sovereign-gold-bond-scheme-2021-23-in-marathi.pngsovereign-gold-bond-scheme-2021-23-in-marathi.png

‘सोव्हेरिअन गोल्ड बॉंड’ ची चौथी सिरीज नुकतीच बंद झाली.पण सर्वसामान्यांना सोन्यातील गुंतवणूकीच्या या पर्यायाबद्दल आजही तितकीशी माहिती नाही.(sovereign gold bond scheme 2021 23 in marathi)

एक काळ होता जेव्हा सोन्याचा गुंतवणुकीसाठी विचार करायचा झाला तरी त्यासाठीचे पर्याय फिजिकल गोल्ड अर्थात दागिने किंवा फारफार 24 कॅरेट शुद्धतेत उपलब्ध असलेले सोन्याचे नाणे किंवा ‘गोल्ड बार’ इतपर्यंतच मर्यादित होते. आता मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात ‘सोव्हेरिअन गोल्ड बॉंड’ हा यामधील सर्वात लोकप्रिय असा पर्याय आहे. सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांत सर्वाधिक पसंती असणाऱ्या या पर्यायात नक्की असं काय ते आज जाणून घेऊया.

‘सोव्हेरिअन गोल्ड बॉंड’ चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे, या गुंतवणुकीस थेट सरकार आणि रिझर्व्ह बँकेची मिळणारी हमी. आणि त्याच बरोबर सोन्याच्या किंमतीत होऊ शकणाऱ्या वाढीमुळे मिळणाऱ्या परताव्या व्यतिरिक्त मिळणारे व्याज. पाहूया या गुंतवणूक योजेनेची वैशिष्ट्ये.

‘सोव्हेरिअन गोल्ड बॉंड’ (SGB) हा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा एक पर्याय.याची सुरुवात सर्वप्रथम 2015 मध्ये सरकारने केली. तसं डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचे गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड, बँक किंवा विविध वित्तसंस्था कडून खरेदी केले जाऊ शकणारे डिजिटल गोल्ड पर्याय आहेतच. मग एसजीबीमध्ये वेगळं असं काय आहे?(sovereign gold bond meaning in marathi)

सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास मिळू शकणारे लाभ.

  • सार्वभौम गोल्ड बाँड योजनेतील परिपक्वता कालावधी 8 वर्षे आहे. आणि या कालावधीनंतर मिळणारा परतावा हा पूर्णपणे करमुक्त असतो.
  • या रोख्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सोन्यावरील वाढीव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. ज्यामुळे सोन्याच्या चढ-उताराच्या वेळी ते गुंतवणूकदारांना संरक्षण देते.
  • मॅच्युरिटीवर त्याची पूर्तता केल्यावर त्यावेळच्या 999 शुद्धतेच्या आधारावर सोन्याच्या दराने परतावा मिळतो. 
  • या रोख्यांचा परिपक्वता कालावधी 8 वर्षांचा असला तरी 5 वर्षानंतर गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडू शकतो.
  • या रोख्यांचा वापर कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून देखील होऊ शकतो.
  • गुंतवणूकदारांना या रोख्यांवर इश्यू किंमतीच्या आधारावर प्रतिवर्ष 2.5%, व्याज अर्धवार्षिक पद्धतीने दिले जाते.
  • एसजीबी जीएसटी अंतर्गत येत नाही,तर भौतिक म्हणजेच फिजिकल सोन्यावर मात्र 3% GST लागू.
  • गोल्ड बॉन्डमध्ये हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध.
  • बाँडवर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध.
  • शुद्धते संदर्भात समस्या नाही.
  • मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या पर्ताव्यावर कर नाही.
  • सोने घरी बाळगण्यासंदर्भातील सुरक्षिततेची चिंता नाही.

सुवर्ण रोख्यांवर कर ?

परिपक्वता कालवधीअर्थात मॅच्युरिटीनंतर मिळणारा परतावा करमुक्त असला तरी दर सहा महिन्यांनी मिळणारे व्याज मात्र करपात्र आहे. व्याज सहामाही आधारावर गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते. हे व्याज आयकर कायदा, 1961 अंतर्गत करपात्र आहे. एका आर्थिक वर्षात, गोल्ड बॉण्ड्समधून मिळालेले व्याज करदात्याच्या ‘इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये’ गणले जाते. करदाता कोणत्या स्लॅबमध्ये येतो या आधारावर हा कर आकारला जातो. तथापि आधी सांगितल्याप्रमाणे मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा मात्र करमुक्त असतो. (TAX on sovereign gold bond in marathi )

  • मुदतपूर्व पैसे काढण्यावर ‘कॅपिटल गेन टॅक्स’.
  • बाँड हस्तांतरणावर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ.

रोख्यांची किंमत कशी ठरते ?

सोव्हेरिअन गोल्ड बाँड्सची किंमत सबस्क्रिप्शन कालावधीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किमतीच्या आधारावर निर्धारित केली जाते. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (IBJA) 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमती प्रकाशित करते. या दृष्टिकोनातून रोख्यांची किंमत निश्चित केली जाऊ शकते. तसेच, ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळते.(Price of sovereign gold bond in marathi)

किती गुंतवणूक करू शकता ?

सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये किमान 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. व्यक्तींना जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतच्या सुवर्ण रोख्यांमध्ये आणि ट्रस्टसारख्या संस्थांना 20 किलोपर्यंतच्या एका आर्थिक वर्षा मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. भारतातील कोणताही वैयक्तिक रहिवासी आणि हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.(sovereign gold bond scheme 2021 23 in marathi)

  • किमान 1 ग्रॅमच्या युनिटमध्ये गुंतवणूक करता येते. तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा 4 किलो.
  • 4 किलोची कमाल गुंतवणूक मर्यादा वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंबासाठी ( HUF ) साठी.
  • ट्रस्टसाठी जास्तीत जास्त 20 किलो गुंतवणुकीची मर्यादा.
  • कमाल गुंतवणूक मर्यादा हि संपूर्ण आर्थिक वर्षासाठी.
सुवर्ण रोखे खरेदी : कुठे आणि कशी ?

प्रत्येक नव्या एसजीबी सिरीजसाठी बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस येथे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तर पुढे सेकंडरी मार्केट म्हणजे BSE आणि NSE सारख्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध झाल्यावर हेच गोल्ड बॉन्ड्स तत्कालीन मुल्यानुसार आपल्या ट्रेडिंग खात्यावरून खरेदी केले जाऊ शकतात. (how to invest in SGB in marathi )

  • नवीन इश्यू लॉन्च झाल्यावर बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता.
  • ऑनलाइन खरेदीवर थेट प्रती ग्रॅम ₹50 सूट.
  • पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी येते.
  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करणे शक्य आहे.
  • बीएसई, एनएसईच्या प्लॅटफॉर्मवरून म्हणजेच थेट तुमच्या ट्रेडिंग खात्यावरूनही खरेदी शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *