नमस्कार मित्रांनो,
हा लेख माझ्या नव्या “मी उद्योजक होणार” या ई-पुस्तकाबद्दल आहे.
‘शेअर मार्केटची तयारी’ आणि ‘अर्थलिपी’ नंतरचं मी उद्योजक होणार!’ हे माझं तिसरं मराठी पुस्तक. आपल्या महाराष्ट्रात उद्यमशीलतेची जुनी परंपरा आहे, पण आजकाल व्यवसाय सुरू करण्याचं धाडस तेव्हाच होतं, जेव्हा नोकरी धोक्यात येते किंवा उत्पन्न कमी पडतं. अशा वेळी नाईलाजाने व्यवसायाकडे वळावं लागतं. पण त्याआधी मनात शंका-कुशंका असतात – ‘लोक काय म्हणतील?’, ‘नाही जमलं तर?’ संकल्पना असते, पण ‘कोणता व्यवसाय?’, ‘नोंदणी कुठे?’ असे प्रश्न पडतात.
हे पुस्तक तुमच्या व्यवसायाच्या स्वप्नांना चालना देण्यासाठी आणि त्यादरम्यान पडणाऱ्या ‘काय, कसं, कुठे’ या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. (marathi book on entrepreneurship)
“मी उद्योजक होणार” हे पुस्तक उद्योजकतेच्या मूलभूत गोष्टींपासून ते यशस्वी व्यवसाय उभारण्याच्या व्यावहारिक टिप्सपर्यंत सर्व काही सोप्या मराठीत समजावून सांगतं. यात तुम्हाला व्यवसायाची कल्पना कशी निवडावी, बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, आर्थिक नियोजन कसं करावं आणि ग्राहकांशी चांगले संबंध कसे टिकवावे याबाबत समजून घेता येईल. नवख्या उद्योजकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
मला नेहमी वाटायचं की मराठीत उद्योजकतेवर सहजसोप्या भाषेतील पुस्तकांची गरज आहे. म्हणूनच मी माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. यात माझ्या प्रवासातील, मित्रपरिवारातील काही अनुभव, चुकांमधून शिकलेले धडे उदाहरणादाखल दिले आहेत. हे सगळं तुम्हाला तुमच्या उद्योग प्रवासात उपयोगी पडू शकेल.
या पुस्तकात काय खास आहे?
- उद्योजकतेच्या प्रत्येक टप्प्यावर लागणारी माहिती आणि उदाहरणे.
- सोप्या मराठीत: सर्वांना समजेल अशा सोप्या आणि स्पष्ट भाषेत.
- प्रत्यक्ष कृतीसाठी: फक्त सिद्धांत नाही, तर खरंच कामाला येणाऱ्या टिप्स.
हे पुस्तक तुमच्यासाठी का? जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या सध्याच्या व्यवसायाला नवीन दिशा द्यायची असेल, तर “मी उद्योजक होणार” तुम्हाला मार्गदर्शन करेल. यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळेल.
आता मिळवा! हे पुस्तक Amazon वर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते खरेदी करू शकता.
मी उद्योजक होणार – Amazon लिंक
या विषयावरील हे पुस्तक सर्वोत्तम आहे असा माझा दावा मुळीच नाही पण सर्वसामान्य मराठी माणसाला उद्योग व्यवसायात उतरताना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणी, मार्गदर्शनाचा अभाव यासारख्या बाबींवर मार्ग कसा काढता येईल यावर भाष्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे मी केला आहे.
मला आशा आहे की हे पुस्तक तुमच्या पसंतीस नक्की उतरेल.
धन्यवाद,
शशांक एच.