या शेअर्सच्या किंमती झाल्या महिन्याभरात दुप्पट.
शेअरमार्केट हे क्षेत्र तसं विलक्षण. इथे कधी काय होईल हे छातीठोकपणे सांगता येत नाही. इथे रंकाचा रावही होऊ शकतो आणि रावाचा रंकही. अनेक शेअर्सच्या किंमतीही अगदी कधी रसातळाला जातील आणि काहीं शेअर्स अगदी महिन्या भराच्या काळात दुप्पट तिप्पट परतावा (stocks that doubled in a Month ) सुद्धा देऊन जातील. आज आपण अशाच महिन्याभरात दुप्पट झालेल्या शेअर्स पाहणार आहोत.
खाली देण्यात आलेल्या शेअर्सच्या किंमती मागील महिन्याभराच्या कालावधीत दुप्पट झाल्या आहेत.
- गुडलक इंडिया (Goodluck India) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹112.40 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹260.80
- तिरुपती फोर्ज (Tirupati Forge) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹31 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹70.25
- प्रजय इंजिनिअर सिंडीकेट (Prajay Engineers ) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹11.35 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹23.30
- तमिळनाडू टेलीकम्युनिकेशन (Tamilnadu telecommunications) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹7.11 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत 16.71
- केम्ब्रिज टेक्नोलॉजी एन्टरप्राईजेस (Cambridge Technology) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹ 34.15 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹81.20
- हॉटेल रग्बी (Hotel Rugby ) : 29 जून 2021 रोजी किंमत ₹ 2 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹ 4.45
बरं हे होते शेअर्स ज्यांच्या किंमती महिन्याभरात दुप्पट झाल्या , या पुढे दिलेल्या शेअरची किंमत तर अवघ्या दोन महिन्यात चौपट झालेय. ( This stock gave four times returns in just two months )
- ग्लोब टेक्स्टाईल (Globe Textiles ) : 29 मे 2021 रोजी किंमत ₹ 46.95 आणि 28 जुलै 2021 रोजी किंमत ₹207.25
तर मित्रांनो हा सगळा आकडेवारीचा खेळ पण यातून लक्षात घेण्याची बाब म्हणजे अशा कमी कालावधीत किंमत दुप्पट-तिप्पट होणारे हे शेअर्स बहुतांश करून पेनी स्टॉक्स ( Penny Stocks ) प्रकारातील असतात म्हणजेच अत्यंत कमी किमतीचे आणि त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर व्यवहार करून कृत्रिम तेजी – मंदी आणली जाते यालाच मार्केटच्या भाषेत ऑपरेट करणे असं म्हटलं जातं. त्यामुळेच अशा शेअर्समध्ये आंधळेपणाने गुंतवणूक करणे टाळणे शहाणपणाचे असते.