गुंतवणूकपर मराठी पुस्तके (Best Investment books in Marathi)
गुंतवणुकसंदर्भात मराठी पुस्तके (Best Investment books in Marathi ): गुंतवणूक करण्यास सुरवात करण्याचा विचार जितका सोपा तितकंच प्रत्यक्षात गुतंवणूकीचे प्लानिंग करणे गोंधळात टाकणारे असते. सुरवात नेमकी कशी आणि कुठून करावी हेच समजत नसतं. मग एखाद्या मित्राने असं केलं म्हणून आपणही तसंच करू. कुणी सांगतं म्युच्युअल फंड सही आहे. तर एखादा छातीठोकपणे अमुक-तमुक पेनी स्टॉक्स खरेदी करण्याबाबत सुचवतो वगैरे वगैरे.
कोणत्याही क्षेत्रात पारंगत होण्यासाठी पुस्तकी व प्रात्यक्षिक असं दोन्ही बाजूंनी ज्ञान मिळणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही एका बाजूने माहिती घेतल्यास दिशाभूल होण्याची शक्यता असते. म्हणजे आता बघा, गुंतवणूक, शेअर मार्केट संदर्भात प्राथमिक माहिती किंवा मूळ संज्ञा – संकल्पना समजून घेऊन सुरवात करू इच्छिणाऱ्याला जर कुणी अगदी एडव्हान्स लेव्हलची पुस्तके किंवा कोचिंग दिलं तर काय होईल ? सगळं डोक्यावरूनच जाईल ना.
आजचा विषय पुस्तकांचा आहे आणि म्हणूनच गुंतवणूक, भांडवली बाजाराबद्दल माहिती देणारी अशीच नेमकी आणि सर्वोत्तम म्हणून वाखाणलेली गेलेली काही पुस्तके आम्ही सुचवणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे अशी बेस्ट सेलर्स पुस्तके अनेक आहेत पण यामध्ये आम्ही तीच पुस्तके सांगणार आहोत जी मराठी भाषेत उपलब्ध आहेत. (Investment books in Marathi ) जेणेकरून आपल्या मराठी भाषिकांना याचा फायदा होईल.
तर पाहूया अशी कोणती पुस्तके आहेत. ( Best Investment books in Marathi )
1 The Intelligent Investor (द इंटेलिजंट इन्व्हेस्टर )
विषय जर शेअरमार्केट मधील गुंतवणुक हा असेल तर हे पुस्तक धर्मग्रंथ समजलं जातं. स्टॉक मार्केटमध्ये आज परवलीचा शब्द मानाला जाणाऱ्या व्हॅल्यु इन्व्हेस्टींगचा जनक समजला जाणाऱ्या द्रष्टा अर्थतज्ञ बेन्जामिन ग्रॅहम यांचे वर्ष 1949 मधील हे कालातीत पुस्तक. गुंतवणूक, शेअर बाजारमध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाकडे हे पुस्तक असलेच पहिजे.
या पुस्तकाची मराठी आवृत्ती अमेझॉनवरून मागविण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
2 The Psychology of Money अर्थात पैशाचे मानसशास्त्र
पैसा, गुंतवणूक याबाबत आपण फारच चौकटीत विचार करतो. म्हणजे काही ठोकताळे ठरलेले असतात त्यानुसार आपण निर्णय घेत असतो पण इथेच खरी गोची होत असते. कारण पैशाबाबत विशिष्ट असे मानसशास्त्र असू शकते असा विचारहीआपण केलेला नसतो. गुंतवणूक असो व एखाद्या उद्योग व्यवसायाची सुरवात, त्याची मुहूर्तमेढ सर्वात आधी मनात रोवली जात असते. गुंतवणुकीबाबत नियोजन, पैशाचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर, आपला पैशाबाबत असलेला दृष्टीकोन हे सर्व किती महत्वाचं असतं ते हे पुस्तक आपल्या ध्यानी आणून देतं. पारायणे करावीत असं हे पुस्तक आहे.
या पुस्तकाची मराठी आवृत्ती अमेझॉनवरून मागविण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
3 One up on the Wall Street (वन अप ऑन द वॉल स्ट्रीट )
सुप्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार , म्युच्युअल फंड व्यवस्थापक, प्रथितयश लेखक पीटर लिंच यांचे शेअर मार्केट गुंतवणुकीवरील (Stock Market Investment ) हे अप्रतिम पुस्तक.
स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार इंट्रा डे किंवा लघु कालावधीचे आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारांत होत असतात. पहिल्या प्रकारांत एका कडील संपत्ती दुसऱ्याकडे स्थलांतरित होते असा समज ग्राह्य धरण्यास वाव आहे कारण यामध्ये अनेकजण गमावतात आणि फारच कमीजण कमवत असतात. पण दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक, या मध्ये संपत्तीची निर्मिती होत असते आणि या पद्धतीने संयमाने गुंतवणूक करणाऱ्याला या दीर्घ कालीन गुंतवणुकीत फायदाच होत असतो. असा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला सिद्धांत लिंच यांनी या पुस्तकात मांडून त्यावर उत्तम मार्गदर्शन केलंय. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत रस असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.
या पुस्तकाची मराठी आवृत्ती अमेझॉनवरून मागविण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
4 What Every Indian Should Know Before Investing ( सुरक्षित गुंतवणूक, घसघशीत परतावा )
बरेचदा गुंतवणूक करण्याचा विचार पक्का असतो, कितपत गुंतवणूक करायची हे सुद्धा निश्चित असतं. पण मग नेमका प्रश्न असतो तो म्हणजे गुंतवणूक करावी कशात ? कारण गुंतवणुकीचीही अनेक पर्याय / उत्पादने उपलब्ध असतात पण त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला माहित नसतात. म्हणजे बघा, अनेकदा गुंतवणूक म्हणून कुणी एखादा 35 वर्षानंतर मॅच्युअर होणारी विमा पॉलिसी घेऊन टाकतो. अशा अनेक उथळ गोष्ठी होण्याची शक्यता असते जर आपल्याला स्टॉक्स, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट्स, पीपीएफ, ईपीएफ, सोने, ज्येष्ठ नागरिकांची बचत योजना, एनएससीज, एसआयपी, आयुर्विमा, आरोग्य विमा, रिअल इस्टेट या सर्वांमधील फरक आणि त्यांची वैशिष्ट्ये माहित नसतील. विनोद पोट्टाईल यांचे हे पुस्तक यासाठीच असून फारच उपयोगी आहे.
या पुस्तकाची मराठी आवृत्ती अमेझॉनवरून मागविण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
5 Romancing the Balance Sheet (बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना )
गुंतवणुकीसाठी काळाच्या आणि व्यावसायिक कसोटीवर सिद्ध होऊ शकणाऱ्या कंपन्या शोधायच्या असतील तर मुलभूत विश्लेषण ( Fundamental Analysis ) पक्कं हवं. आणि त्यासाठी लागणारे निकष म्हणजे ताळेबंद, करोत्तर नफा, संचित नफा, विक्री – खरेदी, लाभांश, बॉटम लाईन इत्यादी संज्ञा आणि संकल्पना संपूर्णपणे माहिती असणे फार महत्वाचे आह. खरं तर हा अगदी बोअरिंग रटाळ वगैरे वाटू शकणारा विषय उच्चशिक्षित तसेच व्यावसायिक आयुष्यात अनेक महत्वाची पदे भूषविलेले सनदी लेखापाल अनिल लांबा यांनी अत्यंत ओघवत्या आणि सोप्या भाषेत पुस्तकात मांडला आहे.
या पुस्तकाची मराठी आवृत्ती अमेझॉनवरून मागविण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
तर मित्रांनो गुंतवणूक या विषयासंदर्भात मराठी भाषेत मार्गदर्शन करू शकतील अशी हि पाच पुस्तके. या व्यतिरिक्तही अनेक पुस्तके आहेत पण मराठी भाषेत उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांची संख्या तशी मर्यादित आहे.
या व्यतिरिक्त शेअर मार्केट हा विषय ज्यांच्यासाठी अगदी नवीन आणि अनोळखी आहे अशांकरिता (Best investment books for beginners) या क्षेत्राविषयी प्राथमिक पण महत्वाची माहिती देणारे आमचे छोटेखानी पुस्तक शेअर मार्केटची तयारी हे सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांनी हे पुस्तक घेतले, वाचले असेल अशांना आमची विंनती आहे कि सदर पुस्तकाबद्दल आपला अभिप्राय (Review आणि Rating) अमेझॉनवर जरूर नोंदवावा.
सदर लेख आपल्याला आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी आपण इथे क्लिक करू शकता.
धन्यवाद !