mis scheme in post office in marathimis scheme in post office in marathi

गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असतात.ढोबळ अर्थाने त्यांची विभागणी करायची झाली तर, जोखीम असणारे आणि जोखीम नसणारे असे दोन भाग करता येतील. शेअर मार्केटशी निगडीत गुंतवणूक असेल तर त्यात जोखीम हि आलीच. (mis scheme in post office in marathi )

पण अनेकजण असतात ज्यांना जोखीम नको असते.परतावा कमी का असेना पण सुरक्षित गुंतवणूक हवी असते. अशा लोकांसमोर पहिला पर्याय असतो तो मुदत ठेव म्हणजेच एफडीचा. यातही आपल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा देणाऱ्या म्हणजेच म्हणजे मासिक उत्पन्न योजना जास्त लोकप्रिय आहेत. (Monthly Income scheme in marathi)

आज आपण भारतीय टपाल विभागाद्वारे आणली गेलेली अशीच एक मासिक उत्पन्न योजना जाणून घेणार आहोत. या योजनेच नाव आहे ‘मंथली इन्कम स्कीम’ म्हणजेच एमआयएस (MIS Post Office scheme in marathi )

या योजनेत फक्त एकदाच म्हणजे एकरकमी गुंतवणूक करावी लागते. एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा किमान रु.1000 आणि त्याच पटीत कमाल ₹४.5 लाखांपर्यंत करता येते. अर्थात वैयक्तिक म्हणजे एकल खात्यासाठी गुंतवणुकीची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये असली तरी जॉईन्ट म्हणजे एकत्रितरित्या उघडलेल्या खात्यासाठी हि मर्यादा 9 लाखांपर्यंत आहे.

जर एखाद्या व्यक्तीने ₹4.5 लाख रुपये एकरकमी जमा करून हे खाते उघडले, तर पुढील पाच वर्षांसाठी त्यांना दर साल दर शेकडा ६.६ % दराने वर्षाला ₹ 29,700 इतकं उत्पन्न व्याजातून मिळेल. इथे दर महिन्याला उत्पन्नाच्या पर्यायानुसार ₹2475 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशाप्रकारे, तुम्हाला पाच वर्षांत मिळणारं एकूण उत्पन्न ₹ 1,48,500 इतकं असेल.

खालील एमआयएस कॅलक्यूलेटरचा वापर करून तुम्ही इच्छित मासिक उत्पन्नासाठी नियोजन करू शकता.(post office mis calculator in marathi )

MIS ची मॅच्युरिटी पाच वर्षे आहे. इथे मॅच्युरिटी म्हणजे योजनेची कालमर्यादा अशा अर्थाने विचारात घ्यावे कारण रक्कम गुंतविल्यानंतर पुढील महिन्यापासून तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळणे सुरु होतं आणि ते पुढील 5 वर्षे तुम्हाला मिळत राहतं. या योजनेत खाते मुदतपूर्व बंद करण्याची सोय असली तरी त्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढले जाऊ शकतात. आणि या नियमांनुसार, खाते उघडल्यानंतर एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेच्या 2% रक्कम वजा करून बाकीची रक्कम परत केली जाते.आणि जर खाते उघडल्यापासून 3 वर्षांनंतर पैसे काढल्यास ठेव रकमेपैकी 1% रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते.

पाहूया या योजनेची वैशिष्ट्ये.

एमआयएस खातं कोण उघडू शकतं. (Who can invest in MIS)

🔹कुणीही सज्ञान व्यक्ती वैयक्तिकरित्या
🔹 संयुक्त खाते (3 प्रौढांपर्यंत)
🔹 अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक
🔹 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्तीच्या स्वत: च्या नावावर.

 ठेव मर्यादा ( How much to invest in MIS)

🔹 खाते किमान रु. 1000 आणि त्याच पटीत रु.४.5 लाखांपर्यंत.
🔹 एका खात्यात कमाल रु.4.50 लाख आणि संयुक्त खात्यात रु.9 लाख रुपये जमा करता येतात.
🔹 सर्व संयुक्त धारकांना संयुक्त खात्यातील गुंतवणुकीत समान वाटा असेल.
🔹 एका व्यक्तीने उघडलेल्या सर्व MIS खात्यांमधील ठेवींची मर्यादा रु.4.50 लाखांपेक्षा जास्त नसेल.
🔹 अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून उघडलेल्या खात्याची मर्यादा मात्र वेगळी असेल.

व्याज ( Interest on MIS)

🔹 व्याज खाते उघडल्यापासून तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर मिळेल आणि मॅच्युरिटी होईपर्यंत दर महिन्यास देय असेल.
🔹 ठेवीदाराने कोणतीही जास्तीची ठेव ठेवल्यास, ती परत केली जाईल ज्यावर खाते उघडल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत फक्त पोस्ट ऑफिस बचत खाते नियमानुसार व्याज लागू होईल.
🔹 मिळणारे व्याज हे बचत खात्यात ऑटो क्रेडिटद्वारे / ईसीएसद्वारे जमा होईल. तसेच CBS पोस्ट ऑफिसमधील MIS खात्याच्या बाबतीत, मासिक व्याज कोणत्याही CBS पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या बचत खात्यात जमा केले जाऊ शकते.
🔹 ठेवीदारास व्याजाद्वारे मिळणारे सदर उत्पन्न करपात्र असेल.

मुदतपूर्व ( प्री-मॅच्युअर) खाते बंद करणे

🔹 खाते सुरु करण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या मुदतीपर्यंत कोणतीही ठेव काढता येणार नाही.
🔹 खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षांपर्यंतच्या कालावधी दरम्यान खाते बंद केल्यास, मुद्दलमधून 2% इतकी वजावट करून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
🔹 खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर ते 5 वर्षांच्या आत, म्हणजेच मॅच्युरिटीच्या कालावधीच्या आधी बंद केल्यास मुद्दलमधून 1% इतकी वजावट करून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
🔹 खाते संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पास बुकसह विहित अर्ज सादर करून मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकते.

मॅच्युरिटी

🔹 5 वर्षांच्या समाप्तीनंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पास बुकसह विहित अर्ज सादर करून खाते बंद केले जाऊ शकते.
🔹 मॅच्युरिटीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खाते बंद करून नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसांना रक्कम परत केली जाते. या रकमेत मुद्दल तसेच परताव्यात मागील महिन्यापर्यंतचं व्याज विचारात घेतलं जातं.

एमआयएस खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केलं जाऊ शकतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *