marathi content writers requiredmarathi content writers required

आम्हाला हवेत ‘कॉन्टेन्ट रायटर्स’ (Marathi Content Writers Required)

लिहिणं जर तुमची आवड असेल. नवनवीन तसेच महत्वपूर्ण माहिती खुसखुशीत आणि रंजक पद्धतीने लिहिण्याची तुमची शैली असेल तर हा लेख तुमच्यासाठीच. कारण इथे तुमच्या लेखनाला व्यासपीठ मिळणार आहेच पण त्याच बरोबर तुमच्या या कौशल्याला आर्थिक दादसुद्धा आम्ही देणार आहोत. म्हणजेच आमच्याकडून प्रकाशित होणाऱ्या तुमच्या लेखासाठी तुम्हाला मानधन मिळणार आहे.

पण अर्थात प्रत्येक उपक्रमाप्रमाणे इथेसुद्धा काही नियम आणि अटीं असणार आहेत, ज्या खालील प्रमाणे आहेत.

लेख पुढील विषयांवरील असावेत. (Subjects for content writing )

१ ) अर्थविषयक माहिती – नवीन आर्थिक घडामोडी – विश्लेषण – गुंतवणूक.

2 ) वित्तसाक्षरता विविध आर्थिक उत्पादने, गुंतवणूक इत्यादी

3 ) एखादा ताजा विषय किंवा घटनेचा आर्थिक पदर उलगडून सांगणारा लेख (अर्थात यासंदर्भातील मुद्द्यास स्थानिक – आंतरराष्ट्रीय असं कोणतंही बंधन नाही ) तसेच काल्पनिक किंवा वास्तवातील कथेच्या माध्यमातून आर्थिक शहाणपण तसेच गुंतवणूकीचे महत्व विषद करण्याचा प्रयत्न सुद्धा उत्तम राहील.

नियम आणि अटीं (Terms & Conditions )

1 ) लेखकाचे मानधन हे प्रती शब्द या निकषावर ठरवले जाईल.

2 ) लेख किमान 600 ते कमाल 800 शब्दांचा असावा. लेख 800 शब्दांपेक्षा मोठा असल्यास मानधन हिशेबात तो कमाल मर्यादा म्हणजे 800 शब्दांचा म्हणूनच विचारात घेतला जाईल.

3 ) लेख वास्तवाला धरून असावा, त्या मध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची अथवा दिशाभूल करणारी नसावी.

4 ) लेखाचे स्वरूप मूळ आणि नवनिर्मित असावे म्हणजेच तो लेख किंवा त्यामधील कोणताही भाग या आधी कुठेही प्रकाशित झालेला नसावा. त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची साहित्य चोरी, वाडःमय चौर्याचा प्रकार नसावा. तसं आढळून आल्यास ती फसवणूक समजली जाईल आणि त्याबाबत ती कारवाई करण्यासोबत सदर लेखकाचे त्यानंतर कोणतेही लेख स्वीकारले जाणार नाही.

5 ) लेख स्वीकारण्या आणि नाकारण्याचे संपूर्ण अधिकार ‘मराठी स्टॉक’ चे असतील तसेच लेख नाकारण्यामागील कारण सांगण्याचे कोणतेही बंधन ‘मराठी स्टॉक’ वर नसेल. लेख न निवडला गेल्यास सदर लेखकास ईमेलद्वारे तसे कळविण्यात येईल.

6 ) महिन्याभरात प्रकाशित झालेल्या लेखांचं मानधन पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणत: 5 ते 7 तारखेपर्यंत थेट आपल्या बँक खात्यावर ( डायरेक्ट ट्रान्स्फर ) जमा केले जाईल.

7 ) ‘मराठी स्टॉक’ वर लेख लेखकाच्या नावानीशी प्रसिद्ध केला जाईल परंतु सदर लेख हा ‘मराठी स्टॉक’ ची मालमत्ता (Copyright of the content) असेल.

8 ) ‘मराठी स्टॉक’ वर आपला प्रकाशित झालेला लेख पुन्हा इतर कोणत्याही व्यासपीठावर प्रकाशित करता येणार नाही.

तर मित्रांनो, वरील नियम आणि अटीं तुम्हाला मान्य असतील आणि वित्त, भांडवली बाजार हि तुमच्या आवडीची क्षेत्र आहेत, त्याच बरोबरीने गुंतवणूक, वित्तसाक्षरता यावर लिखाणाद्वारे व्यक्त होण्याची उर्मी तुमच्यात असेल तर मग उशीर कशाला ? आताच खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *