what is portfolio management service in marathi what is portfolio management service in marathi

शेअर मार्केटशी संबंधित घडामोडींबद्द्दल वाचताना ऐकताना परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (FII ) देशी संस्थात्मक गुंतवणूकदार (DII ) , म्युच्युअल फंड्स याच बरोबर अनेकदा पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) बद्दल ऐकायला मिळतं. तर नक्की पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) म्हणजे नक्की काय हे आज जाणून घेऊया. (what is portfolio management service in marathi)

ज्यांना इक्विटीमध्ये थेट गुंतवणूक करणे परवडत नाही त्यांच्यासाठी पर्याय असतात ते म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) यांचे. पण आता म्युच्युअल फंड आणि पीएमएसमध्ये फरक काय ? पीएमएसचे स्वरूप काय हे पाहूया. (difference between pms and mutual fund)

ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये स्वतः ट्रेडिंग व्यवहार करायचे नसतात ते एकतर मार्केटमध्ये पद्धतशीरपणे दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतात किंवा हीच गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करू शकतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता किंवा हि गुंतवणूक स्वतःही करू शकता.

पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा एक कस्टमाइज्ड गुंतवणूक पोर्टफोलिओ सेवा आहे जी विशेषतः गुंतवणुकीची मोठी क्षमता असणाऱ्यांसाठी असते. पीएमएसद्वारे गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे किमान 50 लाख रुपये असणे आवश्यक आहे. यामध्ये व्यावसायिक मनी मॅनेजर तुमच्या टार्गेटनुसार पोर्टफोलिओ तयार करतात. पीएमएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते आणि डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे.

डिस्क्रीशनरी, नॉन-डिस्क्रीशनरी, एडवाइझरी हे पीएमएसचे तीन प्रकार आहेत. तुमच्या पीएमएस फंडाचे व्यवस्थापन करू देण्यासाठी तुम्हाला तुमच्या फंड मॅनेजरला ‘पॉवर ऑफ एटर्नी’ द्यावी लागते. यामध्ये ठराविक रकमेव्यतिरिक्त, तुमच्या फंड मॅनेजरला रिटर्नवर आधारित कमिशन देखील मिळते.

पीएमएस अशा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी बऱ्यापैकी पैसे आहेत परंतु त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेची आणि कौशल्याची कमतरता आहे.

या क्षेत्रातील विश्लेषकांच्या नुसार गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडाच्या तुलनेत पीएमएस मधून 2 ते 2.5 टक्के जास्त परताव्याची अपेक्षा केली पाहिजे. सर्वसाधारणतः म्युच्युअल फंडातील फंड व्यवस्थापक गुंतवणूकदाराकडून योजनेच्या खर्चाच्या प्रमाणाच्या 0.5 टक्के ते सुमारे 2.5 टक्के शुल्क आकारतात.पीएमएसच्या बाबतीत, व्यवहार मूल्याच्या सुमारे 2 ते 2.5 टक्के शुल्क आकारले जाते, जे स्टॉकच्या खरेदी आणि विक्रीसाठी (मग गुंतवणूकदाराला नफा होवो किंवा तोटा) दोन्हीसाठी लागू आहे.

सेबी नोंदणीकृत पोर्टफोलिओ मॅनेजर्सची यादी इथे क्लिक करून पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *