्यादित ठेवू नका. इतरांनाही नक्कीच शेअर करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

The post मार्जिन कॉल म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/03/margin-call-explained-in-marathi.html/feed 0
गोष्टी वेताळ ..! https://marathistock.com/2023/01/short-stories-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=short-stories-in-marathi https://marathistock.com/2023/01/short-stories-in-marathi.html#respond Thu, 19 Jan 2023 10:15:18 +0000 https://marathistock.com/?p=2075 दृढनिश्चयी राजा विक्रमादित्य पुन्हा त्या झाडाकडे आला. फांदीवरील प्रेत उतरवून त्याने आपल्या खांद्यावर घेतलं आणि स्मशानाचा मार्ग आक्रमू लागला. तेव्हा त्या प्रेतात वास करणारा वेताळ त्याच्याशी बोलू लागला.(short stories in marathi) राजा एका प्रांताचा महाराजा असूनही तुला अशा मध्यरात्रीच्या समयी या भेसूर जंगलात हे कष्ट घेताना पाहून मला तुझी दया येते. ज्या कशासाठी तू हे […]

The post गोष्टी वेताळ ..! appeared first on MARATHI STOCK.]]>
दृढनिश्चयी राजा विक्रमादित्य पुन्हा त्या झाडाकडे आला. फांदीवरील प्रेत उतरवून त्याने आपल्या खांद्यावर घेतलं आणि स्मशानाचा मार्ग आक्रमू लागला. तेव्हा त्या प्रेतात वास करणारा वेताळ त्याच्याशी बोलू लागला.(short stories in marathi)

राजा एका प्रांताचा महाराजा असूनही तुला अशा मध्यरात्रीच्या समयी या भेसूर जंगलात हे कष्ट घेताना पाहून मला तुझी दया येते. ज्या कशासाठी तू हे करतो आहेस त्या बदल्यात तुला मिळणाऱ्या फळाची तुला खात्री आहे का ? कारण मनुष्य स्वभाव अत्यंत विलक्षण असतो. त्याचा ठाव लागत नाही, आणि याचीच प्रचीती आणून देणारी एक गोष्ट तुला आज मी सांगतो.

आधुनिक मुंबापुरीत दोन मित्र राहत होते. विश्वास आणि विकास. दोघेही एकाच शाळेत शिकले, एकत्र कॉलेजला गेले, शिक्षण पूर्ण केलं. विश्वासने भांडवली बाजारात जम बसवला. तर विकासने स्पर्धा-परीक्षा देऊन छानपैकी सरकारी नोकरी मिळवली. दोघेही आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले.

दोघांचाही ‘कॉमन’ मित्रांचा गोतावळा होताच. शेअर मार्केटमध्ये आता काही वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या विश्वासने आपली सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी राखली होती. आणि दुसऱ्या बाजूला विकास सरकारी नोकरीत असल्याने त्यालाही तशी कसली तोशीस नव्हती.

मित्र मंडळीत अनेकजण विश्वासला गुंतवणूक, शेअर्स याबाबत सल्ले विचारत असत. मग शेअर्स, बॉंड्स, आयपीओ काहीही असो विश्वास हातचं काही राखून न ठेवता या क्षेत्रातील आपल्या वकुबानुसार त्यांना सल्ला देत असे. अर्थात माझे सल्ले म्हणजे शिफारस समजू नका असा ‘डिस्क्लोजर’ तो नेहमी जोडायचा. पण त्याने दिलेले हे सल्ले बव्हंशी उत्तम सिद्ध व्हायचे.

विकासला मात्र शेअर मार्केट या क्षेत्रात तितकासा रस नव्हता. नाही म्हणायला विश्वासच्या सांगण्यावरून त्याने डीमॅट खाते उघडले होते. पण शेअर्स घेणे वगैरेच्या फंदात तो कधी पडला नाही. आणि विश्वासनेही त्याला कधी अमुक कंपनीचा शेअर घेच असा आग्रहसुद्धा केला नाही. त्यात नोकरीच्या निमित्ताने विकासची बदली सुद्धा आता दुसऱ्या शहरात झाली होती. त्यामुळे नेहमी होणाऱ्या भेटीगाठी सुद्धा आता अगदीच नाहीच्या बरोबर होऊ लागल्या. पण फोनद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात होतेच.

अशातच एके दुपारी विश्वासचा मोबाईल वाजू लागला. फोन विकासचा होता. दुपारची वेळ म्हणजे विश्वासचं शेअर मार्केट व्यवहार सर्वोच्च बिंदू वर असण्याचा काळ. अशावेळी तो फोन घेणे टाळायचा, पण विकासाचा फोन असल्याने त्याने तो घेतला.

बोल भावा , कसा आहेस ?

मी मजेत, तू कसा आहेस ?

चाललंय तुमच्या कृपेने.. फोन सहजच की काही विशेष ?

विश्वास , अरे मला आता तातडीने २ लाख रुपये हवेत.. मिळतील ? पुढच्या आठवड्यात परत करतो.

तुला तातडीची गरज आहे ना .. मग मिळतील. मला आता नाही पण दीड – दोन महिन्यानंतर लागतील.

थँक्स यार..आठवड्यातच परत करतो तुला.

आत्ताच हवेत कि संध्याकाळपर्यंत पाठवू तुझ्या अकाऊंटला ?

नाही तू आता कामात असशील , संध्याकाळी पाठव. पण शक्यतो आजच बघ.

ओके बॉस .. पाठवतो संध्याकाळी.

आणि त्यानुसार विश्वासने त्याच दिवशी दुपारनंतर पैसे विकासच्या बँक खात्यावर पाठवले. आणि त्यावर ” पैसे मिळाले, थँक्स” असा मेसेज सुद्धा विकासकडून आला.

त्यानंतर अनेक दिवस गेले , दोन-तीन आठवडे झाले. पण विकासकडून पैसे काही परत आले नाहीत. नाही म्हणायला दोन दिवसांपूर्वी “पैशाचं लक्षात आहे , देतो काही दिवसांत” असा मेसेज आला त्याच्याकडून. अर्थात विश्वासला काही प्रॉब्लेम नव्हता. मित्रच आहे, कामाच्या तणावात असेल आज न उद्या देईलच. असा विचार करून तो विषय सोडून द्यायचा.

आता या गोष्टीला सहा महिने झाले, पण विकासकडून पैसे परत येणे नाहीच पण त्यानंतर कोणताही संपर्क सुद्धा केला गेला नाही. अनेकदा विश्वासने त्याच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तोही आता लागत नव्हता. अर्थात संपर्क करण्यामागे पैशापेक्षा किमान त्याची ख्याली खुशाली समजावी हा हेतू होता.

काही दिवसांनी त्यांच्याच एका ‘कॉमन’ मित्राकडून त्याला समजलं कि विकासने गावी प्रशस्त घर बांधलंय आणि नवीन चारचाकी गाडीही घेतलेय. आता मात्र विश्वासला खरंच वाईट वाटलं.आपल्या जवळच्या, अगदी बालपणीच्या मित्राकडून असं काही त्याला अपेक्षित नव्हतं. त्याने तो विषय कायम सोडून द्यायचं ठरवलं. त्यानंतरही विकासच्या प्रगतीपथावरच्या वाटचालीच्या विविध कथा विश्वासपर्यंत पोहोचत होत्याच. कधी नोकरीत मिळालेल्या मलईदार जागेबद्दल, तर कधी कुटुंबासोबत केलेली परदेशवारीबाबत.

आता त्या उधार-उसनवारी प्रकरणाला दिडेक वर्ष होऊन गेलं असेल. विश्वास आता शेअर ब्रोकिंग व्यवसायात जम बसवू लागला होता. अशाच एकेदिवशी दुपारनंतर मार्केट बंद झाल्यावर विश्वास आपल्या रिसर्च, एनालीसीस कामात असताना त्याचा फोन वाजला. आपल्या क्लाएंटपैकी कुणीतरी किंवा नेहमीचा मार्केटिंग ‘कोल्ड कॉल’ असं समजून त्याने फोन घेतला.

विश्वास भाऊ, कसा आहेस .. विकास बोलतोय

हे ऐकून विश्वास आता जागेवर उडायचाचा बाकी होता..पण तरीही सावरून त्याने प्रतिसाद दिला.

मी ठीक आहे भावा .. पण तू कुठे आहेस ? एकदम अंडरग्राउंड ? ना भेट, ना कॉन्टॅक्ट..

पण विकासला स्पष्टीकरण देण्यात काहीच इंटरेस्ट दिसत नव्हता. फक्त औपचारिकता म्हणून त्याने सुरवातीला ‘कसा आहेस’ असं विचारल्याचं विश्वासच्या लक्षात आलं. कारण विकासने लगेच आपल्या मुद्याला हात घातला.

अरे, तुझा सल्ला हवाय किंवा अगदी शिफारसच म्हण की.. दोनेक लाख गुंतवायचे आहेत. कशात टाकू ? कुठल्या कंपनीचे शेअर्स कि इतर कशात ? अगदी सात-आठ महिन्यांच्या मुदतीसाठी.

विकासने पैसे देण्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता .. आणि विश्वासला आता तशी अपेक्षाही नव्हती.

भावा .. असं एखादा कालावधी ठरवून काही होत नसतं रे मार्केटमध्ये..

होरे .. पण तू सांग ..

ठीकेय.. दोन दिवसांनी एक आयपीओ लिस्ट होतोय.. लिस्ट झाल्या झाल्या घे..

अरे वा. . कोणता आयपीओ ?

पेटीएमचा ..

इतकं सांगून वेताळाने आपली गोष्ट संपवली आणि राजा विक्रमादित्याला म्हणाला..

राजा, विश्वासने असं का केलं असेल ? कि त्याने जुनं सगळं विसरून खरंच मित्राला नफा व्हावा म्हणून सल्ला दिला ?

कि मग जुनं उट्टं फेडण्यासाठी असं केलं ?

कि खुद्द विश्वासलासुद्धा शेअर मार्केट मधलं घंटा कळत नव्हतं ?

का केलं विश्वासने असं ?

राजा या प्रश्नाचं उत्तर माहित असूनही तू दिलं नाहीस तर तुझं डोकं शंभर भागांत ‘स्प्लिट’ होऊन तुझ्या पायाशी पडेल आणि जर उत्तर तुला माहीतच नसेल तर तुझं राजेपदच ‘डीलिस्ट’ होऊन जाईल ..

वेताळ धीरगंभीर आवाजात म्हणाला.

आतापर्यंत शांत असलेल्या राजा विक्रमादित्याला आता मात्र घाम फुटू लागला. कुठच्या कुठे हि ब्याद गळ्यात घेतली असा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. त्याचवेळी त्याच्या पाठीतसुद्धा एक कळ येऊन गेली..अन् क्षणाचाही विचार न करता वेताळाचं धूड तसंच मागच्या मागे फेकून देऊन विक्रमादित्याने आपल्या राजवाड्याच्या दिशेने धूम ठोकली.

अजूनही दुसऱ्या प्रहरातच असणाऱ्या त्या रात्रीच्या गर्द काळोखात आता फक्त आसपासच्या कुत्र्यांच्या ओरडण्याचा आणि वेताळाच्या विव्हळण्याचा आवाज भरून राहिला होता.

गोष्ट आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि जर तुम्ही ट्विटरवर असाल तर खालील ट्वीट रिट्वीट करायला विसरू नका.

Image : From Internet

The post गोष्टी वेताळ ..! appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/01/short-stories-in-marathi.html/feed 0
तीन हफ्ते जास्त अन् होमलोनची रक्कम व्याजासहित परत. https://marathistock.com/2022/12/sip-investment-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=sip-investment-in-marathi https://marathistock.com/2022/12/sip-investment-in-marathi.html#respond Mon, 26 Dec 2022 11:49:22 +0000 https://marathistock.com/?p=2023 वर्षाला फक्त तीन अधिकचे हफ्ते तुमचं गृहकर्ज व्याजासहित परत करू शकतील ? (sip investment in marathi) उदाहरणाने पाहूया, तुमचं गृहकर्ज : ₹40 लाख समजू, 8.9% वार्षिक व्याजदराने 22 वर्षांसाठी मासिक हफ्ता अर्थात ईएमआय : ₹34,583 बावीस वर्षांत होमलोन परतफेडी दाखल तुमच्याकडून बँकेला दिली जाऊ शकणारी एकूण रक्कम,  ₹40,00,000 (मुद्दल) + ₹51,29,949 (व्याज) = ₹91,29,949 म्हणजे […]

The post तीन हफ्ते जास्त अन् होमलोनची रक्कम व्याजासहित परत. appeared first on MARATHI STOCK.]]>
वर्षाला फक्त तीन अधिकचे हफ्ते तुमचं गृहकर्ज व्याजासहित परत करू शकतील ? (sip investment in marathi)

उदाहरणाने पाहूया,

तुमचं गृहकर्ज : ₹40 लाख समजू,

8.9% वार्षिक व्याजदराने 22 वर्षांसाठी मासिक हफ्ता अर्थात ईएमआय : ₹34,583

बावीस वर्षांत होमलोन परतफेडी दाखल तुमच्याकडून बँकेला दिली जाऊ शकणारी एकूण रक्कम,

 ₹40,00,000 (मुद्दल) + ₹51,29,949 (व्याज) = ₹91,29,949

म्हणजे 40 लाखांची परतफेड करताना फक्त व्याजापोटी तुम्ही मुदलाहून जास्त म्हणजे 128% रक्कम अधिक भरता.

थेट सांगायचं तर गुंतवणूक संदर्भातील कंपाऊंडिंगचा नियम इथे मात्र तुमच्या विरोधात काम करतो.

पण याच कंपाऊंडिंगच्या मदतीने वर्षाला फक्त तीन अधिकच्या हफ्त्यांसह आपण आपलं हे होमलोन व्याजासकट परत मिळविण्याचा प्रयत्न केला तर ?

नक्की काय करायचं ? (smart way to repay home loan in marathi)

गृहकर्जाचे वर्षाला 12 नव्हे तर 15 मासिक हफ्त्यांची तरतूद करा. म्हणजे ३ हफ्ते जास्त.

म्हणजे,

 ₹34,583 X 3 = ₹1,03,749 (तीन मासिक हफ्त्यांची एकूण रक्कम )

आता हि रक्कम तुम्हाला दर महिना एसआयपी पद्धतीने गुंतवायची आहे.

म्हणजे, ₹1,03,749 / 12 = ₹8,645.75 आपण ₹8,646 विचारात घेऊ.

याचा अर्थ तुम्हाला दर महिना ₹8,646  ची SIP करायची आहे.

‘इतिहासातील आकडेवारी हि भविष्यातील कामगिरीबाबतची शाश्वती मानू नये’ हे वाक्य लक्षात ठेवूनच आपण इथे निर्देशांकाच्या परताव्याचा संदर्भ घेऊ.

मागील 20 वर्षांचा विचार केल्यास निफ्टी निर्देशांकाने दरवर्षी सरासरी (CAGR) 14% आसपास परतावा दिला आहे. अर्थात मागील 2 वर्षापूर्वीच्या करोना घसरणीनंतर मार्केट घेतलेल्या झेपेचा तर्क विचारात घेतला तरी ऐतिहासिक दाखल्यांनुसार मार्केटने दीर्घकाळात 12% च्या आसपास सरासरी परतावा दिल्याचं दिसतं.

आता समजा हि एसआयपी आपण निफ्टी निर्देशांकात केली.

यातून पुढील बावीस वर्षांसाठी वार्षिक 12% इतका सरासरी परतावा जरी जमेस धरला तरी हि रक्कम असेल. ₹1,12,04,315 (रुपये  एक कोटी बारा लाख चार हजार तीनशे पंधरा आणि ऐंशी पैसे )

यात तुमची मूळ गुंतवणूक असेल ₹22,82,544

तर तुम्हाला मिळालेला परतावा असेल  ₹89,21,718

म्हणजे एसआयपीद्वारे केलेल्या या गुंतवणुकीतून तुमची मूळ गुंतवणूक वजा करूनही तुम्ही तुमच्या होमलोनच्या परतफेडीत व्याजासकट भरलेल्या रकमेच्या जवळपास रक्कम तुम्हाला इथे मिळाल्याचे दिसेल. (how to repay home loan faster india in marathi)

अन् हे गृहकर्जाच्या दरवर्षाला तीन अतिरिक्त हफ्त्यांच्या तरतुदीतून सध्या होऊ शकते.या नियमित SIP ला काही वर्षांनी नित्यनेमाने येणाऱ्या DIP चा म्हणजे मोठ्या घसरणीचा अतिरिक्त मुहूर्त साधलात तर तुमच्या  सरासरी परताव्यात वाढणारे एक – दोन अतिरिक्त टक्के तुम्हाला दुधावर येणाऱ्या सायीसारखे भासतील. (investment tips in marathi)   

अर्थात वरील उदाहरणात गृहकर्जावरील व्याजरकमेसंदर्भात मिळणारी ‘कर सवलत’ आणि SIP गुंतवणुकीच्या परताव्यावर लागणारा ‘दीर्घकालीन भांडवली नफा’ अर्थात ‘लॉंग टर्म कॅपिटल गेन’ कर, हे दोन घटकही लक्षात घेण्यासारखे.  

मित्रांनो गुंतवणुकीसंदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या ‘एसआयपी’ आणि ‘कंपाऊंडिंग’ या दोन शब्दांची महती एव्हाना अनेकांना माहित झालेली आहे. पण त्याचं महत्व सांगण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या दृष्टीकोनानुसार उदाहरण मांडत असतो. अगदी तसंच वरील उदाहरणातून दिलेली माहिती हा पूर्णपणे आमचा दृष्टीकोन असून तो गुंतवणूक सल्ला मानू नये. कारण आमचा तर्क, आमचा अंदाज, आमचा अभ्यास चुकीचाही ठरू शकतो. आणि म्हणूनच कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

The post तीन हफ्ते जास्त अन् होमलोनची रक्कम व्याजासहित परत. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/12/sip-investment-in-marathi.html/feed 0
जगातील महत्वाचे शेअर बाजार अन् त्यांचे वेळापत्रक. https://marathistock.com/2022/11/world-stock-market-timing-in-ist-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=world-stock-market-timing-in-ist-in-marathi https://marathistock.com/2022/11/world-stock-market-timing-in-ist-in-marathi.html#respond Fri, 25 Nov 2022 06:06:57 +0000 https://marathistock.com/?p=1971 उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ? बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ? अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ? या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो. (World Stock market timing in IST in marathi […]

The post जगातील महत्वाचे शेअर बाजार अन् त्यांचे वेळापत्रक. appeared first on MARATHI STOCK.]]>
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ? बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ? अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ? या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो. (World Stock market timing in IST in marathi )

शेअर मार्केट नामक क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावलेल्यांना वर सांगितलेलं नवीन नाही. पण यातील अनेकजण किंवा बाजारात सुरुवात करू पाहणाऱ्यांचा याबाबत गोंधळ उडतो. म्हणजे जगातील हे बाजार किती वाजता सुरु होतात. त्यांच्या वेळा काय ? महत्वाचे निर्देशांक कोणते ? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. आपला आजचा लेख याबद्दलच आहे.

सुरुवात एसजीएक्स निफ्टीपासूनच करूया.

‘एसजीएक्स निफ्टी’ हे सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेलं भारतीय निर्देशांक निफ्टीचे डेरीव्हीटिव्ह असून त्याचे दैनंदिन व्यवहार 16 तास चालतात.ते भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6.30 ते रात्री 11.30 पर्यंत चालू असतात.(sgx nifty timings in marathi )

अमेरिकन शेअर मार्केट (US Stock Market )

नॅसडॅक आणि न्यूयॉर्क हे अमरिकेतील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस असून ‘एसएंडपी 500’ अर्थात ‘स्टँडर्ड एन्ड पुअर 500’ व ‘डाऊ जोन्स’ हे दोन निर्देशांक आहेत. उदा.जसे आपल्याकडे ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ हे स्टॉक एक्स्चेंजेस तर ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ हे निर्देशांक आहेत. ( Dow jones and S&P 500 )

अमेरिकन मार्केट हे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होतात जे मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चालू असतात.(US Stock Market timings in marathi )

युरोपियन मार्केट ( Europian Stock Market )

यामध्ये युरोप खंडातील प्रमुख देशातील शेअर बाजारांचा समावेश होतो. जसं युके म्हणजेच इंग्लंडमधील ‘लंडन स्टॉक एक्स्चेंज’, जर्मनीतील ‘डॉयच्च बोर्स’, स्पेनमधील ‘बीएमई स्पॅनिश’, युरोपियन युनियनचे ‘युरोनेक्स्ट’ यांचा समावेश आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार युरोपियन बाजार सर्वसाधारणपणे दुपारी दीड वाजता सुरु होतात, जे रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतात. (Europian Stock Market timings in marathi )

आशियाई बाजार ( Asian Stock Market )

यामध्ये ऑस्ट्रेलियाचे ‘ऑस्ट्रेलिया सेक्युरिटी एक्स्चेंज’, जपानचे ‘जपान एक्स्चेंज ग्रुप’, हॉंगकॉंगचे ‘हॉंगकॉंग स्टॉक एक्स्चेंज’, चीनचे ‘शांघाय स्टॉक एक्स्चेंज’, तैवानमधील ‘तैवान स्टॉक एक्स्चेंज’.तर दक्षिण कोरियातील ‘केआरएक्स कोरियन एक्स्चेंज’ यांचा समावेश आहे. याच प्रमाणे सिंगापूर शेअर बाजारात भारतीय निर्देशांक निफ्टीवर बेतलेला ‘एसजीएक्स निफ्टी’ हा निर्देशांकसुद्धा आशियाई बाजाराचा भाग आहे.

विविध आशियाई देशातील बाजारांचा विचार करता भारतीय प्रमाणवेळेनुसार आशियाई बाजार सकाळी साडे पाच ते दुपारी साडे तीन पर्यंत सुरु असतात. आणि वर सांगितल्यानुसार एसजीएक्स निफ्टी निर्देशांक मात्र 16 तास सुरु असतं. ( Asian Stock Market timings in marathi)

तर हे होते जगातील प्रमुख देशांतील एक्स्चेंजेस. खालील तक्त्यात आपल्याला जगातील महत्वाचे शेअर मार्केट त्यांच्या निर्देशांकासह भारतीय वेळापत्रकानुसार समजून घेता येईल. सदर तक्ता तुम्ही शेअर मार्केट क्षेत्रात नवीन असणाऱ्या तुमच्या मित्रपरीवारासोबत शेअर करू शकता.

world stock market timings in IST in marathi

आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

The post जगातील महत्वाचे शेअर बाजार अन् त्यांचे वेळापत्रक. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/11/world-stock-market-timing-in-ist-in-marathi.html/feed 0
एप स्टोरी ! https://marathistock.com/2022/10/inspirational-story-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=inspirational-story-in-marathi https://marathistock.com/2022/10/inspirational-story-in-marathi.html#respond Fri, 28 Oct 2022 08:30:23 +0000 https://marathistock.com/?p=1906 ते वर्ष होतं 1992, अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती, आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं. भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुल्या आर्थिक धोरण नामक रामबाण औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता. (inspirational story in marathi) तसं […]

The post एप स्टोरी ! appeared first on MARATHI STOCK.]]>
ते वर्ष होतं 1992, अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती, आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं. भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुल्या आर्थिक धोरण नामक रामबाण औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता. (inspirational story in marathi)

तसं बरच काही झालं होतं त्या वर्षी पण आपली आजची हि गोष्ट युक्रेनपासून सुरू होते.

होय तेच, आज जळत असलेलं युक्रेन..

तर झालं काय होतं, त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटनव्ह्यू या गावी आला. येताना त्याने सोबत आपलं दारिद्र्य सुद्धा आणलं होतं.

पैशाची अन् म्हणूनच कामाची गरज असल्याने जॅनने एका ग्रोसरी स्टोअरमध्ये ‘झाडु मारण्याचं काम करायला सुरवात केली. त्याच्या आईनेही आसपासच्या छोट्या मुलांना सांभाळण्याचं म्हणजे ‘बेबी सिटर’ म्हणून काम करायला सुरवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होतीच. पण अमेरिकेत गरिबांसाठी असलेल्या “फूड स्टॅम्पसारख्या अनुदानित योजनांच्या आधारे हे कुटुंब कसबसं तग धरू शकलं .

दोन वर्षांनी जॅन 18 वर्षांचा झाला. तो आता कॉंप्युटर प्रोग्रॅमींग आणि नेटवर्कींगमध्ये रस घेऊ लागला. पण त्यासाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्याइतके पैसे त्याच्याकडे नसायचे. मग तो जुन्या पुस्तकांच्या दुकानातून पुस्तके उधारीने आणून ती अभ्यासू लागला.अभ्यास झाला की तो आणलेली जुनी पुस्तके दुकानदाराला परत करायचा.

जॅन कौम

त्याचा या विषयातील इंटरेस्ट वाढू लागला.तेव्हा त्याने सॅनहौजे युनिव्हर्सिटींमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वेळी एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम करायला सुरवात केली. आता दिवसभर कॉलेज व रात्री नोकरी असे त्याचे जीवनचक्र सुरू झाले. पण पुढे शिक्षणाला मध्यातच रामराम करीत तो विद्यापीठातून बाहेर पडला.

1997 साली त्याला याहूमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी बहरू लागलेल्या अन् इंटरनेट क्षेत्रात सुरवातीलाच आघाडी घेतलेल्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘याहू’ त्यावेळी जोरावर होती. त्याने तेथे 9 वर्षे नोकरी केली. त्याच दरम्यान त्याची ओळख ब्रायन ऍक्टन नावाच्य तरुणाशी झाली. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या या दोघांची गट्टी चांगली जमली. 97 साली वडील आणि 2000 मध्ये आई कॅन्सरने गेल्यानंतर जॉन काहीसा एकटा पडला पण या काळात एक्टनने त्याला आधार दिला.

ब्रायन ऍक्टन

दोघांनी एकत्र काम सुरू केलं. याकाळात अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिलेत. याहू ला सहन करावे लागलेले चढउतार, डॉटकॉम नामक बुडबुड्याचं फुगणं आणि फुटणं. या डॉटकॉम बुडबुड्यात हात धुवून घेण्याचा नादात ब्रायनने आपले हात पोळूनही घेतले.

याच काळात लोकांना उपयोगी पडेल असे एखादे कॉम्युटर ऍप्लिकेशन तयार करण्याची कल्पना जॅनच्या डोक्यात आली. आणि नक्की काय करावं हे ठरविण्याच्या दृष्टीने या दोघांनी याहुतील आपल्या नोकरीला रामराम केला. 

काहीतरी करायचंय, पण नक्की काय आणि कसं  हे उमगायला वर्ष 2009 यावं लागलं, जेव्हा जानेवारी 2009 मध्ये जॅनने आयफोन विकत घेतला.

एप स्टोर संकल्पनासुद्धा तेव्हा नवीनच होती. पण त्याच्या लक्षात आले की स्मार्टफोन उद्योगामुळे आता ऍप्लिकेशनची मोठी बाजारपेठ राहणार आहे.आणि हे एप्स लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग होऊ शकतील.या दरम्यान जॅनने आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी ब्रायनला सोबत घेतले. जॉन आणि ब्रायन दोघांनी कॅलीफोर्नियातील माउंटन व्ह्यूमधील एक कॅफे पकडला. त्या कॅफेमधील एक कोपरा जणू त्यांचं स्टार्टअप हेडक्वार्टर होतं. त्यांचं तिथे नोट्स, कोडिंग असं सगळं सुरू असायचं.

दोघांनी काही दिवसातच स्मार्ट फोनसाठी एक ऍप्लिकेशन तयार केले व बाजारात आणले. ज्यात वापरकर्त्यांना आपल्या दैनंदिन कृती आपल्या एड्रेस बुकमधील मित्र परिवारातील लोकांना कळविण्याची सोय होती. तो वर्ष 2009 चा सुरवातीचा काळ होता. पण सुरवातीला हे एप अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हते. त्यामुळे त्याला लोकांचा प्रतिसाद अगदी शून्य म्हणावा इतका कमी होता. इतकं कि त्यांचे मित्रही ते एप वापरत नव्हते.

नोकरी नाही, व्यवसाय नीट चालत नाही त्यामुळे पैसेही नाहीत अशी पुन्हा अवस्था झाली. म्हणून आता हे सगळं बंद करून पुन्हा दोघांनीही परत नोकरी शोधायला सुरवात केली.

ब्रायनने त्याकाळात नाव होऊ लागलेल्या फेसबूकमध्ये अर्ज केला.त्याला मुलाखतीला बोलावणे सुद्धा आले पण इथेही त्याला ‘रिजेक्ट’ करून परत पाठवले गेले. ट्विटरमध्येही तिचं गत, “आम्ही तुला कळवू” असा ठेवणीतील निरोप.

https://twitter.com/brianacton/status/3109544383?s=20&t=nAYImU3PPtUKaBZveBrxCA

पण म्हणतात ना कि तुमचे कष्ट  प्रामाणिक असतील तर इतर कुणी नाही तरी परिस्थिती त्याची दखल घेत असते,

आणि नेमकं असचं झालं.काही महिन्यांत एपलने पुश नोटिफिकेशन संदर्भातील आपले अपडेट रिलीज केलं. आणि सगळा खेळच बदलला. कारण यामुळे एपच्या रचनेत आणि संकल्पनेत मोठा बदल करण्यात आला. जॅनने आपल्या एपला सोशल मिडियाचं रुपडं देत नवीन अपडेट आणले.आणि ब्रायनने आपल्या याहू मधील सहकाऱ्यांकडून गुंतवणूक आणली.

आणि बघता-बघता अल्पावधीतच हे ऍप्लिकेशन लोकप्रिय झाले.

लोकप्रियता वाढत असली तरी हे एप चालवणे आजही तसं महाग होतं कारण वापरकर्त्यांच्या मोबाईल वेरीफिकेशनसाठी ओटीपी खर्चही महिन्याला हजारो डॉलर्समध्ये होता आणि  जाहिराती न घेण्याच्या धोरणामुळे उत्पन्न फारच कमी होतं. अशा या सुरवातीच्या काळात या दोघा संस्थापकांनी काही वर्षे वेतन न घेण्याचे धोरण स्वीकारलं. आणि काणत्याही जाहिरातीविना अत्यंत सोयीचं ठरलेल्या या एपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली.      

लवकरच फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या कानावर याची माहीती पोचली. 2012 मध्ये त्याने जॉन आणि ब्रायन, दोघांना भेटीचं निमंत्रण धाडलं.
दरम्यानच्या काळात चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर फेब्रुवारी 2014 मध्ये फेसबूकने ही कंपनी साधारण 19 बिलीयन डॉलर्सला विकत घेतली. फेसबूकने ज्या ब्रायनला नोकरीसाठी ‘रिजेक्ट’ केले होते त्याच कंपनीने त्याला इथे संचालक मंडळामध्ये सहभागी करून घेतले. व  जॅनला या नव्या कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्त केले. पुढे 2018 मध्ये मात्र जॅन आपणच उभारलेल्या या कंपनीतून बाहेर पडला.

या कथेची सुरुवात जॅन पासून सुरु झाली असली तरी ही कथा जॅन आणि ब्रायन या दोघांची.. त्यांच्या मैत्रीची अन् त्यांनी निर्माण केलेल्या त्या ऍप्लिकेशनची आहे.

बरं सगळं सांगून झालं पण ज्याने हा इतिहास घडवला ते ऍप्लिकेशनचे कोणतं ?

तुम्ही सांगू शकाल का ? (whatsapp story in marathi)

भारताशी नातं ..

जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती अथवा घटनेचं भारताशी एखादं कनेक्शन असणं आपण भारतीयांना सुखावतं. इथेही आहे असं एक कनेक्शन.

व्हाट्सएपचा संस्थापक जॅन कौम मूळ युक्रेनचा. अमेरिकेला स्थलांतर करण्यापूर्वी लहानपणापासून भारतीय चित्रपट पाहणे हा त्यांच्यासाठी विरंगुळ्याच्या काही क्षणांपैकी एक असे. त्यातही ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय कलाकार राहिलेले मिथुन चक्रवर्ती यांचे कित्येक चित्रपट जॅन यांनी पाहिलेत. त्याकाळचा सुपर हिट ठरलेला डिस्को डान्सर हा चित्रपट पहातच जॅन मोठा झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण जॅन याने हा चित्रपट किमान वीस वेळा पाहिलाय असं खुद्द जॅन यानेच सांगितलंय. (WhatsApp co-founder Jan Koum’s India connection)

The post एप स्टोरी ! appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/10/inspirational-story-in-marathi.html/feed 0
चारशे रुपयांची नोकरी ते हजारो कोटींची कंपनी.. https://marathistock.com/2022/08/kailash-katkar-success-story-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=kailash-katkar-success-story-in-marathi https://marathistock.com/2022/08/kailash-katkar-success-story-in-marathi.html#respond Tue, 23 Aug 2022 12:42:43 +0000 https://marathistock.com/?p=1852 यशस्वी माणसांच्या संघर्षगाथा आपल्याला सुखावतात. आणि अशीच एखादी वाचनात येणारी संघर्षाची कथा जर मराठी माणसाची असेल तर सुखावणाऱ्या त्या मनाला अभिमानाची किनारही लाभते. आज आपण पाहतो, सर्वसामान्यता करिअरची सुरवात इयत्ता दहावीनंतरच होते. म्हणजे आजच्या अल्ट्रा मॉडर्न युगाला ते तसं साजेसच, पण एक काळ असाही होता कि इयत्ता दहावी अनेकांसाठी शिक्षणाची इतिश्री समजली जायची. अशी झाली […]

The post चारशे रुपयांची नोकरी ते हजारो कोटींची कंपनी.. appeared first on MARATHI STOCK.]]>
यशस्वी माणसांच्या संघर्षगाथा आपल्याला सुखावतात. आणि अशीच एखादी वाचनात येणारी संघर्षाची कथा जर मराठी माणसाची असेल तर सुखावणाऱ्या त्या मनाला अभिमानाची किनारही लाभते.

आज आपण पाहतो, सर्वसामान्यता करिअरची सुरवात इयत्ता दहावीनंतरच होते. म्हणजे आजच्या अल्ट्रा मॉडर्न युगाला ते तसं साजेसच, पण एक काळ असाही होता कि इयत्ता दहावी अनेकांसाठी शिक्षणाची इतिश्री समजली जायची.

अशी झाली सुरवात (kailash katkar success story in marathi)

कैलाशच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला कैलाश पुढे उच्च शिक्षण घेण्याऐवजी पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला. जिथे कैलाश कॅल्क्युलेटर आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर सारख्या तेव्हा रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या वस्तू दुरुस्त करायचा. ते वर्ष होतं 1985.

कैलाशला त्याकाळी महिन्याला पगार होता 400 रुपये. कैलाश यांचे वडील फिलिप्समध्ये मशीन सेटर म्हणून काम करायचे.या दरम्यान कैलाश यांनी आपल्या वडिलांना घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिले होते. त्यामुळे त्याचीही यात रुची निर्माण झाली होती.

दुकान मालकाने कैलाशला महिनाभरासाठी आपल्या मुंबईच्या दुकानात शिकण्यासाठी पाठवले. यावेळी कैलाशला पगार होता महिना 1500 रुपये. हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंग अशा कामातून त्याची कमाई महिन्याला 2000 पर्यंत होऊ लागली.

kailash katkar quickheal

1991 : स्वव्यवसायाचा श्रीगणेशा (kailash katkar biography)

कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या नोकरीमुळे कैलाशला या तांत्रिक क्षेत्राविषयी ज्ञान आणि पुरेसे कौशल्य मिळू शकलं. आणि यातूनच आता स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांनी 1991 मध्ये पुण्यात स्वतःचे कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे दुकान उघडले.

दुकान उघडण्यासाठी त्यांची स्वताची गुंतवणूक होती 15000 रुपयांची. पण त्यांनी हे फक्त कॅल्क्युलेटर दुरुस्ती पुरतं मर्यादित ठेवलं नाही. काही काळातच कैलाशनी इतर मशिन्सही दुरुस्त करायला सुरुवात केली. यातूनच लवकर त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी वार्षिक देखभाल करार अर्थात एएमसी मिळाला.

याच दरम्यान कैलाश यांचा लहान भाऊ संजय याने बारावीनंतर शिक्षण सोडायचे ठरवले होते, पण औपचारिक शिक्षण पूर्ण न केल्यामुळे व्यावसायिक आयुष्यातील कमतरता अनुभवलेल्या कैलाश यांनी संजयला शिक्षण न सोडता उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. संजयला संगणक शिक्षण घेण्यासाठी लागणारी फी तेव्हा 5000 रुपये इतकी होती, जी तेव्हा कैलाश यांच्या कुटुंबासाठी फार जास्त होती, यावेळी कैलाश यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

..आणि आलं ते संगणकीय वळण.

ऐंशी, नव्वदीच्या दशकात बालपण घालवलेल्या प्रत्येकाची सर्वात आधी संगणक कधी पहिला याबाबतची आठवणी असेलच. कैलाश यांची सुद्धा आहे. आपल्या व्यवसायानिमित्त अनेकदा त्यांचं बँकेत जाण व्हायचं.व्यवसायानिमित्त म्हणजे बँकेतील तेव्हाची अत्यंत महत्वाची वस्तू असलेल्या कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला ते जायचे. आणि हीच ती वेळ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा  संगणक पाहिला.

हि आज टीव्हीसदृश दिसणारी वस्तू येणारं भविष्य व्यापणार आहे हे कैलाश यांनी जाणलं.आपल्या दुरुस्तीच्या कामातून मिळणारा पैसा नवीन मशीनमध्ये गुंतवण्याचा कैलाशचा विचार होता. कोणत्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे कैलाश यांच्या आईला वाटत होते कि कैलाशनी घरात म्हणजे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करावी, पण कैलाश यांनी त्यांच्या व्यवसायास प्राधान्य दिले. आणि आपल्या आयुष्यातील पहिला संगणक 50 हजार रुपयांना विकत घेतला, त्याचा वापर बिलिंगसाठी होऊ लागला. गंमत अशी कि त्यावेळी अनेकजण त्यांच्या दुकानात फक्त टीव्ही सारखा दिसणारा तो संगणक पाहण्यासाठी यायचे.

सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश.

अमेरिकादी देशात संगणकीय व्यवहार जरी रुळू लागलेले असले तरी भारतात आताशा कुठे सुरवात होऊ लागली होती, संगणक आला म्हणजे त्यासाठी  लागणाऱ्या विविध प्रणाली अर्थात सॉफ्टवेअर लागणारच.त्यामुळे हा बाजार आपल्याकडेही हळूहळू बाळसे धरू लागला. आणि हा प्रभाव त्याकाळात संगणकाला आपलेसे करणाऱ्या कैलाशवरही होताच. यातूनच त्यांनी 1993 मध्ये CAT कॉम्प्युटर सर्विसेस सुरू केली. त्यांची ही कंपनी संगणक देखभाल सेवा देत असे.

यादरम्यान कैलाश यांना आढळून आले की, दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश संगणकाच्या नादुरुस्तीचे कारण मशीन्सना झालेल्या विषाणूची लागण हे असायचं. हे पाहून कैलाश यांनी आपला भाऊ संजयला अँटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. संजय त्यांच्या पदवीत्तर शिक्षणाच्या दिवसांत आपल्या भावाच्या दुकानात वारंवार येत असे. याच दरम्यान त्याने त्याच्या मास्टर्सच्या दुसर्‍या वर्षात ‘विषाणू संक्रमित’ मशीन दुरुस्त करण्यासाठी एक प्रोग्राम विकसित केला.त्यानंतर त्याने असे आणखी 2-4 प्रोग्रॅम्स विकसित केले, जे कैलाश यांनी आपल्या वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी येणाऱ्या कॉम्प्युटरसाठी वापरून पहिले. (Quick Heal Story in marathi )

आणि मग आलं ‘क्विकहिल’.. (Quick Heal Antivirus )

अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या भविष्यातील मागणीचा अंदाज घेऊन, काटकर बंधूंनी  हार्डवेअर दुरुस्ती बाजूला ठेवून आता ‘अँटी-व्हायरस’ सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. आणि मग 1995 मध्ये त्यांनी ‘Quickheal Antivirus’ हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच केले जे DOS या संगणक प्रणालीसाठी होतं. 

त्यावेळी क्विक हील अँटीव्हायरसची किंमत होती 700 रुपये जी त्या काळात उपलब्ध असलेल्या अँटीव्हायरसच्या इतर पर्यायांच्या तुलनेत फारच स्वस्त होती.यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभला. आणि हि क्विकहिलची सुरवात होती ज्या नंतर बंधूंनी मागे वळून पाहिले नाही. 

1998 पर्यंत काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्ती पूर्णतः थांबवली आणि आपलं संपूर्ण लक्ष अँटीव्हायरसकडे वळवलं. कैलाश उत्पादनांचे मार्केटिंग करायचे, तर संजय संशोधन आणि विकासाचे म्हणजेच रिसर्च एंड डेवलपमेंटचे काम पाहत असे.

karkat brothers quickheal
व्यक्ती असो वा संस्था, बॅडपॅच येतोच

सुरुवातीची पहिली 5 वर्षे क्विक हीलचा व्यवसाय पुण्यापुरता मर्यादित होता आणि प्रतिसाद चांगला होता पण तो अद्याप यशस्वी म्हणता येईल अशा टप्प्यावर आला नव्हता.1999 च्या दरम्यान बँका आणि गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद कमी झाल्याने काटकर बंधूंवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती.

पण म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा शेवट एका नवीन पर्वाची सुरवात असू शकते.

या कठीण काळात त्यांनी आपल्या मित्र परिवाराशी बोलून त्यांनी आपल्या उत्पादन जगाला ओरडून सांगण्याचं ठरवलं, अर्थात आपल्या उत्पादनाचं आक्रमक मार्केटिंग करण्याचे ठरवलं.त्यावेळी कैलाश यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात क्विकहिलची अर्ध्या पानाची जाहिरात केली. आणि आता आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

2003 : सिमोलंघन

यश मिळविण्यासाठी सिमोलंघन गरजेचं असतं. वर्ष 2002 मध्ये काटकर बंधूंनी व्यवसाय पुण्याबाहेर नेण्याचं ठरवलं. आणि वर्ष 2003 ला नाशिकमध्ये क्विकहीलची पहिली शाखा उघडण्यात आली. आणि कंपनीच्या सर्व हार्डवेअर विक्रेत्यांना क्विकहील सॉफ्टवेअर विकण्यास प्राधान्य द्यायला सांगण्यात आले.

2002 ते 2010 या काळादरम्यान क्विक हीलने पुण्याबाहेरील अनेक मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली. काटकर बंधूंनी 2011-12 मध्ये कंपन्यांना त्यांच्या समस्येनुसार सेवा द्यायचं ठरवल म्हणजे आता त्यांची कंपनीने ‘एंटरप्राइज सोल्युशन्स’ व्यवसायात प्रवेश केला. हे फार महत्वाचं होतं. कारण कंपनी आता हळूहळू एक जागतिक ब्रँड म्हणून नावारुपास येऊ लागली.

2007 : बदल गरजेचा असतो. ( Change is inevitable )

वर्ष 2007 मध्ये कंपनीने पुण्यात नवीन संशोधन आणि विकास केंद्र उघडल्यानंतर कंपनीचे नाव बदलून आता ते ‘क्विकहील टेक्नोलॉजीज लिमिटेड’ (Quickheal Technologies Limited) असे करण्यात आले.

2010 मध्ये कंपनीत Sequoia Capital कडून 60 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आली. या निधीचा वापर कंपनीच्या नवीन शाखा उघडण्यासाठी करण्यात आला.देशाभरात महत्वाच्या शहरात कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या.

तामिळनाडूनंतर दोन वर्षांत जपान, अमेरिका, आफ्रिका आणि यूएईमध्ये शाखा उघडून कंपनी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली. 2011 मध्ये क्विक हीलने एंटरप्राइझ ग्राहकांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आणि पुढे मग 2013 पर्यंत कंपनीने संगणक आणि सर्व्हरसाठी आपले पहिले ‘एंटरप्राइझ अँड पॉइंट’ सुरक्षा सॉफ्टवेअर सादर केले

आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइझ या दोन्ही घटकांना उत्पादने पुरवते. कंपनी संगणक, सर्व्हर आणि सायबर सुरक्षा याबाबत आपली अद्ययावत उत्पादने वेळोवेळी बाजारात आणीत असते.

शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध : ( Quick Heal IPO)

कोणत्याही कंपनीचा व्यावसायिक प्रवास जेव्हा स्थिर आणि प्रगतीशील होतो तेव्हा तिला सार्वजनिक क्षेत्र खुणावू लागतं. प्रायव्हेट लिमिटेड ते पब्लिक लिमिटेड होणे हे कोणत्याही कंपनीसाठी महत्वाचा टप्पा असतो. क्विकहील बाबत असं झालं नसतं तरच नवल होतं.

अखेर 2016 मध्ये क्विक हीलचा आयपीओ आला आणि पहिल्या पिढीतील एका मराठी उद्योजकाची हि कंपनी बाजारात सूचीबद्ध झाली. (kailash katkar success story in marathi)

quick heal IPO

इंटेल या जगप्रसिद्ध कंपनीची टॅगलाईन आहे ‘इंटेल इनसाईड’. कंपनीची आपल्या क्षेत्रावरील पकड इतकी मजबूत कि जगातील जवळपास प्रत्येक संगणकात इंटेलचा एखादा तरी भाग असणारच असा आत्मविश्वास त्या टॅगलाईन मधून दिसतो.

हे सांगण्याचं कारण म्हणजे उद्या तुम्ही कदाचित जगातील एखाद्या परक्या देशात असताना तिकडे कुणाच्या लॅपटॉपची सुरक्षा ‘क्विकहील’ करत असल्याचं लक्षात आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण क्विकहीलचीही टॅगलाईन काही अशीच आहे..

तुमच्या संगणकात कोण राहतं ? ‘क्विकहील’ कि व्हायरस ?

The post चारशे रुपयांची नोकरी ते हजारो कोटींची कंपनी.. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/08/kailash-katkar-success-story-in-marathi.html/feed 0
जीएसटी ‘परतावा’ नव्हे ‘भरपाई’ https://marathistock.com/2022/06/gst-information-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=gst-information-in-marathi https://marathistock.com/2022/06/gst-information-in-marathi.html#respond Wed, 08 Jun 2022 06:59:08 +0000 https://marathistock.com/?p=1655 जीएसटी अर्थात ‘वस्तू आणि सेवा कर’ हा कर भारतात लागू होऊन आता पाच वर्ष पूर्ण होतील. अनेक धर-सोडी, रचना आणि संकल्पना बदल होऊन अखेर 1 जुलै २०१७ रोजी हा कर भारतात लागू करण्यात आला. (GST information in marathi) दर महिन्याच्या सुरवातीस मागील महिन्याचे जीएसटी संकलन जाहीर केले जाते. यामध्ये केंद्राचा वाटा म्हणजे CGST, तसेच राज्याचा […]

The post जीएसटी ‘परतावा’ नव्हे ‘भरपाई’ appeared first on MARATHI STOCK.]]>
जीएसटी अर्थात ‘वस्तू आणि सेवा कर’ हा कर भारतात लागू होऊन आता पाच वर्ष पूर्ण होतील. अनेक धर-सोडी, रचना आणि संकल्पना बदल होऊन अखेर 1 जुलै २०१७ रोजी हा कर भारतात लागू करण्यात आला. (GST information in marathi)

दर महिन्याच्या सुरवातीस मागील महिन्याचे जीएसटी संकलन जाहीर केले जाते. यामध्ये केंद्राचा वाटा म्हणजे CGST, तसेच राज्याचा वाटा अर्थात SGST, आणि आंतरराज्य वस्तू व सेवा पुरवठा संदर्भातील IGST व सेस (CESS) यांचा समावेश असतो.

संकलन , हिस्सा आणि वाटणी. (GST Collection and Distribution )

जीएसटीमध्ये संपूर्ण देशात एक करप्रणाली अपेक्षित असते. अर्थात आपल्याकडे हे कसोशीने पाळले गेले आहे असं म्हणता येणार नाही पण पाच वर्षांत हि करप्रणाली देशात बऱ्यापैकी रुजली असं नक्कीच म्हणता येईल.

State Goods and Service Tax ( SGST) : उत्पादन – सेवेवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटी मधील हा राज्याचा वाटा असतो जो त्याच वेळी थेट राज्याच्या खात्यात जमा होतो.

Central Goods and Service Tax (CGST) : हा वाटा केंद्राचा जो केंद्र सरकारच्या खात्यात जमा होतो.

Integrated Goods and Services Tax ( IGST) : राज्यां-राज्यांमधील म्हणजेच आंतरराज्य वस्तू – सेवा पुरवठ्या संदर्भात IGST आकाराला जातो. यामध्ये केंद्र आणि राज्यांचा बरोबरीचा (50 :50) वाटा असतो. याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केंद्राकडे असते. म्हणजे CGST चे संकलन करून त्यातील राज्यांचा वाटा संबंधित राज्यांना केंद्राकडून नंतर दिला जातो.

जीएसटी परतावा नव्हे तर भरपाई (GST Compensation explained in marathi)

जुलै २०१७ ला जीएसटी लागू करण्यात आला तेव्हा राज्याचा विक्री कर, व्हॅट इत्यादी करांची जागा त्याने घेतली ( पेट्रोलियम आदी उत्पादने अपवाद ) ज्यामुळे राज्याचा हक्काचा उत्पनाच्या स्त्रोतावर मर्यादा आल्या. आणि म्हणूनच जीएसटी कर-संकलन बाळसे धरेपर्यंत राज्यांना म्हणून पुढील ५ वर्षे केंद्र सरकारकडून भरपाई देण्याचे ठरले.

या पाच वर्षांची मुदत आता जून २०२२ ला संपत आहे.

नुकतंच केंद्राने मे-२०२२ पर्यंतची भरपाई थकबाकी राज्यांना दिली असून आता फक्त जून २०२२ चा शेवटचा हफ्ता बाकी असेल, जो जूनच्या जीएसटी संकलनानंतर ठरेल.

हे सुद्धा वाचा, वैयक्तिक वित्त व्यवस्थापन कसे कराल.(Personal Finance in Marathi )

राज्यांना द्याव्या लागणाऱ्या या भरपाईची तरतूद केंद्र सरकार कुठून करतं ?

याचं उत्तर आहे ‘सेस’ (CESS). सोप्या भाषेत सांगायचं तर , सेस म्हणजे करावर आकाराला जाणारा ‘उपकर’ असतो. जीएसटी सोबत आकारला जाणारा हा सेस राज्यांना द्यावयाच्या भरपाईची तरतूद म्हणून आहे. याची आकारणी जीएसटी सारखीच प्रत्येक वस्तू – सेवा पुरवठ्यानुसार ठरते. राज्याला द्यायची प्रस्तावित रक्कम ठरल्यानंतर दर दोन महिन्यांनी हि भरपाईची रक्कम दिली जाणे अपेक्षित असते.

पाच वर्षे पूर्ण, मग यापुढे राज्यांना भरपाई मिळणार कि नाही ?

केंद्राकडून ‘एप्रिल – मे २०२२’ साठीची एकूण ₹86,912 कोटींची भरपाई थकबाकी राज्यांना देण्यात आल्यानंतर आता राज्यांना फक्त जून २०२२ ची भरपाई मिळणे बाकी आहे.

पण मागील दोन वर्षे कोरोना साथीमुळे आर्थिक शिथिलता आणणारे असल्याचे सांगत जून 2022 नंतरही केंद्राने राज्यांना काही काळ भरपाईची रक्कम देत राहावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्राकडे केली आहे. पण त्याचवेळी केंद्राने मात्र सातत्त्याने वाढणाऱ्या जीएसटी संकलनाच्या वाढत्या आकडेवारीचा संदर्भ देत यापुढे भरपाईची गरज नसल्याचे मत नोंदवले आहे. अर्थात यावर काय निर्णय होतो हे लवकरच स्पष्ट होईलच.

केंद्राकडून राज्यांना दिली जाणारी जीएसटीशी संबंधित या रकमेचं वृत्त देताना अनेक मराठी वृत्तमाध्यमांत ‘जीएसटी परतावा’ हा शब्द प्रयोग केला जातो, ज्या ऐवजी खरंतर ‘जीएसटी भरपाई’ हा शब्दप्रयोग योग्य आहे.

सदर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा.आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

The post जीएसटी ‘परतावा’ नव्हे ‘भरपाई’ appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/06/gst-information-in-marathi.html/feed 0
क्रीप्टोचलन : महत्वाच्या संज्ञा माहिती असुद्या. https://marathistock.com/2022/02/cryptocurrency-terms-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=cryptocurrency-terms-in-marathi https://marathistock.com/2022/02/cryptocurrency-terms-in-marathi.html#respond Tue, 01 Feb 2022 15:08:02 +0000 https://marathistock.com/?p=1377 (cryptocurrency terms in marathi) आजच्या अर्थसंकल्पात दरवर्षीप्रमाणे अनेक महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्यातील लक्षवेधी ठरलेल्या अनेक घोषणांपैकी एक म्हणजे रिझर्व्ह बँकेद्वारे भारताचे ब्लॉकचेन आधारित डिजिटल चलन वर्षभरात आणलं जाणार आहे आणि दुसरी ब्लॉकचेन आधारित डिजिटल एसेट्सवर कर आकारणी करणार असल्याची. डिजिटल एसेट्स (Digital Assets) म्हणजेच ज्यात क्रीप्टोचलन, एनएफटी (NFT ) या गोष्टी येतात हे वेगळं […]

The post क्रीप्टोचलन : महत्वाच्या संज्ञा माहिती असुद्या. appeared first on MARATHI STOCK.]]>
(cryptocurrency terms in marathi) आजच्या अर्थसंकल्पात दरवर्षीप्रमाणे अनेक महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्यातील लक्षवेधी ठरलेल्या अनेक घोषणांपैकी एक म्हणजे रिझर्व्ह बँकेद्वारे भारताचे ब्लॉकचेन आधारित डिजिटल चलन वर्षभरात आणलं जाणार आहे आणि दुसरी ब्लॉकचेन आधारित डिजिटल एसेट्सवर कर आकारणी करणार असल्याची.

डिजिटल एसेट्स (Digital Assets) म्हणजेच ज्यात क्रीप्टोचलन, एनएफटी (NFT ) या गोष्टी येतात हे वेगळं सांगायची गरज नाहीच. आता वेगळ्या अर्थाने पाहिलं कि जेव्हा एखादी वस्तू, मालमत्ता करआकारणी संदर्भात विचारात घेतली जाते आणि त्याच बरोबर सरकारकडूनही देशाची अधिकृत डिजिटल चलन आणणार असल्याचं सुतोवाच केलं जातं तेव्हा याचा अर्थ हा सुद्धा होतो कि सरकारसाठी या बाबी स्वीकारार्ह होत आहेत. म्हणजेच सरकारकडून यास मान्यता मिळतेय का ? खरं तर थेट तसं सरकारने म्हटलेलं नाहीये पण संकेत नक्कीच दिलेत. किंवा थेट सांगायचं तर बंदी वगैरे घालणार या बाबी तर आता केव्हाच मागे ठरल्यात.

तर मग हाच विषय धरून क्रीप्टोचलन व्यवहारांमध्ये सामान्यता कोणत्या संज्ञा वापरल्या जातात आणि त्यांचे नेमके अर्थ आजच्या लेखातून सोप्या भाषेत, थोडक्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करतोय.

ब्लॉकचेन (What is Blockchain in Marathi)

What is Blockchain in Marathi

एक अत्याधुनिक गोळीबंद तंत्रज्ञान ज्यात माहिती डिजिटल रुपात अत्यंत सुरक्षित प्रकारे साठविली जाते. ब्लॉकचेनवर होणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण प्रकारांपैकी एक आहे क्रीप्टोचलन.

क्रीप्टोचलन (What is Crypto Currency in Marathi)

एक अशा प्रकारचे डिजिटल चलन ज्याचे व्यवहार कोणतीही बँक किंवा राष्ट्राकडून नियंत्रित न होता पिअर टू पिअर पद्धतीने होतात. जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सी फंड ट्रान्सफर करता, तेव्हा तो विशिष्ट व्यवहार सार्वजनिक लेजरमध्ये नोंदवला जातो. क्रीप्टोचलन हे डिजिटल पद्धतीने डिजिटल किंवा हार्डवेअर वॉलेटमध्ये साठवले जाते.

होड्ल (What is HODL )

नाही नाही .. चुकीने होल्ड ऐवजी होड्ल असं टाईप झालेलं नाही. क्रीप्टोचलन व्यवहारांत HODL (“hold on for dear life“) याचा अर्थ दीर्घकाळासाठी बाळगणे म्हणजे होल्ड याच अर्थाने आहे.

फूड (What is FUD in Crypto in marathi )

एखाद्या क्रीप्टोटोकन बद्दल नकारात्मकता पसरवायची असेल किंवा तशी परिस्थिती व्यक्त करायची असेल तर हि संज्ञा वापरली जाते. FUD म्हणजे “Fear, Uncertainty, and Doubt”

टोकन (What is crypto token in marathi )

ब्लॉकचेनवर असलेले विशिष्ट मूल्याचे एकक ज्यात सामान्यतः मूल्य हस्तांतरणाव्यतिरिक्त काही इतरही मूल्य प्रस्तावित असतात. उदाहरणार्थ टोकन :डॉह्ज कॉईन,(Dogecoin) शिबा इनू (Shiba Inu)

फीएट करन्सी ( What is Fiat currency in marathi )
What is Fiat currency in marathi

अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आपण जे नेहमी बाळगतो ते चलन. म्हणजे रुपये, डॉलर्स , पौंड. एखाद्या देशाकडून नियमन केली जाणारे चलन म्हणजेच फीएट करन्सी.

बिटकॉईन (What is Bitcoin in marathi )
What is Bitcoin in marathi

सर्वात पाहिलं क्रीप्टोचलन इतकी ओळख खरंतर पुरेशी नाही. वर्ष 2008 मध्ये निर्मित आणि वर्ष 2009 पासून वापरात आलेल्या या क्रीप्टोचलनाने आता फार मोठा पल्ला गाठलाय.

सातोशी नाकामोतो. (who is satoshi nakamoto in marathi )

बिटकॉईनचा निर्माता. म्हणावं तर अज्ञात, आभासी असं हे व्यक्तिमत्व खरंच अस्तित्वात आहे कि हे नाव इतर कुणी व्यक्ती, संस्था किंवा व्यक्तींच्या समूहाने धारण केलंय हे समजण्यास वाव नाहीये. पण अगदी ‘फिनोमेनल’ ठरलंय हे नाव यात काही शंका नाही.

एथेरीअम ( what is ethereum in marathi )
what is ethereum in marathi

बिटकॉईन नंतर सर्वात मोठी आणि महत्वाची क्रीप्टोप्रणाली म्हणजे एथेरीअम. विश्लेषकांच्या मते एथेरीअमचा विस्तार हा बिटकॉईनपेक्षा मोठा असेल. कारण एथेरीअम स्वतः एक स्वतंत्र विकेंद्रित ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे जे एक पीअर-टू-पीअर नेटवर्क स्थापित करतं.अनेक विविध क्रीप्टो प्रकल्प एथेरीअम तंत्रज्ञानावर उभारले जातात.  

अल्टकॉईन (what is altcoin in marathi)

खरंतर बिटकॉईन आणि काही प्रमाणात एथेरीअम सोडून इतर सर्व क्रीप्टोचलनांना अल्टकॉईन म्हणजेच पर्यायी क्रीप्टोचलन म्हणून संबोधलं जातं. म्हणजे ती क्रीप्टोचलने जी स्वताची क्षमता वाढवून वेगळी ओळख निर्माण करतात.

शिटकॉईन (what is shitcoin in marathi)
what is shitcoin in marathi

नावातच सगळं आलं. जसं शेअर्समध्ये आपण पेनी स्टॉक्स म्हणतो तसंच काहीसं इथे क्रीप्टोकॉईनबाबत. अगदी कमी किंवा कोणतंही स्वतंत्र अस्तित्व नसलेले.काही कागदोपत्री बरेच प्रकल्प दिसणारे पण प्रत्यक्षात काहीच नाही. पण सट्टेबाजीसाठी जास्त पसंती असणारे असे हे शिटकॉईन्स. अर्थात असे असले तरी यातील काही थोड्या गुंतवणुकीत रांकाचे राव आणि मोठी गुंतवणुक असेल तर रावाचे रंक सुद्धा करण्याची क्षमता राखतात. त्यामुळे जरा जपूनच.

‘मूनींग’ किंवा ‘टू द मून’ ( To the moon )

एखाद्या क्रीप्टोचलनाचे मूल्य अगदी अत्त्युच्च शिखरावर जाणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते.

व्हेल (whale in cryptocurrency )

ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये मोठे गुंतवणूकदार , बिग बुल , शार्क या संज्ञा ज्या अर्थाने वापरल्या जातात त्या अर्थाने इथे क्रीप्टोचलनांमध्ये मोठी गुंतवणूक बाळगून असणारयांसाठी हि संज्ञा आहे.

पंप (what is PUMP in cryptocurrency)

एखाद्या क्रीप्टोचलनाची किंमत (कृत्रिमरीत्या ) वाढणे किंवा वाढवत नेणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते. जसं शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक ‘ऑपरेट करणे’ ज्या अर्थाने घेतात अगदी तसंच.

डम्प (what is DUMP in cryptocurrency )

पंपच्या अगदी उलट म्हणजे क्रीप्टोचलनाची किंमत (कृत्रिमरीत्या ) घटणे किंवा घटवणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते.

‘सॅट’ अर्थात ‘सातोशी’ ( SAT )

बिटकॉईनचा निर्माता सातोशी नाकामोतो यावरून हे बेतलेलं आहे. जशी एक रुपयाचा छोटा हिस्सा पैसे आणि डॉलर्सचा सेंट्स मध्ये असतो तसंच बिटकॉईनचा किमान भाग (0.00000001) हा सातोशी म्हणून ओळखला जातो.

क्रीप्टो एक्स्चेंज (Top crypto exchanges in world)

हे अगदी जसं शेअर्सच्या व्यवहारांसाठी असलेल्या एक्स्चेंजसारखंच जिथे क्रीप्टोचलनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात. जगातील आघाडीचे क्रीप्टो एक्स्चेंजेस मध्ये बायनान्स, कॉईनबेस इत्यादी तसेच भारतात वझीरेक्स आणि इतर ओळखले जातात.

मित्रांनो या क्षेत्रात अशा अनेक संज्ञा आहेत ज्यांची माहिती आम्ही देत राहूच. पण आताची हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा. आणि हे फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवू नका, तुमच्या जवळच्या मित्र परिवाराशी शेअर नक्की करा. क्रीप्टोचलनासंदर्भात आमचे इतरही लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

The post क्रीप्टोचलन : महत्वाच्या संज्ञा माहिती असुद्या. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/02/cryptocurrency-terms-in-marathi.html/feed 0
जगातील सर्वात उदार अब्जाधीश, वय वर्षे एकोणतीस ! https://marathistock.com/2022/01/sam-bankman-fried-youngest-billionaire-in-the-world-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=sam-bankman-fried-youngest-billionaire-in-the-world-in-marathi https://marathistock.com/2022/01/sam-bankman-fried-youngest-billionaire-in-the-world-in-marathi.html#respond Fri, 28 Jan 2022 07:28:24 +0000 https://marathistock.com/?p=1349 त्याचं वय आहे 29, एका मोठ्या घरात आपल्या दहा मित्र कम सहकाऱ्यांसोबत तो राहतो. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या नव्या खाद्यशैलीनुसार तो व्हेगन आहे. टोयोटा कोरोला हि आजच्या काळात अगदीच जुनी म्हणावी अशी गाडी त्याच्याकडे आहे. (sam bankman fried youngest billionaire in the world in marathi) आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय ? दर शंभरा […]

The post जगातील सर्वात उदार अब्जाधीश, वय वर्षे एकोणतीस ! appeared first on MARATHI STOCK.]]>
त्याचं वय आहे 29, एका मोठ्या घरात आपल्या दहा मित्र कम सहकाऱ्यांसोबत तो राहतो. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या नव्या खाद्यशैलीनुसार तो व्हेगन आहे. टोयोटा कोरोला हि आजच्या काळात अगदीच जुनी म्हणावी अशी गाडी त्याच्याकडे आहे. (sam bankman fried youngest billionaire in the world in marathi)

आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय ? दर शंभरा मागे पन्नास एक जण अशी सहज सापडू शकतात. पण थांबा.. या तरुणाची माहिती इथेच संपत नाही. कारण अजून आम्ही त्याची संपत्ती सांगितलेली नाही.

तर त्याची संपत्ती आहे २२.5 अब्ज डॉलर्स. (sam bankman fried net worth 2022 in marathi) म्हणजे आपल्या भारतीय रुपयांत 16,86,60,22,50,250 इतकी. थोडं सोप्पं करून म्हटलं तर जवळपास एक लाख अडसष्ट हजार कोटी रुपये. आणि यातील बरीचशी संपत्ती त्याला दान करायचेय. आणि त्याने तशी सुरवातही केलेय. दान करायचेय म्हणजे रस्त्यात जो कोणी भेटेल त्याला तो पैसे वाटणार असं नाहीये, तर जगभरात ज्या मानवजातीच्या किंबहुना विश्वाच्या भल्यासाठी जी काही विधायक कामे होऊ घातलीत त्यासाठी तो त्याची संपत्ती टप्प्या-टप्प्याने दान करणार आहे.

बरं हि संपत्ती त्याने काही वडिलोपार्जित किंवा कुटुंबाचा पिढीजात उद्योग व्यवसाय वाढवून वगैरे कमावलेय असंही काही नाही.तसा तो बऱ्यापैकी सधन कुटुंबात जन्माला आला. म्हणजे त्याचे आई-बाबा दोघेही विख्यात अशा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कायदा विद्यालयात प्राध्यापक राहिलेय. म्हणजे उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आला.

ओह्ह सॉरी.. त्याचं नाव तर आम्ही तुम्हाला सांगितलंच नाहीये. तर जगातील या सर्वात तरुण अब्जाधीश तरुणाचं नाव आहे सॅम बँकमन-फ्रिड ( FTX founder Sam Bankman-Fried is the youngest billionaire in the world in marathi ) आणि त्याची ओळख म्हणायची तर जगातलं महत्वाच्या क्रीप्टो एक्सचेंजपैकी एका असणाऱ्या एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंजचा निर्माता.

Image : Forbes

कसं सुरु झालं ?  (sam bankman fried’s childhood)

घरी शैक्षणिक पार्श्वभूमी असली तरी सॅमला शिकण्यात रस वाटत नव्हता ( समविचारी लोकांनी उगाच मनात खुश होण्याऐवजी पुढे वाचावे ) कारण सातव्या-आठव्या इयत्तेत असताना तसं त्याने आई बाबांना बोलूनही दाखवले कि हे अशा प्रकारचं शिक्षण त्याला फारच बोअरिंग वाटतं. त्याला शिक्षणापेक्षा शिक्षण पद्धतीबद्दल आक्षेप होता. मग त्याच्या पालकांनी थोडा विचार करून त्याला आकडेवारीत रस निर्माण व्हावा म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगळ्या प्रकारे गणितात रुची निर्माण करणाऱ्या कॅम्पमध्ये त्याला पाठवलं. आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला. म्हणजे त्याचे समस्या सोडवण्याचे आणि व्यवस्थापनाचे कौशल्य यामुळे सुधारले.

माध्यमिक शिक्षणानंतर सॅम प्रसिद्ध अशा एमआयटीमध्ये (sam bankman fried graduated from MIT) फिजिक्स शिकण्याचा निर्णय घेतला, आता असंही म्हणतात कि हा निर्णय त्याने छापा–काटा करून घेतला होता. तसं असेलही, पण लक्षात घ्या शिक्षणात रस वाटत नव्हता म्हणून त्याने शिक्षण सोडलं नाही.(sam bankman fried education)

इथे ‘एप्सिलॉन थीटा’ नावाच्या एका ग्रुप हाऊसमध्ये सामील झाला आणि  जिथे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आधी इथे तो मित्रांसोबत कम्प्युटरवर रात्रभर गेम खेळत जागरण करणे हा त्याचा रोजचा कार्यक्रम असे. पण नंतर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षापासून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला.

इतर अनेकांप्रमाणे पैसा कमावणे हे त्याचं धेय्य बनलं, पण तो कमावण्याचं कारण वेगळं होतं.

पैसा कमवावा, कारण तो देता यावा, जगातील विधायक गोष्टींसाठी. आणि यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवावा हे त्याने लक्ष्य ठेवले. मग यासाठीच सुरवातीला त्याने वॉलस्ट्रीटवरील एका गुंतवणूकदार कंपनीत नोकरी स्वीकारली. आणि या क्षेत्रात, खरंतर आवडीच्या क्षेत्रात त्याला मनाप्रमाणे शिकता आलं.

sam bankman fried youngest billionaire in the world in marathi
Image : sam bankman fried Facebook account

पण त्याची अब्जाधीश म्हणून ओळख बनली क्रीप्टोचलन क्षेत्रातून. 2013 मध्ये त्याच्या एका मित्राने त्यावेळी अगदी नवं असणाऱ्या या क्षेत्रातील व्यवहारांसाठी एक बॉट बनवला. सॅमला त्याचं हे काम फारच आवडलं. पण त्याच्या या मित्रासोबत काम करण्यासाठी अजून पाच वर्षांचा काळ जावा लागला. 2018 मध्ये ते आपल्या एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंज करिता एकत्र आले, हे एक्स्चेंज म्हणजे जसं बायनान्स आणि आपल्याकडील वाझिरेक्स प्रमाणे.

पण त्या आधी सॅमने काय केलं. (How did sam bankman fried make millions of dollars from bitcoin )

क्रीप्टोचलन प्रकार माहित झाल्यानंतर आपला बराचसा काळ हा प्रकार समजून घेण्यात तो घालवू लागला. बिटकॉईनचे ते दिवस आजच्या सारखे नव्हते. अशाच एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की बिटकॉईनची अमेरिकेतील किंमत होती १० हजार डॉलर्स आणि त्याच वेळी त्याचे जपान एक्स्चेंजमध्ये मूल्य होते ११ हजार डॉलर्स. हि संधी सॅमच्या लक्षात आली. मग काय, अमेरिकेतून खरेदी करा आणि जपान मध्ये विका. असा दर आठवड्याचा त्याचा कार्यक्रम ठरून गेला.

sam bankman fried crypto trader

यातून त्या काळात सॅमने कमावले 20 मिलियन डॉलर्स. आणि मग तो फुलटाइम क्रीप्टोट्रेडर बनला. यातूनच मग आधी सांगितल्याप्रमाणे त्याने एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंजची स्थापना केली. आणि अगदी दोन वर्षांच्या अवधीत त्याची हि कंपनी जगातील 40 बिलियन डॉलर्स मूल्याचं एक मोठं क्रीप्टो एक्सचेंज बनलं.

FTX, a cryptocurrency exchange

‘देण्यासाठी कमावणे’ (Earn to Give) हा सॅमचा फंडा आधीच होता, पण आता तो आणखी चांगल्या प्रकारे राबवू लागला होता. मागील वर्षी सॅमने 50 मिलियन डॉलर्स दान केलेत तसंच येत्या वर्षभरात 500 मिलियन डॉलर्स दान करण्याचं त्याचं लक्ष्य आहे. आणि दशकभरात १० बिलियन डॉलर्स या जगाच्या कल्याणासाठी वाटण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे.

त्याने आतापर्यंत मदत केलेल्या प्रकारात ग्लोबल वार्मिंग, कोव्हीड-19 संकटाचा सामना करण्यासाठी केलेल्या विविध उपाय योजनांसाठी फंडिंग, उष्णकटिबंधातील विविध आजार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राणीजीव आणि विविध प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन. कारण या वसुंधरेवर माणसाइतकाच त्यांचाही अधिकार आहे असं ठाम मत सॅमचं आहे. आणि कदाचित म्हणूनच आपण वेगन असल्याचं तो आवर्जून सांगतो.

जगातील सर्वात श्रीमंत तरुण व्यक्ती (youngest billionaire in the world Sam Bankman-Fried) असूनही कोणतीही महागडी गाडी किंवा अगदी मिरवण्यासारखी गोष्ट सॅम बाळगत नाही.

कारण श्रीमंती हि मिरविण्याची गोष्ट नाहीये.

जास्तीत जास्त पैसा कमावणे हे जगातील सर्वांचं धेय्य असतं, पण तो इतरांची ‘जास्तीत जास्त मदत करण्यासाठी’ हि विचारसरणी मात्र सॅम सारख्या अगदी विरळ असणाऱ्या व्यक्तींचीच असू शकते.

नॅसडेली (NAS DAILY ) या युट्यूबरने बनवलेला सॅमवरील हा व्हिडिओ नक्की पहा

लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर असे वेगवेगळी माहिती देणारे लेख आवडत असतील तर आपण आमच्या ट्विटर, इन्स्टाग्रामफेसबुक पेजला फॉलो करू शकता. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

The post जगातील सर्वात उदार अब्जाधीश, वय वर्षे एकोणतीस ! appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/01/sam-bankman-fried-youngest-billionaire-in-the-world-in-marathi.html/feed 0
वॉरन बफेंचे फसलेले व्यवहार. https://marathistock.com/2022/01/worst-investments-of-warren-buffett-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=worst-investments-of-warren-buffett-in-marathi https://marathistock.com/2022/01/worst-investments-of-warren-buffett-in-marathi.html#respond Wed, 26 Jan 2022 07:15:24 +0000 https://marathistock.com/?p=1332 Worst investments of Warren Buffett in marathi : असं समजू , जगात दोन प्रकारची माणसं आहेत, एक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे आणि दुसरे न करणारे. पण या दोन्ही गटातील लोकांना वॉरन बफे मात्र माहित असतो. आणि बफेसारखी श्रीमंती सर्वांनाच हवी असते.पण त्यासाठी बफेनी घेतलेले कष्ट, त्यांनी मोजलेली किंमत कुणाला धड माहितीही करून घ्यायची नसते. अर्थात […]

The post वॉरन बफेंचे फसलेले व्यवहार. appeared first on MARATHI STOCK.]]>
Worst investments of Warren Buffett in marathi : असं समजू , जगात दोन प्रकारची माणसं आहेत, एक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे आणि दुसरे न करणारे. पण या दोन्ही गटातील लोकांना वॉरन बफे मात्र माहित असतो. आणि बफेसारखी श्रीमंती सर्वांनाच हवी असते.पण त्यासाठी बफेनी घेतलेले कष्ट, त्यांनी मोजलेली किंमत कुणाला धड माहितीही करून घ्यायची नसते. अर्थात यामागे काही प्रमाणात माध्यमांचा सुद्धा हात आहे जे कोणत्याही गोष्टीची फक्त एकच बाजू आपल्या समोर मांडत असतात. कारण तसं  नसतं तर वॉरन बफे हे सुद्धा आपल्या सारखेच मर्त्यमानव आहेत. फरक इतकाच शेअर मार्केट आणि गुंतवणूक हा विषय त्यांनी आपल्या रोजच्या जगण्याचा- आयुष्याचा भाग बनवला हे सुद्धा आपल्याला आवर्जून सांगितलं गेलं असतं. असो..

बफे यांचाही सुरवातीचा मोठा काळ शेअर मार्केट शिकण्यात गेला. पैसा कमवायचा हे त्याचं मुख्य उद्दिष्ट कधीही नव्हतं. तर त्यांना हे विलक्षण आणि काहीसं वेगळं असं क्षेत्र कसं चालतं, कसं काम करतं हे शिकण्यात त्यांना अधिक रस होता. आणि जेव्हा तुम्ही एखादा विषय मनापासून अगदी आवडीने शिकता तेव्हा तो विषय तुमची ओळख बनून जातो.

पण हे बफेंबद्दल हे आपल्याला माहित आहे. मग ते असं काय आहे बफेंबद्दल जे आपल्याला माहित नाही किंवा कमी प्रमाणात माहित आहे. तर हाच मुद्दा पकडून आपण आज जाणून घेणार आहोत वॉरन बफेंचे कंपन्या आणि शेअर्समधील ते व्यवहार ज्यामध्ये त्यांना नुकसान झालं किंवा अपेक्षित नफा झाला नाही.

1) अमेझॉन आणि गुगल ( अल्फाबेट ) ( Buffett avoided Amazon and google )

Amazon Google

2017 मध्ये आपल्या भागधारकांच्या सभेत बोलताना वॉरन बफे यांनी एक कबुली दिली कि संधी असतानाही अमेझॉन आणि गुगल ( अल्फाबेट ) च्या शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली नाही.

म्हणजे लक्षात घ्या आजच्या या दोन अजस्त्र कंपन्याचे महत्व बफे यांना योग्यवेळी ओळखता आलं नाही.

2) वौम्बेक टेक्स्टाईल कंपनीचा फियास्को (Buffett purchased Waumbec Mills)

वौम्बेक टेक्स्टाईल या इंग्लंडमधील टेक्स्टाईल कंपनीची खरेदी हा एक अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे स्वतः बफे यांनीच 2014 मध्ये मान्य केलं आहे. या कंपनीची खरेदी व्यवहार हा कंपनीच्या मालमत्ता मुल्याआधारित असला तरी पुढे नंतर लवकरच त्यांना हा टेक्स्टाईल मिल व्यवसाय बंद करावा लागला.

3) टेस्कोचा धडा ( Tesco : Buffett’s one of the biggest Investing mistakes)

किराणा सामान दुकानाची शृंखला असणाऱ्या या कंपनीचे 415 मिलियन शेअर्स (साडे एकेचाळीस कोटी) बर्कशायर हाथवेने 2012 मध्ये खरेदी केले.त्यानंतर काही काळाने काही शेअर्स विकले, परंतु तरीही बर्कशायरची या कंपनीत मोठी गुंतवणूक कायम राहिली. झालं काय कि 2014 मध्ये कंपनीने आपल्या नफ्याचे आकडे फुगवून दाखविल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स गडगडले. त्यावेळी या कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी उभ्या राहिलेल्या या परिस्थितीमुळे बर्कशायरने आपले काही शेअर्स विकून टाकले आणि 43 मिलियन डॉलर्सचा नफा निश्चित केला.

पण अजूनही काही शेअर्सची गुंतवणूक बफेनी ठेवली होती आणि हीच चूक महागात पडली कारण यामुळे पुढे 444 मिलियन डॉलर्सचा करोत्तर तोटा बर्कशायरला हाथवेला सोसावा लागला.

मी आधीच माझी सगळी हिस्सेदारी विकली असती तर बरं झालं असतं, या गुंतवणुकीबाबत टंगळ-मंगळ करण्याचे धोरण मला महागात पडले. हे या संदर्भातील वॉरन बफे यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.

4) डेक्सटर शू कंपनी मध्ये हात पोळले (Buffett’s loss in Dexter Shoe Co)

1993 मध्ये वॉरन बफेनी हि कंपनी 433 मिलियन डॉलर्सला खरेदी केली आणि पुढे जाऊन तो एक चुकीचा निर्णय म्हणून सिद्ध झाला. 2007 मधील आपल्या गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात बफेनी हे कबूल केलंय, ज्यात आपल्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना बसलेला हा फटका साडेतीन बिलियन डॉलर्स इतका असल्याचे सांगितले. हे मूल्य त्यावेळी बर्कशायर हाथवेच्या एकूण मालमत्तेच्या 1.6 % इतके होते.

या संदर्भातील वॉरन बफेचे गुंतवणूकदारांना उद्देशून वाक्य होते,

माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट सौदा होता ,  पण मी भविष्यात आणखी काही चुका करेन आणि तुम्ही त्यावर पैसे लावू शकता.

2014 मध्ये वॉरन बफे नि जाहीर केलं कि,

डेक्सटर शू कंपनी व्यवहाराच्या वेळी रोख रक्कम न वापरता हा व्यवहार बर्कशायर हाथवेचे शेअर्सद्वारे केला. ज्यांचं मूल्य 5.7 मूल्य डॉलर्स इतकं होतं आणि एक आर्थिक अरीष्ट्य म्हणून गिनीज बुकात या कृतीची नोंद करता येईल .

5) जनरल रीइन्श्युरन्सची खरेदी. (Buying of General Reinsurance)

1998 मध्ये जनरल रीइन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी बर्कशायर हाथवेचे दोन लाख बहात्तर हजार शेअर इश्यू करणे हि बफेंची एक मोठी चूक ठरली ज्यामुळे थकबाकी हिस्श्यात जवळपास 22 टक्क्यांची वाढ झाली. यावर बफेंनी स्वतः म्हटलंय कि,

“आमच्या या कृतीमुळे बर्कशायर हाथवेच्या गुंतवणूकदारांना जितकं मिळालं त्यापेक्षा जास्त त्यांना सोडावं लागलं”

6) कॉन्को फिलिप्सचा मोठा घास. ( Buffett buying large amount of ConocoPhillips stock)

आपले सहकारी चार्ली मुंगेर वगैरेंशी सल्लामसलत न करता 2008 मध्ये तेल आणि वायूंच्या किंमती अगदी शिखरावर असताना या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉन्को फिलिप्स या कंपनीत साठे आठ कोटी शेअर्स, सात बिलियन डॉलर्सला खरेदी केले. पण या आपल्या चुकीची पत्राद्वारे गुंतवणूकदारांना कबुली देतेवेळी मात्र या गुंतवणुकीचे मूल्य साडेचार बिलियन डॉलर्स इतके झाले होते, यावरून हा निर्णय किती घाईचा होता याची कल्पना येते.

7) बर्कशायर हाथवे (Berkshire Hathaway)

berkshire hathaway

धक्का बसला असेल ना ?

आज हि बफेंची यशस्वी गुंतवणूकदार कंपनी म्हणून प्रसिद्धीस असली तरी सुरवात अशी नव्हती. जेव्हा वर्ष 1962 मध्ये हि कंपनी बफेनी खरेदी केली, त्यावेळी ती एक बुडीत निघालेली कापड गिरणी कंपनी होती. आपण या परिस्थितीत योग्य नियोजन करून आपण नफा कमवू शकू असा समज करून विद्यमान व्यवस्थापन हटवून, कंपनीचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेऊन पुढील वीस वर्षे टेक्स्टाईल व्यवसाय चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न बफेनी केला. पण या सगळ्यात बफेंचे किती नुकसान झाले माहित आहे ?

तब्बल 200 बिलियन डॉलर्स !

तर बर्कशायर हाथवेची खरेदी बफेंची अगदी घोडचूक म्हटली तरी चालेल. अर्थात त्यानंतर या कंपनीचं एका गुंतवणूकदार कंपनीत रुपांतर केलं हि बाब वेगळीआणि त्याचं कौशल्य सिद्ध करणारी, पण त्यापूर्वी या कंपनीचा व्यवहार सपशेल चुकीचा ठरला होता हे नक्की.

तर मित्रांनो आजच्या लेखाद्वारे वॉरन बफे सारख्या सार्वकालिक उत्तम गुंतवणूकदार व्यक्तीचेही गुंतवणुकी बाबतचे व्यवहार कसे चुकीचे ठरले होते हे सांगायचा प्रयत्न केलाय. (Worst investments of Warren Buffett in marathi ) अर्थात यामधून त्यांचं सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून असलेलं महत्व किंचीतही कमी करायचा प्रयत्न नाहीये किंबहुना एखादी व्यक्ती आपापल्या क्षेत्रात कितीही मोठी आणि महान असली तरी सरतेशेवटी तीही आपल्या सारखी माणूसच. तिच्याकडूनही चुका होऊ शकतात, फरक इतकाच त्या व्यक्ती आपल्या चुकांना, आपल्या अनुभवांना धडा मानतात आणि त्याचा उपयोग पुढील आयुष्यात करतात. जे आपण सर्वसामान्य मात्र विसरतो.

लक्षात घ्या सचिन तेंडूलकर , विराट कोहली कितीही महान फलंदाज असले तरी एखाद्या चेंडूवर ते सुद्धा शून्यावर बाद झालेले आहेत. असे कितीतरी फुटबॉल सामने असतील ज्यात लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो अगदी निष्प्रभ ठरले असतील.पण म्हणून त्यांचं महानपण कमी होतं का ? अगदी तसंच वॉरन बफे सारख्या व्यक्तींचे उत्तम सौदे असो किंवा मग त्यांच्याकडून घडलेल्या चुका, आपल्या सारख्या सामान्यांसाठी त्याचं महत्व आर्थिक क्षेत्रातील एखाद्या अभ्यासक्रमा इतकंच मोठं आहे हे मात्र नक्की.

माहिती आवडली असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि इतरांनाही शेअर करा. आमचे इतर लेख इथे क्लिक करून वाचू शकता .

The post वॉरन बफेंचे फसलेले व्यवहार. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/01/worst-investments-of-warren-buffett-in-marathi.html/feed 0
सुमंत मुळगावकर आणि टाटा मोटर्स. https://marathistock.com/2022/01/sumant-moolgaokar-tata-sumo.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=sumant-moolgaokar-tata-sumo https://marathistock.com/2022/01/sumant-moolgaokar-tata-sumo.html#respond Sun, 16 Jan 2022 18:02:50 +0000 https://marathistock.com/?p=1300 उद्योग क्षेत्रात बरेचदा पाहायला, अनुभवायला मिळतं कि एखाद्या कंपनीमुळे कोणी एखादी व्यक्ती मोठी झालेली, नावारूपास आलेली असते तर मग कधी मात्र एखाद्या व्यक्तीमुळे साक्षात एखादी कंपनी उभी राहिलेली असते. (TATA Motors story in marathi) आता तुम्हाला वाटेल कि त्यात इतकं काय नवीन ? अनेक उद्योजकांनी स्वतःच्या कंपन्या उभारताना अविश्रांत कष्ट घेतलेले असतातच. म्हणून त्यांच्यामुळे एखादी […]

The post सुमंत मुळगावकर आणि टाटा मोटर्स. appeared first on MARATHI STOCK.]]>
उद्योग क्षेत्रात बरेचदा पाहायला, अनुभवायला मिळतं कि एखाद्या कंपनीमुळे कोणी एखादी व्यक्ती मोठी झालेली, नावारूपास आलेली असते तर मग कधी मात्र एखाद्या व्यक्तीमुळे साक्षात एखादी कंपनी उभी राहिलेली असते. (TATA Motors story in marathi)

आता तुम्हाला वाटेल कि त्यात इतकं काय नवीन ? अनेक उद्योजकांनी स्वतःच्या कंपन्या उभारताना अविश्रांत कष्ट घेतलेले असतातच. म्हणून त्यांच्यामुळे एखादी कंपनी नावारूपास येते हि त्यांच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब. पण आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत जी व्यक्ती संबंधित कंपनीची तशी लौकिकार्थाने मालक नव्हती पण तरीही त्या कंपनीची सर्वेसर्वा होती. म्हणजे श्रीकृष्णाची जैविक आई देवकी असली तरी त्याची आई कोण असं विचारलं कि समोर येते ती यशोदाच.

तसंच काहीसं इथं म्हटलं जाऊ शकतं.

अर्थात तरीही इथे कंपनीच्या खऱ्या मालकाचं महत्व मुळीच कमी होत नाही किंबहुना त्यांच्या सारख्या दृष्ट्या उद्योजकामुळेच त्या कंपनीच्या शिल्पकाराला आपल्या हाती असलेली हि कंपनी अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे उभारता आली, वाढवता आली.

आम्ही बोलतोय टाटा मोटर्स बद्दल आणि अर्थातच सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल.  

तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. युद्ध ऐन मध्यावर होतं. या काळात दोस्त राष्ट्रांचा महत्वाचा भाग असलेल्या इंग्लंडच्या ब्रिटीश रॉयल आर्मीला स्टीलची गरज लागणार होती आणि त्याकाळी त्यांच्या म्हणजे ब्रिटीशांच्या वसाहतींमधील मुख्य वसाहत असणाऱ्या भारतात ब्रिटिशांना यावर पर्याय सापडला. ब्रिटीश रॉयल आर्मीला स्टीलचा पुरवठा करण्याचं काम टाटा स्टीलकडे लागलं. हे काम टाटा स्टीलकडून इतकं चोख झालं कि त्यामुळे खुश होऊन ब्रिटीशांनी टाटा स्टीलला ब्रिटीश रॉयल आर्मीसाठी खास सैन्यासाठी लागणाऱ्या गाड्या बनविण्याचं कंत्राट दिलं.

टेल्कोची स्थापना (Telco Founded )

आता गोष्ट अशी होती कि तोपर्यंत टाटा समूहाचं विशेष असं वाहन उत्पादन करण्याचं कोणतंही युनिट तेव्हा नव्हतं. पण आता मात्र आपला हा उद्योग मोठा होऊ शकतो हे टाटांच्या लक्षात आलं होतं.

आणि यातूनच मग 1945 मध्ये टेल्कोची अर्थात टाटा इंजिनिअरिंग एन्ड लोकोमोटिव्ह कंपनी म्हणजेच आजची टाटा मोटर्स अस्तित्वात आली. आणि या नवनिर्मित कंपनीचं नेतृत्व एका तरुण इंजिनीअरकडे सोपवण्यात आलं. त्या तरुणाचं नाव होतं सुमंत मुळगावकर. मुंबईत जन्मलेले सुमंत यांनी इंजिनिअरिंगची पदवी लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधून मिळवली होती.

ब्रिटीश रॉयल आर्मीसाठी लागणाऱ्या गाड्या बनविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीचा वाहन उद्योग आणखी वाढवायचं विस्तारायचं अशी योजना सुमंत यांच्या मनात तयार होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या टेल्कोच्या व्यावसायिक वाहन निर्मिती योजनेने वेग घेतला आणि मग रस्त्यावर दिसू लागले टाटा ट्रक. कारण याआधी भारतात वापरले जाणारे ट्रक आदी वाहने परदेशातून मागविले जायचे आणि त्यामुळे त्यावर लागणारे विविध कर, स्पेअर पार्टसची उपलब्धता, मेंटेनन्स खर्च इत्यादी ट्रक चालकांसाठी डोकेदुखीच होती.

पण आता टाटा ट्रक आल्यानंतर मात्र परिस्थिती पालटू लागली होती. यामुळे एकूणच देशातील दळणवळण वाढू लागले. उद्योग रोजगारास चालना मिळाली ज्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेस झाला. टेल्कोकडून नागरी वापरासाठी वाहन उत्पादन सुरु होणे हे सुमंत यांच्याच कष्टाचं फलित होतं. टेल्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा स्टीलचे व्हाईस चेअरमन अशा जेआरडी यांनी आपल्या या लाडक्या मित्राकडे दिलेल्या जबाबदाऱ्या सुमंत यांनी लीलया पेलल्या.

सुमंत आणि जेआरडी

टेल्कोतील त्या काळात सुमंत यांची आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल एक किस्सा नेहमी सांगितला जातो.

दुपारच्या जेवणाच्या वेळी जेव्हा कंपनीतील अगदी व्यवस्थापनातील उच्चपदास्थांपासून सर्वसामान्य कामगार कंपनीमध्येच आपले जेवण करत असत तेव्हा सुमंत मात्र जेवणा करण्याऐवजी आपली गाडी घेऊन कुठेतरी बाहेर निघून जात असत. सुरवातीला यात विशेष काही वाटलं नाही पण जेव्हा हि गोष्ट बरेचदा घडू लागली तेव्हा अनेक व्यवस्थापनातील अनेक उच्चपदस्थांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. सुमंत कदाचित वाहनांच्या डीलर्ससह पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवण करण्यास जात असावेत आणि त्यादरम्यान त्यात त्यांचे स्वताचे काही हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता त्यांना वाटू लागली. म्हणूनच मग एक दिवशी सुमंत यांचा पाठलाग करण्याचे यातील काहीजणांनी ठरवले.

नेहमीप्रमाणे जेवणाच्या वेळी सुमंत यांची गाडी कंपनीच्या आवारातून बाहेर पडली आणि त्या मागोमाग पाठलाग करीत या संशयी अधिकाऱ्यांची गाडीही निघाली. सुमंतयांची गाडी नक्कीच कोणत्या तरी पंचतारांकित हॉटेल बाहेर लागेल अशा अपेक्षेत असतानाच त्यांनी पाहिलं कि सुमंत यांची गाडी महामार्गावर असलेल्या एका ढाब्याच्या बाजूला थांबली. आश्चर्याचा धक्का बसलेले मागील गाडीतील अधिकारी गाडीतून उतरून ढाब्यामध्ये प्रवेश करते झाले आणि पाहतात काय तर सुमंत तेथील काही ट्रक चालकांसह तिथे जेवण करत बसले होते. आपल्या कंपनीच्या ग्राहकांचा आपल्या उत्पादनाबाबत असलेला प्रतिसाद, आवडलेली रचना तसेच त्यांना अपेक्षित असलेले बदल, याबद्दल थेट त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा हा प्रकार त्या ट्रक चालकांना जितका सुखावणारा तितकाच टेल्को मधील उच्चपदस्थांना चकीत करणारा होता.

इतकच नव्हे तर जेव्हा कधी व्यावसायिक निमित्ताने सुमंत याचं देशातील विविध भागात दौरे व्हायचे तेव्हाही महामार्गावरील एखाद्या ढाब्याजवळ थांबून जेवण घेणे सुमंत पसंत करायचे कारण इथे मिळणारा ग्राहकांचा ‘फीडबॅक’ त्यांच्यासाठी अस्सल असायचा. आणि याच गोष्ठी पुढे संचालक बैठकीत मांडल्या जाणून ग्राहकांच्या म्हणजेच ट्रक चालकांच्या समस्या, त्यांच्या आपल्या उत्पादनाकडून असलेल्या अपेक्षांवर खल होत असे. जेणेकरून पुढे आपली उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख राखणे टेल्कोला शक्य झालं. अर्थात वरील घटनांमधील तपशील वेगळा असू शकतो पण हे असं घडलंय हे मात्र नक्की.

कारखान्यात उत्पादित झालेला एक लाखावा ट्रक ग्राहक कर्तार सिंग यांना देताना सुमंत मुळगावकर, गंमत अशी कि टाटा ट्रकच्या पहिल्या ट्रकचे ग्राहक सुद्धा कर्तार सिंग हेच होते.

टाटा सुमोमधील ‘सुमो’ म्हणजेच सुमंत मुळगावकर ( sumant moolgaokar tata sumo )   

सुमंत यांना टेल्कोचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातच पण त्याच बरोबर टाटा स्टील मध्येही त्यांचं योगदान राहिलं आहे स्टीलच्याही संचालक मंडळात होते. रतन टाटा यांच्यासाठी सुमंत गुरुस्थानी होते आणि म्हणूनच १९94 मध्ये जेव्हा आपली पहिली मल्टीयुटीलीटी व्हेइकल श्रेणीतील गाडी आणली तेव्हा त्या गाडीस सुमंत याचं नाव दिलं. ‘टाटा सुमो’ (TATA SUMO) हीच ती गाडी जिच्या नावातील सुमो हे नाव सुमंत मुळगावकर यांच्या इंग्रजी लिपीतील नाव आणि आडनावातील ( SUmant MOolgaokar ) पहिल्या दोन आद्याक्षरांनी म्हणजेच ‘SUMO’ असं बेतलेलं आहे.

पुढे वर्ष 2003 मध्ये टेल्कोने टाटा मोटर्स हे नवीन नाव धारण केले, अर्थात काळानुरूप व्यापक व्यावसायिक दृष्टीकोनातून नाव बदलले असले तरी सुमंत मुळगावकर यांच्यासारख्या दृष्ट्या शिल्पकाराचा वारसा मात्र आजही कायम आहे.

The post सुमंत मुळगावकर आणि टाटा मोटर्स. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2022/01/sumant-moolgaokar-tata-sumo.html/feed 0
गरज, संधी आणि क्रांती .. https://marathistock.com/2021/12/electric-car-history-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=electric-car-history-in-marathi https://marathistock.com/2021/12/electric-car-history-in-marathi.html#respond Wed, 22 Dec 2021 11:18:34 +0000 https://marathistock.com/?p=1269 काही दिवसांपूर्वी सात -आठ वर्षाच्या लेकीसह दुचाकीवरून फेरफटका मारताना अचानक गाडीत पेट्रोल भरण्याची आठवण झाली आणि दुचाकी पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवली. लहान मुलं फार बोलतात आणि त्यातही ती प्रश्न फार विचारतात.आता आपल्या सारख्या मोठ्यांना प्रश्न पडणंच बंद झालं असल्याने त्यांच्या प्रश्नांना तोंड देणं आपल्याला कठीण जातं हा भाग वेगळा. तर माझी दुचाकी पेट्रोल पंपात आणि […]

The post गरज, संधी आणि क्रांती .. appeared first on MARATHI STOCK.]]>
काही दिवसांपूर्वी सात -आठ वर्षाच्या लेकीसह दुचाकीवरून फेरफटका मारताना अचानक गाडीत पेट्रोल भरण्याची आठवण झाली आणि दुचाकी पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवली. लहान मुलं फार बोलतात आणि त्यातही ती प्रश्न फार विचारतात.आता आपल्या सारख्या मोठ्यांना प्रश्न पडणंच बंद झालं असल्याने त्यांच्या प्रश्नांना तोंड देणं आपल्याला कठीण जातं हा भाग वेगळा.

तर माझी दुचाकी पेट्रोल पंपात आणि तिच्या प्रश्नांची गाडी इलेक्ट्रिक वाहन या विषयावर वळली. जगातील नवनवीन घटना, शोध, विषय यावर अनेकदा तिला सांगण्याचा प्रयत्न असतो माझा आणि मग ते असं आपल्यावरच बुमरँग होतं. असो.. तर यावेळी तिचा प्रश्न आला..

बाबा, तुमच्या लहानपणी इलेक्ट्रिक गाडी होती ?

नाहीगं, आमच्या लहानपणी नव्हत्या इलेक्ट्रिक गाड्या.

का ?

अगं का म्हणजे काय, त्यावेळी असा काही शोध लागला नसेल.

का नाही लागला शोध ?

एव्हाना दुचाकीत पेट्रोल भरून झालं होतं पण माझं उत्तर देण्याचं इंधन मात्र संपत आलं होतं. तिला म्हटलं,

ते मला पण माहित नाही, पण मी माहिती घेऊन तुला सांगेन.

आताची वेळ टळली आणि मी (मनातच ) हुश्श केलं.

घरी आलो पण चिमुरडीने विचारलेला ” का ?” मात्र मनात साचून राहिला होता.

इलेक्ट्रिक कार अठराव्या शतकात. (First electric car in the world in the 18th century )

आपल्या बुद्धीची मर्यादा आणि एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याचा वकूब माहिती असल्याने अखेर लॅपटॉप उघडून गुगलला शरण गेलो. तर समजलं कि इलेक्ट्रिक गाडी म्हणजे कारसाठीचे प्रयत्न अगदी अठराव्या शतकापासून सुरु आहेत. १८३२ मध्ये कुणा रॉबर्ट अंडरसन नामक व्यक्तीने सर्वप्रथम क्रूड आधारित इलेक्ट्रिक गाडी बनविण्याचा काहीसा यशस्वी प्रयत्न केला. ‘काहीसा’ असं सांगण्याचं कारण म्हणजे त्याची ती गाडी रहाटगाड्यात म्हणजे प्रत्यक्षात रस्तोरस्ती चालविण्यासाठी येऊ शकली नाही. तो मान वर्ष १८८४ मध्ये एका इंग्लिश संशोधकाच्या गाडीला मिळाला.

थॉमस पार्कर (इंग्लंड)निर्मित इलेक्ट्रिक कार 1895 (Wikipedia)

थांबा, आजच्या लेखाचा विषय इलेक्ट्रिक गाडीचा इतिहास , प्रवास वगैरे असा नाहीच आहे. (Not about electric car history in marathi) तर विषय आहे. अठराव्या शतकात सुरु झालेल्या या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप यायला एकविसावं शतक का लागलं ?

तर हा “का?” आजच्या लेखाचा विषय आहे.

तसं पहायाला गेलं तर इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज, मोटार आणि खनिज तेल म्हणजे ज्यापासून इंधन मिळतं यांचा शोध साधारणतः अठराव्या शतकाच्या अल्याड-पल्याड अशा काळातच लागला आहे. जॉन रॉकफेलर ची कथा काहीजणांना माहीतही असेल, असो तर ते खनिज तेल मुळातच ‘निसर्ग निर्मित’ आणि म्हणूनच मर्यादित. त्यामुळे आज ना उद्या त्याचं दुर्भिक्ष निर्माण होणार ते तेव्हाव्ही माणसाच्या लक्षात आलं असलच. मोटार पूर्णतः मानव निर्मित आणि तसंच काहीसं वीजेबद्दल सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे निसर्गतःच तिचं अस्तित्व असलं तरी आपल्या वापरासाठी माणूस तिची आपल्या वापरासापेक्ष निर्मिती करू शकतो आणि त्यामुळेच ती अगदी इंधनाप्रमाणे मर्यादित प्रमाणार उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही.

पण तरीही सोयीचं आणि तत्कालीन जगरहाटीनुसार इंधनावर चालणाऱ्या मोटारी रस्त्यावर दिसणे साहजिक होतं. जग बदलत होतं पण घरातील स्टोव्हपासून नवनिर्मिती ठरलेल्या विमानांपर्यंत सगळीकडे इंधन म्हणजेच क्रूड तेलाचा बोलबाला होऊ लागला. आपल्या भूमीत तेलसाठे असलेल्या किमान तेलास असं महत्व येईपर्यंत तरी अगदी मागास असलेल्या देशांची यापुढील अर्थव्यवस्थाच तेलावर पोसली जाऊ लागली.अमेरिका – रशिया सारख्या देशांना तेलाचे महत्व आधी समजल्यामुळे गल्फ पट्ट्यातील या देशांना आपापल्या कंपूत घेण्याची त्यांच्यात अहमिका होती. त्यामुळे या अरेबियन देशातील जनतेचे नाही पण राज्यकर्त्यांचे उखळ तेवढे पांढरे झाले. त्यातही शेख अहमद झाकी यामिनी सारखी जाणती व्यक्ती तेलमंत्री म्हणून लाभल्यामुळे सौदी अरेबियासारख्या एक कुटुंब नियंत्रित देश अमेरिकेसारख्या शुद्ध भांडवलशाही देशाशी त्यातल्या-त्यात संतुलित व्यापार करू शकला. असो.. 

इलक्ट्रिक कार आपल्याला सत्तरीच्या दशकांत उपलब्ध झाल्या असत्या तर ..?

आता जरा विचार करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या किंवा मोटार आपल्याला एकोणिसाव्या शतकात अगदी साठ-सत्तरीच्या दशकात उपलब्ध झाल्या असत्या तर ? म्हणजे अगदी पायाभूत सुविधांसह. काय स्थिती असती आज ?

अर्थात अमेरिका तसाही आज तेल उत्पादनात स्वयंपूर्ण आहेच. पण जर वर सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने काही दशके आधी आली असती तर तेलावर पोसले गेलेले आखाती देश त्यातील अफाट संपत्ती असणारे राज्यकर्ते-राजघराणी वगैरे, महाकाय तेल कंपन्या किंवा मग अगदी तुमच्या माहितीतील आसपासच्या भागातील एखाद्या आमदार खासदाराचे पेट्रोल पंप या सगळ्यांचे आजचे चित्र काय असते ?

आखाती युद्धाचं काय झालं असतं ? किंबहुना आखाती युद्धच झालं असतं का ? हे असे असंख्य प्रश्न उभे राहतात. 

लांबलेल्या (?) तेलायुगामुळे कुणाचे उखळ पांढरे ? (who has benefitted from oil)

ज्या कालखंडात अनेक तांत्रिक औद्योगिक शोध लागले त्या कालखंडात विजेवर धावणाऱ्या गाड्या, दळणवळण याबाबत ठोस संशोधन का झालं नाही ? कि अगदी गल्ली ते जागतिक स्तरावर राजकारणी, उद्योगसंस्था अशी महाकाय युतीचे आर्थिक हितसंबंध आणि त्याची पूर्ण इकोसिस्टम यामध्ये गुंतली असल्यामुळे अशा काही प्रयत्नांना बळच मिळू दिलं नाही ? 

मागच्या काही दशकातील औद्योगिक इतिहासाची पाने चाळली तर यासाठी अगदी वरवर काही प्रयत्न झालेले दिसतात जे पुढे सरकलेच नाहीत. भारतात टाटा सारख्या सक्षम कंपनीकडूनही याबाबत काही प्रयत्न का झाले नाहीत ? ज्यांच्याकडून झाले ते पुढील टप्प्यावर का नाही गेले ? अगदी अमेरिकेतही खऱ्या अर्थाने हा प्रकार अगदी रोजच्या रहाटगाड्यात तेव्हाच आला जेव्हा एलन मस्कसारख्या स्वयंसिद्ध उद्योजकाने ते मनावर घेतलं तेव्हा.

यापुढे हे थांबवता येणार नाही आणि टेस्लाच्या आपल्याकडील आगमनाची आणि पुढील ना टाळता येणाऱ्या स्पर्धेची जाणीव झाल्यावरच आपल्याकडे हालचाली सुरु झाल्या.अन आता आपल्या देशांत दर दोन तासांना सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन प्रोजेक्ट बद्दलचे अपडेट्स पाहायला मिळतात. 

आपल्याला फक्त दिसते होऊ घातलेली क्रांती पण नाही दिसत ते त्यामागील कुणाचीतरी गरज आणि त्यामधून साधली जाणारी संधी.

वरकरणी आपण यापुढील जग इलेक्ट्रिक वाहनांचे असेल असं भरभरून बोलतो. पण खरंतर हे दिव्यातील तेल संपत आल्यावर नाईलाजाने लाईट लावण्यासारखं झालंय असं म्हणायला वाव नक्कीच आहे. तेल युगाचा तसाही अस्त दृष्टीपथात आहे. अर्थात पुढील काही दशके तेल असेल पण त्यात मलिदा खाण्यासारखं, एखाद्या देशाची आणि राजघराण्याचीही अर्थव्यवस्था पोसली जाण्यासारखं, धनदांडग्यांच्या पिढ्यांची सोय होण्यासारखं काही त्यात नक्कीच नसेल. आणि तसंही बदलत्या जगातील महासत्ता आता ‘ऑइलोहोलिक’ नसेल कारण क्लाइव्ह हुंबी नामक ब्रिटिश गणितज्ञाने म्हटलं आहेच.

 डेटा इज द न्यू ऑइल. 

Data is the new Oil..

लेख आवडला असेल तर इतरांना शेअर नक्की करा, आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

The post गरज, संधी आणि क्रांती .. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2021/12/electric-car-history-in-marathi.html/feed 0