dhanteras in marathidhanteras in marathi

तसं म्हटलं तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस.(dhantrayodashi 2022 marathi) यंदा धनत्रयोदशी 22 नोव्हेंबरला येतेय.(dhanteras date) धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून अनेकजण या दिवशी सोने खरेदी करतात. तुमचा सुद्धा या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर मग तुम्ही काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्यायलाच हव्यात. (dhanteras in marathi )

सोनं खरेदी करताना बिलामध्ये काय तपासावं ? (Gold purchasing info in marathi )

तर सर्व प्रथम, तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिन्यांवर हॉलमार्क आहे का ते तपासायला हवं. हॉलमार्क हे आपल्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या धातूच्या शुद्धतेची खात्री देणारे मानक आहे. ( BSI Hallmark Info)

कॅरेटहॉलमार्क वर्गवारी
23958
22916
21875
18750
hallmark gold purity chart in marathi

त्यानंतर, सोनार अर्थात ज्वेलरकडून या खरेदीसाठी मिळणाऱ्या बिलामध्ये महत्त्वाची माहिती नमूद असणे आवश्यक आहे. धनत्रयोदशीच नव्हे तर अगदी वर्षभरात इतर वेळीसुद्धा सोन्याचे दागिने खरेदी करताना बरेच ग्राहक ज्वेलर्सकडून मिळालेलं बिल नीट तपासून पाहत नाहीत. खरंतर सोन्याचे दागिने त्याची डिझाईन वगैरे निवडताना जो चोखंदळपणा आपण दाखवतो तितकाच तो या दागिन्यांच्या खरेदीनंतर मिळणारं बिल तपासताना दाखवायला हवा.

बिलामध्ये महत्त्वाची माहिती असल्याने भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास त्यात आपली बाजू भक्कम राहते.त्याही पुढे समजा तुम्हाला तुमचे दागिने भविष्यात काही कारणास्तव विकायचे असतील तर तेव्हाही ते बिल उपयुक्त ठरतं. भारतीय मानक ब्युरोने (BIS) आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देताना असे म्हटले आहे की सोन्याचे दागिने खरेदी करताना किरकोळ विक्रेत्याकडून किंवा दागिन्यांकडून योग्य बिल किंवा हॉलमार्क केलेल्या वस्तूचे तपशीलवार बिल घेणे आवश्यक आहे. 

तपशीलवार म्हणजे नेमकी कोणती माहिती बिलामध्ये नमूद असणे आवश्यक आहे ?

बीआयएस वेबसाइटनुसार, बिलामध्ये प्रत्येक दागिन्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे दागिन्याचे वजन, धातूची शुद्धता आणि सूक्ष्मता यांची नोंद असावी. त्याशिवाय हॉलमार्किंग शुल्कही त्यात नमूद केलेलं असावे. BIS ने असेही स्पष्ट केले आहे कि आहे की जर ग्राहकाची इच्छा असेल तर तो हॉलमार्क केलेल्या आपल्या दागिन्यांची शुद्धता BIS मान्यताप्राप्त केंद्रातून तपासून घेऊ शकतो.

बिलामध्ये माहिती कशी असावी हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. समजा तुम्ही 22 कॅरेट सोन्याची 8 ग्रॅमची साखळी खरेदी करत असाल, तर ज्वेलर्सने तुम्हाला दिलेल्या बिलात त्या साखळीचे नाव आणि वर्णन केलेले असले पाहिजे. म्हणजे दागिन्यांची संख्या म्हणून एक असे लिहिलेले असावे.तर वजनात 8 ग्रॅम लिहिलेले असणे आवश्यक आहे. शुद्धतेच्या वर्णनात, 22 कॅरेट असं नमूद केलेले असावे. 

सोन्याचा आजचा भाव किंवा Gold Price today तपासून पहा

त्यानंतर सोन्याची किंमत हि खरेदीच्या वेळी सोन्याच्या मुल्यानुसार असेल आणि त्यात घडणावळ अर्थात मेकिंग चार्जेस याचाही उल्लेख असावा. सोन्याचा आजचा भाव किंवा Gold Price today असं आपण बरेचदा गुगलवर सोन्याचा दर पाहण्यासाठी सर्च करतो. तर प्रत्यक्ष खरेदी करताना सोन्याच्या पेढीवर दिसणाऱ्या दरावर विसंबू नका. यावेळी सुद्धा सोन्याचा त्या दिवशीचा दर शोधा. तुम्ही खरेदी करत असणारा दागिना 22 कॅरेटचा असेल तर त्याचा तुमच्या शहराचा दर शोधा आणि पडताळा. ज्वेलरकडे असणारा दर वेगळा वाटत असेल तर त्यासंदर्भात विचारणा करा. एक ग्राहक म्हणून तुम्हाला खरेदी करतेवेळी आपल्या शंका दूर करून घेण्याचा पूर्ण हक्क असतो आणि जर ती शंका खरेदी सोन्याच्या दागिन्यांसारख्या महत्वाच्या खरेदीबाबत असेल तर मनात कोणताही किंतु ठेवू नका. (Gold buying tips in Marathi )  

हॉलमार्क शुल्क आणि इतर तपशील ( Hallmarking Charges )

दागिन्यांचे हॉलमार्किंग शुल्क जे पूर्वी ते 35 रुपये होते मात्र 4 मार्च 2022 पासून ते आता 45 रुपये प्रती दागिना झाले आहे. जर तुमच्या सोन्याच्या साखळीमध्ये कोणताही खडा ( स्टोन ) बसवला असेल, तर ज्वेलर्सने बिलात त्याची किंमत आणि वजन आदी तपशील स्वतंत्रपणे लिहिणे आवश्यक आहे. सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर सोन्याच्या शुद्धतेबाबत काही शंका असल्यास हॉलमार्क चाचणी केंद्रावर त्याची तपासणी करून घेता येते. यासाठी तुम्हाला 200 रुपये टेस्टिंग शुल्क द्यावा लागेल. BIS-संलग्न असलेल्या धातूंची पारख करणाऱ्या तसेच हॉलमार्किंग केंद्रांची यादी BIS वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *