एथेरीयम या क्रिप्टोचलनाच्या सहनिर्मात्याकडून भारताला जवळपास ₹ 8300 कोटींची मदत.
(Vitalik Buterin donates $1.3 Billion to India Covid relief)

Vitalik Buterin donates $१.3 Billion to India Covid relief
Image : prokerala.com
एथेरीयम या क्रिप्टोचलनाचा सहनिर्माता वितालिक बुटेरीन ( Vitalik Buterin ) याने भारताला कोरोना विरुद्धच्या लढाईत 1.14 बिलिअन डॉलर्सची (भारतीय चलनात जवळपास  8300 कोटीं रुपये ) मदत दिल्याचे फोर्ब्सचे वृत्त आहे. परंतु त्याने हि मदत थेट डॉलर्समध्ये न देता सध्या गाजत असलेल्या शिबा इनू कॉइन्सच्या (Shiba Inu Coin ) माध्यमातून दिली आहे जे कॉइन्स त्याला शिबा इनू कॉइन्सच्या निर्मात्यांकडून बक्षीस म्हणून मिळाले होते.डॉजकॉइन्स (DogeCoin ) मध्ये आलेल्या रॅलीच्या दरम्यान शिबा इनू कॉइन्समध्ये सुद्धा जबरदस्त तेजी दिसून आली होती.
 
अवघा २७ वर्ष वय असलेला वितालिक बुटेरीन फक्त दोन आठवड्यांच्या काळात जगातील सर्वात तरुण क्रिप्टोचलन निर्माता असलेला अब्जाधीश म्हणून समोर आलाय.
 
फोर्ब्जच्या वृत्तानुसार बुटेरीनकडून सदर मदत 12 मे रोजी इंडिया कोविड रिलीफ फंदात थेट एकाच व्यवहारामार्फत पाठवण्यात आले.या फंडाची स्थापना माहिती तंत्रज्ञान उद्योजक संदीप नेलवाल यांनी केली आहे आणि बुटेरीनकडून आलेल्या मदतीनंतर त्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

Thanks @VitalikButerin

One thing we have learnt from Ethereum and @VitalikButerin is importance of community

We will not do anything which hurts any community specially the retail community involved with $SHIB

We will act responsibly!

Plz dont worry $SHIB holders. https://t.co/M4GxTR0JAn

— Sandeep – Polygon(prev Matic Network) (@sandeepnailwal) May 12, 2021

गंमतीची बाब म्हणजे भारतात क्रिप्टोचलनावर बंदी आणली जाणार कि नाही यावर अटकळ व्यक्त केली जात असतानाच भारताला सर्वात जास्त मिळालेल्या मदतींपैकी मिळालेली हि मदत क्रिप्टोचलनातून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *