what is Sovereign Gold Bond in marathi what is Sovereign Gold Bond in marathi 

सॉवरेन गोल्ड बॉन्ड : किती फायद्याचं ?
what is Sovereign Gold Bond in marathi 

सोन्यात गुंतवणूक करण्याचे चार मार्ग आहेत,

  • पारंपारिक पद्धतीने दागिने, नाणी वगैरे स्वरुपात खरेदी
  • डिजिटल पद्धतीने, म्हणजेच अगदी पेटीएम, फोन पे सारख्या पेमेंट एप्सवरून युपीआय पद्धतीने.
  • ईटीएफ (ETF) म्हणजेच एक्चेंसज ट्रेडेड फंड्सच्या माध्यमातून म्हणजेच गोल्ड बीज (Gold Bees ) मधील गुंतवणूक. 
  • इ-गोल्ड
  • सॉवरेन गोल्ड बॉन्ड : (what is Sovereign Gold Bond in marathi )
 

आज आपण पाचव्या पर्यायाबद्दल थोडक्यात समजून घेणार आहोत.

 
 
सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा एक सरकारकडून आणला गेलेला गुंतवणूक पर्याय आहे जो सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेकडून सादर केला जातो. या आर्थिक वर्षासाठी म्हणजे वर्ष 2021 -22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या पहिल्या योजनेची (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 -Series I) विक्री 17 मे पासून सुरु झाली आहेआणि ज्यात गुंतवणूक करण्यासाठी मुदत 21 मे पर्यंत असेल.
 
या योजनेत इश्यू किंमत रु.4,777 हि ठरवण्यात आली आहे म्हणजेच 10 ग्राम सोन्याचे मूल्य इथे रु. 47,770 इतके असेल.
 
योजनेची वैशिष्ट्ये अर्थात फायदे.
 
सॉवरेन गोल्ड बॉन्ड मध्ये प्रत्येक वर्षासाठी व्याजदर निश्चित केला जातो जो अर्धवार्षिक म्हणजेच सहामाही आधारावर गुंतवणूकदाराला मिळतो. यावर्षासाठी व्याजदर 2.5 % वार्षिक इतका असेल. यातून मिळणारं उत्पन्न उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांमध्ये धरले जाते.
 
फिजिकल म्हणजेच दागिने, नाण्यांप्रमाणे या सोन्यास सुरक्षित ठेवण्याची जोखीम नसते कारण सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे पेपर गोल्ड स्वरुपात असते. बॉंड प्रमाणपत्र तुम्ही इतर कागदपत्रांप्रमाणे ठेवू शकता आणि तशीही रिझर्व्ह बँकेकडे त्याची नोंद असतेच.
 
सॉवरेन गोल्ड बॉन्डमधून मिळणारे व्याज हे उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांमध्ये धरले जाते आणि त्यामुळे करआकारणी सुद्धा त्याच अनुषंगाने होते. बॉन्डच्या खरेदीस आठ वर्ष पूर्ण झाल्यावर मिळालेला परतावा करमुक्त असतो परंतु जर गुंतवणूकदाराने हा कालावधी पूर्ण न करता मध्येच गुंतवणूक मोडल्यास मात्र वेगळा कर नियम लागू होतो.
 
सॉवरेन गोल्ड बॉन्ड संयुक्तरित्यासुद्धा खरेदी करता येतं आणि तसेच पालक आपल्या मुलांच्या नावेसुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
 
सॉवरेन गोल्ड बॉन्ड गहाण ठेवून कर्ज मिळविण्याचा पर्यायसुद्धा गुंतवणूकदारास असतो. इतकंच काय तर बॉन्ड स्टॉक एक्सचेंजवरसुद्धा व्यवहार करता येण्याजोगे आहेत पण हि सुविधा बॉंड प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत वापरता येते.
 
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये दागिन्यांप्रमाणे जीएसटी (GST ) आणि घडणावळ (Making Charges ) चा प्रश्नच उपस्थित होत नाही.कारण जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता म्हणजेच जेव्हा फिजिकल पद्धतीने सोने घेता त्यावेळी हि शुल्के तुम्हाला भरावी लागतात म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सोन्याची किंमत त्यावेळी तुम्हाला जास्त मोजावी लागते पण सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये तसं नाहीये.आणि दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल खात्री वगैरे करण्याचा प्रकारही इथे नाही त्यामुळे गुंतवणूकदार पूर्णपणे निश्चित असतो.
 

ऑनलाईन खरेदीवर आहे सूट. ( Discount on Sovereign Gold Bond ) 

 
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करताना जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करत असाल तर तुम्हाला रु.50 प्रतीग्राम सूट मिळते म्हणजे या गुंतवणूकदारांना इतरांप्रमाणे प्रती ग्रामसाठी रु.4,777 च्या ऐवजी रु.4,727 मोजावे लागतील.
 
( सदर लेख माहितीकरिता असून गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *