या कंपनीने दिला एका वर्षात 12 पटीपेक्षा जास्त परतावा.
Multibagger stocks india 

multibagger stocks for 2021 india
Image by mohamed Hassan from Pixabay 
“लाखाचे बारा हजार करणे ” असं तोट्यात केलेल्या एखाद्या व्यवहाराला आपल्या मराठीत म्हटलं जातं पण कधीकधी एखाद्या व्यवहारात अगदी वर्षभरातच “लाखाचे बारा लाख सुद्धा होऊ शकतात”..शेअर मार्केटच्या भाषेत अशा शेअर्सना मल्टीबॅगर (Multibagger stocks india) म्हणतात. हे सगळं सांगायचं कारण आज आपण अशाच एका कंपनीबद्दल  बोलणार आहोत जीने वर्षभरात 12 पट परतावा दिला आहे.
या आधीही आपण कमी कालावधीत अनेक पटीत परतावा देणाऱ्या अनेक मल्टीबॅगर (Multibagger stocks India ) कंपन्यांबद्दल ऐकलंय, वाचलंय. आज एका अशाच कंपनीबद्दल सांगणार आहोत जीने अवघ्या 12 महिन्यांच्या कालावधीत चक्क 1200 % पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेत.
या कंपनीचे नाव आहे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, एक वर्षापूर्वी म्हणजे 4 जून 2020 कंपनीच्या शेअरची किंमत रु.6.30 ( सहा रुपये तीस पैसे ) इतकी होती आणि परवा म्हणजे 4 जून 2021 रोजी एनएससीवर या शेअरची बाजार बंद होतेवेळी किंमत होती रु. 84.55
 
Chart : TradingView

म्हणजे हा परतावा टक्क्यांमध्ये मोजायचा झाला तर या शेअरने वर्षभरात 1342 % रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे मागील वर्षी कुणी १ लाख या शेअरमध्ये गुंतवले असते तर आता त्या एक लाखाचे 13 लाख 42 हजार इतकं मूल्य झालं असतं.

 
सध्या हा शेअर मुव्हिंग एवरेजच्या हिशेबाने 20 ,50 ,200 दिवसांच्या मुव्हिंग एवरेजच्या वर तर 5 आणि 10 दिवसांच्या मुव्हिंग एवरेजच्या खाली ट्रेड करत आहे.

असं काय झालं कि या कंपनीने घोटाळा झाल्यानंतर अशी कात टाकली ?

सी जी म्हणजे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, उर्जा क्षेत्रातील सुटे भाग, स्विचेस व इतर घटक निर्मिती क्षेत्रातील गौतम थापर यांच्या नेतृत्वाखालील हि कंपनी 2019 मधील फसवणूक आणि घोटाळ्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये एन्टीटी ट्यूब गुंतवणूक प्रक्रियेद्वारे मुरुगप्पा समूहाच्या अधिपत्य खाली आली आणि त्यानंतर नवीन संचालक मंडळाच्या कार्भाराखाली कंपनीने उत्तरोत्तर अशी चांगली कामगिरी केल्याचे दिसतेय.एक प्रकारे बाजाराने नवीन संचालकांच्या कार्यपद्धतीवर शाबासकीने शिक्कामोर्तब केलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मल्टीबॅगर (Multibagger stocks india) ओळखायला शिका.

तर अशा मल्टीबॅगर (Multibagger stocks india) ठरू शकणाऱ्या कंपन्यांबद्दल आधीच अभ्यास करून अंदाज लावणे मात्र खरे कौशल्याचे काम. बाजारावर करडी नजर आणि फंडामेंटल एनालीसीस ( Fundamental Analysis ) म्हणजेच मुलभूत विश्लेषणाच्या सहाय्याने हे शक्य होऊ शकतं.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *