कांद्याच्या दरात होणारी वाढ थांबवण्यासाठी 2 लाख टन क्षमतेचा बफर स्टॉक तयार ठेवला जाणार आहे.
सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव लीला नंदन यांनी म्हटले आहे की, कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकार पुढील आर्थिक वर्षात (2021-22) 2 लाख टन कांदा खरेदी करेल.
लीला नंदन यांनी पुढे सांगितले की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये १ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक होता तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये हा आकडा सुमारे 57,000 टन इतका होता.