महिन्याभरात दुप्पटीने वाढला हा शेअर.
शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर कधी किती वर जाईल आणि कोणता कशी आपटी घेईल हे छातीठोकपणे सांगता येत नाही.याची आठवण आता पुन्हा नव्याने करून देण्याचं निमित्त म्हणजे नुकताच एक शेअर गेल्या महिन्याभराच्या काळात दुपटीने वाढला आहे.आणि स्टॉक मार्केट मध्ये होणार्या अशा घडामोडी आता मराठी भाषेतही ( share market in marathi ) उपलब्ध होऊ लागल्यामुळे.
या कंपनीने केली दिला दुप्पट परतावा ( Telecom Stock has zoomed over 100%)
या कंपनीचे नाव आहे हिमाचल फ्युचरीस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड अर्थात HFCL. हि कंपनी टेलिकॉम क्षेत्रातील उत्पादने निर्मिती आणि सेवा पुरवठादार म्हणून ओळखली जाते.उदाहरणार्थ आयएसपी आणि तत्सम तांत्रिक सेवा तसेच ऑप्टीकल फायबर केबलसारखी उत्पादने.
आता आपण जाऊया जवळपास एक महिना मागे म्हणजे 22 एप्रिल 2021 रोजी. या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत रु.24.20 वर बंद झाली आणि आता बरोबर महिन्याभराने म्हणजे 21 मे रोजी 2021 याच शेअरचा बंद दर होता रु.49.10 जो मागील 13 वर्षांच्या कालावधीतील सर्वोच्च दर आहे. म्हणजे फक्त महिनाभराच्या कालावधीत शेअरची किंमत दुपटीहून जास्त झाली. शेअरचा आजचा बंद दर होता रु.44 .
पण असं काय झालं कि कंपनीच्या शेअरने इतकी उसळी घेतली ? stock that doubled in a month
तर त्याला कारणही तसंच आहे.
कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाबद्दल अपेक्षा चांगल्याच होत्या त्यामुळे या शेअरच्या खरेदीला तसा जोर होताच पण प्रत्यक्ष निकालही ‘न भूतो न भविष्यती’ असाच लागला. मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला करोत्तर नफा ( Profit after Tax ) झाला रु.86.50 कोटींचा.
आता नेहमीप्रमाणे काय केलं जातं ?
तर मागील वर्षी याच कालावधीत म्हणजे YOY (year Over Year ) कंपनीला किती नफा झाला होता याची तुलना केली जाते.
तर मागील वर्षी कंपनीचा करोत्तर नफा होता रु.8.7 कोटी. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. रुपये आठ कोटी सत्तर लाख. म्हणजे यंदा कंपनीच्या नफ्यात जवळपास दहा पटीने वाढ झालेय. मग अशा कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उद्या पडणारच ना. दरम्यान कंपनीच्या उत्पन्नातही दुपटीने वाढ झालेय.
सदर वृत्त हे कोणतीही गुंतवणूक शिफारस नसूनशेअर बाजारातील अशा घडामोडी मराठी भाषेत उपलब्ध करून देणे (share market in marathi) इतकाच उद्देश या मागे आहे याची नोंद घ्यावी.तर मित्रांनो हि माहिती होती आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगरचा अनुभव देणाऱ्या या कंपनीची. अर्थात तिमाही निकाल हा एकमेव निकष नसतो हे सुद्धा आम्ही नमूद करतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.