Mahila Samman Saving Certificate in marathi)Mahila Samman Saving Certificate in marathi)

फेब्रुवारी महिन्यात वर्ष 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्वसामान्य स्त्रियांचा संदर्भ देऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. विशेषत: महिलांना विचारात घेऊन सुरू केलेली ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. (Mahila Samman Saving Certificate in marathi)

बहुतांश बहुतेक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये, ठेवीदारांना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) स्वीकारल्यानंतरही कर लाभ मिळेल की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज त्यासंबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.

या योजनेची घोषणा 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. सदर ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’ दोन वर्षांसाठी लवचिक गुंतवणुकीचा आणि कमाल 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेसह आंशिक पैसे काढण्याचा आणि दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याजाचा लाभ देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजे फक्त दोन वर्षांसाठी वैध आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ७.५ टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळतो.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा ? ( How to apply for MSSC in marathi )

हे अगदी सोप्पंय. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेसाठी अर्ज करू शकता. त्या संदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे. ही योजना देशभरातील १.५९ लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेसाठी खाते उघडू शकता.

MSSC मध्ये कर लाभ मिळेल ?

वित्त मंत्रालयाने 5 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हे स्पष्ट केले आहे की या योजनेतील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र नाही. म्हणजे त्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. (Mahila Samman Saving Certificate in marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *