MARATHI STOCK https://marathistock.com वित्तंबातमी, वित्तसाक्षरता ! Tue, 19 Nov 2024 14:19:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://marathistock.com/wp-content/uploads/2024/08/cropped-android-chrome-512x512-1-32x32.png MARATHI STOCK https://marathistock.com 32 32 साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=elcid-investments-in-marathi https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html#respond Fri, 01 Nov 2024 18:38:56 +0000 https://marathistock.com/?p=2606 परवा 29 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग स्टॉक्स पाहत असताना एका स्टॉक्सने लक्ष वेधून घेतले, ऑल टाइम हाय गाठणाऱ्या स्टॉक्सच्या कॅटेगरीमध्ये दिसणाऱ्या या स्टॉक्सने त्या एकाच दिवशी तब्बल 69 हजार पट वाढ नोंदवली होती. थोडं चक्रावूनच गेलो, पण त्यानंतर थोडं शोध घेतल्यावर एकंदरीत प्रकरण लक्षात आलं. कारण एव्हाना बातम्या, अलर्टस येऊ लागली होती. ‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid […]

The post साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. appeared first on MARATHI STOCK.]]>
परवा 29 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग स्टॉक्स पाहत असताना एका स्टॉक्सने लक्ष वेधून घेतले, ऑल टाइम हाय गाठणाऱ्या स्टॉक्सच्या कॅटेगरीमध्ये दिसणाऱ्या या स्टॉक्सने त्या एकाच दिवशी तब्बल 69 हजार पट वाढ नोंदवली होती. थोडं चक्रावूनच गेलो, पण त्यानंतर थोडं शोध घेतल्यावर एकंदरीत प्रकरण लक्षात आलं. कारण एव्हाना बातम्या, अलर्टस येऊ लागली होती.

‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) हे त्या कंपनीचे नाव आहे. पण असं नक्की काय झालं होतं की जवळपास ₹3.59 किंमत नोंदला गेलेला या कंपनीचा शेअर अगदी काही क्षणांत कोणत्याही मर्यादेविना ₹2,36,250.00 पर्यंत गेला. ज्यामुळे त्याने भारतीय स्टॉक मार्केटमधील सर्वात महागडा शेअर बिरुद असलेल्या MRF लाही मागे टाकलंय. त्यानंतर काल हा शेअर आणखी वर जाऊन ₹2,48,062 वर पोहोचलाय. पण गंमतीचा भाग म्हणजे, आजही पुस्तकी मूल्यानुसार हा शेअर स्वस्तच आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही, ‘स्वस्त!’ या उच्चांकी उसळीमागील कारणही या शेअरच्या नियमापेक्षा जास्त ‘स्वस्त’ असण्यामध्येच दडलेलं आहे.

हे झालं एका विशेष लिलावाच्या आयोजनामुळे,

अनेकदा असं होतं की एखाद्या शेअरची किंमत त्याच्या मुलभूत निकषांवर पाहिल्यास वाजवी नसते, या शेअरबाबतही असंच होतं. आधी या शेअरची किंमत 3.59 रुपये होती, तर पुस्तक मूल्य मात्र प्रति शेअर 4 लाख रुपयांपेक्षा अधिक दिसत होतं. म्हणजे पुस्तकी मूल्यानुसार पाहायला गेलं तर शेअरची किंमत योग्य गुणोत्तरात नव्हती.

असं का ?

‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) ही बाजारात एक सूचीबद्ध कंपनी असली तरी ती एक होल्डिंग कंपनी म्हणून वर्गीकृत आहे, जिची कमाई प्रामुख्याने गुंतवणुकीवरील व्याज आणि लाभांशातून येते. होल्डिंग कंपन्यांचे शेअर्स बहुतेक वेळा सवलतीच्या (डिस्काउंट) दरात व्यवहार करतात आणि अल्साइडच्या बाबतीतही असेच होते. अशा शेअरबाबत असणारी बाजारातील अत्यंत कमी तरलता आणि 5% दैनंदिन किमतीची मर्यादा या शेअर्सच्या किमती कमी राहतात. म्हणजेच भोवतालच्या नियम आणि परिस्थितीवश योग्य ती किंमत प्राप्त न होत नाही.
हे लक्षात घेऊन अशा कंपन्यांना त्यांचे वाजवी मूल्य प्राप्त होण्यासाठी काही पाऊले उचलणे आवश्यक होते, ज्याचा विचार करून सेबीने या कंपन्यांना एक विशेष लीलावाद्वारे आपले वाजवी मूल्य प्राप्त करू घेण्याची संधी दिली. म्हणजेच या लिलावाद्वारे या कंपन्यांच्या खऱ्या किंमतीचा शोध घेतला जातो.

काय आहे हा विशेष लिलाव?

SEBI ने जून 2024 मध्ये एक परिपत्रक काढले आहे ज्या अंतर्गत गुंतवणूक (होल्डिंग) कंपन्यांसाठी वाजवी मूल्य निश्चित करण्याच्या मार्गात सुधारणा करण्यासाठी विशेष लिलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. SEBI ने निरीक्षण केले की अशा अनेक कंपन्या त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी व्यवहार करत आहेत, म्हणून त्यांच्यात गुंतवणुक वाढवण्यासाठी एका लिलावाची (ऑक्शन) योजना आणली. ज्यामध्ये शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणत्याही मर्यादेचा अडसर नसेल. यानुसारच 29 ऑक्टोबर रोजी हे लिलाव आयोजीत करण्यात आले होते, ज्यानुसार या शेअर्समध्ये उसळी दिसून आली. लक्षात घ्या ही अशा शेअर्ससाठी एकप्रकारे रिलिस्टिंग म्हणजे पुनर्सूचीबद्ध होण्याची प्रक्रिया असते.

पण विश्लेषकांच्या मते अल्साइडच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीनंतरही कंपनीचे शेअर्स अजूनही 0.38 च्या कमी प्राइस-टू-बुक रेशोवर व्यवहार करत आहेत. कारण कंपनीत प्रवर्तकांकडे 75% हिस्सा असून बाजारात अपेक्षित असणारे फ्री फ्लोट हिस्सेदारी कमी आहे, त्यामुळे योग्य मूल्यासाठी अधिक तरलता आवश्यक आहे. कारण तरलता नसल्याने अल्साइड इन्वेस्टमेंट च्या शेअर्समध्ये शेवटचे व्यवहार याआधी 21 जून 2024 रोजी झाले होते ज्यावेळी अवघे 500 शेअर्स मध्ये व्यवहार झाले होते.

फक्त एल्साइड इन्वेस्टमेंटसाठीच साठीच हा लिलाव आयोजित करण्यात आला होता का?

नाही, पिलानी इन्व्हेस्टमेंट्स, कल्याणी इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र स्कूटर्ससारख्या इतर होल्डिंग कंपन्यादेखील यात सहभागी झाल्या, परंतु त्यांच्या किमतींमध्ये फारसा बदल झाला नाही.

विशेष लिलाव कसे कार्य करते?

हा लिलाव वर्षातून एकदा होतो, ज्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस दिली जाते. लिलावात शेअरची योग्य ती किंमत यशस्वीरित्या शोधण्यासाठी किमान पाच भिन्न खरेदीदार आणि विक्रेते असणे आवश्यक असते. पहिल्या दिवशी किंमत निश्चित न झाल्यास, योग्य किंमत मिळेपर्यंत दुसऱ्या दिवशीही हा लिलाव सुरू राहतो.

असो, जाता-जाता आणखी एक महत्वाचं, एक गुंतवणूकदार कंपनी असल्याने या एल्साइड इन्वेस्टमेंटची ‘Asian Paints’ मध्ये 1.28% हिस्सेदारी आहे, ज्याचे मूल्य रु. 3,616 कोटी आहे, जे ‘Elcid’ च्या स्वतःच्या एकूण बाजार भांडवलाच्या 80% आहे.

The post साडेतीन रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत, केवळ २ दिवसांत. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/11/elcid-investments-in-marathi.html/feed 0
केवळ कठोर कायदा उपयोगाचा नाही. https://marathistock.com/2024/08/how-to-stop-crime-against-women-and-child-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=how-to-stop-crime-against-women-and-child-in-marathi https://marathistock.com/2024/08/how-to-stop-crime-against-women-and-child-in-marathi.html#respond Tue, 20 Aug 2024 07:37:23 +0000 https://marathistock.com/?p=2587 सोसायटीतील सफाईवाल्याला त्याच्या कामात मदत करणाऱ्या त्याच्या 16 – 17 वर्षांचा मुलाला गेली 6 – 7 वर्षे म्हणजे तो 10-11 वर्षांचा असल्यापासून पाहतोय. तसा तेव्हा अत्यंत सुस्वभावी असणाऱ्या या मुलाने शाळा इयत्ता 6 वीत असतानाच सोडली. गेल्या 2 वर्षांपासून बापाने त्याच्या हट्टापायी त्याला स्मार्टफोन घेऊन दिलाय ज्यावर हा दिवसभर इंस्टा रिल्स पाहत असतो. सोशल मीडिया […]

The post केवळ कठोर कायदा उपयोगाचा नाही. appeared first on MARATHI STOCK.]]>
सोसायटीतील सफाईवाल्याला त्याच्या कामात मदत करणाऱ्या त्याच्या 16 – 17 वर्षांचा मुलाला गेली 6 – 7 वर्षे म्हणजे तो 10-11 वर्षांचा असल्यापासून पाहतोय. तसा तेव्हा अत्यंत सुस्वभावी असणाऱ्या या मुलाने शाळा इयत्ता 6 वीत असतानाच सोडली. गेल्या 2 वर्षांपासून बापाने त्याच्या हट्टापायी त्याला स्मार्टफोन घेऊन दिलाय ज्यावर हा दिवसभर इंस्टा रिल्स पाहत असतो. सोशल मीडिया आणि त्याचे अल्गोरिदम ज्याला कळतं त्याला पुढे वेगळं सांगायला नको.

अर्थात या गोष्टीमुळे तो अमुक एका मार्गानेच जाणार असं काही मी भविष्यवाणी करत नाहीये. पण त्याच्या वागण्यात बोलण्यात पूर्वीसारखं सौजन्य राहिलं नाहीये आणि दिवसभर मोबाईलला लागून असल्याने अनेकवेळा बापाचं त्याला ओरडणे कानावर येत असतं. हे बदल निश्चितच जाणवतात.

विषयाला संदर्भ आहे सध्या बलात्कार – लैंगिक अत्याचारांच्या घटनांत झालेली वाढ आणि त्यातही याला बळी पडणाऱ्यांत अल्पवयीन किंवा लहान मुलांची तसेच दुबळ्या घटकातील संख्या लक्षणीय आहे. अर्थात यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात पण माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून सर्वसामान्यपणे जाणवणारा घटक म्हणजे ‘अपेक्षित समज आणि वय गाठण्याआधीच मुलांच्या हातात येणारा मोबाईल आणि त्यामधील सोशल मिडियासारख्या घटकांशी होणारी ओळख’ हा आहे.

आवाक्यात आलेला स्मार्टफोन आणि दिवसाला उपलब्ध असणारा दीड-दोन जीबीचा डेटा. इंस्टारिल्स, युट्युब शॉर्ट्स आणि त्यावरील अर्निंगसाठी आवश्यक असणारी रीच मिळविण्यासाठी होणाऱ्या सोप्या मार्गांचा व फालतू कंटेंटचां वापर, अनिर्बंध ओटीटी (OTT) हे सगळं आज ‘अलार्मिंग’ आहे पण तिकडे लक्ष न देता आपल्या लोकांचे केवळ यावर कठोर कायदा आणि फाशीची शिक्षा अशी मागणी आहे. कठोर शिक्षा हवीच या दुमत नाहीच आणि नव्या गुन्हेगारी कायद्यात अर्थात भारतीय न्याय संहितेत (BNS) तशी तरतूद आहेच आणि ती हवीच पण त्यामुळे असे गुन्हे थांबायचे असते तर निर्भय प्रकरणातील आरोपींना फाशी दिली गेल्यानंतर असे गुन्हे झपाट्याने कमी व्हायला हवे होते पण तसं होण्याऐवजी या अत्याचारांच्या घटनांत वाढच झालेय. का असं होतंय ?

एक उदाहरण पाहूया,

एखाद्या सदासर्वकाळ भुकेल्या असणाऱ्या व्यक्तीची भूक आसपास असणाऱ्या रेस्टॉरंट्स, हॉटेल काऊंटरवरील चमचमीत पदार्थ पाहून किंवा तेथील दरवळ अनुभवून आणखी वाढीस लागते पण ते डोळ्यांना ‘दिसणारं’ प्रत्यक्षात मिळवणं मात्र त्या व्यक्तीच्या ओरबाडून खाण्याच्या वृत्तीच्या आवाक्यात नसतं. मग हि व्यक्ती आपली भूक भागवण्यासाठी एखादी वडापाव गाडी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्टॉलसारख्या ठिकाणी चोरी करू पाहते, कारण ते त्या व्यक्तीला सहज शक्य असतं, त्याच्या आवाक्यात असतं. काहीसं असंच होतं, जेव्हा वर सांगितलेल्या माध्यमांवरून चाळवली गेलेली वासनेची विकृत भूक हि श्वापदे आपल्या आसपास सहज उपलब्ध असणाऱ्या सॉफ्ट टार्गेटवर भागवू पाहतात. अमेरिकेसारख्या मोकळं वातावरण असणाऱ्या देशातही अशाच इंस्टाग्राम संदर्भातील प्रकरणी खुद्द मार्क झुकेरबर्गला जाहीर माफी मागावी लागली आहे.

मग काय करता येईल?

कठोर कायद्यांसोबतच त्यासंदर्भातील प्रक्रिया आणि अंमलबजावणी यांचा वेग वाढायला हवा यात वाद नाही. त्या खेरीज सरकारकडून होऊ शकतील अशा बाबी म्हणजे सीसी कॅमेरांची व्याप्ती वाढायला हवी. सार्वजनिक ठिकाणांच्या खेरीज शाळा, इस्पितळे मग ती सरकारी असो वा खाजगी सीसी कॅमेरा बंधनकारक करण्यात यावे.

पण सर्वात महत्वाचं म्हणजे,

पण माझ्यामते या सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचे नियमन आवश्यक असणे. मी नेहमीच वैयक्तिक गोपनीयतेचा पुरस्कर्ता राहिलोय पण याची किंमत जर येणाऱ्या पिढ्यांना नासवून चुकवावी लागणार असेल तर मात्र यास जबाबदार ठरणाऱ्या गोष्टींचं नियमन व्हायलाच हवं. प्रत्येक समाजमाध्यमी खात्यासाठी वैयक्तिक ओळख जाहीर आणि सत्यापित करणे बंधनकारक व्हायला हवे. समाज माध्यमांवरील कंटेंटसंदर्भात मार्गदर्शक तत्वे आणि संबंधित समाजमाध्यमी खातेधारकांची जबाबदारी निश्चित व्हायला हवी.

कायदा कठोर करून समाज बदलू शकतो पण त्यासाठी तो समाजही प्रगल्भ हवा, दुर्दैवाने आपल्याकडे याची वानवाच आहे. त्यातही बलात्कार, लैंगिक अत्याचारासारखे गुन्हे ‘मानसशास्त्रीय’ अवस्थेशी संबंधित आहेत. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ‘त्याबाबतीत असणाऱ्या कायद्याची समज किंवा पुढे भोगाव्या लागू शकणाऱ्या परिणामांची कल्पना नसते’ असं मुळीच नाही पण प्रत्यक्ष गुन्हा करतेवेळी ती व्यक्ती शरीराने माणूस असली तरी तिच्या मनाचा ताबा वासनांध पशूने घेतलेला असतो.

म्हणूनच ‘सायकोलॉजीकल’ प्रभाव असणाऱ्या अशा गुन्ह्याचा प्रतिबंध केवळ ‘लिगल’ रेमेडीने होणार नाही. यासाठी काही बदल समाजात स्वतः समाजानेही आपणहून करायला हवेत. यासाठी आईबाबांच्या भूमिकेत असणाऱ्यांची जबाबदारी जास्तच आहे. आज लहान असलेल्या आपल्या मुलाने उद्या मोठे होऊन कोणतेही लाजिरवाणे कृत्य करू नये यासाठी आपण काही नियम आजपासून निश्चित करायला हवेत. हल्ली वयवर्षे तीन असल्यापासून मुलांच्या हातात मोबाईल येऊ लागलाय. आईबाबा दोन्ही नोकरी व्यवसाय करणारी असल्याने किंवा मुल शांत राहतं म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. पुढे आपसूकच मोबाईलवरील सोशल मिडियासुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि न कळणाऱ्या अशा त्या वयात नको त्या गोष्टींना ते मुल सामोरं जातं. ‘आपलं लहान मुल मोबाईल किती सराईतपणे हाताळतं’ याचं कौतुक सांगणाऱ्या आईबाबांची खरतर कीव करावीशी वाटते.

शेतीमध्ये उत्तम पिकासाठी जमिनीची मशागत, खते यांचं जे महत्व आहे तेवढंच महत्व मुलांच्या उत्तम मानसिक बैठकीसाठी त्यांच्या लहानपणापासून पालकांकडून आवश्यक असणाऱ्या प्रयत्नाचं आहे. मुलगा असो व मुलगी हे दोघांसंदर्भात आवश्यक आहे पण त्यातही मुलगा असणाऱ्या पालकांची जबाबदारी किंचित जास्त आहे हे सुद्धा आवर्जून लक्षात घ्यायला हवे. ‘उद्याची’ पिढी निकोप हवी असेल तर तिचा ‘आज’ सकस वातावरणात जायला हवा. मुलगा असो व मुलगी, भविष्यात दोघांना एकेमेकांकडे एखादं ‘प्रॉडक्ट’ किंवा ‘सोर्स’ म्हणून न पाहता आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून पाहता यायला हवे या दृष्टीने पालकांचे प्रयत्न असावेत.

आणि हो, दारू पिण्यासाठी, गाडी चालविण्यासाठी, मतदानासाठी, लग्नासाठी असलेलं किमान वयोमर्यादेचं बंधन लहान मुलांकडून होणाऱ्या मोबाईलच्या वापरासाठीसुद्धा का असू नये? 

The post केवळ कठोर कायदा उपयोगाचा नाही. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/08/how-to-stop-crime-against-women-and-child-in-marathi.html/feed 0
4 सर्वोत्तम “लाइफटाईम फ्री क्रेडीट कार्ड्स” https://marathistock.com/2024/03/best-lifetime-free-credit-cards-in-india.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=best-lifetime-free-credit-cards-in-india https://marathistock.com/2024/03/best-lifetime-free-credit-cards-in-india.html#respond Wed, 27 Mar 2024 09:14:21 +0000 https://marathistock.com/?p=2520 “क्रेडीट कार्ड बाळगणे चांगलं कि वाईट?” हा प्रश्न खरतर व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे जर ‘चाकू’ एखाद्या उत्तम शेफच्या हातात असेल तर त्याचा उपयोग उत्तमोत्तम अन्नपदार्थ बनविण्यासाठी केला जाऊ शकेल, पण तोच चाकू एखाद्या माथेफिरूच्या हाती असेल तर ? क्रेडीट कार्ड्सचं सुद्धा काहीसं असंच आहे. ते ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्याव्यक्तीच्या स्वभावावर ते क्रेडीट कार्ड त्याचा मित्र […]

The post 4 सर्वोत्तम “लाइफटाईम फ्री क्रेडीट कार्ड्स” appeared first on MARATHI STOCK.]]>

“क्रेडीट कार्ड बाळगणे चांगलं कि वाईट?”

हा प्रश्न खरतर व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे जर ‘चाकू’ एखाद्या उत्तम शेफच्या हातात असेल तर त्याचा उपयोग उत्तमोत्तम अन्नपदार्थ बनविण्यासाठी केला जाऊ शकेल, पण तोच चाकू एखाद्या माथेफिरूच्या हाती असेल तर ? क्रेडीट कार्ड्सचं सुद्धा काहीसं असंच आहे. ते ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्याव्यक्तीच्या स्वभावावर ते क्रेडीट कार्ड त्याचा मित्र आहे कि शत्रू हे अवलंबून असतं.

आम्ही या आधीही सांगितलंय कि योग्य प्रकारे वापरलं तर क्रेडीट कार्ड फारच उपयुक्त आहे. पण एखाद्याचा स्वभाव उधळपट्टी करण्याचा असेल तर क्रेडीट कार्डसारखा अर्थपात घडवणारा शत्रू नाही. त्यामुळे क्रेडीट कार्ड बाळगावे कि नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. गरज आणि चैन यांच्यातील फरक समजण्याइतपत वित्तसाक्षरता तुमच्यात असेल आणि त्यानुसार क्रेडीट कार्डचा उत्तम वापर करता येत असेल तर मग वरील प्रश्न तुमच्यासाठी नाहीच.

यानुसार आमच्या वापर आणि अनुभवानुसार लाइफटाईम फ्री या गटातील 4 सर्वोत्तम क्रेडीट कार्ड कोणती हे आज आम्ही सांगणार आहोत. हे सांगण्याआधी काही महत्वाचे मुद्दे पुढे स्पष्ट करत आहोत. (Best Lifetime Free Credit Cards in india)

टॉप 4 का ? 5 का नाही ? कारण आमच्या स्वतःजवळ विविध बँकांची लाइफटाईम फ्री या गटातील जवळपास 10 कार्ड्स असली तरी उपयुक्तता आणि वैशिष्ट्यांनुसार आवर्जून नावं घ्यावीत अशी हि चारच आहेत. उगाच आजच्या शिरस्त्यानुसार ऐकायला आणि लिहायला बरं दिसतं म्हणून त्यामध्ये आणखी एक कुठला तरी जोडून “टॉप 5” कशाला सांगू.

कार्डच्या माहितीसोबतच ऑनलाईन एप्लायसाठी दिलेल्या लिंक्सपैकी केवळ 2 कार्ड्सच्या लिंक्स या आमच्या रेफरल लिंक आहेत त्यामुळे हि माहिती रेफरल वगैरे डोळ्यासमोर ठेवून केलेला हा आटापिटा नव्हे हे कृपया लक्षात घ्यावे. कारण तसं करायचं असतं तर उत्तम रेफरल प्रोग्राम असणाऱ्या इतर 4 ते 5 कार्डांचा सहज समावेश आम्ही या सर्वोत्तम लिस्टमध्ये केला असता, पण तसं होणे नाही कारण अनुभवातून, वापरातून जे-जे योग्य आणि उपयुक्त वाटलं केवळ तेच सांगण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. इतर बाबी आमच्यासाठी नेहमीच दुय्यम.

तर पाहूया आमच्या मते चार सर्वोत्तम लाइफटाईम फ्री क्रेडीट कार्ड्स त्यांची वैशिष्ट्ये आणि पूर्णतः ऑनलाईन पद्धतीच्या एप्लाय करण्याच्या लिंकसह. (Best Lifetime Free Credit Cards in india)

  • संपूर्णता मेटल अर्थात धातूने बनलेले क्रेडीट कार्ड.
  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • रिवार्ड पॉईंट्स रिडम्पशन शुल्क नाही.
  • पूर्णतः एप आधारित कार्ड.म्हणजेच वापरकर्त्याच्या हाती कार्डचे संपूर्ण नियंत्रण.
  • महिन्यात किमान तीन कॅटेगरींसाठी वापर केल्यास सर्वाधिक वापराच्या 2 कॅटेगरींसाठी मिळालेल्या रिवार्ड पॉईंट्समध्ये 5 पटींनी वाढ.
  • रिवार्ड पॉईंट्स रिडम्पशनद्वारे एखाद्या खरेदीचे पैसे परत मिळवणे शक्य तसेच वन क्रेडीट कार्डचे बिल सुद्धा पे करता येते. रिडम्पशन शुल्क नसल्याने यामध्ये अतिरिक्त भार नाही.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • महिन्यास 25 हजारांवर वापर तसेच वापरकर्त्याच्या वाढदिवशी नेहमीच्या निकषांच्या 10 पट रिवार्ड पॉईंट्स.
  • रिवार्ड पॉईंट्सचा वापर नेहमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन (इन स्टोर) खरेदीसाठीसुद्धा शक्य.
  • इतर क्रेडीट कार्ड्सच्या तुलनेत कमी म्हणजेच 9% ते 42% दरम्यान व्याजदर.
  • इंटरेस्ट फ्री अर्थात व्याजमुक्त कॅश विड्राव्हल म्हणजेच कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर कमाल 48 दिवसांपर्यंत व्याज आकारले जाणार नाही. केवळ प्रती व्यवहार कॅश एडव्हांस शुल्क रु.199 + जीएसटी लागू.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • अमेझनवरील खरेदीवर प्राइम मेंबर्सना फ्लॅट 5% कॅशबॅक ( तर इतरांना 3%)
  • अमेझन व्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या खरेदीवर फ्लॅट 1% कॅशबॅक.
  • कॅशबॅक दर महिन्यास अमेझन एप मधील आपल्या खात्यातील अमेझन पे बॅलंस च्या रूपाने जमा होत असल्याने कोणतंही रिडम्पशन शुल्क नाही.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : रूपे अर्थात युपीआय पेमेंटसाठी असणाऱ्या बहुतांश क्रेडीट कार्ड्सना जॉईनींग तसेच वार्षिक शुल्क आहे पण जर तुमच्याकडे आधीच एक आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्ड असेल तर हे कार्ड तुम्हाला मोफत जॉईनींगसह लाइफटाईम फ्री मिळू शकेल.
  • महिन्यास रु.25 हजारांवरील वापर तसेच वापरकर्त्याच्या वाढदिवशी नेहमीच्या निकषांच्या 10 पट रिवार्ड पॉईंट्स.
  • रिवार्ड पॉईंट्सचा वापर नेहमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन (इन स्टोर) खरेदीसाठीसुद्धा शक्य.
  • इतर क्रेडीट कार्ड्सच्या तुलनेत कमी 9% ते 42% व्याजदर.
  • इंटरेस्ट फ्री अर्थात व्याजमुक्त कॅश विड्राव्हल म्हणजेच कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर कमाल 48 दिवसांपर्यंत व्याज आकारले जाणार नाही. येथे केवळ प्रती व्यवहार कॅश एडव्हांस शुल्क रु.199 + जीएसटी लागू.

वरील माहिती हि आमच्या वापर आणि अनुभवानुसार लाइफटाईम फ्री या गटातील 4 सर्वोत्तम क्रेडीट कार्डबद्दल आहे. क्रेडीट कार्ड कितीही उत्तम असलं तरी त्याचा हुशारीने वापर आपल्यालाच करायचा असतो. बाकी अनेक क्रेडीट कार्ड्स असतील तर त्यांच्या वेळेवर बिल पेमेंटसाठी क्रेड सारखी एप्स आहेतच. असो, माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा. (Best Lifetime Free Credit Cards in india)

सदर लेख हा शिफारस नसून केवळ माहितीदाखल आहे याची नोंद घ्यावी.

The post 4 सर्वोत्तम “लाइफटाईम फ्री क्रेडीट कार्ड्स” appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/03/best-lifetime-free-credit-cards-in-india.html/feed 0
इलेक्टोरल बाँड म्हणजे काय? https://marathistock.com/2024/03/what-is-electoral-bonds-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=what-is-electoral-bonds-in-marathi https://marathistock.com/2024/03/what-is-electoral-bonds-in-marathi.html#respond Fri, 15 Mar 2024 09:00:46 +0000 https://marathistock.com/?p=2498 सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात, १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली. सदर निर्णय देताना, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हि इलेक्टोरल बाँड योजना घटनाबाह्य ठरवतानाच सदर योजना माहितीच्या अधिकाराचे (आरटीआय) उल्लंघन करते असंही म्हटलंय. तसेच या इलेक्टोरल बाँडसची आकडेवारी निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्याचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले. यावर आधी […]

The post इलेक्टोरल बाँड म्हणजे काय? appeared first on MARATHI STOCK.]]>
सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात, १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली. सदर निर्णय देताना, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हि इलेक्टोरल बाँड योजना घटनाबाह्य ठरवतानाच सदर योजना माहितीच्या अधिकाराचे (आरटीआय) उल्लंघन करते असंही म्हटलंय. तसेच या इलेक्टोरल बाँडसची आकडेवारी निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्याचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले. यावर आधी वेळखाऊपणा करणाऱ्या एसबीआयने, 11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर दुसऱ्याच दिवशीच म्हणजे 12 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड आकडेवारी निवडणूक आयोगाला सुपूर्द केली. आणि त्यानंतर काल निवडणूक आयोगाने हि माहिती (electoral bond data) आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली. म्हणजेच हि माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध झाली.

राजकीय पक्षांना रोख स्वरुपात दिल्या जाणाऱ्या देणगी पद्धतीत बदल करण्याच्या विचारातून आणि त्या अनुषंगाने राजकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 2018 मध्ये हि योजना सुरू करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. पण बहुसंख्य सर्वसामान्यांना अजूनही या योजनेचे स्वरूप काय आणि ती कसे काम करते हे माहित नाही. म्हणूनच आज आपण इलेक्टोरल बाँड म्हणजे काय? आणि सर्वोच्च न्यायालयाने ती का रद्द केली? हे जाणून घेऊया. (what is electoral bonds)

इलेक्टोरल बाँड म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर, इलेक्टोरल बाँड्स हे राजकीय पक्षांना आर्थिक मदत पुरवण्याचे साधन आहे. ज्याद्वारे व्यक्ती, संस्था आणि कंपन्यां आपली ओळख उघड होऊ न देता आपल्या इच्छेनुसार हव्या त्या राजकीय पक्षांना वित्तपुरवठा करू शकतात. पूर्वी राजकीय पक्षांना देणग्या रोख स्वरुपात उघडपणे दिल्या जात असत, पण इलेक्टोरल बाँड्स योजनेमुळे या प्रक्रियेत गोपनीयता आली, किंवा आणली गेली. ही योजना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती. आणि केंद्र सरकारने 9 जानेवारी 2018 रोजी त्याची अंमलबजावणी केली.

योजनेची वैशिष्ट्ये पाहूया. (What is the use of electoral bonds?)

  • एखादी व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा अगदी तुम्ही-आम्हीसुद्धा इलेक्टोरल बाँड्सद्वारे देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला हे निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बाँड्स खरेदी करावे लागतील.
  • तुम्ही हे बाँड्स फक्त सरकारी बँक तीही केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) म्हणजेच मधून खरेदी करू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही बँकेकडून निवडणूक रोखे मिळणार नाहीत.
  • इलेक्टोरल बाँडचे वैशिष्ट्य म्हणा किंवा सुविधा ती अशी की, याद्वारे दिली जाणारी देणगी, कोणत्या पक्षाला आणि किती? हे सर्व गोपनीय असतं. अगदी कोणी देणगी दिली आहे हे संबंधित पक्षालाही माहीत पडत नाही (निदान वरकरणी रचना तरी तशीच). होय पण SBI ला मात्र याबाबत माहिती असते (आता SBI म्हणजे सरकारी बँक, मग हि माहिती सरकारला मागच्या दाराने उपलब्ध होऊ शकते का? असा प्रश्न इथे आम्हाला विचारू नका ) म्हणजे आधीच्या रचनेनुसार पारदर्शक राहणारा तपशील म्हणजे, देणग्या कोणत्या पक्षाला? कोणी? किती? आदी माहिती अगदी निवडणूक आयोग तसेच सर्वसामान्यांना कळू शकत नाही.
  • तसेच, हा बाँड ना कोणत्या कराच्या कक्षेत यतो, ना त्यावर तसेच त्यावर कोणतेही व्याज दिले जात. तसेच विरोधी पक्षाला कोणी जास्त देणगी दिल्यास सत्ताधारी पक्ष त्याला त्रास देऊ शकतो वगैरे, अशा शक्यतांमुळे हि देणगीदाराची माहिती गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे या योजनेचे समर्थन करताना तेव्हा सरकारने म्हटले होते.

इलेक्टोरल बाँड्स कसे खरेदी केले जातात? (How electoral bonds are purchased?)

  • समजा तुम्हाला एका राजकीय पक्षाला 10,000 रुपये देणगी स्वरुपात द्यायचे आहेत. यासाठी तुम्ही SBI च्या कोणत्याही शाखेत जाल आणि तुम्हाला एका विशिष्ट पक्षाला 10,000 रुपये देणगी स्वरुपात द्यायचे आहेत असे सांगाल. यानंतर तुम्हाला 10,000 रुपये बँकेत जमा करावे लागतील आणि त्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपयांचा बाँड मिळेल.
  • राजकीय पक्षाला हे बाँड मिळणार आहे. आता हा बॉण्ड वटावण्यासाठी ( Redeem) त्या पक्षाकडे केवळ 15 दिवसांचा अवधी असतो.
  • जर पक्षाने 15 दिवसांच्या आत बाँड वटवला, तर तुमच्या बँकेत जमा केलेल्या पैशांपैकी 10,000 रुपये त्या पक्षाच्या खात्यात जातील. आणि जर पक्षाने 15 दिवसांच्या बाँड वटवला नाही, तर मात्र तुमचे जमा केलेले पैसे पंतप्रधान मदत निधीमध्ये दान केले जातील.

आता भारतासारख्या लोकशाहीप्रणाली असलेल्या देशांत संरक्षण आणि राष्ट्रासुरक्षा असे क्षेत्रे सोडलं तर इतर कुठेही गोपनीयता असण्याचे कारण तसं नाहीच. सर्वसामान्य नागरिकांना एखादी माहिती हवी असल्यास ती निसंशयपणे आणि सहजतेने त्यांन उपलब्ध व्हायला हवी. आणि नेमकं याच मुद्द्यावर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पीठाने हि इलेक्टोरल बाँड योजना घटनाबाह्य ठरवतानाच सदर योजना माहितीच्या अधिकाराचे (आरटीआय) उल्लंघन करते असं म्हटलं. आणि आता पुढे काय होतंय हे आपण पाहतोच आहोत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, कारण

“नॉलेज इज अ पॉवर, बट ओन्ली व्हेन इट इज शेअर्ड”

The post इलेक्टोरल बाँड म्हणजे काय? appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/03/what-is-electoral-bonds-in-marathi.html/feed 0
EPFO मोफत देतंय ₹7 लाखांचे विमा संरक्षण. https://marathistock.com/2024/03/epfo-insurance-scheme-edli-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=epfo-insurance-scheme-edli-in-marathi https://marathistock.com/2024/03/epfo-insurance-scheme-edli-in-marathi.html#respond Sat, 02 Mar 2024 14:16:45 +0000 https://marathistock.com/?p=2489 सर्वसामान्य लोक म्हणजेच नोकरदार माणसे ज्यांच्यावर व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा असतात. पण अशाच एखाद्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्थात यासाठीच विविध विमा योजना असतात. पण सर्वांना त्या शक्य होतीलच असे नाही. पण याच बरोबरीने सरकारकडूनसुद्धा अशी एक योजना आहे. ज्याबद्दल अनेकांना माहित नसेल. त्या विमा योजनेबद्दल जाणून घेऊया. (EPFO […]

The post EPFO मोफत देतंय ₹7 लाखांचे विमा संरक्षण. appeared first on MARATHI STOCK.]]>
सर्वसामान्य लोक म्हणजेच नोकरदार माणसे ज्यांच्यावर व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा असतात. पण अशाच एखाद्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्थात यासाठीच विविध विमा योजना असतात. पण सर्वांना त्या शक्य होतीलच असे नाही. पण याच बरोबरीने सरकारकडूनसुद्धा अशी एक योजना आहे. ज्याबद्दल अनेकांना माहित नसेल. त्या विमा योजनेबद्दल जाणून घेऊया. (EPFO insurance Scheme EDLI in marathi)

काय आहे हि विमा योजना?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना (Employees Deposit Linked Insurance scheme EDLI) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेनुसार जर EPFO सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 7 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.

यासाठी स्वतंत्रपणे कोणतेही प्रीमिअम भरावं लागत नाही म्हणजेच EDLI कर्मचाऱ्यांसाठी एक मोफत विमा योजना म्हणून काम करते. ज्यामध्ये नामनिर्देशित लाभार्थी 7 लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक मदतीचा दावा करण्यास पात्र आहेत. जर कोणी नॉमिनी करण्यात आला नसेल तर दाव्याची रकम कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात वितरित होते. योजनेंतर्गत मिळणारे कव्हरेज कर्मचाऱ्याच्या आजारपणाच्या, अपघाताच्या किंवा नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांपर्यंत विस्तारित आहे.

EDLI योजनेंतर्गत लाभाची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराच्या आधारावर ठरवली जाते. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती 20 टक्के बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट रक्कम मिळण्यास पात्र ठरतो. मासिक पीएफ कपातीपैकी, 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजना (EPS), 3.67 टक्के EPF आणि 0.5 टक्के EDLI योजनेसाठी वाटप केले जाते.

अटीं आणि नियम.

खातेधारकाच्या विमा संरक्षणातून लाभार्थी किमान 2.5 लाख रुपये आणि कमाल 7 लाख रुपयांचा दावा करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, व्यक्तींनी किमान 12 महिने सतत नोकरीत असणे आवश्यक आहे. असे न झाल्यास, तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही.

EDLI योजना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला अनपेक्षित आणि आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुरक्षा मिळू शकेल.

EDLI मोजणी कशी ?

मृत सदस्याच्या वारसांना मिळणारी विमा रक्कम नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांतील सरासरी मासिक पगाराच्या 35 पट म्हणून मोजली जाते.

कर्मचाऱ्याचे कमाल सरासरी मासिक वेतन मर्यादा रु.  15,000

तर, 35 पटीनुसार 35 x ₹ 15,000 = Rs.  ५,२५,०००

बोनस योजनेअंतर्गत दावेदाराला  रु.1,75,000 रुपये देखील दिले जातात

अशा प्रकारे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला देय असलेली एकूण रक्कम रु.  7,00,000

या योजनेसाठी नोंदणी कशी ? ( How to register for EDIL)

EPFO सदस्यांची EDLI साठी आपोआप नोंदणी केली जाते. सदर व्यक्ती जोपर्यंत ईपीएफची सक्रिय सदस्य आहे केवळ तोपर्यंत त्या व्यक्तीस ईडीएलआय योजनेद्वारे कव्हर केले जाते. EPF नोंदणीकृत कंपनीची सेवा सोडल्यानंतर त्याचे कुटुंब/वारस/नामनिर्देशित व्यक्ती त्याबाबत दावा करू शकत नाहीत.

EDLI लाभांचा दावा कसा करावा ? (How to claim for EDLI)

  • सदस्याच्या मृत्यूनंतर विमा लाभ मिळविण्यासाठी फॉर्म 5 IF भरावा लागेल
  • सदस्य (त्याच्या मृत्यूच्या वेळी) EPF योजनेत सक्रिय योगदानकर्ता असावा
  • सदस्याच्या नामनिर्देशित व्यक्तीद्वारे लाभांचा दावा केला जाऊ शकतो
  • जर कोणीही नॉमिनी घोषित केले नाही तर, कुटुंबातील हयात असलेले सदस्य लाभांचा दावा करण्यास पात्र असतील. EPS अंतर्गत कुटुंबाची व्याख्या जोडीदार, पुरुष मुले (25 वर्षांपर्यंत), अविवाहित मुली अशी केली जाते.
  • जर कुटुंबातील कोणीही हयात नसेल तर, विम्याचा लाभ मृत सदस्याच्या कायदेशीर वारसाद्वारे दावा केला जाऊ शकतो.
  • दाव्याच्या फॉर्मवर नियोक्त्याने ( Employer) स्वाक्षरी आणि प्रमाणित करणे आवश्यक आहे
  • नियोक्ता नसल्यास, फॉर्म खालीलपैकी कोणत्याही एकाद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे:
    • राजपत्रित अधिकारी
    • दंडाधिकारी
    • ग्रामपंचायत अध्यक्ष
    • महापालिका किंवा जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष / सचिव / सदस्य
    • पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमास्टर
    • खासदार किंवा आमदार
    • CBT किंवा EPF च्या प्रादेशिक समितीचे सदस्य
    • बँक व्यवस्थापक (ज्या बँकेत खाते ठेवले होते
  • फॉर्म 5 IF फॉर्म 20 (मृत सदस्याच्या बाबतीत EPF काढण्याचा दावा) आणि फॉर्म 10C / Form10D या तिन्ही योजनांचे (EPF, EPS आणि EDLI) एकाच वेळी लाभ मिळवण्यासाठी भरले जाऊ शकतात 
The post EPFO मोफत देतंय ₹7 लाखांचे विमा संरक्षण. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2024/03/epfo-insurance-scheme-edli-in-marathi.html/feed 0
ट्रेडिंग करताना कोणत्या चूका टाळाल. https://marathistock.com/2023/12/common-trading-mistakes-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=common-trading-mistakes-in-marathi https://marathistock.com/2023/12/common-trading-mistakes-in-marathi.html#respond Tue, 26 Dec 2023 15:53:46 +0000 https://marathistock.com/?p=2469 नियमित ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सपैकी फारच कमी जण नियमित पणे यश मिळवतात. अयशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामागे ट्रेडरकडुन होणाऱ्या चुका कारणीभूत आहेत.या चुका कोणत्या ते आज जाणून घेऊया. (common Trading Mistakes in Marathi) ट्रेडिंग प्लॅन नसणे : ट्रेडिंग का? कोणत्या सेगमेंटमध्ये ? की ज्यादिवशी जे गुलाबी भासतं तिकडे जायचं..? अशी स्थिती असेल तर थांबा. कारण […]

The post ट्रेडिंग करताना कोणत्या चूका टाळाल. appeared first on MARATHI STOCK.]]>
नियमित ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सपैकी फारच कमी जण नियमित पणे यश मिळवतात. अयशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामागे ट्रेडरकडुन होणाऱ्या चुका कारणीभूत आहेत.या चुका कोणत्या ते आज जाणून घेऊया. (common Trading Mistakes in Marathi)

ट्रेडिंग प्लॅन नसणे : ट्रेडिंग का? कोणत्या सेगमेंटमध्ये ? की ज्यादिवशी जे गुलाबी भासतं तिकडे जायचं..? अशी स्थिती असेल तर थांबा. कारण याचा अर्थ तुमच्याकडे योग्य ट्रेडिंग प्लॅन नाहीये. तुमच्या कौशल्ये, आकलन क्षमतेनुसार ट्रेडिंग सेगमेंट ठरवा. स्ट्रॅटेजी विकसित करा, निश्चित करा. रिस्क मॅनजमेंट अर्थात जोखीम व्यवस्थापन आखा व त्याचे नियम स्ट्रीक्टली पाळा. (Stock Trading Errors)

इमोशनल ट्रेडिंग : तुम्हाला काय वाटतं यावर मार्केट आपली दिशा ठरवत नाही. उत्साहाच्या भरात, हावरटपणाने, झालेला तोटा आजच भरून काढण्यासाठी ट्रेडिंग करू नये हे लक्षात असू द्या.(Emotional Trading Risks)

ओव्हरलेव्हरेजिंग टाळा : कर्ज घेऊन ट्रेडिंग च काय तर गुंतवणूक सुद्धा टाळावी हा भांडवली बाजाराचा अलिखित नियम आहे. आणि लेव्हरेजिंग अर्थात ब्रोकरकडून मिळणारी क्रेडिट वापरून मूळ भांडवलाच्या काही पटीत ट्रेडिंग करणे हे कर्ज घेण्यासारखेच. ते टाळलेलं योग्य. (Over-leveraging Dangers.)

कॉपी टाळा : अमुक अशी ट्रेडिंग करतो, तमक्या
सेगमेंटमध्ये करतो, बेसिक रिसर्च अभ्यास न भूतकाळातील कामगिरीच्या आधारे अमुक स्टॉक / सेगमेंट फायदेशीर आहे, असं स्वतःचं मत ठरवून मार्केटवर थोपावल तर मार्केट तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही.(Trading Plan Essentials)

अतिआत्मविश्वास : मोटार चालवता येते म्हणून थेट विमान हाती घ्याल ? नाही ना ? मग स्टॉकमध्येच धडपडत असताना फ्युचर आणि ऑप्शन्स चे आकर्षण कशाला ? शेअर मार्केटशी संबंधित असलं तरी एफ एंड ओ आणि त्यातही ऑप्शन्स ट्रेडिंग हे एक स्वतंत्र जग आहे. त्यातील संकल्पना, प्रभाव पाडणारे घटक, गुणोत्तरे क्लिष्ट असून त्याचा सखोल अभ्यास आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ यासाठी आपण किती तयार आहोत यावर त्याचा विचार व्हावा.(Over Confidence)

भाकरी न उलथवणे : देशातील, जगभरातील बदलत्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील बदलांनुसार मार्केटसुद्धा अनेकदा कुस बदलत असतं. त्यातील वातावरण बदलत असतं. मग तुमची तीच ट्रेडिंग शैली, स्ट्रॅटेजी सदासर्वकाळ कशी चालेल. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, त्याचा अभ्यास करून तुमच्या ट्रेडिंग शैली अन् पद्धतीत बदल हवाच.(Trading Education Importance)

ओव्हरट्रेडिंग: बाजाराचा कोणताही शेवटचा दिवस ठरलेला नाही. मग तुम्हालाइतकी घाई का ? शेअर मार्केट, बाजार यापलीकडे ही जग आहे. प्रत्येक बाबीकडे मार्केट लेन्समधून पाहू नका. ब्रेक घ्या फ्रेश व्हा अन् पुन्हा उतरा.

मिरवू नका : “मी ट्रेडर आहे.. मग अमुक ट्रेड करतो आणि तमुक कमावतो” असे बोंब ठोकणारे अनेकदा अयशस्वी ट्रेडर असू शकतात. कारण मुळात उत्तम ट्रेडर होण्यासाठी विश्लेषक आणि चिकित्सक वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला हे मिरवण्यात काडीमात्र रस नसतो. याच बरोबर तुम्ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही तुमच्या जवळच राहुद्या “अतीपरिचयात अवज्ञा” (बाजाराकडून) हे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा लागू होतं. विश्वास नसेल तर आजमावून पहा.

असो, सध्या तरी इतकचं, अजुन काही नवीन समजलं तर पुन्हा सांगूच.
माहिती आवडली असेल तर शेअर कराच.
धन्यवाद!

The post ट्रेडिंग करताना कोणत्या चूका टाळाल. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/12/common-trading-mistakes-in-marathi.html/feed 0
भारतीय वंशाच्या त्या तरुणाने चक्क अमेरिकन बाजार कोसळवलं. https://marathistock.com/2023/08/how-did-navinder-sarao-crash-the-market-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=how-did-navinder-sarao-crash-the-market-in-marathi https://marathistock.com/2023/08/how-did-navinder-sarao-crash-the-market-in-marathi.html#respond Mon, 21 Aug 2023 08:56:57 +0000 https://marathistock.com/?p=2461 अगदी थोडक्या कालावधीसाठी का होईना पण त्या भारतीय वंशाच्या तरुणाने अमेरिकन स्टॉक मार्केट दाणकन आपटलं होतं. लंडनमधील आपल्या आईबाबांच्या घरात आपल्या बेडरूममध्ये बसून त्याने हा पराक्रम केला होता. अर्थात म्हणायला पराक्रम म्हटलं तरी होतं ते एक दुःसाहसच. (How did Navinder Sarao crash the market in marathi) या व्यक्तीचं नाव आहे नविन्द्र सिंह सारव. सध्या लंडन […]

The post भारतीय वंशाच्या त्या तरुणाने चक्क अमेरिकन बाजार कोसळवलं. appeared first on MARATHI STOCK.]]>
अगदी थोडक्या कालावधीसाठी का होईना पण त्या भारतीय वंशाच्या तरुणाने अमेरिकन स्टॉक मार्केट दाणकन आपटलं होतं. लंडनमधील आपल्या आईबाबांच्या घरात आपल्या बेडरूममध्ये बसून त्याने हा पराक्रम केला होता. अर्थात म्हणायला पराक्रम म्हटलं तरी होतं ते एक दुःसाहसच. (How did Navinder Sarao crash the market in marathi)

या व्यक्तीचं नाव आहे नविन्द्र सिंह सारव. सध्या लंडन तुरुंगात बंद असलेला साराव हा एक फ्लॅश क्रॅश ट्रेडर होता. या “फ्लॅश क्रॅश” प्रकरणात २०१५ मध्ये त्याला अटक झाली. जे काही त्याने केलं त्यामुळे अमेरिकन बाजार फार नाही पण तासाभरासाठी 1000 अंकांनी कोसळला असेल. पण तो रिकव्हर होण्यापूर्वी बाजारातील १ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स आपटले होते.

2010 मध्ये पश्चिम लंडनमधील आपल्या आई-वडिलांच्या घरातून शेअर बाजारात व्यापार करणाऱ्या नावेंदर सारव यांनी अमेरिकन शेअर बाजारात गोंधळ घातला. नविंद्र सराव यांच्यावर यूएसमध्ये फसवणूक आणि फसवणूक यासह २२ वेगवेगळे आरोप आहेत. या फसवणुकीसाठी कोर्टाने सरावला किमान ३८० वर्षांची शिक्षा सुनावली, जी जगातील आर्थिक गुन्ह्यां संदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा आहे.

नक्की काय झालं होतं ?

नविन्द्रने जे काही केलं त्याला ट्रेडिंगच्या भाषेत ‘स्पूफिंग’ असे म्हणतात. स्पूफिंग म्हणजे व्यवहार होण्यापूर्वी तो रद्द करण्याच्या उद्देशाने केलेली शेअर्सची खरेदी आणि विक्री. 37 वर्षीय नरेंद्र सिंग सराव आपल्या आई-वडिलांच्या घरातून संगणकाद्वारे ‘शिकागो एक्सचेंज’मध्ये व्यापार करत होता. या ट्रेडिंगमधून त्याने  5 वर्षांत त्याने 30 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त कमाई केली.

हा शिकागो मर्कंटाइल एक्सचेंज संपूर्ण संगणकीकृत बाजार आहे. कोणत्याही तंत्रस्नेही व्यक्तीलाही येथे ढवळाढवळ करणे अगदी कठीण आहे. येथील अद्ययावत ट्रेडिंग प्रोग्राम्स एक्स्चेंजवरील किमतीच्या वेगवान हालचाली त्वरित कॅप्चर करतात. म्हणजे यामध्ये ते मानवी व्यवहार हालचालींना मागे टाकतात. ज्यामुळे स्टॉक एक्स्चेंजमध्ये खरेदीचे सिग्नल अर्ध्या सेकंदानंतरच स्क्रीनवर उपलब्ध होतात. इथे पिकिंग म्हणजे ट्रेड या सूक्ष्म कालावधीत उचलणे ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजेच जितक्या लवकर तुम्ही खरेदी कराल तितके जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. कारण इथे तुमची स्पर्धा संगणकाशी असते. ज्यामुळे खरेदी बटणावर क्लिक करण्‍यास विलंब होतो.
व्यवहार निर्णय घेण्यास तुमच्या मेंदूला अर्धा सेकंद लागत असेल तर संगणक मात्र तो व्यवहार काही मिलिसेकंदात तो व्यवहार पूर्ण करतो. एखादी गोष्ट त्वरित खरेदी केली पण त्याची योग्य किंमत समजून घेण्यास तुम्ही कमी पडलात तर मग तुम्ही पैसे कमवण्याची संधी गमावली असं समजायचं.

शिकागोमध्ये ही स्पर्धा इतकी वेगवान आहे की खरेदी-विक्रीमध्ये सूक्ष्म सेकंदाचा फरक असतो. शिकागो एक्सचेंजमध्ये सर्व ऑपरेशन्ससाठी अशा विलक्षण सॉफ्टवेअरचा वापर होतो ज्याद्वारे खरेदीच्या ट्रेंडचे अनुसरण केलं जातं. सारवने सॉफ्टवेअरचे अल्गोरिदमच एकमेकांशी जोडले ज्यामुळे त्याच्यासाठी संगणकांच्या तुलनेत व्यवहार करणे सोपं झालं.

तपास अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, साराव संगणक अल्गोरिदम वापरून मोठ्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता. त्याला व्यवहारांच्या सेटलमेंटमध्ये रस नव्हता. याद्वारे खरेदीच्या ऑर्डरपेक्षा स्टॉकच्या विक्रीच्या ऑर्डर्स अधिक दाखवून त्यामुळे बाजार घसरणार आहे हे सारावने ट्रेडर्सन पटवून दिले. त्यामुळे संगणकाद्वारे व्यवहार करणारे ट्रेडर्स नुकसान टाळण्यासाठी आपले शेअर्स विकायचे आणि ज्यामुळे बाजारात त्यांची किंमत कमी होऊ लागायची.आणि मग किंमत कमी होण्याची वाट पाहत असलेला साराव स्वतः खरेदी सुरु करायचा.

जोपर्यंत बाजाराला लक्षात यायचं कि विक्री ऑर्डर पाठवली गेली आहे, तोपर्यंत किंमती पुन्हा वाढू लागायच्या. मग साराव ते चढ्या भावाने विकून भरघोस नफा मिळवायचा. प्रत्येक व्यवहाराच्या हिशेबाने पाहिल्यास हा नफा फारच कमी वाटू शकतो. परंतु जर तो दर तासाला या व्यवहारांची झालेली पुनरावृत्ती पाहिल्यास तो एकूण नफा लक्षणीय वाटतो. अमेरिकन तपास संस्था एफबीआयच्या म्हणण्यानुसार ही ट्रेडिंग मधून केलेली हि मागणी बनावट असते ज्यामुळे बाजाराची फसवणूक होते. यूएस कायद्यानुसार हि स्पूफिंग पद्धत गुन्हा आहे, म्हणूनच एफबीआयने साराववर केवळ स्टॉक्सच्या फसव्या व्यवहारासाठीच नव्हे तर 6 मे 2010 रोजी स्टॉक मार्केट क्रॅशला कारणीभूत ठरल्याचा आरोप लावला.

त्या दिवशी डाऊ जोन्स निर्देशांक काही मिनिटांत 700-1000 अंकांनी घसरला. यामुळे यूएस स्टॉकचे $800 बिलियनचे नुकसान झाले, अर्थात जरी शेअर बाजार त्यानंतर लवकरच सावरला असला तरी. या व्यवहारांद्वारे 50 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केल्याचे कबूल करण्यास नविंद्र सिंग साराव याने अनेक वर्षे लावली. 

The post भारतीय वंशाच्या त्या तरुणाने चक्क अमेरिकन बाजार कोसळवलं. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/08/how-did-navinder-sarao-crash-the-market-in-marathi.html/feed 0
मुलीच्या जन्मावर मिळणार ५० हजार रुपये. महाराष्ट्र शासनाची “माझी कन्या भाग्यश्री” योजना. https://marathistock.com/2023/07/majhi-kanya-bhagyashree-yojana-information-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=majhi-kanya-bhagyashree-yojana-information-in-marathi https://marathistock.com/2023/07/majhi-kanya-bhagyashree-yojana-information-in-marathi.html#respond Wed, 19 Jul 2023 05:24:08 +0000 https://marathistock.com/?p=2430 majhi kanya bhagyashree yojana information in marathi : मुलींच्या जन्मदरात वाढ, मुलींचे शिक्षण आणि आरोग्य आदींमध्ये सुधारणा अशा स्त्री सक्षमीकरणास वाव देणाऱ्या विविध योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून राबवल्या जात असतात. आपल्याकडे जन्मलेल्या पहिल्या मुलीचं स्वागत “पहिली बेटी, धनाची पेटी” असं म्हणून करतो. आणि जणू हाच संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री […]

The post मुलीच्या जन्मावर मिळणार ५० हजार रुपये. महाराष्ट्र शासनाची “माझी कन्या भाग्यश्री” योजना. appeared first on MARATHI STOCK.]]>
majhi kanya bhagyashree yojana information in marathi : मुलींच्या जन्मदरात वाढ, मुलींचे शिक्षण आणि आरोग्य आदींमध्ये सुधारणा अशा स्त्री सक्षमीकरणास वाव देणाऱ्या विविध योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून राबवल्या जात असतात.

आपल्याकडे जन्मलेल्या पहिल्या मुलीचं स्वागत “पहिली बेटी, धनाची पेटी” असं म्हणून करतो. आणि जणू हाच संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुधारित पद्धतीने पुन्हा सुरू केली आहे. 

या योजनेंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांना 50,000 रुपये मिळतात. यासोबतच अपघात विमा कवच आणि ओव्हरड्राफ्ट सुविधासुद्धा या योजनेत उपलब्ध आहे.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलींच्या जन्मावर 50,000 रुपये मुदत ठेवीच्या स्वरुपात दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. मुलींच्या जन्मदर आकडेवारीचा प्रसार आणि सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दोन मुली असलेल्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 ऑगस्ट २०१७ पासून या योजनेत काही बदल करून पुन्हा राबविण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? (who can benefit from majhi kanya bhagyashree yojana )

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) संयुक्त खाते उघडले जाते. या खात्यासोबत 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधासुद्धा उपलब्ध आहे. पाहूया या योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम.

योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम. (majhi kanya bhagyashree yojana features )

  • केवळ कन्या अपत्य असणारे कुटुंब पात्र.
  • 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुली पात्र.
  • लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे गरजेचे.
  • एक मुलगी असल्यास 50 हजार, दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावे 25 हजार आणि तीन मुली असल्यास अपात्र.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जुळ्या मुली झाल्यास, त्या दोन्ही मुली योजनेस पात्र असतील.
  • मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने स्वतंत्ररीत्या उघडण्यात आलेल्या खात्यात सदर रकम मुदतठेवीच्या स्वरुपात ठेवली जाईल.
  • सदर खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडण्यात येईल आणि त्यासोबत रु.एक लाखांचा अपघात विमा आणि रु.पाच हजारपर्यंत ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळेल.
  • मूळ मुद्दल त्यावरील व्याजासहित परत मिळण्यासाठी मुलगी वयाचे अठरा वर्षे पूर्ण, इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे गरजेचे.
  • वार्षिक उत्पन्न 7.5 लाख उत्पन्न असणारे कुटुंब पात्र.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर माता आणि पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक.
  • प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब मुदत ठेवीवरील जमा व्याज काढून घेऊ शकते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ही कागदपत्रे गरजेची ? (Documents required for majhi kanya bhagyashree yojana)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल फोन नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पत्ता पुरावा असावा. यासोबतच उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म आणि अर्ज कुठे ? (how to apply for majhi kanya bhagyashree yojana)

या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. तत्पूर्वी मुलीच्या जन्माची नोंदणी संबंधित क्षेत्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात करावी लागेल. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर त्या क्षेत्रातील अंगणसेविकेकडे अर्ज फॉर्म संबंधित दस्तावेजासह सादर करावा. त्यानंतर अंगणसेविका हा फॉर्म पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकांकडे सादर करतील.

आम्ही तुम्हाला त्या फॉर्मची डाऊनलोड लिंक खाली येथे देत आहोत. ज्यावर क्लिक करून तुम्ही माहितीपत्रक आणि फॉर्म डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि भरा.


महिला व बाल विकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या इतर योजनांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

The post मुलीच्या जन्मावर मिळणार ५० हजार रुपये. महाराष्ट्र शासनाची “माझी कन्या भाग्यश्री” योजना. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/07/majhi-kanya-bhagyashree-yojana-information-in-marathi.html/feed 0
फिटनेस व सोय दोन्ही देणारी ई-सायकल तीही टाटाकडून.. https://marathistock.com/2023/07/tata-stryder-zeta-plus-e-bike-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=tata-stryder-zeta-plus-e-bike-in-marathi https://marathistock.com/2023/07/tata-stryder-zeta-plus-e-bike-in-marathi.html#respond Sun, 09 Jul 2023 15:07:42 +0000 https://marathistock.com/?p=2414 ई-वाहने आणि त्यातही ई-बाईक हि बाब आता नवीन राहिली नाहीये. अनेक कंपन्यांच्या ई-दुचाकी एव्हाना रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. पण जर याच वेळी सायकल स्वरूपातील ई-दुचाकीचा पर्याय तुमच्या समोर आला तर ? आणि त्यातही हि ई-सायकल टाटा (TATA) या नावाच्या विश्वासासार्ह तुमच्यापर्यंत येणार असेल तर ? (tata stryder Zeta Plus e-bike in marathi) आश्चर्य वाटून घेण्याची […]

The post फिटनेस व सोय दोन्ही देणारी ई-सायकल तीही टाटाकडून.. appeared first on MARATHI STOCK.]]>
ई-वाहने आणि त्यातही ई-बाईक हि बाब आता नवीन राहिली नाहीये. अनेक कंपन्यांच्या ई-दुचाकी एव्हाना रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. पण जर याच वेळी सायकल स्वरूपातील ई-दुचाकीचा पर्याय तुमच्या समोर आला तर ? आणि त्यातही हि ई-सायकल टाटा (TATA) या नावाच्या विश्वासासार्ह तुमच्यापर्यंत येणार असेल तर ? (tata stryder Zeta Plus e-bike in marathi)

आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाहीये कारण हे खरं आहे.

टाटा समूहाचा हिस्सा असणाऱ्या एका कंपनीने नुकतेच एका नवीन ई-बाईकचे अनावरण केले आहे ज्यामध्ये सायकल आणि बाईक या दोन्हीची वैशिष्ट्ये सामावली आहेत. या नव्या ई-बाईकचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. टाटा समूहाच्या मालकीची उपकंपनी असलेल्या स्ट्रायडरने (stryder) हे उत्पादन विकसित केले आहे.

तांत्रिक क्षमता / वैशिष्ट्ये (stryder Zeta Plus battery )

‘झेटा प्लस’ असे या नव्या बाईकचे नाव आहे. या नवीन ई-बाईकच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि किफायतशीर वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या Zeta Plus मध्ये 36 V/6 Ah बॅटरी आहे. म्हणजेच ई-बाईकमध्ये म्हणजे 36 व्होल्टची बॅटरी आहे, जी इलेक्ट्रिक सायकल श्रेणीत उच्च दर्जाची असून ज्याद्वारे 216 Wh पॉवर जनरेट केली जात असल्याचा कंपनीचा दावा आहे.

वैशिष्ट्ये काय आहेत ? (stryder Zeta Plus features )

स्ट्रायडरचा दावा आहे की त्यांची हि ईव्ही दुचाकी भारतातील सर्व रस्त्यांवर चालण्यास सक्षम आहे. या ईव्हीचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. चार्जिंग करून रायडींग आणि पेडलच्या मदतीने म्हणजे सायकलिंग अशा दोन्ही प्रकारे ती ऑपरेट केली जाऊ शकते. एकदा चार्ज केल्यानंतर, हि इलेक्ट्रिक बाइक 30 किमी पर्यंत धावू शकते. स्ट्रायडर झेटा प्लस ( Zeta Plus e-bike) ची राइड आरामदायी आहे कारण तीची बांधणी स्टीलच्या हार्डटेल फ्रेमची आहे असं कंपनी सांगते.

याच बरोबर तिला शक्तिशाली ऑटो-कट डिस्क ब्रेक मिळतात. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. बॅटरी चार्ज करण्यासाठी होणाऱ्या विजेचा वापर लक्षात घेता या इलेक्ट्रिक सायकलची रनिंग कॉस्ट फक्त 10 पैसे प्रति किमी इतकी असल्याचा कंपनीचा दावा आहे. म्हणजेच या सायकलद्वारे प्रवासासाठी या प्रति किलोमीटर केवळ 10 पैसे मोजावे लागतील.

किंमत किती ? आणि कुठे खरेदी करता येईल ? (price of Zeta Plus e-bike)

स्ट्रायडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी या ई-बाईकची किंमतही वाजवी ठेवली असल्याचा दावा केला आहे. यांच्या मते, स्ट्रायडर झेटा प्लसचीसुरवातीची किंमत किंमत 26,995 रुपये इतकी आहे. पण लवकरच त्यात वाढ केली जाऊ शकते. या ई-बाईकचे बुकिंग स्ट्रायडरच्या वेबसाइटवर करता येऊ शकेल. स्ट्रायडरने सुरुवातीला ही ई-बाईक भारतात 4000 हून अधिक स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

फिटनेस आणि सोय अशा दोन्हीची गरज पूर्ण करणारी हि नवीन ई-बाईक स्टायलिश, परवडणारी आणि इको-फ्रेंडली आहे अशी माहिती स्ट्रायडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी ई-बाईकच्या अनावरण प्रसंगी दिली.

इमेजेस कंपनीच्या संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहेत.

The post फिटनेस व सोय दोन्ही देणारी ई-सायकल तीही टाटाकडून.. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/07/tata-stryder-zeta-plus-e-bike-in-marathi.html/feed 0
डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=how-to-make-money-with-digital-marketing https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html#respond Wed, 28 Jun 2023 14:50:58 +0000 https://marathistock.com/?p=2408 आज 28 जून 2023 रोजी आमच्या  @marathistock ट्विटर खात्यास पाच वर्षे पूर्ण झाली. पाच वर्षापूर्वी 28 जून 2018 मध्ये हे खाते सुरु केले तेव्हा जे काही थोडं फार कळत होतं ते होतं फक्त शेअरमार्केट. पण या पाच वर्षांत ब्लॉगिंग, मग वर्डप्रेस वेबसाईट, एमेझन एफीलीएट मार्केटिंग, ‘डील्स – ऑफर्स’ वेबसाईट, किन्डल ई-बुक, गमरोड इथपर्यंतचा प्रवास, आणि यादरम्यान […]

The post डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग appeared first on MARATHI STOCK.]]>

आज 28 जून 2023 रोजी आमच्या  @marathistock ट्विटर खात्यास पाच वर्षे पूर्ण झाली.

पाच वर्षापूर्वी 28 जून 2018 मध्ये हे खाते सुरु केले तेव्हा जे काही थोडं फार कळत होतं ते होतं फक्त शेअरमार्केट.

पण या पाच वर्षांत ब्लॉगिंग, मग वर्डप्रेस वेबसाईट, एमेझन एफीलीएट मार्केटिंग, ‘डील्स – ऑफर्स’ वेबसाईट, किन्डल ई-बुक, गमरोड इथपर्यंतचा प्रवास, आणि यादरम्यान थोडंफार डिजिटल मार्केटिंगसारख्या गोष्टी जाणून घेऊ शकलो. 

अर्थात आजही केवळ एकाच व्यक्तीकडून व्यवस्थापीत केल्या जाणाऱ्या या फाफट पसाऱ्याने पाच वर्षांचा हा पल्ला गाठणं शक्य झालं केवळ तुमच्या प्रतिसादामुळेच.

आज पाच वर्षानंतर सहजंच पाहिल्यावर लक्षात आलं कि व्यावसायिक लेखक वगैरे नसलो तरी नाही म्हणायला आपल्या नावावर स्वतःचे म्हणावेत असे जवळपास दोनशेहून अधिक लेख, तीन विविध विषयांना वाहिलेल्या वेबसाईट्स, आणि दोन पुस्तके (अर्थातच ई-बुक्स ) इतकी बौद्धिक वगैरे मालमत्ता जमा झाली आहे.कारण सगळ्याच गोष्टी पैशात तोलता येत नसल्या तरी काही मनाला समाधान नक्कीच देऊन जातात.

पण हे काय आणि कसं, हे आपल्यासारख्याच इतरांनाही समजावं आणि करू पाहता यावं, म्हणून यासंदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न. कारण यामध्ये कोणतीही तांत्रिक क्लिष्टता नाहीये तसेच फार खर्चिक वगैरे असंही काही नाही, म्हणजे हे अगदी कोणीही करू शकतो. हो अगदी बऱ्यापैकी स्मार्टफोन आणि कम्प्युटर हाताळू शकणारा कुणीही. 

म्हणजे कुठून सुरवात ?

असं कोणताही एक विषयाचा  कोपरा-कोनाडा (Niche ) निवडा ज्यामध्ये तुम्ही कौशल्ये बाळगता आणि ज्याबाबत तुम्ही बऱ्यापैकी व्यक्त होऊ शकता. 

आम्ही कसं केलं ?

वेबसाईट :

सर्वप्रथम ट्विटर, फेसबुक पेजने सुरुवात होऊद्या. जसं आम्ही मराठी स्टॉक साठी केलं. तर असंच तुमच्या स्वारस्य आणि कौशल्याचा विषय निवडल्यानंतर त्या विषयाला चिकटून राहा. विषयाबाबतची नाविन्यपूर्ण, सर्वोत्तम माहिती आपल्या अनुसारकांना देण्याचा प्रयत्न असुद्या. तदनंतर थोडाफार जम बसल्यानंतर वेबसाईट साठी प्रयत्न करू शकता. सुरुवात गुगलच्या Blogger ने होऊद्या. वेबसाईटसाठी एखादं नाव ठरवावं. सब-डोमेन ऐवजी स्वतःचं डोमेन असण्यास प्राधान्य द्या. Hiox  सारख्या  व्यासपीठावर किमान किंमतीत डोमेन मिळवू शकता. किंवा तुमच्या पसंतीचा इतर पर्याय सुद्धा निवडू शकता. यांनतर ब्लॉगरवरच वेबसाईट उभारू शकता. यासाठी युट्युब मदतीला आहेच.

चांगला जम बसल्यानंतर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेस कडे स्थलांतरित करू शकता यासाठीच्या होस्टिंगसाठी तुमच्या पसंतीचा किंवा होस्टींगर सारखा पर्याय निवडू शकता. जिथे एकल वेबसाईटसाठी वर्षाला अडीच हजाराच्या आसपास खर्च येतो. युट्युबच्या सहाय्याने तुमची ब्लॉगर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेसवर सहजरीत्या स्थलांतरित करू शकाल.

आता वेबसाईट बनवून जवळपास सहा महिने झाल्यानंतर तुम्ही ती गुगल एड सेन्ससाठी सबमिट करू शकता. लक्षात असुद्या “कंटेंट इज द किंग” म्हणजेच उत्तमोत्तम कंटेंट तुमच्या डिजिटल यशाची गुरुकिल्ली असते. गुगल एड सेन्ससाठी एप्लाय करताना तुमच्या वेबसाईटवर नियमित लेख येत असतील याची काळजी घ्या. विषयांची निवड तसेच लेखन करण्यासोबतच ‘सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन’ (SEO) समजून घ्यावे. आता एआयच्या (AI ) युगात हे सोप्पं आणि आव्हानात्मक असं दोन्ही भासू शकतं.

एफीलीएट असोसिएट:

हे सगळं करत असतानाच ‘एफीलीएट मार्केटिंग’ नावाचा प्रकार सुद्धा शिकून घ्यावा.याची सुरुवात एमेझन एफीलीएट असोसिएट पासून करता येईल.आपल्या सोशल मिडिया खात्यावरून ‘एफीलीएट मार्केटिंग’ करताना प्रॉडक्ट्स तुमच्या  कंटेंटशी संबंधित राहील याची काळजी घ्यावी. 

एफीलीएट मार्केटिंग करताना त्याच्याशी संबंधित वेबसाईट बनवता आली तर उत्तमच, जशी आमची स्वतःची द डील ( The Deal ) या नावाची वेबसाईट आहे. तुम्ही आमच्या या वेबसाईटला आणि तिच्याशी  संबंधितट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

किन्डल ई-बुक :

‘वाचनाने माणूस शहाणा होत असेल तर “लेखनाने ते शहाणपण तपासता येतं” असं आमचं मत आहे. लेखन बऱ्यापैकी जमू लागलेलं असेल तर आणि आपल्या आवडत्या क्षेत्रातील सांगण्यासारखे किंवा असलेलं थोडंफार ज्ञान वाटावसं वाटत असेल तर. ई-बुक हा उत्तम पर्याय आहे आणि इथेही एमेझन तुमच्या सोबत आहे. किन्डल डायरेक्ट पब्लिशिंग अर्थात KDP  च्या सहाय्याने तुम्ही तुमचं लिखाण ई-बुकमध्ये परावर्तीत करून एमेझनवर विक्री करिता ठेवू शकता. अर्थात इतेही पैसे कमावणे दुय्यम आणि लेखनाची आवड जोपासणे तसेच कौशल्ये, ध्यान इतरांमध्ये वाटण्यास प्राधान्य दिलं तर त्यातून मिळणारं समाधान मोठं असतं. आणि यातही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय टूल्स उपयुक्त ठरू शकतात. फक्त त्यांचा कल्पकतेने वापर करता आला पाहिजे.

याप्रकारे आम्ही आमची खाली दिलेली दोन ई-पुस्तके एमेझनवर उपलब्ध करून दिली आहेत.

1 ) Take it “Personally”


2 ) 
शेअर मार्केटची तयारी

बरं हे सगळं करत असताना आपण आपल्या मुख्य व्यवसायास अनुसरून काही प्रयत्न या डिजिटल माध्यमाद्वारे करू शकता. जसं आम्ही आमच्या नव्या https://legitance.in/ या प्रयत्नातून करीत आहोत. लेजीटान्सच्या माध्यमातून आम्ही लीगल, डिजिटल आणि फायनान्स ( विमा ) संबंधित सल्ला आणि सेवा पुरवीत आहोत. आपण आमच्या या वेबसाईटला आणि ट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

याव्यतिरिक्त मराठी माणसांकडून होत असणाऱ्या उद्यमशील प्रयत्नांना जास्तीत जास्त पोहोच मिळावी या हेतूने सुरु केलेलं मी उद्यमी हे ट्विटर खातेही आहेच. आपल्या माहितीतील कोणीही व्यक्ती जी स्वयंरोजगार उभारू पाहतेय तसेच आपल्या या प्रयत्नांतून इतरांसाठी रोजगार निर्माण करू पाहत असेल तर अशा व्यक्तींच्या उद्यमशील तेची माहिती आमच्या पर्यंत नक्की पोहोचावा आम्ही त्यांना आमच्या या खात्याद्वारे प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. 

डिजिटल मार्केटिंग :

तुमचं उत्पादन – सेवा थेट असो वा डिजिटल, डिजिटल मार्केटिंग हि फार महत्वाची बाब बनलीये. तुम्ही वर वाचलं असेल कि दिलेल्या सर्व प्रकारांत डिजिटल मार्केटिंगचा वापर आम्ही केलेला आहे. मग ते आमच्या समाज माध्यमी खात्यावरून केलेली ‘एफीलीएट मार्केटिंग’ असो किंवा मग वेबसाईटवरील लेखांद्वारे पुरवलेली शेअरमार्केट, आर्थिक संकल्पना विषयक माहिती असो किंवा मग  डीमॅट खाते उघडण्याबाबतचे मार्गदर्शन असो.आता चॅट जीपीटी सारख्या विविध एआय टूल्समुळे डिजिटल उत्पादनांचा वेग वाढणारच आहे. नुकतंच प्रकाशित झालेले आमचे नवीन ई-पुस्तक याचेच उदाहरण आहे. हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन (पर्सनल फायनान्स) संदर्भातील पुस्तक आम्ही एमेझन सोबतच गमरोड (Gumroad) या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे.

आमच्या ट्विटरवरील सुरवातीस पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिलेल्या या माहितीचा उद्देश आमचा इथपर्यंतचा प्रवास सांगणे नसून, समाज माध्यम आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करून काही नवं – वेगळं करू पाहणाऱ्या व्यक्तींना याद्वारे थोडक्यात मार्गदर्शन करण्याचा आहे. अर्थात हे प्रयत्न करतानाच आपला मूळ व्यवसाय – नोकरी यांना अंतर देण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा इथे नमूद करणे महत्वाचे वाटते,

धन्यवाद!

The post डिजिटल करिअर = सोशल मिडिया + एआय + डिजिटल मार्केटिंग appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/how-to-make-money-with-digital-marketing.html/feed 0
‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=what-is-net-worth-in-marathi https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html#respond Mon, 19 Jun 2023 04:55:32 +0000 https://marathistock.com/?p=2382 मोरूला त्याचा मित्र बंड्या सांगत होता कि समोरच्या बिल्डींगमधला राजेश आता चांगला श्रीमंत झालाय. म्हणजे असं का वाटतं तुला ? मोरूचा मित्राला प्रश्न अरे, गेल्याच आठवड्यात उपनगरात एक फ्लॅट घेतला त्याने, चारचाकी गाडी या आधीच घेतली आहे, गावाला जमीन, शिवाय पाचेक तोळं सोनं सुद्धा करून ठेवलंय. बंड्याने एका दमात मोरूला सांगून टाकलं तसं नसतं रे […]

The post ‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
मोरूला त्याचा मित्र बंड्या सांगत होता कि समोरच्या बिल्डींगमधला राजेश आता चांगला श्रीमंत झालाय.

म्हणजे असं का वाटतं तुला ?

मोरूचा मित्राला प्रश्न

अरे, गेल्याच आठवड्यात उपनगरात एक फ्लॅट घेतला त्याने, चारचाकी गाडी या आधीच घेतली आहे, गावाला जमीन, शिवाय पाचेक तोळं सोनं सुद्धा करून ठेवलंय.

बंड्याने एका दमात मोरूला सांगून टाकलं

तसं नसतं रे भावा, समोर दिसतं त्यावरून परीक्षा करू नये, आजच्या क्रेडीट कार्ड, पे-लेटर आणि ईएमआयच्या जगात तर मुळीच असं करू नये. मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा तर तू श्रीमंत आहेस.

आता हे सांगताना मोरू गाडी विश्लेषणाच्या मार्गावर आणू लागला.

काय , मी त्याच्यापेक्षा श्रीमंत ? हे कसं काय ?

बंड्या आता ऐकायला उतावीळ झाला होता.

तुला त्या राजेशची नेटवर्थ किती हे सांगता येईल ?

मोरूने बंड्याला हसत-हसत विचारलं .

नेटवर्थ ? ते काय असतं ? आणि त्याचा या श्रीमंती-गरिबीशी काय संबंध.

गोंधळलेल्या बंड्याचा मोरूला प्रतिप्रश्न .

थोडा वेळ असेल तर मग लक्ष देऊन ऐक,

हातावरच्या स्मार्टवॉचमध्ये वेळ पाहत मोरू मित्राला म्हणाला

एखादी व्यक्ती श्रीमंत आहे कि गरीब हे आपण कसं ठरवतो ? आपण ढोबळमानाने त्याच्याकडील संपत्ती मोजतो. त्याचं घर , गाडी, सोनं आणि जमीन जुमला वगैरे. आणि त्यानुसार त्याची श्रीमंत किंवा गरीब यातील वर्गात रवानगी करून टाकतो.

‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? (what is net worth in marathi )

पण हे करताना आपण फक्त बेरीज करतो आणि वजाबाकी मात्र विसरतो. कारण एखाद्याकडील संपत्तीचे मोजमाप करताना त्याची मालमत्ता वजा त्याचे दायित्व ( अर्थात कर्ज आणि इतर आर्थिक देणी) हि साधी-सोपी पद्धत नेट वर्थ शोधताना वापरतात.

नेट वर्थ ही एक आर्थिक संज्ञा आहे जी एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची वास्तविक सांपत्तिक स्थिती दर्शवते म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालमत्ता (त्याच्या मालकीच्या गोष्टी) वजा त्यांच्या दायित्वांचे (त्यांच्यावर असलेले कर्ज) एकूण मूल्य दर्शवते.

ही संकल्पना आणखी स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी, आपण राजेशचेच उदाहरण घेऊ. राजेशचे राहते घर सामाईक कुटुंबाचे आहे त्यामुळे ते इतक्यात त्याच्या संपत्तीत धरता येणार नाही, पण त्याने उपनगरात घेतलेल्या नव्या फ्लॅटची आजची किंमत ₹90 लाख इतकी आहे. त्याच्याकडे ₹1 लाखांची बचत आहे आणि कार घेताना जरी तिची किंमत ₹10 लाख असली तरी आता दीड वर्षानंतर मात्र तिचे मूल्य ८.५ लाख इतके असेल. पाच तोळे सोने ज्याची किंमत अडीच लाखांपर्यंत. तसेच गावाकडील जमिनीची आताचे मूल्य 6 लाखांच्या आसपास आहे. तर ही आहे त्याची मालमत्ता.

दुसरीकडे, आता त्याचे दायित्व अर्थात कर्ज-जबाबदारी पाहूयात, फ्लॅट घेताना त्याने गृहकर्ज काढले होते. ज्यातील ₹70 लाखांचे गृहकर्ज त्याला फेडायचे आहे. या व्यतिरिक्त कार घेताना घेतलेल्या वाहन कर्जातील ₹5 लाखांचे कर्ज फेडणे बाकी आहे. गावाकडे जमीन आहे पण ती नुकतीच गहाण ठेवून ४ लाखाचे कर्ज त्याने घेतले आहे.

होय त्याने काही दागिने नक्की केले आहेत पण त्यामधील जवळपास ३ तोळे दागिने त्याने क्रेडीट कार्डवर खरेदी केले होते आणि त्या क्रेडीट कार्ड थकबाकीचे त्याने कर्जात रुपांतर करून ईएमआय सुरु केले आहेत. हि कर्ज रक्कम आजच्या घडीला दीड लाखांपर्यंत आहे. या व्यतिरिक्त . 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज त्याच्यावर आहे.

राजेशच्या निव्वळ संपत्तीचे (Net worth) मूल्य काढण्यासाठी आपण त्याच्या मालमत्तेमधून त्याच्या दायित्वे वजा करूया.

एकूण संपत्ती मूल्य ( Net Assets Value )

संपत्ती मूल्य
घर ₹90 लाख
बचत ₹1 लाख
गावाची जमीन₹6 लाख
सोने ₹2.5 लाख
गाडीचे आताचे मूल्य ₹8.5 लाख
एकूण संपत्ती1 कोटी आठ लाख

आता राजेशचे एकूण दायित्व पाहूया,

दायित्व (Net liabilities)

दायित्वमूल्य
गृहकर्ज ₹70 लाख
वाहन कर्ज ₹5 लाख
गहाणखत (कर्ज )₹4 लाख
क्रेडीट कार्ड कर्ज ₹1.5 लाख
वैयक्तिक कर्ज₹2 लाख
एकूण मालमत्ता82 लाख पन्नास हजार.

तर मग नेटवर्थ सूत्र, (Net worth formula )

नेटवर्थ = ‘एकूण मालमत्ता मूल्य’ उणे ‘एकूण दायित्व’

म्हणून 1,08,00,000 – 82,50,000 = 25,50,000

तर, राजेशच्या मालमत्तेचे निव्वळ मूल्य अर्थात नेटवर्थ आहे ₹25,50,000 (रुपये पंचवीस लाख पन्नास हजार)

हे सांगून झाल्यावर मोरू बंड्याला म्हणाला, “तुझं आपल्या इमारतीमधील घर स्वतःचं आहे, ज्याचं आताचं मूल्य 70 लाखांच्या आसपास आहे आणि त्यावर तू घेतलेले गृहकर्ज 40 लाखांच्या आसपास आहे.”

“म्हणजे इथे 70 लाख – 40 लाख = 30 लाखांची मालकी मूल्य तुझं आहे. याव्यतिरिक्त तुझं कोणतेही वेगळे कर्ज किंवा दायित्व नाहीये त्यामुळे तुझी दुचाकी, बचत खात्यात २५ हजारांची रक्कम, आणि दीड तोळ्याच्या आसपास असलेलं सोनं गृहीत धरून दीड लाखांच्या आसपास रक्कम तुझ्याकडे आहे.”

“आता हे सगळे विचारात घेता जवळपास 31 लाख पन्नास हजार तुझी नेट वर्थ आहे जी तुझ्यामते श्रीमंत वगैरे असणाऱ्या राजेशच्या साडे पंचवीस लाखांपेक्षा जास्तच आहे कि.”

आपण हे सांगितल्यानंतर बंड्याच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानाची नोंद घेत मोरू घराकडे निघाला.

अर्थात हे झालं बंड्या आणि राजेश बदल, तुम्हाला तुमची नेट वर्थ माहित आहे का ? नसेल माहित तर खालील ‘नेटवर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator) च्या सहाय्याने ती जाणून घेऊ शकता. यामध्ये मालमत्ता असो वा दायीत्वे, त्यांचे सध्याचे मूल्य प्रविष्ट करावे.

‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator)

Net Worth Calculator

श्रीमंती मूल्यमापनी गणक

संपत्ती (₹)

दायित्व (₹)

‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ ( What is HNI in marathi )

हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ अर्थात एचएनआय म्हणजे उत्तम सांपातिक स्थित असणाऱ्या अशा व्यक्ती ज्यांची निव्वळ मालमत्ता दहा लाख डॉलर्सपेक्षा ( भारतीय रुपयांत सध्या 8 कोटीहून अधिक) जास्त आहेत. आता गंमत अशी कि कर्जबाजारी, अयशस्वी उद्योगपती म्हणून अलीकडे ज्यांचा उल्लेख होतो त्या अनिल अंबानींची नेटवर्थ आजही 250 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच ‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ या वर्गात ते मोडतात.

मला आशा आहे की हे स्पष्टीकरण, तक्ता आणि ‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ च्या सहाय्याने तुम्हाला ‘नेट वर्थ’ हि संकल्पना समजली असेल.

The post ‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/what-is-net-worth-in-marathi.html/feed 0
तब्बल 88 हजार कोटी रस्त्यातून गायब ? https://marathistock.com/2023/06/rbi-notes-went-missing.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=rbi-notes-went-missing https://marathistock.com/2023/06/rbi-notes-went-missing.html#respond Sat, 17 Jun 2023 08:59:49 +0000 https://marathistock.com/?p=2384 ‘गाडीतून पैसे निघाले, पण पोहोचलेच नाहीत.’ एखादी हॉलिवूड किंवा गेलाबाजार साऊथच्या चित्रपटात शोभेल अशी स्टोरीलाईन वाटते ना ? पण हे वास्तवात घडलंय, निदान सरकारी महितीमधून असाच काही निष्कर्ष निघतोय. काय प्रकरण ? ही विवादित, हरवलेली वगैरे रक्कम आहे तब्बल ₹88 हजार कोटींची. सरकारने 500 रुपयांच्या 88106.5 लाख नोटा छापल्या होत्या, पण त्यापैकी रिझर्व्ह बँकेकडे फक्त […]

The post तब्बल 88 हजार कोटी रस्त्यातून गायब ? appeared first on MARATHI STOCK.]]>

‘गाडीतून पैसे निघाले, पण पोहोचलेच नाहीत.’

एखादी हॉलिवूड किंवा गेलाबाजार साऊथच्या चित्रपटात शोभेल अशी स्टोरीलाईन वाटते ना ? पण हे वास्तवात घडलंय, निदान सरकारी महितीमधून असाच काही निष्कर्ष निघतोय.

काय प्रकरण ?

ही विवादित, हरवलेली वगैरे रक्कम आहे तब्बल ₹88 हजार कोटींची.

सरकारने 500 रुपयांच्या 88106.5 लाख नोटा छापल्या होत्या, पण त्यापैकी रिझर्व्ह बँकेकडे फक्त 72600 लाख नोटा पोहोचल्याचं आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीतून उघड झालं आहे.

म्हणजे इथे 500 रुपयांच्या सुमारे 15500 लाख नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

असंच काहीसं घडलं एप्रिल 2015 ते मार्च 2016 दरम्यान, जेव्हा नाशिकच्या करन्सी नोट प्रेसद्वारे 500 रुपयांच्या 2100 लाख नोटा छापण्यात आल्या, पण त्या रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत.म्हणजे या दोन्ही घटना पाहता 500 रुपयांच्या एकूण 176 कोटी नोटा मधल्या मध्येच महामार्गातून गायब झाल्या का? आणि या सर्व नोटांची किंमत काढली तर ती सुमारे 88 हजार कोटी रुपये इतकी निघतेय.

माहिती कुठून आली समोर ?

सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हि बाब समोर आली आहे. भारतात 3 सरकारी टांकसाळी आहेत, जिथे चलनी नोटा छापल्या जातात. यामध्ये पहिली, ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान लिमिटेड’, जी बंगळुरूमध्ये आहे. दुसरी ‘करन्सी नोट प्रेस’, जी नाशिकमध्ये आहे आणि तिसरी ‘बँक नोट प्रेस’ , जी देवासमध्ये आहे. चलनी नोटा येथे छापल्या जातात आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत वितरीत होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठविल्या जातात.

अर्थात वरील घटनांमधून अघटीत निष्कर्ष निघत असला तरी संबंधित सरकारी खात्यांकडून यावर स्पष्टीकरण आल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होतील. (rbi notes went missing.)

The post तब्बल 88 हजार कोटी रस्त्यातून गायब ? appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/rbi-notes-went-missing.html/feed 0
अवघ्या 35 पैशांत रेल्वेचा प्रवासी विमा. https://marathistock.com/2023/06/irctc-travel-insurance-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=irctc-travel-insurance-in-marathi https://marathistock.com/2023/06/irctc-travel-insurance-in-marathi.html#respond Mon, 05 Jun 2023 06:59:01 +0000 https://marathistock.com/?p=2365 ओदिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि विमा कवचाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण लांब पल्ल्याच्या रल्वे प्रवासासाठी रेल्वेकडून आधीच उपलब्ध असलेल्या एका विमा योजनेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.(IRCTC Travel insurance in marathi) दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला या प्रवासादरम्यान लागू असणाऱ्या ऐच्छिक विम्याबद्दल विचारण्यात येतं. केवळ 35 […]

The post अवघ्या 35 पैशांत रेल्वेचा प्रवासी विमा. appeared first on MARATHI STOCK.]]>
ओदिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि विमा कवचाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण लांब पल्ल्याच्या रल्वे प्रवासासाठी रेल्वेकडून आधीच उपलब्ध असलेल्या एका विमा योजनेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.(IRCTC Travel insurance in marathi)

दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला या प्रवासादरम्यान लागू असणाऱ्या ऐच्छिक विम्याबद्दल विचारण्यात येतं. केवळ 35 पैसे प्रीमिअम असणारा हा विमा अनेकजण नाकारतात. खरं तर असं करू नये. कारण अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या विम्याचे लाभ आणि वैशिष्ट्ये कोणते हे पाहूया .

विम्यात कोणत्या जोखिमी समाविष्ट ( what is covered in IRCTC Travel Insurance )

अपघाती मृत्यू₹10 लाख
कायमचे अपंगत्व ₹10 लाख
कायमचे अंशिक अपंगत्व₹7.5 लाख
जखमींना रुग्णालयातील खर्चापोटी ₹2 लाख
मृतावशेषांच्या वाहतूक खर्चापोटी₹10 हजार

काही महत्वाच्या बाबी. ( Info about IRCTC Insurance )

  • विमा फक्त भारतीय नागरिकांसाठी.
  • विमा केवळ ऑनलाईन तिकीट बुकिंगवर.
  • विमा सध्या ऐच्छिक.
  • प्रीमियम 35पैसे प्रति व्यक्ती.
  • केवळ कन्फर्म्ड, आरएसी व अंशतः कन्फर्म्ड तिकिटांसाठी वैध. 2016 मध्ये IRCTC कडून सुरु करण्यात आलेली हि विमा योजना प्रवाशांना अपघात, दहशतवादी हल्ला, दरोड्यासारख्या घटनांत विमाकवच प्रदान करते.

सध्या ऐच्छिक असणारा हा विमा बंधनकारक करावा तसेच हा विमा प्रवाशांच्या 5 वर्षाखालील मुलांना,ऑफलाईन अर्थात स्थानकांवर रांगा लावून तिकीट आरक्षित करू पाहणारे तसेच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना सुद्धा लागू करावा.अशी विनंती ट्विटरद्वारे आम्ही आयआरसीटीसी (@IRCTC) आणि अश्विनी वैष्णव (@AshwiniVaishnaw) यांना करतो.

The post अवघ्या 35 पैशांत रेल्वेचा प्रवासी विमा. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/06/irctc-travel-insurance-in-marathi.html/feed 0
ई-पुस्तक : शेअर मार्केटची तयारी. https://marathistock.com/2023/05/free-stock-market-ebook-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=free-stock-market-ebook-in-marathi https://marathistock.com/2023/05/free-stock-market-ebook-in-marathi.html#respond Fri, 19 May 2023 08:04:42 +0000 https://marathistock.com/?p=2349 शेअर मार्केट : एक असं क्षेत्र ज्याचं सर्वसामान्य मराठी माणसास जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते. बरं सुरवात करायची तर नक्की कुठून आणि कशी ? असे अनेक प्रश्न मनात असतात. मग समोर जे काही ज्या क्रमाने येईल तसे आपण वाचत-पाहत जातो, परिणामी भांडवली बाजार समजण्यापेक्षा त्याबद्दल मनात गोंधळ जास्त निर्माण होतो. हेच ओळखून, […]

The post ई-पुस्तक : शेअर मार्केटची तयारी. appeared first on MARATHI STOCK.]]>

शेअर मार्केट : एक असं क्षेत्र ज्याचं सर्वसामान्य मराठी माणसास जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते.

बरं सुरवात करायची तर नक्की कुठून आणि कशी ? असे अनेक प्रश्न मनात असतात. मग समोर जे काही ज्या क्रमाने येईल तसे आपण वाचत-पाहत जातो, परिणामी भांडवली बाजार समजण्यापेक्षा त्याबद्दल मनात गोंधळ जास्त निर्माण होतो.

हेच ओळखून, शेअर मार्केटच्या प्राथमिक माहितीसह महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करणारे हे आमचं छोटेखानी ई-पुस्तक आम्ही सादर करीत आहोत.

महत्वाची सूचना : ऑफर मर्यादित काळासाठी असून सदर ई-पुस्तक हे अमेझोन किंडल एपद्वारे वापरता येऊ शकते.

The post ई-पुस्तक : शेअर मार्केटची तयारी. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/05/free-stock-market-ebook-in-marathi.html/feed 0
प्रधान मंत्री किसान सन्मान योजना. https://marathistock.com/2023/05/pm-kisan-yojana-in-marathi.html?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=pm-kisan-yojana-in-marathi https://marathistock.com/2023/05/pm-kisan-yojana-in-marathi.html#respond Mon, 15 May 2023 14:45:02 +0000 https://marathistock.com/?p=2345 पीएम किसान सन्मान निधी (pm kisan yojana in marathi) : या योजनेचा 14 वा हप्ता मे महिन्यात मिळू शकतो. अर्थात केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2000 म्हणजेच वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. जाणून घेऊया कशी आणि कुठे करायची ऑनलाइन नोंदणी? (pm kisan.gov.in registration in marathi […]

The post प्रधान मंत्री किसान सन्मान योजना. appeared first on MARATHI STOCK.]]>
पीएम किसान सन्मान निधी (pm kisan yojana in marathi) : या योजनेचा 14 वा हप्ता मे महिन्यात मिळू शकतो. अर्थात केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2000 म्हणजेच वर्षाला ६ हजार रुपये मिळतात.

जाणून घेऊया कशी आणि कुठे करायची ऑनलाइन नोंदणी? (pm kisan.gov.in registration in marathi )

सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.

✅ आता Farmers Corner वर जावे.

✅ येथे ‘New Farmer Registration’या पर्यायावर क्लिक करावे.

✅ यानंतर आधार क्रमांक टाकावा.

✅ आता कॅप्चा कोड टाकून आपले राज्य निवडावे व पुढील प्रक्रियेसाठी जावे.

✅ या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी.

✅ आता आपल्या बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहितीही टाकावी.

त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे व माहिती असणे आवश्यक आहे. (Documents required for pm kisan yojana )

✅ आधार कार्ड.

✅ बँक खाते असणे आवश्यक आहे.

✅ अर्जदार शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

✅ उत्पन्नाचा दाखला.

✅ जमिनीची कागदपत्रे.

✅ रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील लिंकवरून ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. (pm kisan kyc status )

exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

पीएम किसान सन्मान निधी योजनेंसंदर्भात काही अडचणी येत असतील तर खालील हेल्पलाइन क्रमांका किंवा मेलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.(pm kisan helpline numbers)

हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092.

तक्रार pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.

The post प्रधान मंत्री किसान सन्मान योजना. appeared first on MARATHI STOCK.]]>
https://marathistock.com/2023/05/pm-kisan-yojana-in-marathi.html/feed 0