जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना पारंपरिक आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक घसरण का झाली? “SaaSpocalypse” आणि “पाटील इफेक्ट” असे शब्द का ट्रेंड होऊ लागले? या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत राहुल पाटील. मूळचे बंगळूरूचे तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि सध्या Anthropic या आघाडीच्या AI कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO).

ही नेमकी काय भानगड आहे ते पाहूया,

AI स्पर्धेची नवी लाट आणि Anthropic.

Anthropic ही अमेरिकास्थित AI कंपनी “Claude” नावाचा प्रगत AI मॉडेल विकसित करते. कोडिंग, डेटा विश्लेषण, रिपोर्टिंग, ग्राहक संवाद, कंटेंट निर्मिती यांसारखी अनेक कामे Claude अधिक अचूक आणि वेगाने करू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.

राहुल पाटील यांनी CTO पद स्वीकारल्यानंतर कंपनीने वेळ न दवडता इंजिनिअरिंग गती, उत्पादन विस्तार आणि एंटरप्राइझ-लेव्हल AI सोल्यूशन्सवर विशेष भर दिला. यामुळे AI आता केवळ सहाय्यक न राहता, स्वयंचलितपणे काम करणारा ‘डिजिटल कर्मचारी’ ठरू शकतो, अशी धारणा निर्माण झाली.

पण मग आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण का?

AI मॉडेल्सच्या प्रगतीमुळे गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला,

जर AI स्वतः कोड लिहू शकत असेल, डेटा प्रोसेस करू शकत असेल आणि ग्राहक सेवा हाताळू शकत असेल, तर पारंपरिक आयटी सेवा कंपन्यांची गरज किती उरेल?

यामुळे:

  • भारतीय आणि जागतिक आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री वाढली.
  • SaaS (Software as a Service) मॉडेलवर दबाव येईल अशी भीती निर्माण झाली.
  • आउटसोर्सिंग आणि मॅन्युअल कोडिंग व्यवसाय कमी होईल असा अंदाज बांधला जाऊ लागलाय.
  • काही दिवसांत अब्जावधी डॉलरचे बाजारमूल्य घसरल्याची नोंद.

ही भीती प्रत्यक्षात कितपत खरी आहे, हा वेगळा विषय असला तरी बाजारातील ही प्रतिक्रिया मात्र तीव्र होती.


बरं मग “पाटील इफेक्ट” म्हणजे काय?

“पाटील इफेक्ट” हा अधिकृत आर्थिक शब्द नाही; पण माध्यमांमध्ये वापरला गेलेला संदर्भ आहे. याचा अर्थ असा,

राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली AI क्षमतांमध्ये झालेल्या झपाट्याच्या प्रगतीमुळे पारंपरिक आयटी कंपन्यांच्या भविष्यासंदर्भात निर्माण झालेली बाजारातील भीती आणि त्यातून झालेली शेअर घसरण.

काही विश्लेषकांनी याला “SaaSpocalypse” असेही संबोधले, म्हणजे SaaS कंपन्यांसाठी आव्हानात्मक काळ.

बंगळूरूचा ठसा का चर्चेत?

राहुल पाटील मूळचे बंगळूरूचे असल्यामुळे ही चर्चा भारतात अधिक रंगली. भारत हा आयटी सेवा उद्योगाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. अशा परिस्थितीत, AI-आधारित ऑटोमेशनमुळे भारतीय आयटी कंपन्यांवर दबाव येऊ शकतो, ही शक्यता बाजाराने गंभीरतेने घेतली.

त्यामुळे “बंगळूरूचा राहुल पाटील” ही ओळख माध्यमांमध्ये विशेष ठळकपणे समोर आली.

हो पण आता पुढे काय?

AI मुळे आयटी क्षेत्र पूर्णपणे कोलमडेल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. पण बदल अटळ आहे.

  • आयटी कंपन्यांना AI-सहकार्यात्मक मॉडेल स्वीकारावे लागेल
  • अपस्किलिंग आणि रीसकिलिंग अनिवार्य होईल
  • मानवी + AI सहकार्याचा नवा उद्योगमानक तयार होईल

जो तगणार, तोच जगणार !

आयटीसाठी आपलंच अपत्य असणारं AI हे संकट नसून एक संक्रमणाचा टप्पा आहे, ज्या कंपन्या हे स्वीकारून त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवतील त्याच पुढे राहतील… टिकतील.

who is rahul patil of Anthropic in marathi

rahul patil anthropic

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *