What is crude oil in marathiWhat is crude oil in marathi

आज आपण तेलाबद्दल बोलणार आहोत. हे तेल म्हणजे घरोघरी वापरले जाणारे स्वयंपाकाचे तेल नाही, पण स्वयंपाकच नव्हे तर किंबहुना आपलं रोजचं जगणं त्याच्याशी निगडीत आहे असं म्हटलं तरी त्यात अतिशयोक्ती नसेल. कारण जगभरातील सर्व प्रकारच्या व्यवहारक्रिया चालू ठेवण्यासाठी वापर होत असलेल्यांपैकी कच्चे तेल हे सर्वात मोठे माध्यम आहे.

जगात दररोज सुमारे 930 लाख बॅरल कच्चे तेल वापरले जाते. भारत दररोज सुमारे 47 लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो आणि ज्यापैकी 83% तेल भारत आयात करतो. भारत जे कच्चे तेल आयात करतो ते ब्रेंट क्रूड आहे कारण भारत प्रामुख्याने आखाती देशांतून आणि आता रशियातून तेल आयात करतो जेथे कच्च्या तेलाचा बेंचमार्क आहे ब्रेंट. (Brent Crude oil in marathi )

ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय बेंचमार्क किंमतींची तुलना करण्यापूर्वी, कच्चे तेल म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे ?

कच्चे तेल म्हणजे काय? (What is crude oil in marathi)

कच्च्या तेलाचा इतिहास 300 दशलक्ष वर्षांचा आहे. नैसर्गिकरित्या अवस्थेत सापडणाऱ्या तेलास कच्चे तेल म्हणतात. कच्चे तेल हा गडद रंगाचा जाड द्रव आहे, म्हणजेच हा एक प्रकारचा गडद हायड्रोकार्बन पदार्थ असतो जो जगभरात जमीनीखाली आणि समुद्रात आढळतो. हे कच्चे तेल बाहेर काढल्यानंतर ते मशीनच्या साह्याने शुद्ध केले जाते. यामधून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नैसर्गिक वायू, वंगण आणि व्हॅसलीन इत्यादी विविध घटक मिळतात जे वेगळे केले जातात. कच्चे तेल ‘बॅरल’मध्ये (पिंप ) मोजले जाते आणि एका बॅरलमध्ये साधारणतः 159 लिटर इतके क्रूड तेल असते. (what is crude oil used for in marathi)

तेल बेंचमार्क म्हणजे काय? ( What is Oil Benchmark)

खरंतर, कच्चे तेल काढण्याचे जगात दोन मुख्य प्रकार आहेत, एक जमिनीवरून आणि दुसरे समुद्रातून. आणि ‘जशी खाण, तशी माती’ या न्यायाने, प्रत्येक प्रदेशातून काढलेल्या कच्च्या तेलाची गुणवत्ता वेगळी असते. काहींमध्ये गंधक अधिक असते तर काही अधिक ज्वलनशील असतात. याशिवाय तेल व्यापारी कंपन्यांचा नेहमी कल, कोणत्या प्रदेशातून तेल आयात करणे सोपे आणि ते स्वस्त असेल यानुसार ठरतो.

समुद्रातून काढले जाणारे तेल जहाजांच्या साहाय्याने सहज विकता येते आणि जमिनीतून (अमेरिकेप्रमाणे) काढलेले तेल पाइपलाइन किंवा ट्रकच्या साहाय्याने पाठवावे लागते जे खूप खर्चिक असते. आणि हे सर्व घटक (गुणवत्ता, प्रमाण, तेलाची वाहतूक) लक्षात घेऊनच तेलाची बेंचमार्क किंमत ठरवली जाते. 

म्हणूनच तेल आयात करणारी व्यक्ती, कंपनी किंवा देश तेल खरेदी करण्यापूर्वी या बेंचमार्कच्या आधारे तेल कोठून आयात करायचे हे ठरवतात.

जगभरात प्रामुख्याने 3 कच्च्या तेलाचे बेंचमार्क आहेत. ( Crude Oil Benchmark )

1. ब्रेंट क्रूड ऑइल बेंचमार्क. 

2. WTI बेंचमार्क.

3. दुबई आणि ओमान बेंचमार्क 

आता या सगळ्यांबद्दल एक-एक करून जाणून घेऊया.

1. ब्रेंट क्रूड ऑइल बेंचमार्क ( what is Brent Crude)
हे तेल नॉर्वे आणि युनायटेड किंगडम जवळील उत्तर समुद्रातून काढले जाते. या तेलात सल्फरचे प्रमाण जास्त असून त्यापासून डिझेलही चांगले तयार होते. जगभरातील क्रूड करारांपैकी दोन तृतीयांश करार या ब्रेंट क्रूड ऑइल बेंचमार्कमध्ये सेटल केले जातात.

2. WTI बेंचमार्क म्हणजे काय? (what is WTI Crude)
WTI बेंचमार्क असलेले तेल अमेरिकन तेल विहिरींमधून काढले जाते. ते पाइपलाइनद्वारे वाहन नेले जाते. ओक्लाहोमा हे अमेरिकेतील एक राज्य आहे. या ठिकाणी हे तेल साठवले जाते. याचा वापर कमी-सल्फर असलेलं गॅसोलीन आणि कमी-सल्फर असलेलं डिझेल बनवण्यासाठी केला जातो. कमी API गुरुत्वाकर्षणामुळे, कमी सल्फरमुळे ते हलके आणि गोडं असतं.

3. दुबई आणि ओमान बेंचमार्क ( Dubai and Oman benchmark)
अरब देशांमधून काढलेल्या तेलास या बेंचमार्कचा संदर्भ आहे.

ब्रेंट क्रूड ऑइल व डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल बेंचमार्कमध्ये काय फरक? (Difference in Brent Crude Oil and WTI Benchmark )

1. ब्रेंट क्रूड तेल नॉर्वे आणि युनायटेड किंगडम जवळील उत्तर समुद्रातून काढले जाते तर अमेरिकन तेल विहिरींमधून काढल्या जाणाऱ्या तेलास WTI बेंचमार्क तेल म्हणतात.

2. ब्रेंट क्रूडची किंमत ही ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) द्वारे ठरणारी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किंमत आहे, तर WTI क्रूडची किंमत यूएस म्हणजेच अमेरिकन तेलाच्या किमतींसाठी बेंचमार्क आहे.

3. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्सचा व्यापार प्रामुख्याने लंडनमधील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE) वर केला जातो, तर WTI फ्युचर्सचा व्यापार न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्सचेंज (NYMEX) वर होतो.

4.जगभरातील क्रूड करारांपैकी दोन तृतीयांश करार या ब्रेंट क्रूड ऑइल बेंचमार्कमध्ये सेटल केले जातात, तर WTI चा व्यापार मुख्यत्वे फक्त यूएसमध्ये केला जातो. म्हणजेच ब्रेंट क्रूड तेलाची बाजारपेठ WTI पेक्षा खूप मोठी आहे.

5. ब्रेंट क्रूडसाठी शिपिंग खर्च कमी आहे कारण ते थेट समुद्रातून काढले जाते जेथून ते सहजपणे जहाजांवर लोड केले जाऊ शकते आणि विविध विक्री बिंदूंवर पाठवले जाऊ शकते. तर WTI साठी शिपिंग खर्च जास्त आहे कारण ते पाइपलाइनद्वारे कशिंग, ओक्लाहोमा अशा ठिकाणी नेऊन साठवावे लागते. आणि त्यानंतर तेथून ते व्यापाऱ्यांना आयात करावे लागते, जे खूप खर्चिक आहे.

आम्हाला आशा आहे कि खनिज तेलाबद्दलच्या विविध संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील. माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *