Top FMCG companies in india : भारतातील आघाडीच्या पाच एफएमसीजी (FMCG) कंपन्या.

FMCG companies in India
भारतात ऐंशीच्या दशकापर्यंतचा काळ असा होता जेव्हा ठराविक पण अगदी घरातील एक सभासद असल्याप्रमाणे काही उत्पादने भारतीयांच्या घरात नेहमी दिसून येत होती. अगदी सांगायचंच झालं तर डालडा वनस्पती, बोरोलीन, सिबाका, बिनाका असे अनेक. आजच्या चाळीशीपुढे असणाऱ्या अनेकांना आपल्या लहानपणीच्या आठवणींना असणारी त्यांची सोबत आठवत असेल.
 
 
पुढे 1991 मध्ये भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले. फारच महत्वाचं आणि काळाची गरज असलेल असं पाऊल होतं ते. याचा संदर्भ द्यायचं कारण म्हणजे या धोरणाची फळे दिसू लागल्यानंतर देशातील मध्यम वर्गाचा टक्का वाढला. त्यानुसार “गरजेच्या गोष्ठी” या शब्दाची व्याख्याच बदलून गेली.त्यामुळे FMCG ह्या क्षेत्रात नवनवीन ब्रँड्स आणि त्यांची नवीनवीन उत्पादने दिसू लागली.ऐंशीच्या दशकात अगदी सरकारी नोकरदार वर्गाच्या घरातही फक्त टीव्हीवर जाहिरातीत दिसणारी मॅगी कुठे आणि आता दर महिन्याला तेल, चहा, धान्याच्या सोबत महिन्याच्या किराणा खरेदीत एस्सेन्शिअल झालेले चीझ, फ्रोझन फ्रेंच फ्राइज सारखे प्रकार कुठे.
 
 
बरं हे सगळं सांगत सुरवात करायचं कारण म्हणजे अगदी सर्वसामान्य जनता ते अतिश्रीमंत अशा सर्वांना हवंहवंस वाटणारं हे उद्योग क्षेत्र म्हणजे Fast-Moving Consumer Goods अर्थात FMCG.
 
 
तसं पाहायला गेलं तर भांडवली बाजारात सुचीबद्ध अशा पंधरा मुख्य कंपन्या सांगता येतील पण आज आपण पाहणार आहोत या क्षेत्रातले “बेस्ट फाईव्ह” म्हणजे आघाडीच्या पाच कंपन्या ज्यांनी आपलं जीवन व्यापून टाकलंय. खालून वर म्हणजेच ‘काउंटडाऊन’ पद्धतीने आपण  पाहूया कंपन्या कोणत्या आहेत .

Top FMCG companies in india

5 ) ब्रिटानिया इंडस्ट्रीज Britania Industries : ( बाजारमूल्य रु. 83,595 कोटी ) 

भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक. कंपनी भारतीय मग नाव ब्रिटानिया कसं ? तर 1892 मध्ये कोलकातामध्ये 292 रुपयांच्या भांडवलावर काही ब्रिटीश व्यक्तींनी कंपनीची सुरवात केली. परंतु आता मात्र कंपनी वाडिया उद्योग समूहाच्या मालकीची आहे. देशभरात जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त रिटेल स्टोर्समध्ये त्यांची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत आणि भारतातील पन्नास टक्के घरात कंपनीच्या उत्पादनांचा वापर आहे.
कंपनीच्या एकूण उत्पन्नात फक्त बिस्किटांचा वाट 75 % आहे. त्यानंतर कंपनीची बेकरी, डेरी वगैरे उत्पादने आहेत.
 

4 ) डाबर इंडिया Dabur India : ( बाजारमूल्य रु. 95,741 कोटी ) 

या नावाची तशी गंमतच. डॉक्टर एस.के बर्मन यांनी या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय देवनागरी पद्धतीनुसार Daktar Burman अशा प्रकारे तेव्हा जनमानसात ओळख बनलेल्या या कंपनीचे नाव मग या दोन्ही शब्दांतील सुरवातीची Da आणि Bu अशी काही अक्षरे जुळवून Dabur हे नाव रूढ झाले.
उत्पादने : च्यवनप्राश, मध, हेअरऑईल, ओडोनील, फळाचे ज्यूस, टूथपेस्ट अशी बहुविविध उत्पादने.
3) नेस्ले इंडिया Nesle India : ( बाजारमूल्य रु.1,59,153 कोटी ) 
मुळची 150 वर्षे जुनी स्विस कंपनी पण भारतात रुळलेली. 1912 च्या सुमारास कंडेन्स्ड दुध उत्पादनाद्वारे भारतात उद्योगाची पायाभरणी. भारतीयांना सर्वात ओळखीचे उत्पादन म्हणजे ज्या प्रकारची सुरवात करून जनमानसांत रुजवलेले उत्पादन ते म्हणजे मॅगी या ब्रँड अंतर्गत बाजारात आणलेले इन्स्टंट नुडल्स. काहीवर्षांपुर्वी याच उत्पादनामुळे कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
कंपनीला 45.5% उत्पन्न फक्त दुग्धजन्य आणि न्युट्रीशीअस उत्पादनांमधून मिळतं.मॅगी आणि तत्सम उत्पादनांमधून 27.5% उत्पन्न प्राप्त होतं.त्यानंतर 13.5% कॉफीसारखी उत्पादने व  12.5% कन्फेक्शनरी म्हणजेच चॉकलेट्स सारख्या उत्पादनांमधून.बाकी 0.7% इतर उत्पादनांमधून होतं.
 
2 ) आयटीसी लिमिटेड ITC ltd : ( बाजारमूल्य रु. 2,51,531 कोटी )
जवळपास 110 वर्ष जुनी हि कंपनी मुळची सिगारेट उत्पादन करणारी. विल्स, गोल्ड फ्लेक , ब्रिस्टॉल, इंडिया किंग्स, क्लासिक हि सिगारेट्स अनेकांना माहित असतील पण आपण कंपनीला ओळखतो ते FMCG उत्पादक म्हणून. सनफिस्ट, आशीर्वाद, बिंगो, विवेल, सॅव्हेलॉन हि काही कंपनीची लोकप्रिय ब्रँड्स. पण तरीही लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आयटीसी आजही आशियातील तंबाखूजन्य उत्पादनांत मुख्य उत्पादक आहे. कंपनीचे सर्वात मोठे ग्राहकोपयोगी ब्रँड्स आहेत आशीर्वाद, सनफिस्ट. ज्यामधून कंपनीला जवळपास 65% उत्पन्नं मिळतं.
1 ) हिंदुस्तान युनिलिव्हर Hindustan Unilever : ( बाजारमूल्य रु. 5,66,023 कोटी ) 
‘भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी’ हि ओळख या कंपनीसाठी पुरेशी आहे. मुळच्या युनिलिव्हर या ब्रिटीश कंपनीची भारतातील उपकंपनी. भारतात असं एकही घर नसेल जिथे या कंपनीचे एकही उत्पादन नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जवळपास 20 विभागांत 35 ब्रँड्समध्ये या कंपनीचा भारतात FMCG उद्योग विस्तारलेला आहे. कंपनीची लोकप्रिय उत्पादने ब्रँड्स आहेत सर्फ एक्सेल, डव्ह, लक्स, लाइफबॉय, सनसिल्क, नॉर, क्लिनिक प्लस, व्हील इत्यादी. भारतीय FMCG उद्योगात हिंदुस्तान युनिलिव्हरचा वाट 40 % च्या आसपास आहे.
 

FMCG हे असं क्षेत्रं आहे ज्यात परिस्थितीनुरूप थोडीफार वाढ-घट नक्कीच पाहायला मिळू शकते पण गुंतवणुकीचा विचार करता हे त्या क्षेत्रांपैकी एक आहे आहे जे जगाच्या अंतापर्यंत टिकून राहू शकतात.

 
माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *