आज शेअर मार्केटची सुरवात काहीशी नकारात्मकच झाली आणि उत्तरोत्तर घसरण वाढत गेली शेवटच्या तासाभरात मात्र पुन्हा खरेदीचा जोर पाहायला मिळाला ज्यामुळे आजच्या दिवसाची जवळपास पूर्ण भरपाई निर्देशांकांनी केली.
सकाळी निफ्टीची पातळी जी 14597.85 पर्यंत खाली आली होती ती पुढे 14763.90 पर्यंत वर गेली आणि निर्देशांक दिवसाखेरीस 14736.40 वर बंद झाला.
सगळ्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये रीअल्टी (+2.7%) आणि आयटी (1.8%) यांची वाढ सर्वाधिक ठरली आणि याउलट बँकिंग (-1.6%) आणि वित्तीय सेवा (-1.1%) क्षेत्रे सर्वाधिक घटीचे राहिले.
आजचे वधारणारे | फरक |
अदानी पोर्टस | ⏫ 5.2% |
टेक महिंद्रा | ⏫ 2.5% |
ब्रिटानिया | ⏫ 2.5% |
आजचे घसरणारे | फरक |
इंडसइंड बँक | ⏬ 4.2% |
पॉवर ग्रीड | ⏬ 3.3% |
आयसीआयसीआय बँक | ⏬ 2.2% |