भारतातील युनिकॉर्न कंपन्या
India’s Unicorn startups 

India's Unicorns
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay

युनिकॉर्न कंपन्या म्हणजे अशा नवउद्यमी कंपन्या अर्थात आजच्या भाषेत स्टार्टअप्स ज्यांचं बाजारमूल्य एक बिलियन अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक आहे. 

 
एखाद्या देशातील स्टार्टअप्सच्या संख्येवरून त्या देशातील वातावरण नवीन उद्योग रुजण्यास किती अनुकूल आहे याचा अंदाज बांधता येतो.
 
आजच्या घडीला भारतात एप्रिल 2021 च्या आकडेवारीनुसार 32 युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. यात सर्वाधिक बाजारमूल्य आणि यावर्षी म्हणजे 2021 मध्ये युनिकॉर्न यादीत समावेश झालेल्या अशा दोन भागात समावेश करता येईल. यानुसार यादीतील आघाडीच्या कंपन्या आपण पाहणार आहोत.
 
सर्वाधिक बाजारमूल्य असणाऱ्या युनिकॉर्न कंपन्या.
 

वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजेच PayTM  

भारतात पेमेंट क्षेत्रात सुरवात करणाऱ्या कंपन्यांमधील आघाडीची कंपनी. कंपनीचे बाजारमूल्य 16 बिलिअन डॉलर्स इतके आहे.
 
 
बायजूस ( BYJU’s )
 
यापुढील काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती फोफावणार आहे हे आता काही स्पष्ट झालं आहेच आणि याच बदलत्या काळानुसार योग्य वेळेवर डाव साधणाऱ्या कंपन्यांमध्ये हि कंपनी आघाडीवर आहे. कंपनीचे बाजारमूल्य 13 बिलिअन डॉलर्स इतके आहे.
 

ओयो (OYO ) 

बजेट हॉटेल्स क्षेत्रातील आघाडीचे नाव. ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार तात्पुरत्या निवासासाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असल्यामुळे ग्राहकप्रिय. कंपनीचे बाजारमूल्य 9 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

नॅेशनल स्टॉक एक्स्चेंज ( NSE ) 

औपचारिक ओळख करू देण्याची गरज आहे ? भारतातील सर्वाधिक व्यवहार होणाऱ्या आणि अगदी जगातील आघाडीच्या एक्स्चेंजेसपैकी एक. बाजारमूल्य 6.5 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

ओला कॅब्स (OLA

एप आधारित कॅब सेवा पुरवणारी अगदी कमी कालावधीत नावारूपास आलेली कंपनी. भारतातच नव्हे तर आता आंतराष्ट्रीय पातळीवरही व्यवसाय वाढीस कंपनीकडून सुरवात. कंपनीने लंडन सारख्या शहरातही सेवा देण्यास सुरवात केली आहे.कंपनीचे बाजारमूल्य 9 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

झोमॅटो (Zomato

फूड डिलेव्हरी क्षेत्रातील आजचे सर्वांच्या मुखी असलेले नाव. आसपासच्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून आपले आवडीचे खाद्यपदार्थ काही मिनिटांत घरपोच आणि त्यावर बरेचदा कॅशबॅक सारख्या ऑफर्ससुद्धा. कंपनीचे बाजारमूल्य 5.4 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

ड्रीम इलेवन ( Dream 11

भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात असं काही चाललं नसतं तरच नवल. स्वताच्या आवडीची टीम बनवा आणि त्यानुसार मग आभासी मॅच खेळली जावून पुढे बक्षिसे मिळविण्याची सुद्धा संधी. कंपनीचे बाजारमूल्य 5 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

स्विगी (Swiggy )

पुन्हा एकदा फूड डिलेव्हरी क्षेत्र. भारतात या क्षेत्रात दोन ( स्विगी, झोमॅटो) कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होऊ लागलेय असं म्हटल्यास अतिशयोक्ती नसेल. स्विगीचे बाजारमूल्य 5 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

वर्ष 2021 मध्ये या यादीत समावेश झालेल्या काही चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्या.
 

क्रेड ( CRED

चमकदार अशी कल्पना घेऊन आलेलं हे फिन्टेक क्षेत्रातील हे एप. जर तुमच्याकडे क्रेडीट कार्ड असेल तर हे एप तुमच्या मोबाईल मध्ये हवंच. क्रेडीट कार्ड एक असो वा अनेक, सर्वांचे देयक, त्यात काही लपलेले शुल्क असतील तर त्याची माहिती हे एप तुम्हाला देतंच पण त्यासोबतच क्रेडीट कार्डच्या बिल पेमेंट त्वरित करून काही सेकंदात ते पूर्ण होण्याची सोय. त्यावर कॅशबॅक सारख्या ऑफर्ससुद्धा. कंपनीचे बाजारमूल्य 2.2 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

या लिंकवरून हे एप डाऊनलोड केल्यास पहिल्या क्रेडीट कार्ड बिल पेमेंट नंतर रु.500 कॅशबॅक मिळवता येईल.  

 

मीशो (Meeshow )

आयआयटी दिल्ली पदवीधारांना सुचलेली एक चमकदार कल्पना. समाज माध्यमांवरून सुरु करता येईल असे ई-कॉमर्स प्रकारातील हि संकल्पना. म्हणजे अगदी फेसबुक , व्हॉट्सएप, इंस्टाग्राम सारख्या माध्यामांवरून उत्पादने विकता येतील आणि ज्याद्वारे अगदी सर्वसामान्यांना कमाई करता येईल. कंपनीचे बाजारमूल्य 2.1 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

शेअरचाट (ShareChat )

बंगळूरू स्थित कंपनीकडून आणले गेलेलं हे समाज माध्यमाधारित एप. नेहमीसारखंच पण शेअर करण्यासाठी जास्त मसाला या एपने देऊ केलाय. त्यामुळे तरुणांमध्ये जास्त क्रेझ असणारं. कंपनीचे बाजारमूल्य 2.1 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

डिजीट इन्श्युरन्स ( DIGIT ) 

नॉन-लाइफ विमा क्षेत्रातील नवा खेळाडू. कोरोनासारख्या आपत्तीमुळे तसंही सर्वसामन्यांचा विमा घेण्याकडे कल वाढलेला आहेच, त्यात सरकारनेही या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून या क्षेत्रास आणखी वाव करून दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या नव्या स्पर्धकांची संख्या वाढू लागलेय त्यातीलच हे एक नाव. आजकाल कोणत्याही एका कंपनीची विमा उत्पादने विकण्यापेक्षा अनेकजण POSP (Point of Salesperson) बनून सुद्धा कमाई करू इच्छितात. अशांना डिजीट हि संधी सुद्धा उपलब्ध करून देते. कंपनीचे बाजारमूल्य 1.9 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स ( Five Star Business Finance )

वित्तीय सेवा पुरवणारी नॉन बँकिंग संस्था. कर्ज, तारण इत्यादी सेवा देणारी वित्तीय संस्था. व्यावसायिक कर्ज यांचे मुख्य वित्तीय उत्पादन आहे. कंपनीचे बाजारमूल्य 1.4 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

गपशप ( GupShup )

मेसेजिंग सेवा पुरवणारी आणि अलोकडेच टायगर ग्लोबलकडून 100 मिलिअन डॉलर्सची गुंतवणूक मिळवल्यामुळे चर्चेत असलेलं स्टार्टअप. कंपनीचे बाजारमूल्य 1.9 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

इन्फ्रा मार्केट (Infra Market )

बांधकाम, पायाभूत सेवा उभारणी क्षेत्राशी संबंधित आणि त्या अनुषंगाने सेवा पुरवणारी हो कंपनी फारच कमी कालावधीत पुढे आली आहे. कंपनीचे बाजारमूल्य 1 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

 

ग्रो (Groww)

अत्यंत नवीन पण जोमाने पुढे येत असलेली फिन्टेक कंपनी. भांडवली बाजार आणि त्यासंबंधित वित्तीय सेवा व उत्पादने या कंपनीकडून पुरवल्या जातात. कंपनीचे बाजारमूल्य 1 बिलिअन डॉलर्स इतके आहे.

India's Unicorn
मित्रांनो या होत्या भारतातील आघाडीच्या आणि युनिकॉर्न या संज्ञेत समाविष्ट झालेल्या स्टार्टअप्स म्हणजेच नवउद्यमी कंपन्या. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

 

2 thoughts on “या आहेत भारतातील आघाडीच्या युनिकॉर्न कंपन्या.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *