Is House an Asset or Liability in marathiIs House an Asset or Liability in marathi

नोकरदार असणारे तुम्ही तुमचं पाहिलं घर घेता तेव्हा ती तुमची गरज असते..राहण्याची..निवाऱ्याची..

पण त्यानंतर मालमत्ता म्हणा किंवा मग गुंतवणूक म्हणून.. पण तुम्ही पुन्हा एखादं घर खरेदी करता.. त्यानंतर आणखी एक… अर्थातच हे सगळं गृहकर्जावर.

आता तुम्ही या तुमच्या सर्व कथित मालमत्ता, गुंतवणुकीचे हफ्ते भरू लागता. त्यांचा मेंटेनन्स.. मालमत्ता कर तुम्हाला नियमितपणे भरावा लागतो. मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स आणि अमेनिटीजपाहून हुरळून गेलेले तुम्ही त्यानुसार पडणाऱ्या मेंटेनन्स पाहून भानावर येता. कारण घर भाड्याने देऊनही याची भरपाई अगदी जेमतेम होईल अशी परिस्थिती असते. त्यानंतर प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये साजरे होणारे सण-उत्सव यांच्या वर्गणीसाठी तुम्हाला धोरण ( द्यायचे कि नाही ?) ठरवावं लागतं. कारण सण साजरे करणाऱ्या तेथील रहिवाश्यांनी आपापली घरे निवाऱ्याची गरज म्हणून घेतलेली असतात. तुमच्या सारखा गुंतवणूक, मालमत्ता वगैरे द्रष्टेपणा त्यांनी दाखवलेला नसतो. त्यामुळे आपापले सणवार ते साजरा करू पाहतात. पण तुम्हाला मात्र हे सण एकाच वेळी तुमच्या सगळ्या घरांच्या ठिकाणी साजरे करायचे कि नाही हे ठरवावं लागतं.

बरं घर भाड्याने द्या किंवा नको.. तुमच्या घराची वेळोवेळी डागडुजी मात्र तुम्हालाच करावी लागणार असते. त्यातूनही पहिली काही वर्षे तुमच्या गृहकर्जाची परतफेड चिंचोक्याच्या आकारात होत असते. आपल्या मिळकतीत हे थोडं कठीण होतंय हे पाहून तुम्ही या पैकी एक घर विकायचा विचार करता.

आता गमंत अशी आहे कि, घर घेताना तुम्ही बिल्डरच्या “सर्वसमावेशक” अशा किंमतीला भुलून घर घेतलेलं असतं. पण त्यानंतर बिल्डरकडून लावण्यात आलेले डेव्हलपमेंट चार्जेस, काही वर्षांचा आगाऊ मेंटेनन्स, अलाणा चार्जेस–फलाणा चार्जेस दिलेले असतात. पण त्यावेळी बँकेतून एप्रूव्ह झालेले लोन आणि घर मिळण्याचा आनंद अन् या आनंदाच्या क्षणी तुम्ही अशा बेरीज-वजाबाकी करत बसत नाही. पण घर विकताना मात्र तुम्हाला आता हे तुमचं ‘रिसेल’ घर त्या खरेदीच्या वेळी कर आणि इतर अलाणा-फलाणा चार्जेससह पडलेल्या किंमतीच्या वर विकणे भाग असतं.

नोकरदार असलेल्या तुम्हाला आता मात्र लक्षात येऊ लागतं कि नोकरदार माणसासाठी त्याचं प्रत्येक घर हे त्याच्या ‘कल्पित’ गुंतवणूक आणि मालमत्तेपेक्षा वास्तवातील ‘जबाबदारी’ जास्त असतं.

आधीच एक घर असताना गृहकर्जावर आणखी एक नवे घर घेऊन त्याचा ईएमआय भरण्याऐवजी त्या आकाराची  एसआयपीच करा असं इथे आम्हाला मुळीच सांगायचं नाही.

पण अनावश्यक खर्च करून, कर्ज घेऊन तुमचं दायित्व वाढवण्याऐवजी केलेली साधीसरळ गुंतवणूक ( FD, Govt Small saving schemes, Gold, Index ) सुद्धा बरंच काही साध्य करू शकते.

कदाचित एखादं घर ? विना कर्जाने ?

विचार , दृष्टीकोन पूर्णतः वैयक्तिक.

Is House an Asset or Liability in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *