मुंबई, ता. 24 जून 2021 : कोवीड-19 च्या महामारीविरुध्द लढण्यासाठी मिरे ऍसेट फाऊंडेशनने 15 हजार मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. लसीकरणासाठी मिरे फाऊंडेशनने वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पीटल तसेच नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे सहकार्य घेतले आहे. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील लसीकरण हे प्रत्यक्षात विले पार्ले पश्चिम येथील जमनाबाई नरसी स्कुलमध्ये केले जाणार आहे. मोफत लसीकरणाच्या या मोहिमेतुन मुंबईतील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास मदत केली जाणार आहे. मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोवीड संसर्गाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊन हटविेले जात असताना ही मोहिम सुरु केल्याने लसीकरणास वेग येऊन अधिकाधिक नागरीकांना तातडीने कोवीडपासून सुरक्षाकवच मिळण्यास मदत होणार आहे.
मिरे ऍसेट (Mirae Asset) फाऊंडेशनतर्फे मुंबईत कोवीड-19 लसीकरण मोहिमेस पाठबळ.
मिरे ऍसेट (Mirae Asset) फाऊंडेशनचे संचालक रितेश पटेल या लसीकरण मोहिमेबद्दल बोलताना म्हणाले की, एक जबाबदार कॉर्पोरेट घटक या नात्याने मिरे अॅसेट आपले कर्तव्य बजावत आहे. लस उपलब्ध होण्याबाबत असलेल्या आव्हानांचा विचार करत आपल्या दररोजच्या आरोग्य आणि रुग्णालय सेवेत सामाजिक आरोग्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांबरोबर आम्ही या मोहिमेसाठी भागीदारी केली आहे.
लसीकरणाच्या नोंदणीबाबतची इत्यंभूत माहिती मिरे ऍसेटच्या संकेतस्थळावरच असलेल्या मिरे ऍसेट फाऊंडेशनच्या वेबपेजवर उपलब्ध आहे.
कोवीड महामारीच्या उद्रेकानंतर मिरे ऍसेट फाऊंडेशनने कोवीड-19 विरुध्द लढण्यासाठी अनेक नाविन्यपुर्ण आणि व्युहात्मक योजना हाती घेतलेल्या आहेत. विविध सरकारी संस्थांबरोबर भागीदारी करत मिरे ऍसेट फाऊंडेशनने कोवीड-19 च्या चाचणीसाठी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेक केंद्र सुरु केली आहेत. मिरे फाऊंडेशनच्या या मदतीमुळे किमान दहा हजार नागरिकांना चाचण्यांच्या माध्यमातून फायदा झाला आहे. मिरे ऍसेट फाऊंडेशनने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आरएनएन एक्सट्रॅक्शन यंत्र, आरएनए एक्सट्रॅक्शन किटस्, आरटी-पीसीआर यंत्र आणि औद्योगिक वापराचे रेफ्रीजरेटर्स आदी वैद्यकीय यंत्रे परळच्या हाफकिन इन्सिट्युट तसेच कळव्यातील सीएसटीएम हॉस्पीटल या दोन संस्थांना देणगीदाखल भेट देत या संस्थांची क्षमता वाढविण्यास हातभार लावला आहे.