Repo rate linked home loan.Repo rate linked home loan.

तुमचं गृहकर्ज रेपो रेटशी जोडलेलं आहे का ?

(Repo rate linked homeloan in marathi) रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार रेपो रेट लिंक्ड होमलोन ही बँकांनी सुरू केलेली नवीन गृह कर्ज योजना आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. या योजनेअंतर्गत, फ्लोटिंग कर्जासाठी गृह कर्जाचा व्याज दर एमसीएलआर (MCLR ) ऐवजी रेपो दराशी  सलग्न केला जातो. रेपो रेट म्हणजे ज्या व्याज दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांना पैसे कर्जाऊ देते.

जर तुम्ही गृहकर्जदार असाल आणि तुमच्या बँकेने रेपो रेट लिंक्ड होमलोन योजना आणली असेल तर आपणास आपला गृह कर्ज व्याजदर एमपीएलआर वरून  रेपोरेट आधारित  करून घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. रिझर्व्ह बॅंकेने इतर सर्व  बँकांना त्यांच्या ग्राहकांना त्यांचे गृहकर्ज  एमसीएलआर आधारित कर्जांकडून रेपोरेट कर्जामध्ये हस्तांतरित करण्यास परवानगी देण्याची सूचना केली आहे.यासाठी कर्जदाराला बँकेस काही प्रशासकीय शुल्क द्यावे लागतील.
 

रेपो रेट लिंक्ड होम लोन (RRLL) किती फायद्याचं ?

 
रेपो रेट लिंक्ड होम लोन योजनेंतर्गत घेतलेली कर्जे म्हणजे जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून  रेपो दरात बदल करते तेव्हा तेव्हा तुमच्या कर्जावरील व्याज दरही बदलणार.भारता सारख्या विकसनशील देशांची अर्थव्यवस्था जशी विस्तारत राहणार तसं तसं भविष्यात व्याजदरांत कपातच अपेक्षित आहे आणि या दृष्टीने सर्वसामान्यांसाठी गृहकर्जासारख्या कर्जासाठी रेपो रेट लिंक्ड होमलोन (RLLR) उत्तम पर्याय उपलब्ध आहे.
 
 
माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा . आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *