शेअर मार्केटमध्ये कंपन्यांच्या तिमाही निकालांना फार महत्व आहे. अनेक कंपन्यांच्या वाटचालीची दिशा या तिमाही निकालांतून स्पष्ट होत असते. कंपनीचा महसूल, निव्वळ नफा याबरोबरच एबीट्डा (EBITDA) हा प्रकार बरेचवेळा कानावर येत असतो. आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत. नक्की काय आहे हा प्रकार आणि कशासाठी त्याचा वापर होतो. (What is EBITDA in marathi )
एबीट्डा म्हणजे काय ? (What is EBITDA in marathi )
EBITDA म्हणजे एखाद्या कंपनीची व्याज, कर, कर्जमाफी आणि घसारापूर्वीची कमाई असते जी कंपनीचा या सर्व कपातीपूर्वी असणारा नफा सांगते. वेगळ्या प्रकारे सांगायचे झाले तर, हे एखाद्या कंपनीचे उत्पन्न असतं ज्यामध्ये व्याज, कर, कर्जमाफी आणि घसारा यासारख्या विशिष्ट खर्चांचा समावेश असतो.
अनेक गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी मोठ्या कंपन्यांची आपापसांत तुलना करताना कव्हरेज रेशो म्हणून EBITDA विचारात घेतात.
EBI, EBIT आणि EBITDA
EBITDA दोन पर्यायात पाहिलं जातं, ज्याचा वापर गुंतवणूकदार आणि विश्लेषक कंपनीच्या नफा मोजण्यासाठी करतात. हे पर्याय आहेत
EBITA = व्याज, कर आणि कर्जमुक्तीपूर्व कमाई
EBIT = व्याज आणि करपूर्व कमाई.
EBITDA नॉन GAAP फाइनेंशियल फिगर म्हणूनही संबोधलं जातं. म्हणजेच EBITDA सामान्य स्वीकृत लेखा तत्त्वांचे (GAAP) पालन करत नाही. आर्थिक अहवालाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी GAAP निकष महत्त्वाचे असतात जे EBITDA मध्ये विचारात घेतले जात नाहीत .
EBITDA समीकरण फोड करून पाहूया
E – अर्निंग (कमाई)
B – बिफोर (च्याआधीचं)
I – इंटरेस्ट (व्याज)
T – टॅक्स (कर)
D – डेप्रिसिएशन (घसारा)
A – अमोर्टायझेशन ( कर्जमुक्ती प्रमाण)
म्हणजेच कर, व्याज घसारा आणि कर्जमुक्ती प्रमाण वजा करण्याआधीची कमाई.
1. कमाई ( Earning )
म्हणजे निव्वळ नफा किंवा निव्वळ उत्पन्न असं समजलं जातं.
2. व्याज (Interest )
जेव्हा एखादी कंपनी बँकेकडून किंवा इतर कोणाकडून कर्ज घेते तेव्हा त्या कर्जावर व्याज भरावे लागते. अर्थात व्याजाचं हे प्रमाण त्या कंपनीच्या कर्जाची रचना कशी आहे यावर अवलंबून असतं. कर्ज संरचना व प्रमाण लक्षात घेऊन कंपनीच्या कर्ज आणि व्याजाच्या प्रमाणाबद्दल अंदाज बांधता येतो.एकंदरीत यावरून यावरून गुंतवणूकदार आपली गुंतवणूक जोखमीची आहे की नाही याबद्दल निष्कर्ष काढू शकतो.
3. कर (TAX )
कंपनी सरकारला कराच्या रूपात पैसे देते. निव्वळ नफा मोजताना सर्व प्रकारचे म्हणजे राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक कर वजा करून मोजला जातो.
करदायित्व आणि त्यावरील खर्चात दरवर्षी आणि व्यवसायानुसार बदल होण्याची शक्यता असते. हे सहसा कंपनीचं उद्योगक्षेत्र, स्थान आणि कंपनीच्या आकारमनावर अवलंबून असतं. याचा उल्लेख सामान्यतः उत्पन्न विवरणाच्या परिचालन उत्पन्न खर्च (Operating Income) विभागात केलेला असतो.
4. घसारा (Depreciation )
दोन वर्षापूर्वी तुम्ही घेतलेल्या मोबाईलची किंमत आजही तितकीच असू शकेल का ? उत्तर आहे , नाही.
कारण वापर, झीज आणि अप्रचलितपणामुळे मालमत्तेचे मूल्य कालांतराने कमी होत असतं. अवमुल्यानामुळे होणाऱ्या या घटीस घसारा असे म्हणतात. या घसाऱ्याचं प्रमाण व्यवसाय व उद्योग क्षेत्रानुसार वेगळं असू शकतं. म्हणजे एखाद्या प्लांट मधील यंत्रे , मशीन्स कालानुरूप जुने होतात आणि त्याचं त्यानुसार अवमूल्यन होतं अशा स्थितीत ते बदलले जातात पण हेच एखाद्या बौद्धिक मालमत्ता क्षेत्रातील कंपनीला फक्त आपले पेटंट, परवाने, हक्क हे अद्ययावत ठेवावे लागतात.
5. कर्जमुक्ती प्रमाण (Amortization )
कर्जमुक्ती म्हणजे हे एक लेखा (अकाऊंट्स ) तंत्र आहे ज्याद्वारे वेळोवेळी नियमितपणे कर्जाची केली जात असलेली परतफेड आणि त्याचा संदर्भ घेऊन कंपनीचा व्यावसायिक वेग व मालमत्ता मूल्याशी चाचपणी केली जाते.
EBITDA कसं काढलं जातं ?
कंपनीच्या निव्वळ उत्पन्नातून (नफ्यातून नव्हे ) व्याज, कर, कर्जमुक्तीप्रमाण आणि घसारा यांच्या व्यतिरिक्त इतर खर्च वजा करून EBITDA ची गणना केली जाते.
सर्वसाधारणपणे, कंपनीचा EBITDA शोधण्यासाठी दोन सूत्रे वापरली जाऊ शकतात:
EBITDA = निव्वळ नफा + व्याज + कर + घसारा + कर्जमुक्ती प्रमाण
EBITDA = परिचालन (Operating) उत्पन्न + घसारा + कर्जमाफी
कंपन्या आपल्या व्यवसायातील विशिष्ट पैलू अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी ही सूत्रे लागू करतात.
उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला एखाद्या कंपनीच्या आर्थिक स्थितीवर कर्जामुळे कसा परिणाम होऊ शकतो हे तपासायचे असल्यास, तो EBITDA मधून फक्त घसारा आणि कर वगळेल. ज्याद्वारे गुंतवणूकदार कर्जामुळे कंपनीची आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होऊ शकतो हे सहजपणे शोधू शकेल.
एबीट्डा कॅलक्यूलेटर ( EBITDA Calculater )
EBITDA मार्जिन म्हणजे काय? (What is EBITDA Margin in marathi)
EBITDA मार्जिन हे कंपनीचे एकूण उत्पन्न आणि एकूण महसूल यांच्यातील संबंध स्पष्ट करते. आणि उच्च EBITDA मार्जिन हे एखादी कंपनी एका वर्षात किती रोख नफा कमवू शकते हे सूचित करते, जे समान उद्योगक्षेत्रांमध्ये कार्यरत कंपन्यांच्या कामगिरीची तुलना करताना ते उपयुक्त ठरतं.
पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कंपनीच्या आर्थिक विवरणात EBITDA नोंदणीकृत नाही; त्यामुळे गुंतवणूकदारांनी हे गणित स्वतःच मांडायचं असतं.
खालील सूत्र वापरून EBITDA मार्जिन काढलं जातं. (what is ebitda margin formula)
EBITDA मार्जिन = EBITDA / एकूण महसूल
उदाहरणार्थ, ‘अ’ कंपनीचा EBITDA रु.6,00,000 आहे आणि कंपनीचा एकूण महसूल आहे रु.60,00,000
दुसरीकडे, ‘ब’ कंपनीचा EBITDA 7,50,000 रुपये आणि 90,00,000 रुपये एकूण महसूल नोंदवला आहे.
तर सूत्रानुसार,
‘अ’ कंपनीसाठी EBITDA मार्जिन = EBITDA / एकूण महसूल
= 600000/6000000
= 10%
‘ब’ कंपनीसाठी,
EBITDA मार्जिन = 750000/9000000
= 8%
त्यामुळे, जास्त EBITDA असूनही, ‘ब’ कंपनीचे EBITDA मार्जिन ‘अ’ कंपनीच्या तुलनेत कमी आहे. याचा अर्थ ‘अ’ कंपनी आर्थिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम आहे आणि त्यामुळे संभाव्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी ‘अ’ कंपनी निवड करणे योग्य राहील.
EBITDA चे फायदे
EBITDA चे खालील फायदे आहेत:
- हे व्यवसायाच्या वाढीचे आणि त्याच्या ऑपरेशनल मॉडेलच्या परिणामकारकतेचे विश्लेषण करण्यास मदत करतं.
- हे कंपनीच्या कॅशफ्लोचे वास्तविक मूल्य समोर आणतं..
- EBITDA केवळ कंपनीच्या दैनंदिन कामकाज चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा हिशेब ठेवतं.
- हे एखाद्या कंपनीच्या आर्थिक कार्यक्षमतेची तिच्या समक्षेत्रातील कंपन्यांशी तुलना करण्यास मदत करतं.
EBITDA तोटे
EBITDA मध्ये काही तोटे आहेत जे खालीलप्रमाणे आहेत –
- कर्जाचा खर्च EBITDA मधून वगळण्यात आला आहे, त्यामुळे वरपांगी दिसणारी आकडेवारी दिशाभूल करणारी असू शकते.त्यामुळे कंपनीच्या तरल मालमत्तेची वास्तविक कमाई किंवा माहिती मूल्य स्पष्टपणे समोर येत नाही.
- बरच उद्योग प्रमुखांकडून आपले चुकीचे आर्थिक निर्णय आणि वित्त-केंद्रित कमतरता लपवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
- उच्च व्याजदराच्या आर्थिक कर्जावर याचा परिणाम होत नाही.
- कंपनीच्या आर्थिकस्थितीबाबत चित्र स्पष्ट होण्यासाठी पोहोचण्यासाठी त्या कंपन्यांनी EBITDA सोबत इतर आर्थिक मेट्रिक्स वापर करणे योग्य राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.