कोरोना उपचारांसाठी पीएफ मधून काढता येणार पैसे.
EPFO allows another withdrawal from employee provident fund due to COVID-19 second wave.
कोरोनामुळे वारंवार लागणारा लॉकडाऊन आणि त्यामुळे उद्भवलेली आर्थिक तंगी यामुळे आधीच सर्वसामान्य पिचलेले आहेत आणि त्यात जर एखाद्यास कोरोनाची लागण झाल्यास उद्भवणारा खर्चाचा बोजा त्या बिकट परिस्थितीत आणखी भर घालतो. पण यामध्ये आता थोडाफार दिलासा मिळू शकतो.
कारण मागील वर्षीप्रमाणे केंद्र सरकारने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी महत्वाचा निर्णय घेतला असून तो म्हणजे सर्वसामान्यांना कोविड उपचारांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधून (EPFO ) काही मर्यादे पर्यंत रक्कम काढू देण्याची सुविधा.
(How to withdraw fund from epf for covid-19 treatment in marathi)
यामध्ये सदस्य तीन महिन्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा EPF खात्यातील 75 % पर्यंतची रक्कम (दोन्ही पर्यायामधील जी कमी असेल ) उपचारांच्या कारणांसाठी काढू शकतो.याकरिता सदस्य EPFO च्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर जावून आपल्या UAN आणि पासवर्ड सह लॉग-इन करून ऑनलाईन क्लेम करू शकतो
वेबसाईट: unifiedportal-mem.epfindia.gov.in
याआधी गेल्यावर्षी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) अंतर्गतअशा प्रकारेच EPFO मधून पैसे काढण्यासाठीची अट शिथिल करत EPFO सदस्याला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
EPFO कडून असते सात लाखांच्या विम्याचे कवच. ( Life Insurance from EPFO )
बऱ्याच जणांना माहित नसेल पण जर तुमचा दर महिन्यास भविष्य निर्वाह निधीसाठी हफ्ता वळता होत असेल तर तुम्ही EPFO कडून असणाऱ्या सात लाखांच्या जीवन विम्यासाठी (Life Insurance) पात्र असता कारण EPFO चे सर्व सदस्यांना एम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम, 1976 (EDLI) अंतर्गत हा विमा लागू असतो. हे विमा कवच आधी सहा लाखांचं होता पण सप्टेंबर 2020 मध्ये ते 7 लाख इतकं करण्यात आलं आहे.