how to make money with digital marketinghow to make money with digital marketing

आज 28 जून 2023 रोजी आमच्या  @marathistock ट्विटर खात्यास पाच वर्षे पूर्ण झाली.

पाच वर्षापूर्वी 28 जून 2018 मध्ये हे खाते सुरु केले तेव्हा जे काही थोडं फार कळत होतं ते होतं फक्त शेअरमार्केट.

पण या पाच वर्षांत ब्लॉगिंग, मग वर्डप्रेस वेबसाईट, एमेझन एफीलीएट मार्केटिंग, ‘डील्स – ऑफर्स’ वेबसाईट, किन्डल ई-बुक, गमरोड इथपर्यंतचा प्रवास, आणि यादरम्यान थोडंफार डिजिटल मार्केटिंगसारख्या गोष्टी जाणून घेऊ शकलो. 

अर्थात आजही केवळ एकाच व्यक्तीकडून व्यवस्थापीत केल्या जाणाऱ्या या फाफट पसाऱ्याने पाच वर्षांचा हा पल्ला गाठणं शक्य झालं केवळ तुमच्या प्रतिसादामुळेच.

आज पाच वर्षानंतर सहजंच पाहिल्यावर लक्षात आलं कि व्यावसायिक लेखक वगैरे नसलो तरी नाही म्हणायला आपल्या नावावर स्वतःचे म्हणावेत असे जवळपास दोनशेहून अधिक लेख, तीन विविध विषयांना वाहिलेल्या वेबसाईट्स, आणि दोन पुस्तके (अर्थातच ई-बुक्स ) इतकी बौद्धिक वगैरे मालमत्ता जमा झाली आहे.कारण सगळ्याच गोष्टी पैशात तोलता येत नसल्या तरी काही मनाला समाधान नक्कीच देऊन जातात.

पण हे काय आणि कसं, हे आपल्यासारख्याच इतरांनाही समजावं आणि करू पाहता यावं, म्हणून यासंदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न. कारण यामध्ये कोणतीही तांत्रिक क्लिष्टता नाहीये तसेच फार खर्चिक वगैरे असंही काही नाही, म्हणजे हे अगदी कोणीही करू शकतो. हो अगदी बऱ्यापैकी स्मार्टफोन आणि कम्प्युटर हाताळू शकणारा कुणीही. 

म्हणजे कुठून सुरवात ?

असं कोणताही एक विषयाचा  कोपरा-कोनाडा (Niche ) निवडा ज्यामध्ये तुम्ही कौशल्ये बाळगता आणि ज्याबाबत तुम्ही बऱ्यापैकी व्यक्त होऊ शकता. 

आम्ही कसं केलं ?

वेबसाईट :

सर्वप्रथम ट्विटर, फेसबुक पेजने सुरुवात होऊद्या. जसं आम्ही मराठी स्टॉक साठी केलं. तर असंच तुमच्या स्वारस्य आणि कौशल्याचा विषय निवडल्यानंतर त्या विषयाला चिकटून राहा. विषयाबाबतची नाविन्यपूर्ण, सर्वोत्तम माहिती आपल्या अनुसारकांना देण्याचा प्रयत्न असुद्या. तदनंतर थोडाफार जम बसल्यानंतर वेबसाईट साठी प्रयत्न करू शकता. सुरुवात गुगलच्या Blogger ने होऊद्या. वेबसाईटसाठी एखादं नाव ठरवावं. सब-डोमेन ऐवजी स्वतःचं डोमेन असण्यास प्राधान्य द्या. Hiox  सारख्या  व्यासपीठावर किमान किंमतीत डोमेन मिळवू शकता. किंवा तुमच्या पसंतीचा इतर पर्याय सुद्धा निवडू शकता. यांनतर ब्लॉगरवरच वेबसाईट उभारू शकता. यासाठी युट्युब मदतीला आहेच.

चांगला जम बसल्यानंतर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेस कडे स्थलांतरित करू शकता यासाठीच्या होस्टिंगसाठी तुमच्या पसंतीचा किंवा होस्टींगर सारखा पर्याय निवडू शकता. जिथे एकल वेबसाईटसाठी वर्षाला अडीच हजाराच्या आसपास खर्च येतो. युट्युबच्या सहाय्याने तुमची ब्लॉगर वेबसाईट तुम्ही वर्डप्रेसवर सहजरीत्या स्थलांतरित करू शकाल.

आता वेबसाईट बनवून जवळपास सहा महिने झाल्यानंतर तुम्ही ती गुगल एड सेन्ससाठी सबमिट करू शकता. लक्षात असुद्या “कंटेंट इज द किंग” म्हणजेच उत्तमोत्तम कंटेंट तुमच्या डिजिटल यशाची गुरुकिल्ली असते. गुगल एड सेन्ससाठी एप्लाय करताना तुमच्या वेबसाईटवर नियमित लेख येत असतील याची काळजी घ्या. विषयांची निवड तसेच लेखन करण्यासोबतच ‘सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन’ (SEO) समजून घ्यावे. आता एआयच्या (AI ) युगात हे सोप्पं आणि आव्हानात्मक असं दोन्ही भासू शकतं.

एफीलीएट असोसिएट:

हे सगळं करत असतानाच ‘एफीलीएट मार्केटिंग’ नावाचा प्रकार सुद्धा शिकून घ्यावा.याची सुरुवात एमेझन एफीलीएट असोसिएट पासून करता येईल.आपल्या सोशल मिडिया खात्यावरून ‘एफीलीएट मार्केटिंग’ करताना प्रॉडक्ट्स तुमच्या  कंटेंटशी संबंधित राहील याची काळजी घ्यावी. 

एफीलीएट मार्केटिंग करताना त्याच्याशी संबंधित वेबसाईट बनवता आली तर उत्तमच, जशी आमची स्वतःची द डील ( The Deal ) या नावाची वेबसाईट आहे. तुम्ही आमच्या या वेबसाईटला आणि तिच्याशी  संबंधितट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

किन्डल ई-बुक :

‘वाचनाने माणूस शहाणा होत असेल तर “लेखनाने ते शहाणपण तपासता येतं” असं आमचं मत आहे. लेखन बऱ्यापैकी जमू लागलेलं असेल तर आणि आपल्या आवडत्या क्षेत्रातील सांगण्यासारखे किंवा असलेलं थोडंफार ज्ञान वाटावसं वाटत असेल तर. ई-बुक हा उत्तम पर्याय आहे आणि इथेही एमेझन तुमच्या सोबत आहे. किन्डल डायरेक्ट पब्लिशिंग अर्थात KDP  च्या सहाय्याने तुम्ही तुमचं लिखाण ई-बुकमध्ये परावर्तीत करून एमेझनवर विक्री करिता ठेवू शकता. अर्थात इतेही पैसे कमावणे दुय्यम आणि लेखनाची आवड जोपासणे तसेच कौशल्ये, ध्यान इतरांमध्ये वाटण्यास प्राधान्य दिलं तर त्यातून मिळणारं समाधान मोठं असतं. आणि यातही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय टूल्स उपयुक्त ठरू शकतात. फक्त त्यांचा कल्पकतेने वापर करता आला पाहिजे.

याप्रकारे आम्ही आमची खाली दिलेली दोन ई-पुस्तके एमेझनवर उपलब्ध करून दिली आहेत.

1 ) Take it “Personally”


2 ) 
शेअर मार्केटची तयारी

बरं हे सगळं करत असताना आपण आपल्या मुख्य व्यवसायास अनुसरून काही प्रयत्न या डिजिटल माध्यमाद्वारे करू शकता. जसं आम्ही आमच्या नव्या https://legitance.in/ या प्रयत्नातून करीत आहोत. लेजीटान्सच्या माध्यमातून आम्ही लीगल, डिजिटल आणि फायनान्स ( विमा ) संबंधित सल्ला आणि सेवा पुरवीत आहोत. आपण आमच्या या वेबसाईटला आणि ट्विटर खात्यास नक्की भेट द्या.

याव्यतिरिक्त मराठी माणसांकडून होत असणाऱ्या उद्यमशील प्रयत्नांना जास्तीत जास्त पोहोच मिळावी या हेतूने सुरु केलेलं मी उद्यमी हे ट्विटर खातेही आहेच. आपल्या माहितीतील कोणीही व्यक्ती जी स्वयंरोजगार उभारू पाहतेय तसेच आपल्या या प्रयत्नांतून इतरांसाठी रोजगार निर्माण करू पाहत असेल तर अशा व्यक्तींच्या उद्यमशील तेची माहिती आमच्या पर्यंत नक्की पोहोचावा आम्ही त्यांना आमच्या या खात्याद्वारे प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. 

डिजिटल मार्केटिंग :

तुमचं उत्पादन – सेवा थेट असो वा डिजिटल, डिजिटल मार्केटिंग हि फार महत्वाची बाब बनलीये. तुम्ही वर वाचलं असेल कि दिलेल्या सर्व प्रकारांत डिजिटल मार्केटिंगचा वापर आम्ही केलेला आहे. मग ते आमच्या समाज माध्यमी खात्यावरून केलेली ‘एफीलीएट मार्केटिंग’ असो किंवा मग वेबसाईटवरील लेखांद्वारे पुरवलेली शेअरमार्केट, आर्थिक संकल्पना विषयक माहिती असो किंवा मग  डीमॅट खाते उघडण्याबाबतचे मार्गदर्शन असो.आता चॅट जीपीटी सारख्या विविध एआय टूल्समुळे डिजिटल उत्पादनांचा वेग वाढणारच आहे. नुकतंच प्रकाशित झालेले आमचे नवीन ई-पुस्तक याचेच उदाहरण आहे. हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन (पर्सनल फायनान्स) संदर्भातील पुस्तक आम्ही एमेझन सोबतच गमरोड (Gumroad) या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे.

आमच्या ट्विटरवरील सुरवातीस पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिलेल्या या माहितीचा उद्देश आमचा इथपर्यंतचा प्रवास सांगणे नसून, समाज माध्यम आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करून काही नवं – वेगळं करू पाहणाऱ्या व्यक्तींना याद्वारे थोडक्यात मार्गदर्शन करण्याचा आहे. अर्थात हे प्रयत्न करतानाच आपला मूळ व्यवसाय – नोकरी यांना अंतर देण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा इथे नमूद करणे महत्वाचे वाटते,

धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *