financial literacy in marathifinancial literacy in marathi

आर्थिक दृष्टीकोनातून महत्वाचे वाटलेले असे काही निर्णय–कृती खाली देत आहोत ज्यांचा विचार प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने करायला हवा. (financial literacy in marathi)

सदर माहिती आमच्या स्वानुभवातून आहे. जे आम्हाला भावलं, योग्य वाटलं ते सर्वांना लागू असायला हवं असं निश्चितच नाही. प्रत्येकाची आव्हाने आणि त्यांना सामोरी जाण्याची त्यांची शैली वेगळी असू शकते. त्यामुळे आपला वैयक्तिक आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्यावा हि विनंती.

मुदत विमा (टर्म इंश्योरन्स) : हि अत्यंत महत्वाची बाब. तुमच्या क्षमतेवर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे, तुमच्या कुटुंबियांसाठी  उत्तमोत्तम योजना तुमच्या मनात आहेत ज्या तुम्ही निश्चितच पूर्ण कराल. पण लक्षात ठेवा हे जग अनिश्चितेने भरलेले आहे. एखादी दुर्दैवी घटना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांपासून दूर सारू शकते. अशावेळी तुमच्या योजना आणि त्यासाठी असणारे तुमचे प्रयत्न यांना काहीही अर्थ उरत नाही.

म्हणूनच तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना किमान आर्थिक तोशीस पडणार नाही याची तरतूद तुम्ही मुदत विमा (टर्म इन्श्योरंस) घेऊन करून ठेवू शकता. सर्वसाधारणपणे मुदत विम्याचं कवच तुमच्या सध्याच्या उत्पन्नाच्या 15 ते 20 पटीत असावं असा संकेत आहे.

आरोग्य विमा (हेल्थ इंश्योरन्स)  : एखादं आजारपण किंवा अपघात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काहीवर्षे मागे ढकलू शकतो. हे टाळायचं असेल तर आरोग्य विम्याची तरतूद हवीच. (Health Insurance in marathi)

आरोग्य विमा घेताना संपूर्ण कुटुंबाचा विचार करावा. तसेच त्यातील अटीं-नियम समजून घ्यावेत. बरेचदा कमी प्रीमिअमच्या नादात विविध व्याधी किंवा शस्त्रक्रीयेवर असणाऱ्या विमाकवचावर मर्यादा असतात. अशा वेळी वरील खर्च आपल्याला करावा लागू शकतो. तसेच दावा निकाली प्रक्रिया ( क्लेम सेटलमेंट ) स्वतः विमा कंपनी हाताळते कि एखाद्या त्रयस्थ संस्थेकडे (टीपीए) हे काम सोपवलं आहे, हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचं आहे. कारण यामुळे क्लेम सेटलमेंट प्रक्रिया लांबू शकते किंवा नकारात्मक होण्याची शक्यता असते. विमा घेते वेळी नियम समजून न घेतल्यामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं

बचत खाते ( सेव्हिंग अकाऊंट ) : अनेकांना  वाटेल ‘हे तर आमच्याकडे आहेच की’ पण हे जर तुम्ही तुमच्या सॅलरी खात्याबद्दल समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. सॅलरी खाते वरकरणी जरी बचत खाते असले तरी व्यवहाराच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ते ‘सेव्हिंग’ नव्हे तर ‘एक्स्पेन्स’ अकाऊंट असते. म्हणजे बचत नव्हे तर खर्च करण्यासाठी त्याचा जास्त वापर होत असतो. म्हणूनच एक वेगळे बचत खाते असुद्या ज्यात खऱ्या अर्थाने बचत करता येईल जी पुढे गुंतवणुकीत रुपांतरीत करता येईल.

डिमॅट खाते (डिमॅट अकाऊंट ) : सर्वात कळीचा मुद्दा. डिमॅट खाते कशाला हवे ?  शेअर मार्केट म्हणजे जुगार हा समज ( खरं तर गैरसमज ) हा आता केव्हाच मागे पडला आहे. ट्रेडिंग नव्हे तर केवळ दीर्घ गुंतवणुकीच्या उद्देशाने चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा निर्देशांकात केलेली निरंतर गुंतवणूक उतम परतावा मिळवून देऊ शकते हे अनेकांना पटलंय. (How to open demat account in marathi)

अनेक एक्स्चेंज ट्रेडेड म्युच्युअल फंड असतात ज्यातही आपण सहजतेने गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ निफ्टी निर्देशांकाशी समकक्ष कामगिरी राखणारा निप्पॉनचा ‘निफ्टीबीज’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याचनुसार सोन्यातील गुंतवणूक गोल्ड ईटीएफद्वारे करता येते.

लवकरच होऊ घातलेल्या डिमटेरीअलाझेशन प्रक्रियेमुळे विम्यासारखे महत्वाचे दस्तावेजसुद्धा डिमॅट खात्यात उपलब्ध असतील.

थोडक्यात काय तर डिमॅट खाते हि आता आवश्यक बाब असणार आहे.

डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेली लिंक हि आम्ही वापरत असलेल्या ब्रोकरची आहे. आपण या लिंकवरून किंवा आपल्या पसंतीच्या इतर कोणत्याही ब्रोकरकडे डिमॅट खाते उघडू शकता.

मुदत ठेव (एफडी ) : दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून मुदत ठेव अर्थात ‘एफडी’ हा पर्याय संयुक्तिक नसला तरी खात्रीशीर परतावा म्हणून निश्चितच चांगला आहे. त्यामुळे एखादी छोटी रक्कम या पर्यायात टाकणे उत्तम. त्यातही ‘फ्लेक्सी फिक्स्ड डीपॉझिट’ (एफएफडी ) हा यातील एक चांगला पर्याय आहे. याची माहिती आम्ही आमच्या एका लेखामध्ये दिलेली आहे. जी तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता. (fixed deposit)

सरकारी रोखे गुंतवणूक खाते (गव्हर्न्मेंट बॉंड्स)  : मुदत ठेवी खालोखाल खात्रीशीर असा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून सरकारी रोख्यांतील गुंतवणुकीकडे पाहिलं जातं. पण या सरकारी रोख्यांमध्ये कुठे आणि कशी गुंतवणूक करावी हे अनेकांना माहित नसतं. खरंतर त्यासाठी खुद्द रिझर्व्ह बँकेने सोय उपलब्ध करून दिलेली आहे. खालील लिंकवर नोंदणी करून तुम्ही वेळोवेळी येणाऱ्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. ( How to Invest in government bonds in marathi)

क्रेडीट कार्ड : अनेकांना आश्चर्य वाटेल. कारण क्रेडीट कार्ड म्हणजे उधळपट्टी आणि कर्जबाजारी होण्याचा राजमार्ग वगैरे वाटू शकतं. पण हे सगळं वापरकर्त्यांच्या स्वभावावर आहे. आमच्या मते सांगायचं तर क्रेडीट कार्ड हि खरंतर फार सोयीची गोष्ट आहे. पण आपण तिचं रुपांतर संकटात करून टाकतो.

काय करायचं, तर दर महिन्याचा काही एक खर्च असा असतो जो करणे आपल्याला भाग असतं. उदाहरणार्थ. महिन्याचं किराणासामान, देयके ( युटीलिटी बिल्स) हा खर्च ‘वरखर्च’ या प्रकारात नक्कीच येत नाही. म्हणजे याची तजवीज आपल्याला दरमहिन्याला करावीच लागते. मग हाच खर्च जो तुम्ही त्या-त्या वेळी रोखीने किंवा डेबिट कार्डने न करता क्रेडीट कार्डने करून त्याचे बिल मुदतीपूर्व भरून टाकावे. याने होणारा फायदा म्हणजे या खर्चातून रिवार्ड पॉईंट्स तसेच युटीलिटी बिल्स वरील नियमित कॅशबॅक मिळत राहते.

आणि त्याही पुढे क्रेडीट कार्डचे बिल भरायला मिळणारा 30 ते 50 दिवसाचा अवधी तुम्हाला तुमच्याच बचत खात्यातील त्या रकमेवर व्याज मिळवून देतं ते वेगळंच. क्रेडीट कार्ड व्यवस्थापन करण्यासाठी क्रेड सारखे एप सुद्धा सोयीचं ठरतं. म्हणजेच एखादं आजीवन म्हणजेच ‘लाईफटाईम फ्री’ क्रेडीट कार्ड बाळगणे हिताचे ठरते. अर्थात तुमचा स्वभाव उधळपट्टी करणारा नसावा हे सुद्धा महत्वाचं.

इथे देण्यात आलेली लिंक हि आम्ही वापरात असलेल्या अशाच एका लाईफटाईम फ्री क्रेडीट कार्डची आहे ज्यात रिवार्ड पॉईंट्स कधीच अवैध ठरत नाहीत. तसेच हे पॉईंट्स रिडीम करण्यास कोणतेही वेगळे शुल्क नसते. त्याहूनही पुढे हे रिवार्ड पॉईंट्स कॅशमध्येही रुपांतरीत करता येतात.

पूर्णतः एपद्वारे नियंत्रित असणारे हे कार्ड कोणत्याही कागदपत्रांशिवाय खालील लिंकवरून एपद्वारे ऑनलाईन प्राप्त करता येईल. (अर्थात आम्हाला हे कार्ड आवडलं याचा अर्थ तुम्हालाही आवडलंच पाहिजे असा आमचा अट्टाहास नाही) ( Credit Card in marathi)

दैनंदिन आर्थिक व्यवहार नोंद: कुठे जायचं आहे हे निश्चित असेल तरच ‘कोणत्या मार्गाने जायचं या मुद्द्याला अर्थ आहे. तसंच ‘पैसा किती साठवायचा आणि कुठे गुंतवायचा’ हे ठरवायचं असेल तर आधी ‘पैसा कुठून येतो अन कुठे जातो’ हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठीच दैनंदिन आर्थिक नोंदी ठेवणे गरजेचे. अर्थात आता यासाठी जुन्या पद्धतीच्या नोंदवहीची गरज नाही. आज अनेक एप्स उपलब्ध आहेत जे तुमचं हे काम सोप्पं करतात आणि आपल्या नियमित-अनियमित अशा या जमा खर्चात होणाऱ्या वाढ आणि घटीबाबत तुम्हाला वेळोवेळी कळवतात. ( daily financial budgeting)

एनपीएस / पीपीएफ :  कोणतीही योजना एकांगी असू नये. आणि हे गुंतवणुकीसही लागू आहे. गुंतवणूक पर्यायात विविधता असावी. अर्थात त्यातील गुंतवणुक निधीच्या प्रमाणाबाबत प्राधान्यक्रम आपापल्या इच्छेनुसार ठरवला जाऊ शकतो. ( How to invest in NPS in marathi)

भविष्याची तरतूद म्हणून पेन्शन योजना उपयोगी आहेत ज्यात प्रामुख्याने एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम पब्लिक प्रॉव्हिडेन्ड फंड.

एनपीएस खाते खालील लिंक वरून उघडता येईल.

पीपीएफ खाते बॅंकेमध्ये उघडावे लागते. हे खाते ऑफलाईन आणि  ऑनलाईन ( काही ठराविक बँका ) पद्धतीने उघडता येते.

आणीबाणीची तरतूद ( इमर्जन्सी फंड ) : भविष्यासाठीच्या तुमची आखलेल्या योजना आणि नियतीच्या तुमच्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या असू शकतात. आणीबाणी याचा अर्थच मुळी अचानक उद्भवणारी कठीण परिस्थिती. अशावेळी किमान तुमची आर्थिक बाजू सक्षम असणे गरजेचे असते. म्हणून महिन्याकाठी किंवा शक्य तेव्हा नियमित काही रक्कम यासाठी बाजूला काढणे इष्ट आहे. (emergency fund explained in marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *