GTT order information in-marathiGTT order information in marathi

असं मानून चालू कि जग दोन गटात विभागलंय. एक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे आणि दुसरे शेअर मार्केटबद्दल काही माहित नसणारे. ( GTT order information in marathi )

बरं जे गुंतवणूक करतात त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. फुल टाईम ट्रेडर, पार्ट टाईम ट्रेडर ,पोझिशनअल, लॉंग टर्म गुंतवणूकदार वगैरे. यासर्वांमध्ये जे खऱ्या अर्थाने फक्त गुंतवणूकदार (ट्रेडर नव्हे )असतात, म्हणजे ब्रोकिंग एपवर ऑर्डर टाकण्याशी त्यांचा संबंध बहुतांशी फक्त शेअर्स घेण्यासाठी येतो. आणि अर्थातच कधी अपेक्षित परतावा – नफा निश्चित करताना सुद्धा. हा कालावधी तसा दीर्घ असतो. म्हणजे डे-ट्रेडिंग किंवा स्विंग वगैरे सारखा नाही.

अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या नेहमीच्या नोकरी-व्यवसायातून मार्केट घडामोडींवर रोज लक्ष ठेवणं किंवा रोज आपली शेअर खरेदी विक्रीची ऑर्डर नव्याने टाकणे कठीण असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे अलीकडेपर्यंत मार्केटमध्ये तुमची खरेदी-विक्रीची ऑर्डर फक्त एका दिवसापुरतीच वैध असायची. ‘असायची’ असं सांगतोय कारण आता स्थिती तशी नाही.कारण आता जीटीटी ऑर्डर ने नवी सोय उपलब्ध करून दिली आहे.

जीटीटी ऑर्डर म्हणजे काय ? ( GTT order information in marathi )

जीटीटी म्हणजे ‘गुड टील ट्रिगर्ड’ (GTT : Good Till Triggered) सध्या सोप्या मराठीत सांगायचं तर अशी ऑर्डर जी शेअरची तुम्हाला अपेक्षित किंमत येईपर्यंत वैध राहते. म्हणजे तुम्हाला रोज सकाळी नव्याने ऑर्डर टाकायची गरज नाही.

असं काय वेगळं या फिचरमध्ये? ( What is GTT order in marathi )

चला एक उदाहरण घेऊन पाहूया,

मला इन्फोसिसचे शेअर्स घ्यायचे आहेत, या कंपनीच्या एका शेअरची आता किंमत आहे 1450 रुपये. पण माझ्या विश्लेषणानुसार मला हा शेअर रु. 1400 च्या खाली आल्यानंतर घ्यायचा आहे. पण आता हि किंमत कधी येऊ शकते हे काही नक्की नाही, कदाचित उद्या, पुढील आठवड्यात किंवा अगदी महिन्याभरानंतर.

अशा स्थितीत मला या शेअरच्या गुंतवणुकीसाठी तरी रोज मार्केटवर लक्ष ठेवावं लागलं असतं. किंवा रोज नव्याने खरेदीची (Buy) ऑर्डर टाकावी लागली असती. त्यातही एकदा का अशा किंमतीला हा शेअर आला आणि मी तो खरेदी केल्यानंतर त्यातून मला अपेक्षित नफा आणि अवाजवी नुकसान निश्चित करून ठेवायचं असेल तर त्यासाठी पुन्हा नव्याने रोज ऑर्डर टाकावी लागेल.

पण जीटीटी ऑर्डरमुळे मात्र हे फार सोप्पं झालंय.

जीटीटी ऑर्डरद्वारे मी माझी खरेदी (BUY) तसेच लक्ष्य (Target ) आणि अवाजवी नुकसान टाळण्यासाठी स्टॉपलॉस (StopLoss) हे तिन्ही एकाच ऑर्डर मध्ये निश्चित करू शकतो. या फिचरचं सर्वात महत्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य म्हणजे डिलिव्हरीसाठीची हि जीटीटी ऑर्डर 365 दिवस म्हणजे वर्षभरासाठी वैध असते.

म्हणजे वर्षभरात जेव्हा कधी शेअरची किंमत तुमच्या अपेक्षित किंमतीस उपलब्ध होईल तेव्हा तुमच्या खरेदीच्या ऑर्डरची अंमलबजावणी होणार. त्या ऑर्डरसोबत जर तुम्ही लक्ष्य ( Target ) आणि स्टॉपलॉस (StopLoss) या दोन्ही ऑर्डर्स लावलेल्या असतील तर त्या कार्यान्वित ( Active ) होतील. फ्युचर्स एंड ऑप्शन्स साठीची ऑर्डर मात्र कॉन्ट्रॅक्ट्स एक्सपायरी पर्यंत वैध राहील.

म्हणजे आता अचानक एपमध्ये होणारे तांत्रिक बिघाड वगैरेमुळे नवीन ऑर्डर टाकता न आल्याने होणारे नुकसान इथे टाळता येऊ शकते.कारण लक्ष्य ( Target ) आणि स्टॉपलॉस (StopLoss) या दोन्ही ऑर्डर्स तुम्ही सुरवातीला लावलेल्या असतील

GTT ऑर्डर कशी लावता येईल ? ( How to place a GTT Order )

Upstox, Zerodha सह अनेक ब्रोकर्स सदर सुविधा पुरवतात, परंतु आम्ही Upstox वापरत असल्याने खालील उदाहरण Upstox एप च्या माध्यमातून देत आहोत. हि सुविधा Upstox च्या नव्या एप वर उपलब्ध आहे.

1 ) तुमच्या Upstox खात्यात लॉग इन करा.

2) NSE कॅश स्टॉक किंवा कोणतीही फ्युचर्स/ऑप्शन स्क्रिप निवडा.

3) ‘खरेदी’ किंवा ‘विक्री’ निवडा.

4) खाली दिसणाऱ्या ‘GTT ऑर्डर’ टॅबची निवड करा.

‘5) डिलिव्हरी’ म्हणून प्रकार निवडा.

6) तुम्हाला शेअर तुमच्या अपेक्षित किंमतीपेक्षा जास्त किंमतीला स्क्रिप खरेदी किंवा विक्री करायची असल्यास Above निवडा आणि मूल्य प्रविष्ठ करा.

7) तुम्हाला सध्याच्या किमतीवर स्क्रिप खरेदी किंवा विक्री करायची असल्यास ‘Immediate’ असं निवडा.

8) तुम्हाला शेअर तुमच्या अपेक्षित किंमतीपेक्षा कमी किंमतीला स्क्रिप खरेदी किंवा विक्री करायची असल्यास ‘below’ असं निवडा आणि मूल्य प्रविष्ठ करा.

9) इच्छित मूल्य, माहिती ( Buy, Sell, Stop loss, Target ) प्रविष्ट करा.

10) तुमची ऑर्डर देण्यासाठी ‘Review’ वर क्लिक करा. यानंतर तुमची GTT ऑर्डर यशस्वीरित्या कार्यान्वित केली जाईल.

शुल्क (Charges for GTT order) : सध्या तरी जीटीटी ऑर्डरसाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही आहेत. म्हणजेच ब्रोकरेज आणि कर आदी नेहमीची शुल्क वगळता या प्रकारच्या ऑर्डरसाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही.

माहिती आवडली असल्यास इतरांनाही हि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *