त्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची सही नसते. Currency note that doesn’t have governor’s signature on it.
भारताचं चलन आहे रुपया (Rupee) , आपल्या देशाच्या विविधांगी रोमहर्षक अशा इतिहासासारखंच आपल्या या चलनाला पण एक इतिहास आहे. भारताचं चलन रुपया हे संस्कृत मधील “रुप्यकंम” म्हणजे चांदीचे नाणे यावरून घेतले आहे. हे नाव “रुपीया” म्हणून शेरशहा सुरी याने आपल्या कारकिर्दीत चलनात आणले होते. 1540 च्या आसपासच्या काळात शेरशहाने चांदीची नाणी चलनात आणली ज्यांचा वापर पुढे मुघल आणि मराठा साम्राज्यातही होत राहिला.
त्यानंतर पुढे इंग्रजांच्या राजवटीच्या सुरवातीस इसवी सन 1700 चा उत्तरार्ध ते 1800 चा पूर्वार्ध या कालावधीत बँक ऑफ हिंदोस्तान , बँक ऑफ बंगाल आणि बिहार यांच्या स्थापनेसह चलन म्हणून कागदी नोटांचा पर्याय पहिल्यांदा स्वीकारण्यात आला.
पुढे एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली आणि जानेवारी 1938 मध्ये पाच रुपयाची नोट रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणली गेली. तत्पूर्वी बँकेच्या स्थापनेपूर्वी 1917 च्या दरम्यान एक रुपया चलनात आणला गेला होता जो नंतर रद्द करून 1940 मध्ये पुन्हा स्वीकारला गेला. तो पर्यंत एक आणा, दोन आणे हे चलनात चांगलेच रुळले होते.
नोटबंदी यापूर्वीची.. ( History of Demonetisation in india)
चाळीसच्या दशकात भारतीय चलनात अगदी एक हजार , दहा हजार अशा उच्च मूल्याच्या नोटाही होत्या ज्या 1946 मध्ये चलनातून बाद करण्यात आल्या आणि त्यानंतर 1954 मध्ये एक हजार आणि दहा हजार सोबत पाच हजाराच्या मूल्याच्या नोटाही चलनात आणल्या गेल्या. मग जानेवारी 1978 मध्ये काळा पैसा रोखण्यासाठी रु.100 च्या मुल्यावरील सर्व नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या.
दरम्यान 1957 मध्ये 1 रुपया म्हणजे 100 पैसे हि साधी सरळ संकल्पना स्वीकारण्यात आली. पुढे एक रुपया नाण्यासह नोटेमध्येही उपलब्ध होता सोबत तसाच प्रकार पुढे ऐंशीच्या दशकात 2 , 5 आणि दहा रुपयांसोबतही केला गेला.
एक रुपयाची नोट आपण बऱ्याच जणांनी पहिली असेल. काही जणांचा जुन्या नोटा जमवण्याचा छंद वगैरे असतो त्यांच्या संग्रहात एक रुपयाची नोट असतेच. वर्ष 1994 – 95 मध्ये छापण्यास जास्त खर्च येतो म्हणून काही काळ या नोटेची छपाई थांबविण्यात आली होती.
तर असं काय कारण आहे कि हि एक रुपयाची नोट इतर सर्व चलनी नोटांपेक्षा वेगळी ठरते ?
तुमच्या जवळील इतर कोणतीही नोट घ्या आणि शक्य असेल तर एक रुपयाची नोट सुद्धा समोर असुद्या .
आता दोन्ही नोटा समोर ठेवून त्यांच्या मुल्या व्यतिरिक्त त्यात काय फरक जाणवतोय ?
काही लक्षात येतंय ..?
इतर कोणतीही नोट मग अगदी 2 रुपये ते 2 हजार रुपयांची नोट असो , त्यावर “भारतीय रिझर्व्ह बँक” म्हणजेच इंग्रजीत “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया” असं नमूद केलेलं आढळेल पण एक रुपयाच्या नोटेवर तुम्हाला फक्त “भारत सरकार” म्हणजेच “गव्हर्मेंट ऑफ इंडिया” असं नमूद केलेलं लक्षात येईल.
बरं हा झाला एक फरक, दुसरा फरक म्हणजे इतर सर्व चलनी नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची सही असलेली दिसेल आणि सोबत या नोटेस असलेल्या मुल्यास सदर नोट वटली जाण्याची खात्री देणारं एक वचननामा सुद्धा असतो. अर्थात एक रुपयाच्या नोटेवरही सही असते, पण ती असते थेट केंद्रीय अर्थ सचिवांची, पण त्यासोबत हि नोट वटली जाण्यासंदर्भात कोणताही वचननामा नसतो.. असं का ?
तर मित्रांनो यामागचं कारण असं आहे कि ,
या सर्व नोटा मग एक रुपयाची असो किंवा मग दोन हजाराची त्या छापल्या जातात सरकारच्या करन्सी नोट छापखान्यात पण रु.2 ते 2000 या नोटा रिझर्व्ह बँकेच्या वतीने छापल्या जातात तर एक रुपयाची नोट छापली जाते ती खुद्द भारत सरकारसाठी. आणि खुद्द सरकारच्या अधिकारात येणाऱ्या आणि त्यामुळेच या नोटेच्या मुल्यासोबत ते वटविण्यासाठी प्राप्त होणार्या अधिकारासाठी ना कोणत्याही वेगळ्या वचनाची असते आणि सरकारची मालमत्ता या न्यायाने या नोटेवर मग रिझर्व्ह बँकेचं नाव असण्याचा प्रश्नच नाही.
थोडक्यात सोपं करून सांगायचं तर , रिझर्व्ह बँक छापत असणार्या सर्व चलनी नोटा “Fiat” करन्सी म्हणजे ‘तशी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे म्हणून त्यास मूल्य आहे’ अशा प्रकारच्या असतात आणि आपण छापत असणार्या सर्व नोटांसाठी रिझर्व्ह बँकेची जबाबदारी बनत असते. पण एक रुपया हे रिझर्व्ह बँकेसारख्या कोणत्याही संस्थेकडून चलनात न येता खुद्द सरकारकडून आणलं जात असतं त्यामुळे त्याकडे एक जबाबदारी (Liability) म्हणून नव्हे तर मालमत्ता (Assets) म्हणून पाहिलं जातं असतं.
शेवटी एक सुंदर योगायोग सांगतो..
अशी कोणती व्यक्ती आहे जिने अर्थसचिव म्हणून एक रुपयाच्या नोटेवर सही केलेय आणि त्याच बरोबर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून इतर चलनी नोटांवर सुद्धा त्यांची सही राहिलेय..?
येईल सांगता ?
बरं एक क्लू देऊया,
याच व्यक्तीने पुढे देशाचं अर्थमंत्रिपद सुद्धा या व्यक्तीने उत्तम संभाळलंय..
आठवलं ?
चला अगदी फायनल क्लू देतो.. यानंतर उत्तर यायलाच हवं.
पुढे जाऊन याच व्यक्तीने देशाचं पंतप्रधानपदही भूषवलंय..
येस्स ..
डॉक्टर मनमोहन सिंग..
मित्रानो माहिती आवडली असेल तर शेअर कराच.. धन्यवाद.