राकेश झूनझूनवाला यांचा 3F फॉर्म्युला

Rakesh Jhunjhunwal’s Investment formula

Rakesh Jhunjhunwal's Investment formula
Rakesh Jhunjhunwal’s Investment formula

Images source : Wikipedia

भारतीय शेअरमार्केटचे बादशहा, बिगबुल, भारताचे वॅारेन बफेअशी एक ना अनेक बिरुदे चिकटलेली आहेत, हि व्यक्ती भारतात शेअर मार्केटशी अगदी पुसटसा संबंध आलेल्या व्यक्तीलाही माहित असेल.अशी व्यक्ती जिच्या शेअरमार्केटमधील प्रत्येक व्यवहाराचा, वक्तव्याचा मतितार्थ अनेक विश्लेषकांकडून काढला जात असतो. होय आम्ही बोलतोय राकेश झूनझूनवाला (rakesh jhunjhunwala) यांच्याबद्दल, जे तसे नेहमीच बातम्यांमध्ये असतात (rakesh jhunjhunwala news), अर्थात आता त्यांची औपचारिक ओळख करू देण्याची गरज नाहीच त्यामुळे राकेश झूनझूनवाला यांचा 3F फॉर्म्युला (Rakesh Jhunjhunwal’s Investment formula ) नक्की काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात.
 
 
  • झूनझूनवाला यांनी 80 च्या दशकात शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरवात केली.    
  • आज झूनझूनवाला यांची लुपिन, टाटा मोटर्स, रॅलीज इंडिया (Rallis India), नजारा टेक्नोलॉजीज (Nazara Technologies) और फेडरल बँक सारख्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक. 
  • मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत झूनझूनवाला यांची एकूण संपत्ती 18000 कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते.
 
 
राकेश झूनझूनवाला यांच्या प्रत्येक आर्थिक कृतीमागे असलेला अर्थ काढण्याचा विश्लेषकांचा प्रयत्न असतो. म्हणजे एखाद्या कंपनीत वाढवलेली हिस्सेदारी असो किंवा मग ती कमी केलेली असो त्यामागचं कारण जाणून घेण्याची सर्वांची इच्छा असते.
 
1985 मध्ये केवळ पाच हजार घेऊन मुंबई गाठणाऱ्या झूनझूनवाला यांची या मार्च अखेरीस संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकूण संपत्ती ( Networth )  रु.18,432 कोटी इतकी असल्याचे समजते. सध्या त्यांची क्रिसिल (Crisil), ल्यूपिन (Lupin), टाइटन (Titan),टाटा मोटर्स (Tata Motors),, रॅलीज इंडिया (Rallis India), नजारा टेक्नोलॉजीज (Nazara Technologies) और फेडरल बँक सारख्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
 

गुंतवणूकदारांना काय सांगतात झूनझूनवाला ? ( Rakesh Jhunjhunwal’s Investment formula )

 

शेअर मार्केटमध्ये नव्याने येऊ पाहणारे आणि आधीच सक्रीय असणाऱ्या अशा दोन्ही घटकांना झूनझूनवाला खालील सल्ले देतात.
 

 

संयम असणे सर्वात महत्वाचे :

 

 
शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संयम हा गुण अंगी असणे फार महत्वाचे आहे. कारण बऱ्याचदा आपल्या मनाप्रमाणे बदल इथे होत नाहीत किंवा त्यासाठी फार काळ जावा लागतो. आणि त्याच दरम्यान आपण चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. हे सगळं टाळण्यासाठी संयम फार महत्वाचा आहे. आपल्यालाही असा अनेकदा अनुभव आला होता जेव्हा आपल्या पोर्टफॉलिओमधील अधिकांश शेअर्स नकारामक राहिले होते, असेही झूनझूनवाला सांगतात.
 

 

स्वतःवर आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास असुद्या.

 

 
याबाबत सांगताना झूनझूनवाला सांगतात कि बरेचदा आपल्या अपेक्षेप्रमाणे एखाद्या शेअर्सची कामगिरी होताना दिसत नाही. किंबहुना ती नकारात्मक होताना दिसते. अशावेळी आपण घाबरून चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते तर असं न करता सारासार विचार करून आपल्या अभ्यासाचे पुनरावलोकन करून त्याद्वारे काढलेले निकष योग्य आहेत असं दिसत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत सांगताना ते सेसा गोवाचे उदाहरण देतात, ऐंशीच्या दशकात पोलाद उद्योग क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सेसा गोवाचा शेअर घसरून रु.20-25 पर्यंत खाली आला होता आणि तरीही त्या काळात झूनझूनवाला यांनी त्या शेअर्समध्ये त्यावेळी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती जी त्यावेळी अनेकांना चुकीची वाटली पण त्यानंतर जवळपास 1989 च्या सुमारास झूनझूनवाला यांना त्या गुंतवणुकीने 4 -5 पतीने परतावा दिला होता.
 
 
ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातील फरक समजून घ्या.
 
 
जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही हे निश्चित केलं असलं पाहिजे कि तुम्ही तो जास्त कालावधीसाठी ठेवणार आहात कि लवकरात लवकर विकून नफा निश्चित करणार. तुम्ही एकदा शेअर घेऊन जरी तो 2-3 आठवडे ठेवून नंतर विकला तरी ती ट्रेडिंगच आहे. कारण त्यात तत्कालीन घटना, त्यांचे पडसाद आदीं कारणांनी एक प्रकारची प्रतिक्रिया शेअर्सच्या हालचालींमध्ये आलेली असते जी थोड्या कालावधीसाठी असू शकते.पण गुंतवणुकीमध्ये मात्र कंपनीचे फंडामेंटल्स, कामगिरी, नावलौकिक महत्वाचे असतात ज्याचा उपयोग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी होतो. त्यामुळे तुम्ही कोण आहात ‘गुंतवणूकदार कि ट्रेडर’ हे निश्चित करा.
 
 

काय आहे 3F चा फॉर्म्युला ? ( What is Rakesh Jhunjhunwal’s 3F formula )

 
 
एका मुलाखतीत झूनझूनवाला गुंतवणूकदारांसाठी 3F फॉर्म्युला सांगितला आहे, ज्याचा वापर केल्यास नफ्याची शक्यता आणि वारंवारता बळावते.स्वतः झूनझूनवाला हा फॉर्म्युला नेहमी विचारात घेतात.
 

 

3 F म्हणजे ‘फेअर व्हॅल्यू, फंडामेंटल आणि फ्यूचर प्रॉस्पेक्ट’.

 

 
गुंतवणुकीसाठी कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करताना कंपनीचा शेअर महाग नसून योग्य दारात (फेअर व्हॅल्यू) उपलब्ध आहे का ? त्यानंतर फंडामेंअल्स म्हणजे कंपनीची आत्तापर्यंतची कामगिरी, सध्या हातात असलेली कंत्राटे, ऑर्डर्स, कंपनीचे नामांकित ग्राहक, संचालक मंडळ आदी बाबी विचारात घ्याव्यात. तसेच कंपनीच्या भविष्यातील योजना ( फ्यूचर प्रॉस्पेक्ट) काय आहेत आणि त्या कितपत व्यवहार्य वाटत आहेत, याचा अंदाज घ्यावा.
 
 
कोरोना आणि उद्योग क्षेत्रांना बसलेला फटका याबद्दल बोलताना झूनझूनवाला सांगतात, कोरोनामुळे हॉटेल उद्योग आणि एविएशन ( विमान वाहतूक ) या दोन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे येणाऱ्या काळात याच दोन क्षेत्रात तेजी दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *