आम्ही ‘मराठी स्टॉक’ ट्वीटरवर “शेअर बाजार मराठी’ Share Bajar Marathi (@marathistock ) या नावाने सक्रीय आहोतच. स्टॉक मार्केट (Stock market in Marathi ) तसेच इतर आर्थिक घडामोडी अशी इत्यंभूत वित्तंबातमी तुमच्यापर्यंत मराठीत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण ट्वीटरवरील शब्दमर्यादा म्हणा किंवा अधिकाधिक माध्यमातून व्यक्त होण्याची उर्मी, आता या क्षेत्रातील जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत आता या ब्लॉगद्वारे आम्ही पुरवू इच्छित आहोत.
जगात अनेक राजकीय, सामाजिक घडामोडी घडत असतात आणि अनेकवेळा या घडामोडींना एक आर्थिक किनार असते किंबहुना अनेक देशांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयामागे आर्थिक विचार असण्याची शक्यता जास्त असते.मग अमेरिकेकडून सौदी बाबतचे धोरण असो किंवा ओपेकचा तेल उत्पादनातील वाढ कपातीचा निर्णय किंवा अगदी चीन आणि आपल्या दरम्यानचे आयात निर्यात धोरण असो या सर्वांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काळात नकळत परिणाम होत असतो. तर या माध्यमातून या अशाच घटना, भांडवली बाजारातील तसेच इतर अर्थ जगतातील घडामोडी, बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल.
आम्हाला खात्री आहे कि तुमचा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल.
धन्यवाद !
प्रगटीकरण (Disclosure) : मित्रांनो आमच्या ब्लॉगपोस्टमध्ये काही उत्पादने, सेवांचे सलग्नित दुवे ( AFFILIATE LINK, REFERRAL LINK) असू शकतील.जर आपण ही उत्पादने खरेदी करता तेव्हा त्या उत्पादनांच्या किंमतीच्या एकही पैसा आपल्याला जास्त द्यावा लागत नाही परंतु आपण ती खरेदी या लिंकवरून करता म्हणून आम्हाला त्यातील अगदी छोटीसा हिस्सा या विपणासाठी दिला जातो ज्या मुळे आम्हाला नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.