how to retrieve money sent to wrong account via google pay upi in marathihow to retrieve money sent to wrong account via google pay upi in marathi

फार नाही अगदी पाच-एक वर्षापूर्वीपर्यंत पैसे देवाण-घेवाण ऑनलाईन व्यवहार व्हायचे. पण ते सगळं करणारा किंवा करू शकणारा वर्ग काहीसा सुशिक्षित किंबहुना तंत्रज्ञानस्नेही वगैरे प्रकारातला होता. कारण ऑनलाईन पैसे हस्तांतरण व्यवहार म्हणजे लॉग-इन तपशील जसं कस्टमर आयडी, पासवर्ड, त्यानंतर बेनीफिशीअरी म्हणजे लाभार्थ्याचे तपशील भरणे, ट्रान्झॅक्शन पासवर्ड नावाचा वेगळा प्रकार हे सर्व माहित असणारा, लक्षात ठेवू शकणारा वगैरे असायचा. (how to retrieve money sent to wrong account via google pay upi in marathi )

पण यूपीआयने हा सगळा खेळच पालटला. रस्त्यावरील गरीब भाजीवाल्यापासून अगदी सप्ततारांकित हॉटेलपर्यंत यूपीआय कुणालाच वर्ज्य राहिलं नाहीये. पण कितीही सोपं आणि सहज असलं तरी याचा वापर करतानाही चुका होऊ शकतात. घाई गडबडीत चुकीचा यूपीआय आयडी किंवा क्रमांक टाकून पैसे पाठवले गेल्याचे तसेच फसवणुकीचे प्रकारही झालेले आहेत. पण असं झाल्यास काय करावे ?

यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?  चिंता नको. तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.

जर तुम्ही, GPay, PhonePe, Paytm  सारख्या यूपीआय एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल, तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहक सेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. त्याच दरम्यान तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनशी सुद्धा संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
या आधी तुमच्या फोनवर त्या चुकीच्या व्यवहाराद्वारे पैसे खात्यातून वजा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज सेव्ह करा. या मेसेजमधील तपशील आहेत ते परताव्यासाठी आवश्यक ठरतात.

आरबीआयच्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांत सांगितल्यानुसार चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास, तुम्ही bankingombudsman.rbi.org.in या बँकिंग लोकायुक्त संकेतस्थळावर जाऊन तक्रार सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत अर्जही देऊ शकता, ज्यामध्ये तुमच्या बँकेच्या तपशिलासोबत, पैसे चुकून ज्या खात्यात पाठवले गेले आहेत तो खाते क्रमांकही टाकावा लागेल.

कायदेशीर तक्रारही करता येते.

जर तुम्हाला माहित असेल की या व्यवहारांतील चुकीचा लाभार्थी कोण आहे आणि ती व्यक्ती तुम्ही संपर्क करून पैसे परत पाठवण्याची विनंती करूनही तुमचे पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर तुम्ही NPCI वेबसाइटवर जाऊनही त्या व्यक्तीविरोधात तक्रार करू शकता. (wrong upi transaction complaint in marathi)

NPCI वेबसाइटवर तक्रार कशी करावी.

सर्वप्रथम NPCI च्या वेबसाईटला https://www.npci.org.in/ भेट द्या. ( How to complain with NPCI in marathi)

येथे सर्वात वर असणाऱ्या पर्यायामध्ये उजव्या कोपऱ्यातील ‘गेट इन टच’ या टॅबवर कर्सर नेल्यास तेथे युपीआय कम्प्लेंट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

त्यानंतर येणाऱ्या अनेक पर्यायांपैकी ट्रान्सेक्शन्स या पर्यायाची निवड करा.

यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन नेचर, इश्यू, ट्रान्झॅक्शन आयडी, बँक, रक्कम, ट्रान्झॅक्शनची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यासारखे तपशील द्यावे लागतील.
सोबतच तुमचे बँक खाते विवरण अर्थात ‘अकाऊंट स्टेटमेंट’ जोडून आपली तक्रार सबमिट करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *