Best Lifetime Free Credit Cards in indiaBest Lifetime Free Credit Cards in india

“क्रेडीट कार्ड बाळगणे चांगलं कि वाईट?”

हा प्रश्न खरतर व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे जर ‘चाकू’ एखाद्या उत्तम शेफच्या हातात असेल तर त्याचा उपयोग उत्तमोत्तम अन्नपदार्थ बनविण्यासाठी केला जाऊ शकेल, पण तोच चाकू एखाद्या माथेफिरूच्या हाती असेल तर ? क्रेडीट कार्ड्सचं सुद्धा काहीसं असंच आहे. ते ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्याव्यक्तीच्या स्वभावावर ते क्रेडीट कार्ड त्याचा मित्र आहे कि शत्रू हे अवलंबून असतं.

आम्ही या आधीही सांगितलंय कि योग्य प्रकारे वापरलं तर क्रेडीट कार्ड फारच उपयुक्त आहे. पण एखाद्याचा स्वभाव उधळपट्टी करण्याचा असेल तर क्रेडीट कार्डसारखा अर्थपात घडवणारा शत्रू नाही. त्यामुळे क्रेडीट कार्ड बाळगावे कि नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. गरज आणि चैन यांच्यातील फरक समजण्याइतपत वित्तसाक्षरता तुमच्यात असेल आणि त्यानुसार क्रेडीट कार्डचा उत्तम वापर करता येत असेल तर मग वरील प्रश्न तुमच्यासाठी नाहीच.

यानुसार आमच्या वापर आणि अनुभवानुसार लाइफटाईम फ्री या गटातील 4 सर्वोत्तम क्रेडीट कार्ड कोणती हे आज आम्ही सांगणार आहोत. हे सांगण्याआधी काही महत्वाचे मुद्दे पुढे स्पष्ट करत आहोत. (Best Lifetime Free Credit Cards in india)

टॉप 4 का ? 5 का नाही ? कारण आमच्या स्वतःजवळ विविध बँकांची लाइफटाईम फ्री या गटातील जवळपास 10 कार्ड्स असली तरी उपयुक्तता आणि वैशिष्ट्यांनुसार आवर्जून नावं घ्यावीत अशी हि चारच आहेत. उगाच आजच्या शिरस्त्यानुसार ऐकायला आणि लिहायला बरं दिसतं म्हणून त्यामध्ये आणखी एक कुठला तरी जोडून “टॉप 5” कशाला सांगू.

कार्डच्या माहितीसोबतच ऑनलाईन एप्लायसाठी दिलेल्या लिंक्सपैकी केवळ 2 कार्ड्सच्या लिंक्स या आमच्या रेफरल लिंक आहेत त्यामुळे हि माहिती रेफरल वगैरे डोळ्यासमोर ठेवून केलेला हा आटापिटा नव्हे हे कृपया लक्षात घ्यावे. कारण तसं करायचं असतं तर उत्तम रेफरल प्रोग्राम असणाऱ्या इतर 4 ते 5 कार्डांचा सहज समावेश आम्ही या सर्वोत्तम लिस्टमध्ये केला असता, पण तसं होणे नाही कारण अनुभवातून, वापरातून जे-जे योग्य आणि उपयुक्त वाटलं केवळ तेच सांगण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. इतर बाबी आमच्यासाठी नेहमीच दुय्यम.

तर पाहूया आमच्या मते चार सर्वोत्तम लाइफटाईम फ्री क्रेडीट कार्ड्स त्यांची वैशिष्ट्ये आणि पूर्णतः ऑनलाईन पद्धतीच्या एप्लाय करण्याच्या लिंकसह. (Best Lifetime Free Credit Cards in india)

  • संपूर्णता मेटल अर्थात धातूने बनलेले क्रेडीट कार्ड.
  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • रिवार्ड पॉईंट्स रिडम्पशन शुल्क नाही.
  • पूर्णतः एप आधारित कार्ड.म्हणजेच वापरकर्त्याच्या हाती कार्डचे संपूर्ण नियंत्रण.
  • महिन्यात किमान तीन कॅटेगरींसाठी वापर केल्यास सर्वाधिक वापराच्या 2 कॅटेगरींसाठी मिळालेल्या रिवार्ड पॉईंट्समध्ये 5 पटींनी वाढ.
  • रिवार्ड पॉईंट्स रिडम्पशनद्वारे एखाद्या खरेदीचे पैसे परत मिळवणे शक्य तसेच वन क्रेडीट कार्डचे बिल सुद्धा पे करता येते. रिडम्पशन शुल्क नसल्याने यामध्ये अतिरिक्त भार नाही.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • महिन्यास 25 हजारांवर वापर तसेच वापरकर्त्याच्या वाढदिवशी नेहमीच्या निकषांच्या 10 पट रिवार्ड पॉईंट्स.
  • रिवार्ड पॉईंट्सचा वापर नेहमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन (इन स्टोर) खरेदीसाठीसुद्धा शक्य.
  • इतर क्रेडीट कार्ड्सच्या तुलनेत कमी म्हणजेच 9% ते 42% दरम्यान व्याजदर.
  • इंटरेस्ट फ्री अर्थात व्याजमुक्त कॅश विड्राव्हल म्हणजेच कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर कमाल 48 दिवसांपर्यंत व्याज आकारले जाणार नाही. केवळ प्रती व्यवहार कॅश एडव्हांस शुल्क रु.199 + जीएसटी लागू.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : नाही (लाइफटाईम फ्री)
  • अमेझनवरील खरेदीवर प्राइम मेंबर्सना फ्लॅट 5% कॅशबॅक ( तर इतरांना 3%)
  • अमेझन व्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या खरेदीवर फ्लॅट 1% कॅशबॅक.
  • कॅशबॅक दर महिन्यास अमेझन एप मधील आपल्या खात्यातील अमेझन पे बॅलंस च्या रूपाने जमा होत असल्याने कोणतंही रिडम्पशन शुल्क नाही.

  • जॉईनींग शुल्क : नाही
  • वार्षिक शुल्क : रूपे अर्थात युपीआय पेमेंटसाठी असणाऱ्या बहुतांश क्रेडीट कार्ड्सना जॉईनींग तसेच वार्षिक शुल्क आहे पण जर तुमच्याकडे आधीच एक आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्ड असेल तर हे कार्ड तुम्हाला मोफत जॉईनींगसह लाइफटाईम फ्री मिळू शकेल.
  • महिन्यास रु.25 हजारांवरील वापर तसेच वापरकर्त्याच्या वाढदिवशी नेहमीच्या निकषांच्या 10 पट रिवार्ड पॉईंट्स.
  • रिवार्ड पॉईंट्सचा वापर नेहमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन (इन स्टोर) खरेदीसाठीसुद्धा शक्य.
  • इतर क्रेडीट कार्ड्सच्या तुलनेत कमी 9% ते 42% व्याजदर.
  • इंटरेस्ट फ्री अर्थात व्याजमुक्त कॅश विड्राव्हल म्हणजेच कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर कमाल 48 दिवसांपर्यंत व्याज आकारले जाणार नाही. येथे केवळ प्रती व्यवहार कॅश एडव्हांस शुल्क रु.199 + जीएसटी लागू.

वरील माहिती हि आमच्या वापर आणि अनुभवानुसार लाइफटाईम फ्री या गटातील 4 सर्वोत्तम क्रेडीट कार्डबद्दल आहे. क्रेडीट कार्ड कितीही उत्तम असलं तरी त्याचा हुशारीने वापर आपल्यालाच करायचा असतो. बाकी अनेक क्रेडीट कार्ड्स असतील तर त्यांच्या वेळेवर बिल पेमेंटसाठी क्रेड सारखी एप्स आहेतच. असो, माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

सदर लेख हा शिफारस नसून केवळ माहितीदाखल आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *