अखेर येणार-येणार म्हणून ज्याची गुंतवणूकदार वाट पाहत होते तो एलआयसी आयपीओ एकदाचा येतोय. अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले असू शकतात. म्हणूनच आज जाणून घेऊया या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आयपीओबाबत महत्वाची माहिती. (LIC IPO Info in Marathi )
👉 भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) म्हणजेच एलआयसीचा हा IPO 4 मे 2022 रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.
👉 अँकर गुंतवणूकदारांसाठी मात्र तो दोन दिवस आधी म्हणजे 2 मे 2022 पासून सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. (LIC IPO for Anchor Investors )
👉 IPO मध्ये बोली लावण्याची म्हणजे सबस्क्राईब करण्याची शेवटची तारीख आहे 9 मे 2022. (LIC IPO Last day Subscription )
👉 LIC च्या IPO चा प्राइस बँड रु. 902 ते 949 रु. दरम्यान असेल. विमा कंपनी या IPO च्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.(LIC IPO Price band )
👉 या IPO मधील आपली 3.5 टक्के हिस्सेदारी विकून सरकार 20,557 कोटी रुपये उभे करणार आहे. (LIC IPO Govt stack )
👉 आयपीओसाठी एलआयसीचे मूल्य ६ लाख कोटी रुपये इतके आहे. याआधी सरकारची ५ टक्के हिस्सेदारी विकून ३० हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना होती. आता मात्र सरकारकडून केवळ 3.5 टक्के हिस्सा विकला जात आहे.
👉 LIC च्या IPO चा एकूण इश्यू आकार 22.13 कोटी शेअर्सचा असेल. यापैकी 10 टक्के म्हणजेच 2.21 कोटी शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. त्याच वेळी, पंधरा लाख शेअर्स एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी असतील.
👉 कर्मचारी आणि पॉलिसी धारकांना असणाऱ्या आरक्षणानंतर उर्वरित समभागांपैकी, 50% QIB साठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% NII साठी असतील.
👉 LIC पॉलिसीधारकांना या IPO मध्ये 60 रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना 40 रुपयांची सूट मिळणार आहे.
👉 गुंतवणूकदार या IPO मध्ये 15 शेअर्ससाठी ( एक लॉट) बोली लावू शकतील.
👉 902 ते 949 रुपयांच्या प्राइस बँडसह LIC च्या या एका लॉटमध्ये 15 शेअर्स असतील. म्हणजेच एका लॉटसाठी तुम्हाला किमान 13530 रुपये गुंतवावे लागतील.
👉 या IPO मध्ये 22.1 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
कसा कराल अर्ज ? ( How to Apply for LIC IPO )
आयपीओला अर्ज करण्यासाठी तुमचं डीमॅट खातं (Demat Account) असणं आवश्यक आहे. जे CDSL किंवा NSDL या DP कडे उघडलं जातं. जर आपण अजूनही डीमॅट खातं उघडलेलं नसेल तर ते अपस्टॉक्स, झिरोधा, एन्जेल ब्रोकिंगसारख्या ब्रोकर्सकडे आपण ऑनलाईन पद्धतीने डीमॅट व ट्रेडिंग खातं उघडू शकता. आणि त्या ब्रोकरमार्फतही आयपीओ साठी अर्ज करू शकता.
अपस्टॉक्स (Upstox) वर ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांत डीमॅट व ट्रेडिंग खातं उघडण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नेटबँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्यामार्फत अर्ज करू शकता. नेटबँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्यावर लॉग-इन केल्यावर साधारणतः इन्व्हेस्टमेंट या विभागात आयपीओसाठी अर्ज करण्याची सोय असते. तिथे असलेल्या आयपीओमधून एलआयसी आयपीओची निवड करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. या वेळी आपला डीमॅट खाते क्रमांक सोबत असावा.
याच बरोबर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या खात्यावरुनही आयपीओसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाईन पद्धतीत ASBA सुविधेचा वापर करून अर्ज करता येतो. ASBA (Account supported by Blocked Amount) म्हणजेच आयपीओसाठीची रक्कम तुमच्याच खात्यात गोठवली जाऊन जर तुम्हाला आयपीओ इश्यू प्राप्त झाल्यास ती पुढे वळती केली जाणार अन्यथा ती रक्कम पुन्हा तुमच्यासाठी मुक्त केली जाणार.
ASBA शिवाय तुम्ही युपीआयमार्फत सुद्धा आयपीओ साठीचे पेमेंट करू शकता.
एलआयसी पॉलीसीधारकांसाठी महत्वाचं ( Important for LIC Policy Holder)
एलआयसी पॉलिसीधारक ज्यांच्याकडे एक किंवा अधिक एलआयसी पॉलिसीज आहेत ते या आरक्षण सुविधेअंतर्गत IPO साठी करू शकतील. पण तत्पूर्वी पॉलिसीधारकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) एलआयसीच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये विहित कालावधीमध्ये अद्ययावत केलेला आहे. पात्र पॉलिसीधारक ‘कट ऑफ’ किंमतीवर “Policyholder Reservation Portion” साठी अर्ज करू शकतील. सर्वसाधारण गुंतवणूकदार आणि पात्र पॉलिसीधारक यांच्यासाठी बोलीची कमाल रक्कम मर्यादा रु 2,00,000 पेक्षा जास्त नसेल.
इश्यू किंमतीमध्ये एलआयसी पॉलीसीधारकांसाठी ₹60 तर कर्मचाऱ्यांसाठी ₹40 सूट असणार आहे.
आयपीओ एलॉटमेंट स्टेटस कुठे तपासाल ? ( How To Check LIC IPO Allotment Status )
इश्यू बंद झाल्यानंतर साधारणता पाच ते सहा दिवसांत एलॉटमेंट होते. आपण ती खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज केलेला इश्यू निवडून आणि आपला पॅन क्रमांक टाकून तपासू शकता.
https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx
तर मित्रानो, हि माहिती होती एलआयसी आयपीओबद्दल (LIC IPO Info in Marathi ). तुम्हाला यातून नव्याने काही समजलं असेल, आवडलं असेल तसेच आणखी काही समजून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सदर लेख इतरांनाही हि शेअर करा.
धन्यवाद !