sip investment in marathisip investment in marathi

वर्षाला फक्त तीन अधिकचे हफ्ते तुमचं गृहकर्ज व्याजासहित परत करू शकतील ? (sip investment in marathi)

उदाहरणाने पाहूया,

तुमचं गृहकर्ज : ₹40 लाख समजू,

8.9% वार्षिक व्याजदराने 22 वर्षांसाठी मासिक हफ्ता अर्थात ईएमआय : ₹34,583

बावीस वर्षांत होमलोन परतफेडी दाखल तुमच्याकडून बँकेला दिली जाऊ शकणारी एकूण रक्कम,

 ₹40,00,000 (मुद्दल) + ₹51,29,949 (व्याज) = ₹91,29,949

म्हणजे 40 लाखांची परतफेड करताना फक्त व्याजापोटी तुम्ही मुदलाहून जास्त म्हणजे 128% रक्कम अधिक भरता.

थेट सांगायचं तर गुंतवणूक संदर्भातील कंपाऊंडिंगचा नियम इथे मात्र तुमच्या विरोधात काम करतो.

पण याच कंपाऊंडिंगच्या मदतीने वर्षाला फक्त तीन अधिकच्या हफ्त्यांसह आपण आपलं हे होमलोन व्याजासकट परत मिळविण्याचा प्रयत्न केला तर ?

नक्की काय करायचं ? (smart way to repay home loan in marathi)

गृहकर्जाचे वर्षाला 12 नव्हे तर 15 मासिक हफ्त्यांची तरतूद करा. म्हणजे ३ हफ्ते जास्त.

म्हणजे,

 ₹34,583 X 3 = ₹1,03,749 (तीन मासिक हफ्त्यांची एकूण रक्कम )

आता हि रक्कम तुम्हाला दर महिना एसआयपी पद्धतीने गुंतवायची आहे.

म्हणजे, ₹1,03,749 / 12 = ₹8,645.75 आपण ₹8,646 विचारात घेऊ.

याचा अर्थ तुम्हाला दर महिना ₹8,646  ची SIP करायची आहे.

‘इतिहासातील आकडेवारी हि भविष्यातील कामगिरीबाबतची शाश्वती मानू नये’ हे वाक्य लक्षात ठेवूनच आपण इथे निर्देशांकाच्या परताव्याचा संदर्भ घेऊ.

मागील 20 वर्षांचा विचार केल्यास निफ्टी निर्देशांकाने दरवर्षी सरासरी (CAGR) 14% आसपास परतावा दिला आहे. अर्थात मागील 2 वर्षापूर्वीच्या करोना घसरणीनंतर मार्केट घेतलेल्या झेपेचा तर्क विचारात घेतला तरी ऐतिहासिक दाखल्यांनुसार मार्केटने दीर्घकाळात 12% च्या आसपास सरासरी परतावा दिल्याचं दिसतं.

आता समजा हि एसआयपी आपण निफ्टी निर्देशांकात केली.

यातून पुढील बावीस वर्षांसाठी वार्षिक 12% इतका सरासरी परतावा जरी जमेस धरला तरी हि रक्कम असेल. ₹1,12,04,315 (रुपये  एक कोटी बारा लाख चार हजार तीनशे पंधरा आणि ऐंशी पैसे )

यात तुमची मूळ गुंतवणूक असेल ₹22,82,544

तर तुम्हाला मिळालेला परतावा असेल  ₹89,21,718

म्हणजे एसआयपीद्वारे केलेल्या या गुंतवणुकीतून तुमची मूळ गुंतवणूक वजा करूनही तुम्ही तुमच्या होमलोनच्या परतफेडीत व्याजासकट भरलेल्या रकमेच्या जवळपास रक्कम तुम्हाला इथे मिळाल्याचे दिसेल. (how to repay home loan faster india in marathi)

अन् हे गृहकर्जाच्या दरवर्षाला तीन अतिरिक्त हफ्त्यांच्या तरतुदीतून सध्या होऊ शकते.या नियमित SIP ला काही वर्षांनी नित्यनेमाने येणाऱ्या DIP चा म्हणजे मोठ्या घसरणीचा अतिरिक्त मुहूर्त साधलात तर तुमच्या  सरासरी परताव्यात वाढणारे एक – दोन अतिरिक्त टक्के तुम्हाला दुधावर येणाऱ्या सायीसारखे भासतील. (investment tips in marathi)   

अर्थात वरील उदाहरणात गृहकर्जावरील व्याजरकमेसंदर्भात मिळणारी ‘कर सवलत’ आणि SIP गुंतवणुकीच्या परताव्यावर लागणारा ‘दीर्घकालीन भांडवली नफा’ अर्थात ‘लॉंग टर्म कॅपिटल गेन’ कर, हे दोन घटकही लक्षात घेण्यासारखे.  

मित्रांनो गुंतवणुकीसंदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या ‘एसआयपी’ आणि ‘कंपाऊंडिंग’ या दोन शब्दांची महती एव्हाना अनेकांना माहित झालेली आहे. पण त्याचं महत्व सांगण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या दृष्टीकोनानुसार उदाहरण मांडत असतो. अगदी तसंच वरील उदाहरणातून दिलेली माहिती हा पूर्णपणे आमचा दृष्टीकोन असून तो गुंतवणूक सल्ला मानू नये. कारण आमचा तर्क, आमचा अंदाज, आमचा अभ्यास चुकीचाही ठरू शकतो. आणि म्हणूनच कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *