World's Happiest Countries in marathiWorld's Happiest Countries in marathi

हे आहेत जगातील सर्वाधिक आनंदी देश.
World’s Happiest Countries

सुखं म्हणजे नक्की काय असतं ? “सुख , आनंद वगैरे सगळं मानण्यावर आहे.” असे बरेच तत्वज्ञानी बोल आपल्याला नेहमी वाचायला , ऐकायला मिळत असतात. पण सुखी असणे म्हणजे नक्की काय, याचा खरंच कधी विचार केला आहे का ? सुखी माणसाचा सदऱ्याबद्दल बर्ट्रांड रसेल सारख्या सिद्धहस्त लेखकालाही लिहावसं वाटलंय. सुख दुर्मिळ गोष्ट आहे का ? तसंही असु शकतं, कारण अगदी अब्जावधी रुपयांची धनी असलेली व्यक्तीही सुखी असेलच असं आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही.
 
आज असा काहीसा वेगळा विषय घेण्याचं कारण म्हणजे जवळपास दीड वर्ष जगातून सुख, आनंद असे समानार्थी भावना दुर्मिळ झाल्यासारखं झालंय . कोरोना महामारीने अवघ्या मानवजातीला “स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे काय ?”, हे नव्याने अनुभवायला दिलं. अगदी इंग्लंडसारख्या एकोणिसाव्या शतकापर्यंत जगाचे राज्यकर्ते म्हणून मिरवलेल्या देशालाही याची अनुभूती आलीच.
 
पण या काळातही म्हणजे 2020 मध्येही जगातील सर्वाधिक आनंदी असे देश कोणते होते याची यादी (World Happiness Report ) मात्र बनली आहे. या यादीमधील एकूण देशांपैकी आघाडीचे वीस म्हणजे जगातील सर्वाधिक आनंदी असे 20 देश कोणते आहेत ते पाहूया.
  1.  फिनलँड
  2. आईसलँड
  3. डेन्मार्क 
  4. स्वित्झर्लड
  5. नेदरलँड
  6. स्वीडन
  7. जर्मनी
  8. नॉर्वे
  9. न्युझीलँड 
  10. ऑस्ट्रिया 
  11. इस्राएल 
  12. ऑस्ट्रेलिया 
  13. आयर्लंड 
  14. अमेरिका
  15. कॅनडा
  16. चेक रिपब्लिक 
  17. बेल्जियम 
  18. इंग्लंड 
  19. तैवान 
  20. फ्रान्स  
सदर आकडेवारी हि निर्देशांक मुल्यानुसार काढण्यात आलेली आहे ज्यात दरडोई जीडीपी, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य आणि अपेक्षित वयोमर्यादा, आवडी-निवडीचे स्वातंत्र्य, भ्रष्टाचार आदींबद्दल असलेल्या सामाजिक जाणीवा, समाजातील औदार्याची भावना इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास केला  गेला आहे.
बरं हि यादी होती आनंदीपणात आघाडीवर असलेल्या वीस देशांची. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यात आपल्या देशाचा समावेश आहे का ? आणि असेल तर कितवा क्रमांक आहे भारताचा ?
 
तर यात भारताचा नंबर आहे 92 आणि आपल्यानंतर असलेले देश आहेत जॉर्डन, टांझानिया आणि झिम्बाब्वे..  तसंच आपल्या आधी म्हणजे आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर नायजेरिया , बांग्लादेश , ताजिकिस्तान हे देश अनुक्रमे 59 , 68 , 62 व्या क्रमांकावर आहेत.
 

जाता-जाता इतकंच सांगू शकतो कि जसं पैशाचं सोंग नाही आणता येत तसंच सुखाचं सोंग हि नाही वटवता येत..

 
सदर लेखासाठी वर्ल्ड हॅप्पिनेस रिपोर्टचा संदर्भ घेण्यात आला आहे. सदर रिपोर्ट अधिक माहिती आणि तपशिलासह तुम्ही इथे क्लिक करून मिळवू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *