CAGR म्हणजे काय? (What is CAGR in marathi )
शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करणे एक गोष्ट आहे आणि केलेली गुंतवणूक समाधानकारक परतावा देतेय कि नाही हे ओळखणे हि दुसरी. कारण जर तुम्ही केलेली आणि त्यासाठी घेतलेली जोखीम पाहता जर तुम्हला परतावा अगदी मुदत ठेवी सारखा मिळत असेल तर भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीला काही अर्थ राहत नाही. (What is CAGR in marathi)
या क्षेत्रात तुम्ही गुंतवणूक करता , सोबत जोखीम पत्करता , कारण तुम्हाला नेहमीच्या पारंपारिक गुंतवणुकी पेक्षा चांगला परतावा अपेक्षित असतो . मग हा परतावा मोजण्याचे निकष काय आहेत ?
मित्रांनो तेजी- मंदी येतच असतात पण शेअरमार्केटने दीर्घ कालावधीत नेहमी नफाच दिलाय आणि त्यात जर आपण केलेली गुंतवणूक योग्य क्षेत्रात आणि कंपन्यांमध्ये असेल तर त्याचा आपल्याला फायदाही तसाच असतो पण योग्य कंपन्या म्हणजे चांगली कामगिरी करणाऱ्या आणि यापुढेही कायम राखण्याची शक्यता असलेल्या कंपन्या.
गुंतवणुकीच्या बाबतीत भूतकाळातील कामगिरी हि भविष्यकाळातील कामगिरीची शाश्वती नसते असं असलं तरी विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून भूतकाळातील कामगिरीचा वेळोवेळी घेतलेला आढावा.जो आपल्याला त्या क्षेत्राबद्दल, एखाद्या कंपनीबाबत व तिच्या औद्योगिक तसेच आर्थिक भविष्याबाबत अंदाज बांधण्यास मदत करतं.
कारण कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तिची आतापर्यंत कामगिरी कशी राहिली आहे हे आपण पाहतोच.आणि हे पाहताना आपण अनेक निकष लावतो ज्यासाठी बरीच आकडेवारी सुद्धा अभ्यासतो.
असाच एक महत्वाचा निकष म्हणजे CAGR म्हणजेच वार्षिक पद्धतीने परतावा वाढीचा सरासरी दर. कंपनीने आतापर्यंत दिलेला परतावा मोजताना वापरल्या जाणाऱ्या पद्धतीसाठी CAGR चा वापर होतो.
कंपाऊंड एंन्युअल ग्रोथ रेट म्हणजेच म्हणजेच गुंतवणुकीची दरवर्षी सरासरी कोणत्या वेगाने वाढ झाली ?
CAGR कसा मोजतात ? ( How Calculate CAGR ?)
सरासरी म्हटलं तर आपण सोप्या पद्धतीने भागाकार करतो त्यातून आपल्याला एक सरासरी ( एव्हरेज ) मूल्य मिळतं पण CAGR तसं नाही मोजत. आपण एक उदाहरणांने पाहू.
तुम्ही शेअरमार्केटमध्ये एका कंपनीत 100 रुपये गुंतवले आणि दोन वर्षांनी परताव्यासह तुमची गुंतवणूक 121 रुपये झाली तर इथे त्या कंपनीचा CAGR 10 आहे. पण कसा ?
तर इथे असं मानलं जातं कि
100 रुपयांची गुंतवणूक पहिल्या वर्षाअखेरीस 10% दराने 110 झाली आणि त्यानंतर पुढील वर्षी त्याच दरानुसार 110 चे 10% = 11 म्हणून 110 + 11 = 121
म्हणजे इथे या कंपनीचा दोन वर्षासाठी CAGR 10% आहे. अशाच प्रकारे आपण 5, 10, 15 वर्षांसाठी CAGR पाहू शकतो.
लक्षात घ्या वरील स्पष्टीकरण आपण हे उदाहरणादाखल घेतलं आहे म्हणजे CAGR नुसार दोन वर्षांनी झालेलं मूल्य 121 हे पहिल्या वर्षी अगदी 130 राहिलेलंही असू शकतं. आणि नंतर कमी होऊन सरासरी नुसार 121 आलेलं असेल.
तसंच दुसरी शक्यता अशीही की पहिल्या वर्षी परतावा 105 झालं असेल आणि नंतर दुसऱ्या वर्षी वेगाने वाढून 121 झालेलं असेल. तर अशा वेळी लक्षात घ्या कि, CAGR मोजताना नेहमी सुरवातीचे आणि अंतिम मूल्य पाहिलं जातं.
आपली गुंतवणूक एखाद्या मागील कालावधीत कोणत्या वेगाने वाढलेय हे जाणून घेण्याचा CAGR हा उत्तम निकष आहे . कारण इथे पारंपरिक सरासरी ना पाहता त्या-त्या कालावधीत निर्देशांक किंवा क्षेत्राच्या तुलनेत आपल्या गुंतवणुकीने दिलेल्या परताव्याचं विश्लेषण आपल्याला करणे सोपं जातं. लार्ज कॅप कंपन्यांसाठी 5-7 टक्के CAGR समाधानकारक मानला जातो तर स्मॉल कॅप कंपन्यांसाठी तो 15-30 असू शकतो.
तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा CAGR तुम्ही इंटरनेटवर सहजपणे उपलब्ध असलेल्या CAGR कॅल्क्युलेटरद्वारे पडताळून पाहू शकता.
मित्रांनो हे होतं CAGR बद्दल ( What is CAGR) ,माहितीआवडली असेल तर नक्की शेअर करा आणि
याच विषयावरील आमचा खाली दिलेला युट्युब व्हिडीओ आपण पाहू शकता.
धन्यवाद.