त्याचं वय आहे 29, एका मोठ्या घरात आपल्या दहा मित्र कम सहकाऱ्यांसोबत तो राहतो. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या नव्या खाद्यशैलीनुसार तो व्हेगन आहे. टोयोटा कोरोला हि आजच्या काळात अगदीच जुनी म्हणावी अशी गाडी त्याच्याकडे आहे. (sam bankman fried youngest billionaire in the world in marathi)
आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय ? दर शंभरा मागे पन्नास एक जण अशी सहज सापडू शकतात. पण थांबा.. या तरुणाची माहिती इथेच संपत नाही. कारण अजून आम्ही त्याची संपत्ती सांगितलेली नाही.
तर त्याची संपत्ती आहे २२.5 अब्ज डॉलर्स. (sam bankman fried net worth 2022 in marathi) म्हणजे आपल्या भारतीय रुपयांत 16,86,60,22,50,250 इतकी. थोडं सोप्पं करून म्हटलं तर जवळपास एक लाख अडसष्ट हजार कोटी रुपये. आणि यातील बरीचशी संपत्ती त्याला दान करायचेय. आणि त्याने तशी सुरवातही केलेय. दान करायचेय म्हणजे रस्त्यात जो कोणी भेटेल त्याला तो पैसे वाटणार असं नाहीये, तर जगभरात ज्या मानवजातीच्या किंबहुना विश्वाच्या भल्यासाठी जी काही विधायक कामे होऊ घातलीत त्यासाठी तो त्याची संपत्ती टप्प्या-टप्प्याने दान करणार आहे.
बरं हि संपत्ती त्याने काही वडिलोपार्जित किंवा कुटुंबाचा पिढीजात उद्योग व्यवसाय वाढवून वगैरे कमावलेय असंही काही नाही.तसा तो बऱ्यापैकी सधन कुटुंबात जन्माला आला. म्हणजे त्याचे आई-बाबा दोघेही विख्यात अशा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कायदा विद्यालयात प्राध्यापक राहिलेय. म्हणजे उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आला.
ओह्ह सॉरी.. त्याचं नाव तर आम्ही तुम्हाला सांगितलंच नाहीये. तर जगातील या सर्वात तरुण अब्जाधीश तरुणाचं नाव आहे सॅम बँकमन-फ्रिड ( FTX founder Sam Bankman-Fried is the youngest billionaire in the world in marathi ) आणि त्याची ओळख म्हणायची तर जगातलं महत्वाच्या क्रीप्टो एक्सचेंजपैकी एका असणाऱ्या एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंजचा निर्माता.
कसं सुरु झालं ? (sam bankman fried’s childhood)
घरी शैक्षणिक पार्श्वभूमी असली तरी सॅमला शिकण्यात रस वाटत नव्हता ( समविचारी लोकांनी उगाच मनात खुश होण्याऐवजी पुढे वाचावे ) कारण सातव्या-आठव्या इयत्तेत असताना तसं त्याने आई बाबांना बोलूनही दाखवले कि हे अशा प्रकारचं शिक्षण त्याला फारच बोअरिंग वाटतं. त्याला शिक्षणापेक्षा शिक्षण पद्धतीबद्दल आक्षेप होता. मग त्याच्या पालकांनी थोडा विचार करून त्याला आकडेवारीत रस निर्माण व्हावा म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगळ्या प्रकारे गणितात रुची निर्माण करणाऱ्या कॅम्पमध्ये त्याला पाठवलं. आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला. म्हणजे त्याचे समस्या सोडवण्याचे आणि व्यवस्थापनाचे कौशल्य यामुळे सुधारले.
माध्यमिक शिक्षणानंतर सॅम प्रसिद्ध अशा एमआयटीमध्ये (sam bankman fried graduated from MIT) फिजिक्स शिकण्याचा निर्णय घेतला, आता असंही म्हणतात कि हा निर्णय त्याने छापा–काटा करून घेतला होता. तसं असेलही, पण लक्षात घ्या शिक्षणात रस वाटत नव्हता म्हणून त्याने शिक्षण सोडलं नाही.(sam bankman fried education)
इथे ‘एप्सिलॉन थीटा’ नावाच्या एका ग्रुप हाऊसमध्ये सामील झाला आणि जिथे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आधी इथे तो मित्रांसोबत कम्प्युटरवर रात्रभर गेम खेळत जागरण करणे हा त्याचा रोजचा कार्यक्रम असे. पण नंतर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षापासून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला.
इतर अनेकांप्रमाणे पैसा कमावणे हे त्याचं धेय्य बनलं, पण तो कमावण्याचं कारण वेगळं होतं.
पैसा कमवावा, कारण तो देता यावा, जगातील विधायक गोष्टींसाठी. आणि यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवावा हे त्याने लक्ष्य ठेवले. मग यासाठीच सुरवातीला त्याने वॉलस्ट्रीटवरील एका गुंतवणूकदार कंपनीत नोकरी स्वीकारली. आणि या क्षेत्रात, खरंतर आवडीच्या क्षेत्रात त्याला मनाप्रमाणे शिकता आलं.
पण त्याची अब्जाधीश म्हणून ओळख बनली क्रीप्टोचलन क्षेत्रातून. 2013 मध्ये त्याच्या एका मित्राने त्यावेळी अगदी नवं असणाऱ्या या क्षेत्रातील व्यवहारांसाठी एक बॉट बनवला. सॅमला त्याचं हे काम फारच आवडलं. पण त्याच्या या मित्रासोबत काम करण्यासाठी अजून पाच वर्षांचा काळ जावा लागला. 2018 मध्ये ते आपल्या एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंज करिता एकत्र आले, हे एक्स्चेंज म्हणजे जसं बायनान्स आणि आपल्याकडील वाझिरेक्स प्रमाणे.
पण त्या आधी सॅमने काय केलं. (How did sam bankman fried make millions of dollars from bitcoin )
क्रीप्टोचलन प्रकार माहित झाल्यानंतर आपला बराचसा काळ हा प्रकार समजून घेण्यात तो घालवू लागला. बिटकॉईनचे ते दिवस आजच्या सारखे नव्हते. अशाच एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की बिटकॉईनची अमेरिकेतील किंमत होती १० हजार डॉलर्स आणि त्याच वेळी त्याचे जपान एक्स्चेंजमध्ये मूल्य होते ११ हजार डॉलर्स. हि संधी सॅमच्या लक्षात आली. मग काय, अमेरिकेतून खरेदी करा आणि जपान मध्ये विका. असा दर आठवड्याचा त्याचा कार्यक्रम ठरून गेला.
यातून त्या काळात सॅमने कमावले 20 मिलियन डॉलर्स. आणि मग तो फुलटाइम क्रीप्टोट्रेडर बनला. यातूनच मग आधी सांगितल्याप्रमाणे त्याने एफटीएक्स क्रीप्टो एक्सचेंजची स्थापना केली. आणि अगदी दोन वर्षांच्या अवधीत त्याची हि कंपनी जगातील 40 बिलियन डॉलर्स मूल्याचं एक मोठं क्रीप्टो एक्सचेंज बनलं.
‘देण्यासाठी कमावणे’ (Earn to Give) हा सॅमचा फंडा आधीच होता, पण आता तो आणखी चांगल्या प्रकारे राबवू लागला होता. मागील वर्षी सॅमने 50 मिलियन डॉलर्स दान केलेत तसंच येत्या वर्षभरात 500 मिलियन डॉलर्स दान करण्याचं त्याचं लक्ष्य आहे. आणि दशकभरात १० बिलियन डॉलर्स या जगाच्या कल्याणासाठी वाटण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे.
त्याने आतापर्यंत मदत केलेल्या प्रकारात ग्लोबल वार्मिंग, कोव्हीड-19 संकटाचा सामना करण्यासाठी केलेल्या विविध उपाय योजनांसाठी फंडिंग, उष्णकटिबंधातील विविध आजार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राणीजीव आणि विविध प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन. कारण या वसुंधरेवर माणसाइतकाच त्यांचाही अधिकार आहे असं ठाम मत सॅमचं आहे. आणि कदाचित म्हणूनच आपण वेगन असल्याचं तो आवर्जून सांगतो.
जगातील सर्वात श्रीमंत तरुण व्यक्ती (youngest billionaire in the world Sam Bankman-Fried) असूनही कोणतीही महागडी गाडी किंवा अगदी मिरवण्यासारखी गोष्ट सॅम बाळगत नाही.
कारण श्रीमंती हि मिरविण्याची गोष्ट नाहीये.
जास्तीत जास्त पैसा कमावणे हे जगातील सर्वांचं धेय्य असतं, पण तो इतरांची ‘जास्तीत जास्त मदत करण्यासाठी’ हि विचारसरणी मात्र सॅम सारख्या अगदी विरळ असणाऱ्या व्यक्तींचीच असू शकते.
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर असे वेगवेगळी माहिती देणारे लेख आवडत असतील तर आपण आमच्या ट्विटर, इन्स्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करू शकता. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा