आयटीआय म्युच्यूअल फंडातर्फे आयटीआय व्हॅल्यू फंडरुपी नवीन योजना
( ITI Value Fund )
Image credit : Internet |
• फंड हाऊसतर्फे ही बारावी गुंतवणूक योजना
• उद्दीष्टानुसार देशातील 43 शहरात फंडाचे कामकाज सध्या सुरु
• नवीन फंड योजना 25 मे 2021 पासून खुली तर 8 जुन 2021 ला बंद होणार
मुंबई, ता. 28 मे 2021 : आयटीआय म्युच्यूअल फंड एप्रिल 2019 मध्ये कार्यान्वित झाला असून गुंतवणूकदारांसाठी आत्तापर्यंत बाजारात अकरा सक्षम अशा गुंतवणूक योजना आणलेल्या आहेत. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी अर्थात एएमसीला रोख निधीच्या बाबतीत सक्षम असलेल्या उद्योगसमुहाचे पाठबळ आहे. सर्व गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत समाधान देणारा अनुभव मिळण्यासाठी अतिशय छोट्या कालावधीत समुहाने आपल्या एएमसीत उच्च कारभार, मनुष्यबळ, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा याबाबत उत्तम मापदंड तयार केले आहेत.
आयटीआय म्युच्यूअल फंड आता आयटीआय व्हॅल्यू फंड ही नवीन फंड योजना ( एनएफओ) आणत आहे. ही नवीन योजना 25 मे 2021 रोजी गुंतवणूकीसाठी खुली होत असून येत्या आठ जूनला बंद होणार आहे. किमान पाच हजार रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. आयटीआय व्हॅल्यू फंड ही मुदतमुक्त प्रकारातील समभाग गुंतवणूक योजना असून यातील निधी हा प्रामुख्याने समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये गुंतविला जाणार आहे.
नवीन योजनेबद्दल बोलताना आयटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी जॉर्ज हेबर जोसेफ म्हणाले की, आपल्या सुरुवातीपासून आमचा फंड गुंतवणूकादारांना अतिशय आगळावेगळा उत्तम अनुभव देत आहे. व्हॅल्यू फंडाच्या आधारे दीर्घ मुदतीत भांडवल वृध्दी करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. दीर्घ कालावधीत जोखीम सांभाळत सातत्याने उत्तम परतावा मिळवून देण्याची क्षमता असलेले परंतु सध्या अतिशय अल्प पातळीवर असलेले समभाग हुडकून काढण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीर्घ कालावधीत उत्तम परतावा आणि मुल्यधारीत गुंतवणूक योजनेचा पाठपुरावा करणाऱ्यांसाठी ही नवीन योजना अतिशय उत्तम आहे. पारदर्शक पध्दतीने संदेशवहन आणि भारतभर वितरकांशी सातत्याने संपर्क निर्माण केल्यामुळे बाजारात सध्या आम्ही आमचे उत्तम असे स्थान तयार केलेले आहे. यापुर्वी आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभलेल्या तीस प्रमुख शहरे आणि त्यानंतरच्या 30 गावांवर आम्ही या नवीन योजनेसाठी प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहोत. गुंतवणूकदार आणि आमचे वितरक यांना आम्ही एक टिम म्हणून अतिशय चांगला अनुभव मिळवून देण्याबाबत वचनबध्द असल्याचे जोसेफ यांनी स्पष्ट केले.
आयटीआय म्युच्यूअल फंडाने आत्तापर्यत आयटीआय मल्टी कॅप, आयटीआय लाँग टर्म इक्विटी फंड( ईएलएसएस-करबचत योजना), आयटीआय आर्बिट्राज फंड, आयटीआय लिक्वीड फंड, आयटीआय ओव्हरनाईट फंड, आयटीआय बॅलन्स्ड अॅडव्हॉंटेज फंड, आयटीआय स्मॉल कॅप फंड, आयटीआय बँकींग आणि पीएसयू डेब्ट फंड, आयटीआय लार्ज कॅप, आयटीआय मिड कॅप आणि आयटीआय अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन हे फंड बाजारात आणलेले आहेत.
आयटीआय म्युच्यूअल फंडाने आत्तापर्यंत देशभरात तेरा हजारांपेक्षा अधिक वितरक नेमले आहेत. तसेच 25 शाखा स्थापन केलेल्या आहेत. आगामी काही वर्षात देशभरातील जास्तीत जास्त फंड वितरकांना कंपनीच्या नेटवर्कमध्ये आणण्यासाठी आणखी शाखा कार्यालये स्थापन केली जाणार आहेत.
योग्य वेळेला योग्य योजना सादर करणे हे आयटीआय म्युच्यूअल फंडाचे उद्दीष्ट आहे. एसक्यूएल म्हणजेच सुरक्षेसाठी पुरेसे मार्जिन ( एस), गुणवत्तापुर्ण व्यवसाय ( क्यू) आणि अल्प लिव्हरेज ( एल) या व्यवसाय पध्दतीआधारे मालमत्ता व्यवस्थापनात नवीन पर्व आयटीआय फंडाने आणले आहे. फंड हाऊसने जोखीम व्यवस्थापनात अतिशय बळकट अशी चौकट तसेच पोर्टफोलिओच्या निर्मितीसाठी योग्य समभागाची निवड करण्यासाठी पायापासून संशोधन पध्दतीवर स्पष्टपणे लक्ष केंद्रीत करत अतिशय सक्षम गुंतवणूक प्रक्रिया उभी केलेली आहे.