ओदिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि विमा कवचाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण लांब पल्ल्याच्या रल्वे प्रवासासाठी रेल्वेकडून आधीच उपलब्ध असलेल्या एका विमा योजनेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.(IRCTC Travel insurance in marathi)
दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला या प्रवासादरम्यान लागू असणाऱ्या ऐच्छिक विम्याबद्दल विचारण्यात येतं. केवळ 35 पैसे प्रीमिअम असणारा हा विमा अनेकजण नाकारतात. खरं तर असं करू नये. कारण अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या विम्याचे लाभ आणि वैशिष्ट्ये कोणते हे पाहूया .
विम्यात कोणत्या जोखिमी समाविष्ट ( what is covered in IRCTC Travel Insurance )
अपघाती मृत्यू | ₹10 लाख |
कायमचे अपंगत्व | ₹10 लाख |
कायमचे अंशिक अपंगत्व | ₹7.5 लाख |
जखमींना रुग्णालयातील खर्चापोटी | ₹2 लाख |
मृतावशेषांच्या वाहतूक खर्चापोटी | ₹10 हजार |
काही महत्वाच्या बाबी. ( Info about IRCTC Insurance )
- विमा फक्त भारतीय नागरिकांसाठी.
- विमा केवळ ऑनलाईन तिकीट बुकिंगवर.
- विमा सध्या ऐच्छिक.
- प्रीमियम 35पैसे प्रति व्यक्ती.
- केवळ कन्फर्म्ड, आरएसी व अंशतः कन्फर्म्ड तिकिटांसाठी वैध. 2016 मध्ये IRCTC कडून सुरु करण्यात आलेली हि विमा योजना प्रवाशांना अपघात, दहशतवादी हल्ला, दरोड्यासारख्या घटनांत विमाकवच प्रदान करते.
सध्या ऐच्छिक असणारा हा विमा बंधनकारक करावा तसेच हा विमा प्रवाशांच्या 5 वर्षाखालील मुलांना,ऑफलाईन अर्थात स्थानकांवर रांगा लावून तिकीट आरक्षित करू पाहणारे तसेच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना सुद्धा लागू करावा.अशी विनंती ट्विटरद्वारे आम्ही आयआरसीटीसी (@IRCTC) आणि अश्विनी वैष्णव (@AshwiniVaishnaw) यांना करतो.