डाईम : फेसबुक क्रिप्टोचलन याच वर्षी येणार
DIEM : Facebook Cryptocurrency will be launched in 2021 

 
DIEM Facebook Cryptocurrency
Image by Gerd Altmann from Pixabay 
फेसबुक (Facebook ) स्वतःचे क्रिप्टोचलन आणणार हि काही आता नवीन गोष्ट राहिली नाहीये, पण हे क्रिप्टोचलन याच वर्षी येणार आहे हि मात्र नक्कीच नवीन बातमी आहे.
 
याआधी या क्रिप्टोचलनाचे नाव ‘लिब्रा’ हे असणार अशी कुणकुण होती पण आता फेसबुकने मात्र आपल्या या क्रिप्टोचलनाचे नाव डाईम (DIEM ) हे असेल असे जाहीर केले आहे आणि ते याच वर्षी म्हणजे 2021 मध्ये आणले जाणार हे सुद्धा आता स्पष्ट झाले आहे. फेसबुक आपल्या डिजिटल चलनातील प्रोजेक्ट डाईम असोसिएशनच्या माध्यमातून हे क्रिप्टोचलन  लॉंच करणार आहे.
टेस्लासाठी बिटाकॉइन्समध्ये पेमेंट स्वीकारण्याच्या आपल्या आधीच्या घोषणेवरून एलन मस्कनी  युटर्न  घेतल्यानंतर  बिटाकॉइन्सच्या मूल्यात मोठी घसरण झाल्याचे दिसतेय आणि नेमका हाच मुहूर्त साधून फेसबुकने आपल्या क्रिप्टोचलनाची घोषणा केली आहे हे विशेष,
 
फेसबुकचे हे क्रिप्टोचलन दोन सेट्स मध्ये लॉंच केलं जाईल ज्यामध्ये एक बहुचलनी म्हणजे मल्टीकरन्सी कॉइन असेल तर दुसरे डॉलर किंवा युरो यांच्या तुलनेत विशिष्ठ मूल्य राखणारं असेल. असंही म्हटलं जात आहे कि डाईम (DIEM ) चे पैसे स्थानांतरण शुल्क अर्थात ट्रान्स्फर चार्जेस अत्यंत कमी असतील जेणेकरून जास्तीतजास्त लोकांनी या क्रिप्टोचलनाकडे आकर्षित व्हावे.
 
इतर तर्कवितर्क काहीही असोत पण फेसबुकच्या या घोषणेने एक मात्र स्पष्ट होतंय कि भविष्यात क्रिप्टोचलनाची चलती असणार आहे. अगदी भारताबद्दल सांगायचं तर भारतातील WazirX सारख्या  क्रिप्टोचलन एक्स्चेंजवर उघडल्या जाणाऱ्या नवीन खात्यातही वाढ होणे म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत क्रिप्टोचलनाची गोष्ट आता झिरपू लागलेय. अर्थात चलनाचे हे नवीन स्वरूप किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *