how to start customer Service centercustomer Service center

How to start CSC Centre ?

आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण बँकिंग संदर्भातील अनेक कामे चुटकी सरशी करू शकतो. पण वीज – इंटरनेट सारखं माध्यम आजही देशातील अनेक भागात उपलब्ध नाही आहे. आणि यामुळेच देशातील अनेक ग्रामीण भागांत आजही बँकिंग सेवा मिळणे दुरापस्त आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने बँकेचे ग्राहक सेवा केंद्र अर्थात Customer Service Point / Customer Service Centre सुरु करण्यास मान्यता दिली आहे. हे केंद्र सुरु करणारी व्यक्ती यामधून बऱ्यापैकी उत्पन्न सुद्धा मिळवू शकते. पण अनेकांना प्रश्न पडतो कि ग्राहक सेवा केंद्र कसं सुरु कराल ? ( How to start CSC Center ?)

ग्राहक सेवा म्हणजे काय ? What is Customer Service Centre ?

ग्राहक सेवा केंद्र म्हणजे बँकेची एक प्रकारे मिनी ब्रांचच असते जिथे अनेक महत्वाच्या सेवा ग्राहकांना पुरवल्या जात असतात. सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत किंवा विविध अनुदान आता थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे धोरण आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचे बँक खाते असावे असा संकेत आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागात CSC ला फारच वाव आहे. तुम्ही तुमच्या पसंतीच्या बँकेचं CSC सुरु करू शकता.

CSP सुरु करण्यासाठी पात्रता. Eligibility to start CSC

जर आपल्याला हे केंद्र आपल्या भागात सुरु करायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे आयआयबीएफ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ज्यानंतर तुम्ही CSP साठी नोंदणी करू शकता. इंडियन इंस्टीट्युट ऑफ बँकिंग अँड फायनान्स कडून घेतली जाणारी एक टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला हे प्रमाणपत्र प्राप्त होते. तसेच तुमचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.तुमच्याकडे 250 – 300 चौरस फूट जागा असावी.एखादे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असणे महत्वाचे.किमान संगणक साक्षरता असावी.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची.

बँक मित्र बनून ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी पुढील बाबी गरजेच्या आहेत.

  • अर्जदाराचा फोटो ( Scanned Copy size 25 to 50 KB) )
  • ओळखीचा पुरावा ( Govt ID ) तसेच पत्त्याचा पुरावा (Address Proof )
  • ज्या ठिकाणी केंद्र सुरु करावयाचे आहेत त्या जागेचे फोटो. (Longitude and latitude photo size 50 to 100 KB)
  • बचत खात्याचा कॅन्सल्ड चेक.
  • सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.
  • आयआयबीएफ प्रमाणपत्र.
  • पॅन कार्ड
  • ना हरकत प्रमाणपत्र. ( जर कुठे काम करत असाल )
CSP अंतर्गत आपण कोणत्या सेवा पुरवू शकतो ? Services offered by CSP

बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु करून आपण खालील सेवा पुरवू शकतो.

  • नवीन खाते उघडणे.
  • खात्यात पैसे जमा करणे.
  • खात्यातून पैसे काढणे.
  • खात्यातून पैसे हस्तांतरण सेवा.
  • खातेदाराचा कर्जाकरिता अर्ज प्रक्रिया पार पडणे.
  • क्रेडीट कार्ड सेवा .
कसं आणि कुठे कराल अर्ज ? Where & How to Apply for CSP ?

ग्राहक सेवा केंद्रासाठी (Customer Service Point) तुम्हाला सर्वप्रथम बाजूला दिलेल्या सीएससी बँकिंग पोर्टलच्या म्हणजेच बँक मित्रच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. bankmitra.csccloud.in इथे भेट दिल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करून उजव्या बाजूकडे बँक मित्र नोंदणीसाठी असलेल्या व्हीएलई नोंदणी (VLE Registration ) वर क्लिक करून न्यू युजर निवडावे. त्यानंतर पुढील सहा टप्प्यात योग्य ती माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून तुम्ही सीएससी बँक मित्र नोंदणी (Registration for CSC Bank Mitra ) पूर्ण करू शकाल. 

बँक मित्र म्हणून नोंदणी झाल्यानंतर तुम्ही CSC मार्फत सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचे CSC म्हणजेच बँक मित्र बनून ग्राहक सेवा केंद्र ( Customer Service Point ) सुरु शकता.

माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *