पॅन आधारसोबत लिंक कसे कराल.
How to link Aadhaar with PAN

How to link Aadhaar to PAN
Image : Internet

How to link Aadhaar with PAN? पॅन आधारसोबत लिंक कसे कराल ? खरं अत्यंत महत्वाची व  सोपी बाब पण दुर्लक्षली गेलेली सुद्धा. पण हे करणं आवश्यक आहे आणि अनिवार्य सुद्धा. त्यासाठी सरकारकडून अनेकवेळा मुदतवाढ दिली गेली आहे. कारण एका मर्यादेनंतर कोणत्याही सरकारी योजनांच्या संदर्भात “मी अजून पॅन आणि आधार लिंक केलेलं नाही” अशी कारणे चालणार नाहीत. त्यामुळे आता पॅन आणि आधार जोडण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 होती यानंतर ती 30 सप्टेंबरपर्यंत  वाढवली गेली आहे. पण या नंतर त्यास मुदतवाढ न मिळाल्यास  आपलं पॅनकार्ड रद्दही होऊ शकते.

 

म्हणून पॅन आणि आधार एकमेकांना कसे लिंक करायचे (How to link Aadhaar to PAN) ते आज सोप्या टप्प्यांमध्ये पाहूया.

 
  1. प्रथम प्राप्तीकर म्हणजेच इन्कम टॅक्स खात्याच्या संकेतस्थळास https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्यावी आणि थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर दिसणाऱ्या “लिंक आधार” ( Link Aadhar ) पर्यायवर क्लिक करावे. किंवा थेट त्या पर्यायवर या https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar लिंकद्वारे तुम्ही जाऊ शकता.
  2. त्यानंतर समोर आलेल्या फॉर्ममध्ये तुमचं पॅन,आधार क्रमांक, नाव आणि मोबाइल क्रमांक भरावा.
  3. जर तुमच्या आधार कार्डवर जन्मदिनांकाऐवजी जन्मवर्ष नमूद असेल तर तशी विचारणा करणाऱ्या (I have only year of birth in Aadhaar card) छोट्या चौकोनात टिक करावी आणि तशीच टिक आधार तपशील व्हॅलीडेट करू देण्यासंदर्भात ( I agree to validate my Aadhaar details) असणाऱ्या चौकोनातही करावी.
  4. त्यानंतर लिंक आधार (Link Aadhaar ) या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर एक ओटीपी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल ज्याच्या साह्याने व्हॅलीडेट करावे.
  5. यानंतर आपलं पॅन आणि आधार सोबत जोडले गेले असल्याचा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल.
 
तर अशाप्रकारे तुम्ही तुमचं पॅन आणि आधारसोबत जोडू शकता, तर यापुढील 30 सप्टेंबरची मुदत पुन्हा वाढवली जाईल या  समजुतीत राहणे कदाचित महाग पडू शकेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *