How to get learning Driving Licence in Maharashtra : लर्निंग लायसन्स घरातून ऑनलाईन पद्धतीने कसे काढाल ? असं आता इंटरनेट वर सर्च करण्याची किंवा कुणाला विचारण्याची गरज नाही कारण आता शिकाऊ वाहन परवाना ( Get learning driving Licence online at home) घरातूनच मिळवता येणार आहे. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले आहे.

शिकाऊ वाहन परवाना मिळवणे हे एके काळी दिव्यच असायचं. म्हणजे एकतर एजंट ला पकडा किंवा मग मनाची तयारी करून या खिडकी वरून त्या खिडकी वर फेऱ्या मारा. पण यामध्ये कालानुरूप बदल होत गेले आणि आता तर शिकाऊ वाहन परवाना ( Learning Driving licence Online )मिळवणे अगदी एका क्लिकवर आलेले आहे.

कशा प्रकारे काढाल लर्निंग लायसन्स ? How to get Learning Driving Licence online in Maharashtra in Marathi.

सर्वप्रथम इथे क्लिक करून परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर स्क्रोल डाऊन करून आपल्या राज्याचा पर्याय निवडा.

त्यानंतर समोर येणाऱ्या पर्यायांमध्ये पहिलाच पर्याय शिकाऊ वाहन परवान्याचा (Apply for Learning licence) असेल.

यानंतर पुढील टप्प्यांत तुम्हाला शिकाऊ वाहन परवान्यासाठी अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम डाव्या बाजूकडील “अर्जदार कोणताही लायसन्स धारण करत नाही” (Applicant Does not hold any Learner licence ) हा पर्याय निवडून उजव्या बाजूस General हा पर्याय निवडावा.

यानंतर आपली ओळख पटविण्यासाठी ( Authentication ) चे दोन पर्याय तुमच्या समोर असतील. पहिला, आधार प्रणालीच्या साह्याने (Submit Via Aadhaar Authentication) आणि दुसरा आधार प्रणाली शिवाय (Submit without Aadhaar Authentication) यामधील जर पहिला पर्याय तुम्ही निवडता तर तुम्हाला वाहन चालकाच्या लर्निंग टेस्ट आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी आरटीओ (RTO ) केंद्राला भेट द्यावी लागणार नाही. तुम्हाला एक एप्लीकेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल ज्याच्या साह्याने तुम्ही लर्निंग टेस्ट ऑनलाइन पद्धतीने देऊन आपले लर्निंग लायसन्स घरबसल्या प्राप्त करू शकता.

पण लक्षात घ्या, याकरिता तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधारला जोडलेला असला पाहिजे

आधार द्वारे पडताळणी पर्याय स्वीकारल्यास फॉर्ममध्ये आपली प्राथमिक माहिती भरलेली समोर येते ती आपण तपासून घ्यावी. त्यानंतर आपल्या विभागानुसार RTO केंद्र निवडावे. तसेच आपल्याला दुचाकी कि चारचाकी वाहन परवाना हवाय ते निवडावे.गाडी स्वतः शिकलात कि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ? हि माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. मग फॉर्म क्रमांक एक सबमिट करायचे.

आता तुमच्या समोर फॉर्म क्रमांक एक उघडला गेला असेल त्यामध्ये तुमच्यात काही शारीरिक मर्यादा वगैरे आहेत का या संदर्भात प्रश्न विचारले गेले असतील आणि त्यानुसार तुम्हाला ती माहिती इथे हो / नाही (Yes / No ) या पर्यायांमध्ये टिक करून द्यायची आहे.

आता तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज प्राप्त झाल्याचं स्क्रीनवर दिसेल.त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म आणि Acknowledgement अशा दोन्ही कॉपीज तुम्ही प्रिंट किंवा सेव्ह करून घ्याव्यात. या नंतर पुढील स्क्रीनवर तुम्हला फॉर्म क्रमांक 1 दिसेल. तुम्हाला त्याचीही प्रिंट घ्यायची आहे.

यानंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या पाच टप्प्यांपैकी फक्त दोनच टप्पे पूर्ण करायचे आहेत ते म्हणजे फोटो आणि सही अपलोड करणे ( Upload Photo ) आणि फी भरणे ( Fees Payment ). प्रोसिड पर्यायावर क्लिक करून तुम्ही सुरवात करू शकाल.पण आधीच आधार पर्यायाद्वारे तुमचं व्हेरीफिकेशन झालं असल्याने फोटो समोर आलेला असेल त्यामुळे तुम्हाला आता फक्त स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

हे केल्यानंतर तुम्हाला फक्त फी पेमेंट करावे लागेल जी दुचाकीसाठी रुपये 200 च्या आसपास आहे व ती तुम्ही ऑनलाइन पद्धतीने भरू शकाल. लक्षात घ्या इथे पेमेंट गेट वे एसबीआय असलं तरी तुम्हाला फी भरण्यासाठी डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड आणि अगदी युपीआयचे पर्याय उपलब्ध असतील. फी भरल्यावर समोर येणारी पावती सेव्ह करावी किंवा प्रिंट घ्यावी.

ऑनलाईन टेस्ट आणि मग लायसन्स ( Online test to get Learning Licence )

आता तुम्हाला शेवटची कृती करायची आहे ती म्हणजे ऑनलाइन पद्धतीने टेस्ट द्यायची आहे. या आधी एक छोटासा माहितीपर व्हिडीओ क्लीप तुम्हाला पहावी लागेल. आणि त्यानंतर click here for learner licence test या पर्यायवर क्लीच्क करून टेस्ट साठी सुरवात करावी. लक्षात घ्या या टेस्ट मध्ये तुम्हाला 60 % गुण मिळवायचे आहेत. व्हिडीओ नीट पहिला असल्यास तसेच वाहन चालविण्या संदर्भातील नियमांची बऱ्यापैकी माहिती असल्यास हि टेस्ट काहीच कठीण नाही.

तर अशा प्रकारे तुम्ही लर्निंग लायसन्स घरातून ऑनलाईन (online learning driving licence ) पद्धतीने काढू शकाल. व लर्निंग लायसन्स घरातून ऑनलाईन पद्धतीने कसे काढाल ? (How to get learning Driving Licence in Maharashtra )यावर इतरांना सुद्धा मार्गदर्शन करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *