काही दिवसांपूर्वी ओळखीतल्या एकाने अगदी रस्त्यात थाबवून मला विचारले “भावा, बायनरी ट्रेडिंग म्हणजे काय रे?”

एकाच वेळी ‘हसू आणि चिंता’ हे दोन्ही भाव त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर उमटले होते. अर्थात त्यावेळी घाईघाईत त्याला मिनिटभरात जे सांगता येईल ते सांगितले आणि नंतर फोन करून पुन्हा एकदा माहिती दिली तीही जोखीमीच्या उच्च शक्यता सांगून. त्याचवेळी त्याला हे सुद्धा सांगितलं की सेबी आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भारतात बायनरी ऑप्शन्स ट्रेडिंग (binary options trading) अवैध आहे आणि जी काही केली जाते ती परदेशी व्यासपीठावरून केली जाते ज्यामध्ये भयंकर जोखीम आहे.

असो, हाच विषय आजच्या लेखाचा विषय, ‘बायनरी ट्रेडिंग’ हा प्रकार आहे तरी काय?

बायनरी ट्रेडिंगमध्ये फक्त ‘हो किंवा नाही,‘ म्हणजे ‘वर किंवा खाली’ अशा दोन पैकी एकच पर्याय निवडायचा असतो. आणि तेही काही मिनिटांसाठी.. म्हणजे रिस्क आणि नशीब यातलं अंतर 50%. पण जोखीम आणि नफा या शक्यता केवळ 50% वाटत असल्या तरी हा प्रकार अत्यंत जोखमीचा आहे.

कसं चालतं बायनरी ट्रेडिंग, वैशष्ट्ये आणि धोके काय आहेत. हे सोप्या शब्दांत समजून घेऊया.

बायनरी ट्रेडिंगची ओळख, वैशिष्ट्ये आणि जोखीम.

बायनरी ट्रेडिंग ही एक प्रकारची आर्थिक सट्टेबाजी आहे. यात तुम्ही पुढील काही कालावधीसाठी एखाद्या एसेटच्या (जसे शेअर्स, चलन, सोने किंवा इंडेक्स इत्यादी) किंमती वाढेल की कमी होईल यावर ‘हो’ किंवा ‘नाही’ असा अंदाज लावता. ‘बायनरी’ म्हणजे फक्त दोनच परिणाम, यश (नफा) किंवा अपयश (तोटा). यात मधली स्थिती नसते; सगळं काळं किंवा पांढरं असतं.

सामान्य ट्रेडिंगमध्ये नफा किंमतीच्या किती वाढीवर अवलंबून असतो, पण इथे नफा 70-80% पर्यंत निश्चित असतो. उदाहरणार्थ, 1000 रुपयांची गुंतवणूक यशस्वी झाल्यास नफ्यासह 1700-1800 रुपये मिळू शकतात. पण अपयशी झाल्यास संपूर्ण रक्कम जाते. ही पद्धत छोट्या मुदतीची असते, ट्रेडची वेळ 1 मिनिटापासून काही तासांपर्यंत असते.

बायनरी ट्रेडिंग कशी चालते?

बायनरी ट्रेडिंगची प्रक्रिया :

  1. एसेट निवड: शेअर्स, चलन (जसे USD/INR), सोने किंवा क्रिप्टो निवड.
  2. अंदाज आणि गुंतवणूक: वेळ ठरवा (उदा. 15 मिनिटे) आणि ‘कॉल’ (वाढ) किंवा ‘पुट’ (घट) पर्याय घेतला जातो. त्यानुसार रक्कम गुंतवली जाते (उदा. 500 रुपये).
  3. परिणाम: वेळ संपल्यावर किंमतीनुसार नफा किंवा तोटा. उदाहरणार्थ, समजा ‘कॉल’ अर्थात किंमत वाढीचा पर्याय घेतला असेल आणि डॉलरची किंमत 83 रुपयांवरून 84 रुपयांवर गेली तर नफा; अन्यथा 100% तोटा. म्हणजे गुंतवलेली सर्व रक्कम गमवावी लागते. पण नफ्याचे प्रमाण 70% ते 80% असते, म्हणजे विषमता सुरवातीपासूनच आहे. आपल्या शेअर बाजारतल्या ‘रिस्क रिवॉर्ड रेशो’ची अगरबत्ती इथे लावता येत नाही.

ट्रेडचे प्रकार वेगवेगळे असतात: हाय/लो (साधा अंदाज), टच/नो टच (किंमत एखाद्या स्तराला पोहोचेल का?) आणि बॉउंडरीज (किंमत दोन स्तरांमध्ये राहील का?).

बायनरी ट्रेडिंगची वैशिष्ट्ये.

  • सोपेपणा: मोठे चार्ट किंवा गणिताची गरज नाही; फक्त अंदाज.
  • पटकन परिणाम: छोट्या ट्रेड्समुळे लगेच नफा मिळतो.
  • निश्चित धोका : गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त नुकसान होत नाही.
  • कमी रक्कम: 100-500 रुपयांपासून सुरू करता येते.

बायनरी ट्रेडिंगचे धोके आणि तोटे

वरवर बायनरी ट्रेडिंग आकर्षक वाटते, पण प्रत्यक्षात धोकादायक आहे:

  • अनिश्चितता: बाजाराच्या हालचालींमुळे 50-50 चान्स वाटतो, पण नफ्याचे आणि तोट्याचे गुणोत्तरच विषम आहे. म्हणजे तोटा 100% पण नफा 70-80% पर्यंत.
  • यात 70-80% ट्रेडर्स दीर्घकाळात तोटा सहन करतात.
  • भावनिक दबाव: पटकन ट्रेड्समुळे आवेगात चुका होतात, सलग नुकसान होते.
  • फसवणुकीचा धोका: बरेच प्लॅटफॉर्म अनियमित; पैसे हरवण्याची शक्यता जास्त.
  • कायदेशीर बाजू: भारतात RBI आणि SEBI याला सट्टेबाजी म्हणून पाहतात आणि ते पूर्ण मंजूर नाही. नफ्यावर कर आणि जास्त शुल्क असू शकतात.

म्हणून लक्षात घ्या, हा सखोल विश्लेषण विश्लेषणाअंती केला जाणारा गुंतवणूकीचा किंवा नेहमीच्या ट्रेडिंगचा प्रकार नसून निव्वळ सट्टेबाजी आहे. त्यामुळे यापासून दूरच राहणे उत्तम!

मित्रांनो या प्रकाराबद्दलचा हा ब्लॉग लिहिण्यामागे आमचा उद्देश कोणत्याही शिफारशीचा नसून केवळ माहिती पुरवण्याचा आहे. माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा तसेच आणखी इतर कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला जाणून घेणे आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.

binary trading in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *