Alphabet : Google parent companyAlphabet : Google parent company

Which is Googles Parent Company – उपकंपन्यांच्या नंतर अस्तित्वात आलेली पॅरेंट कंपनी.

 
which is googles parent company : बरेचदा आपण वाचतो, ऐकतो कि अमुक एक कंपनी अशी उभारली गेली, कंपनीचा पसारा असा वाढला त्यानंतर उपकंपन्या स्थापित झाल्या आणि मग हि मूळ कंपनी कशाप्रकारे त्या अनेक कंपन्यांची मातृसंस्था म्हणजेच आजच्या कॉर्पोरेट भाषेत ‘पॅरेंट कंपनी’ म्हणून ओळखली जाते वगैरे. 
 
आज यशोशिखरावर असलेल्या अनेक कंपन्यांचा प्रवास असा नेहमीच्या मार्गाने झालेला असतो. पण आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जीचा प्रवास थोडा उलट आहे. ज्यावेळी हि पालक कंपनी अस्तित्वात आली त्यावेळी या कंपनीची उपकंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणून गणली जाऊ लागली होती आणि आजही आहेच. हे म्हणजे मुलगा स्वतः शिकून मोठा होऊन कमावता झाला असताना त्याला आई-बाबा मिळण्यासारखं. 
या कंपनीची ओळख इथेच संपणार नाहीये तिचं वेगळेपण, आकार याबद्दल आपण बोलणार आहोत.

हि कंपनी आहे अल्फाबेट. ( ALPHABET Inc.)

 
अल्फाबेट हि आजची टेक जायन्ट समजली जाणाऱ्या गुगलची “पॅरेंट कंपनी”. गुगलबद्दल काही औपचारिक असं सांगायची गरज आहे असं वाटत नाही कारण आजच्या नेट सॅव्ही पिढीचं अवघं आयुष्य गुगलनं व्यापलंय.
 

तर अल्फाबेटबद्दल.. (About Alphabet Inc in marathi ) 

 
स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी असणाऱ्या लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन या दोन युवकांनी 1998 गुगलची सुरवात केली. मजल-दरमजल करत नव्या संकल्पनांसह नव्या कंपन्या सुरु करत तर कधी इतरांनी सुरु केलेल्या कंपन्या आपल्या पंखाखाली घेत गुगल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. गुगलचा स्वताचा पसारा मोठा होताच पण त्या सोबत आपल्या इतर उपकंपन्यांच्या कारभाराकडे सुद्धा तीस लक्ष द्यावं लागत होतं.
आणि मग यातून एका मातृसंस्थेची गरज निर्माण झाली. त्यानुसार  अल्फाबेटची संकल्पना पुढे आली जिच्या छत्रछायेत या इतर कंपन्या येतील आणि त्यांचं  व्यवस्थापन करणे सुलभ होईल. कोणत्याही नव्या प्रकल्पाची, कामाची निश्चिती झाल्यावर ठरवू, मिटिंग घेऊ वगैरे गोष्टीत  फालतू वेळ न दवडता प्रत्यक्ष एक्शनला महत्व देणाऱ्या लॅरी व सर्गेइ या दोघांनी अखेर 2015 अल्फाबेट या कंपनीची स्थापना केली.

यामुळे झालं काय..

या आधी आपल्या कामासंदर्भात , नवीन प्रोजेक्टसंदर्भात गुगलला रिपोर्टिंग करणाऱ्या Google Fiber, Loon, CapitalG, Calico, DeepMind, GV, X, Jigsaw, Makani, Sidewalk Labs, Verily, Waymo, Wing आदी कंपन्या यानंतर गुगल ऐवजी अल्फाबेटला रिपोर्ट करू लागल्या आणि अर्थात गुगलचे रिपोर्टिंगसुद्धा अल्फाबेटला होऊ लागले. स्टॉक मार्केटमध्ये गुगल नावाने सूचीबद्ध असलेले शेअर्स आता अल्फाबेटचे झाले.

 
Alphabet Google

 

 
आता गुगलवरील भार कमी होऊन तिचं मुख्य काम इंटरनेट आधारित सेवा पुरवणे हे राहिलं. अल्फाबेट स्थापन करून लॅरी पेज आणि सर्गेइ ब्रिन यांनी गुगलमधील आपल्या जबाबदाऱ्यांवरून बाजूला होऊन ते दोघे अल्फाबेटकडे पूर्णवेळ लक्ष देऊ लागले आणि गुगलची जबाबदारी सुंदर पिचाई या प्रतिभावान तरुणाकडे सोपवली. इतकंच काय पुढे 2019 मध्ये अल्फाबेटची जबाबदारीही सुंदर यांच्याकडे सोपवण्यात आली.
 
अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला , मुळाक्षरे म्हणजे नावातूनच या कंपनीचे मुख्यत्त्व सुचवण्यात आलेलं आहे. तुम्ही जर अल्फाबेटचे संकेत स्थळ पाहाल तर यातही तुम्हाला वेगळेपण लक्षात येईल.
 

अल्फाबेटचे संकेतस्थळ (Website Of Alphabet Inc) : abc.xyz/

 
काही वेगळं नवीन वाटतंय ? यातूनही अक्षरमाला सुचवण्यात आलेय. इंग्रजी वर्णमालेची सुरवात होते ABC ने आणि शेवट XYZ ने. याचा खुबीने वापर करून वेबसाईटच्या प्रत्यक्ष नावात नेहमीप्रमाणे कंपनीचे नाव म्हणजे इथे अल्फाबेट हे न घेता सूचकपणे इंग्रजी वर्णमालेतील सुरवातीची तीन “अल्फाबेट्स” ABC घेण्यात आले आणि त्यापुढे नेहमी सारखे सरधोपट डॉट कॉम डोमेन ऐवजी डॉट XYZ हे डोमेन घेण्यात आले.
 
अल्फाबेटबद्दल काही काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स.
 
  • अल्फाबेट स्वतः कोणतेही उत्पादन बनवत नाही , ना कोणतीही सेवा पुरवत.
 
  • फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार अल्फाबेटचे बाजारमूल्य आहे 1,368 बिलियन डॉलर्स. इंटरनेट आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यामध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण ? अर्थात अमेझॉन.
 
  • अल्फाबेटचे पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची संख्या आहे 1,35,301
 
  • मागील वर्षी कंपनीचा निव्वळ नफा 40.27 मिलियन डॉलर्स इतका सर्वोच्च राहिला आहे.
 
तर हे होतं गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेटबद्दल. माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा. आमचे इतर असेच माहितीपूर्ण  लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
 
*लेखातील इमेजेस इंटरनेटवरून घेण्यात आली आहेत. 
*Images in the posts are taken from internet sources like Wikipedia & other websites.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *