जगातील गुंतवणूक रिसर्च संस्था HINDENBURG RESEARCH ने अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 85% पर्यंत घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. HINDENBURG RESEARCH च्या मते अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबावाखाली येऊ शकतो. या संदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदनबर्ग रिसर्चने गैर-भारतीय इन्स्ट्रुमेन्ट्सद्वारे ( भारतीय भांडवली मार्केट बाहेरील ) अदानी समूहात शॉर्ट्स पोझिशन्स घेतल्या आहेत. (HINDENBURG RESEARCH and ADANI Group Stocks fall in marathi)
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हिंडेनबर्ग रिसर्चला अदानी समूहाच्या सूचिबद्ध कंपन्यांवर दीर्घ मुदतीसाठी सट्टा लावायचा नाही.त्यामुळे या वृत्तानंतर अदानी समूहाचे शेअर्स आज घसरले आहेत.
गैरप्रकारांचे आरोप : या व्यतिरिक्त या फायनान्शिअल रिसर्च फर्म असणाऱ्या हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या मूल्यांकनात फेरफार केलं गेलं असल्याचा दावा केला आहे . यामध्ये अनेक प्रकरणांचा ज्यात मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समावेश आहे.
अहवालानुसार, अदानींच्या प्रमुख कंपन्यांनी कर्ज तर घेतले आहे.पण त्यासाठी कंपन्यांचे समभाग गहाण ठेवून समूहाची ढोबळ आर्थिक स्थिती ( ग्रॉस फायनान्शियल कंडीशन ) धोक्यात आणली आहे. हा संशोधन अहवाल तयार करण्यासाठी अदानी समूहाच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.त्याचबरोबर हजारो कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचा हिंडेनबर्गचा दावा आहे.
या संदर्भातील वृत्तामुळे आज गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.आज मंगळवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत जवळपास 3 टक्क्यांनी घसरून 3,315 रुपये झाली होती. याशिवाय अदानी समूहाच्या 6 अन्य कंपन्यांचे शेअर्स – अदानी विल्मर, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन यांचेही शेअर्स विकले गेले.अदानी समूहाच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 46,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
अदानी समूहाच्या समभागांची आताची स्थिती (Adani Stocks fall)
अदानी ट्रान्समिशन: रु 2608 (5.51% खाली)
अदानी पोर्ट्स: रु 716.75 (5.83% खाली)
अदानी पॉवर: रु 261.65 (4.73% खाली)
अदानी विल्मर: रु 541.15 (खाली 4.98 %)% ) घट)
अदानी टोटल गॅस: 3749.60 (3.50% घसरण)
अदानी ग्रीन: रु 1881.70 (1.66% घसरण)
दरम्यान गौतम अदानी समूहाकडून हिंडेनबर्गच्या अहवाला संदर्भात ‘धक्कादायक’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे कळते.
दरम्यान हा अहवाल तुम्ही खालील लिंकवर वाचू शकता. ( hindenburg research report Link )
https://hindenburgresearch.com/adani/