PowerGrid InvIT चा आयपीओ.

PowerGrid InvIT IPO
पावरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात PowerGrid InvIT चा आयपीओ आज पासून गुंतवणूक करण्यासाठी उघडला गेला आहे आणि त्यासाठी 3 मे पर्यंत अर्ज करता येईल. जवळपास 7,735 कोटी रुपयांचा निधी या आयपीओद्वारे कंपनी जमा करणार आहे.
आयपीओ आणू पाहणारा हा देशातील पहिलाच इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे. IPO चा प्राईज बँड रु.99 – 100 आहे आणि एक लॉट 1100 शेअर्सचा असेल.


पाहूया काय वैशिष्ट्ये आहेत या IPO ची.


  • कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात गुंतवणूक, उभारणी , हाताळणी आणि देखभाल अश्या विविध बाजूंनी कार्यरत आहे.
  • कंपनी यावर्षी म्हणजे जानेवरी 2021 रोजी सेबी नोंदणीकृत झाली आहे.
  • आयपीओद्वारे कंपनी रु.4,993.48 मूल्यांचे शेअर्स वितरीत करणार असून रु.2,741.50 चे शेअर्स ऑफर फोर सेल द्वारे उपलब्ध केले जाणार आहेत.
  • उत्पन्न आणि नफ्याच्या आघाडीवर कंपनीची कामगिरी गेल्या २-३ वर्षात चढी राहिलेली आहे.
  • कंपनीने आपल्या एंकर इन्व्हेस्टर्सकडून या आधीच रु.3,480.74 कोटी जमा केले आहेत.
  • कंपनीच्या एंकर इन्व्हेस्टर्स मध्ये टाटा एआयए लाइफ इन्श्युरन्स, टाटा एआईजी जनरल इंश्योरेंस कंपनी, एसबीआई म्यूचुअल फंड, एचडीएफसी म्यूचुअल फंड, टाटा म्यूचुअल फंड, फिडेलिटी फंड्स, एसबीआई लाइफ इंश्योरेंस कंपनी, यूटीआई एमएफ, आईसीआईसीआई प्रुडेंशियल म्यूचुअल फंड, सुंदरम म्यूचुअल फंड, सीपीपी इन्व्हेस्टमेंट बोर्ड प्राइवेट होल्डिंग्ज आणि रेनबो इंवेस्टमेंट्स लिमिटेड यांचा समावेश आहे.


तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी सदर आयपीओचा पर्याय आजमावता येऊ शकतो.


सूचना : सदर लेखा व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची असून ती शिफारस समजू नयेत. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *