नुकतंच भारताकडून गव्हाची निर्यात तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.(india bans wheat exports) त्यावर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पण आता याचाच संदर्भ घेऊन आज आपण जगात गहू उत्पादन आणि निर्यातीत आघाडीचे देश कोणते हे पाहणार आहोत.(top wheat producing and exporting countries)
पण या आधी हे लक्षात घ्यायला हवं कि गहूच काय पण कोणत्याही उत्पादन निर्मितीत आघाडीवर असणे आणि त्या उत्पादनाच्या निर्यातीत आघाडीवर असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. म्हणजे पहा ना . आपला देश गव्हाच्या उत्पादनात पहिल्या तीन देशांत गणला जातो पण पण निर्यातीत मात्र तो पहिल्या वीस देशांमध्ये सुद्धा नाहीये. तिथे पाकिस्तानचा क्रमांक मात्र बराच वर आहे.
याचं कारण कोणत्याही देशाला सर्वप्रथम आपली देशांतर्गत गरज भागवून मगच निर्यातीचा विचार करायचा असतो, गव्हाच्या बाबतीत आपलं अगदी असंच आहे.
तर पाहूया जगात गहू उत्पादनात आघाडीवर असलेले देश.(Top wheat producing countries in marathi)
देश | प्रमाण 2021 -22 (टन मध्ये ) |
चीन | 136,946 |
भारत | 109,520 |
रशिया | 75,500 |
अमेरिका | 44,790 |
ऑस्ट्रलिया | 34,000 |
युक्रेन | 33,000 |
पाकिस्तान | 27,000 |
कॅनडा | 21,652 |
अर्जेन्टिना | 20,500 |
तुर्कस्तान | 16,250 |
बरं हे होते जगातील आघाडीचे गहू उत्पादक देश,
आता पाहूया गव्हाच्या निर्यातीत जगात कोणते देश आघाडीवर आहेत.(top wheat exporting countries in marathi)
देश | प्रमाण वर्ष 2020 (टन मध्ये ) |
रशिया | 37,267,014 |
अमेरिका | 26,131,626 |
कॅनडा | 26,110,509 |
फ्रान्स | 19,792,597 |
युक्रेन | 18,055,673 |
ऑस्ट्रेलिया | 10,400,418 |
अर्जेन्टिना | 10,196,931 |
जर्मनी | 9,259,493 |
कझाकस्तान | 5,198,943 |
पोलंड | 4,689,130 |
आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.